परतणा-यांबद्दल

Submitted by उद्दाम हसेन on 22 August, 2013 - 00:28

मी सर्वप्रथम हे स्पष्ट करतो कि हा बाफ भारतात परतणा-यांचे जे अनुभव इथल्या लोकांना येतात त्यांच्यासाठी आहे. इथल्या लोकांचे काय अनुभव आहेत हे जाणून घेण्यासाठी हा बाफ आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा यात प्रयत्न नाही.

भारतातून परदेशात जाण्याची अनेक कारणे असू शकतात. कुणी कुठे जावे याबद्दल कुणाला आक्षेप असण्याचं कारण नाही. देशप्रेम वगैरे गोष्टी बाजूला ठेवल्या कि संधीच्या शोधात जाणे हे आपण समजू शकतो. पण याच लोकांनी आपलं तिथलं काम संपल्यानंतर भारतात परतताना भारतियांना नावे ठेवणे हे कितपत योग्य आहे ? गावाकडच्या एखाद्या कुटुंबातल्या एखादा सदस्य शहरात जाऊन राहतो तेव्हां त्याचं बरं चाललय ना म्हणून कुणी त्याला रोखत नाही. हा सदस्य हुषार, चुणचुणीत असतो. शहरात राहून पुन्हा गावाची ओढ लागल्यावर तो गावाकडे परतायचा निर्णय घेतो आणि आल्यानंतर गावातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींबद्दल तक्रारी करू लागतो. सुरुवात अर्थातच संडास बाथरूमची सोय नसण्याने होते. गावाकडचे लोक भांबावतात. सुरुवातीला नवं काहीतरी ऐकायला मिळतंय म्हणून भक्तिभावाने ऐकतातही. पण दुस-या गावातल्या अशाच कुटुंबात असाच अनुभव आल्याच लक्षात येतं. गावात सुविधा मिळत नाहीत म्हणून बसता उठता चीडचीड करणारा हा सदस्य चांगली तीन चार वर्षे झाली तरी रूळतही नाही, प्रतही जात नाही आणि बदल व्हावेत म्हणून स्वतःही काही करत नाही आणि कसे करावे याबद्दल सांगतही नाही यामुळे नाही म्हटलं तरी घरचे इतर लोक हळूहळू चिडू लागतात. शेवटी कुणीतरी विचारतचं तू इथून जाण्यापूर्वी तुला गावात काय असतं याबद्दल कल्पना नव्हती का ? मग आता आल्यावर का स्वतःला आणि इतरांना त्रास देतोस ? तू आल्याबरोबर अचानक गाव कसं बदलेल ? तुला शहरातल्या सुधारणा इथे आणायच्या असतील तर तू पुढाकार घे , आम्ही आहोत तुझ्यासोबत..

गावोगावी असे परतणारे लोक असतात. त्यातले काही गाववाल्यांच्या आवाहनाचा अर्थ समजावून घेवून आपणही काही देणं लागतो या भावनेने यथाशक्य काम करतात. ज्यांना शक्य नाही त्यांची चीडचीड कमी होते. पण काहीं यातलं काहीच न करता गावाला कर देतोय ना मी मग मला शहरातल्या सुविधा इथं मिळायला काय हरकत आहे ? तुम्ही नागरीक म्हणून कधी सुधारणार हे पालुपद चालूच ठेवतो.

परदेशातून भारतात परतणा-यांचेही असे वेगवेगळे अनुभव येतात. त्यात मुख्यत्वे आम्हाला इथे आल्यावर किती त्रास होतो हा आरोप असतो. तेव्हां आपल्याला असेच प्रश्न पडतात. परतण्याच्या आधी या लोकांना काहीच कल्पना नव्हती का ? याच देशातून गेलेले असल्याने इथल्या अडचणींबद्दल अनभिज्ञ असल्याच्या थाटात काहिंचे चिडणे, आदळआपट करणे हे समजण्याप्लिकडे असते. यातले काही लवकरच रूळतात. अ‍ॅडजस्ट करून घेतात. पण तीन चार वर्षे झाल्यानंतरही नकारात्मक अनुभवांचा पाढा वाचणा-यांबद्दल इथल्यांना आश्चर्य का वाटू नये ? इथे लोकांना सिव्हीक सेन्स नाही हे कुणीच अमान्य करत नाही. पण तो बदलण्यासाठी काहीही न करता निव्वळ टीका करण्याच्या वृत्तीबद्दल भारतियांना काय वाटतं ? मुळात सगळेच भारतिय समाजाच्या बदलण्यासाठी काही झपाटून कार्य करताहेत असं अजिबात नाही. पण रहदारी सुधारण्यासाठी काम करणारी संस्था आहे, हे लोक टॅक्सपेयरही आहेत आणि तरीही सामाजिक बांधिलकी म्हणून बदल होण्यासाठी काम करतात. पर्यावरणाच्या -हासासाठी काम करणारे लोक आहेत. अंधश्रद्धा कमी व्हाव्यात म्हणून काम करणारे लोक आहेत. शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून काम करणारे लोक आहेत. जातीयतेच्या विरुद्ध काम करणारे लोक आहेत. कष्टक-यांसाठी लढे देणारे लोक आहेत. आपापले काम सांभाळून, कर भरूनही असे काम करणारी लोक जगात सर्वत्र आहेत. त्यातूनच देश घडतात. युरोप अमेरिकेतल्या सुविधांचे गोडवे गाणा-यांनी ते नक्कीच गावेत. पण हे देश या स्टेजला पोहोचण्यासाठी त्यांच्याकडे जे काही बदल झाले असतील, संक्रमणे झाले असतील त्यात आपल्या या भारतियांचं योगदान किती ? ते तिथं गेले तेव्हा ऑलरेडी या सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध होत्या, एक प्रगत समाज त्यांना दिसत होता.

आता भारतात परतल्यावर यांना ठळक बदल जाणवायला लागले म्हणून बदल कसे होणार ? या बदलायच्या प्रोसेसबद्दल त्यांना काही एक ऐकून घ्यायचं नसतं (अपवाद अर्थात आहेत). फक्त चिडचिड करायची असते. याट रस्त्यावर थुंकणे, रहदारीचा बट्ट्याबोळ, वेळ न पाळणे, रस्त्यावरचे खड्डे आदी बाबींचा समावेश असतो. सरकारी भ्रष्टाचाराबद्दल तर इथलेही लोक हैराण आहेत. पण तुम्ही कसे काय राहता बुवा या घाणीत हा सूर ब-याच जणांमधे आढळतो. मग हा परत का जात नाही हा प्रश्न मनात उभा राहतो. पण त्याच्याचसारखं स्पष्ट विचारलं कि तुम्ही न बदलणारे, टीका सहन न होणारे ठरता.

थोडक्यात हे अंगाला तेल लावून आलेले पहिलवान असतात. हे कुस्तीचा आव आणणार पण कुठेच तावडीत सापडणार नाहीत. याउलट कधीही असुविधा न पाहीलेले अमेरिकन्स / युरोपियन्स कसलीही कुरकुर न करता इथल्या अनुभवांना सामोरे जाताना दिसतात. प्रसंगी त्यात बदल घडवून आणतात. उत्तरांचल मध्ये झालेल्या अभूतपूर्व संकटानंतर भारतियांनी केलेला कचरा साफ करण्यासाठी एक ब्रीटीश मुलगी तिथे येऊन कचरा स्वतः साफ करू लागली. तिला असं काम करताना पाहून स्थानिकांना योग्य संदेश गेला. ते देखील तिच्या कार्यात सहभागी झाले. सरतेशेवटी हे आपलं काम ती करतीये या जाणिवेने रिलीफ कँप आणि लगतचा परीसर स्वच्छ झाला. नुसत्या टीका करणा-या सोकॉल्ड फॉरिन रिटर्न्र्ड मंडळींच्या पार्श्वभूमीवर हा अनुभव आश्वासक नाही का ? त्या मुलीला तिच्या देशात आणि आपल्या देशात असलेला फरक जाणवला नसेल का ? कि ती टीका करत बसली.

ते देश प्रगत असण्याचं कारण म्हणजे परिस्थिती कशी बद्लावी याचं त्यांना असलेलं भान हे होय. स्वतःपासून सुरुवात केल्याशिवाय बदलाला सुरूवात होत नाही हे तिला माहीत आहे.

- इराणमधे गेलेल्या एका अमेरिकन महीलेने तिथल्या अस्वच्छतेबद्दल तक्रार न करता स्वतः झाडू आणि पोछा घेऊन संडास बाथरूम साफ करण्यापासून स्वच्छतेला सुरुवात केली.

- इथे काही ऑटोमोबाईल कंपन्यांमधे काम करणारे अधिकारी आहेत. यायच्या जायच्या रत्स्यावर लागण-या जामचे कारण शोधून काढून एका चौकातल्या व्यावसायिकांना थोडे मागे हटून चौक मोकळा करण्यासाठी त्यांनी आर्थिक आणि इतर मदत केली.

- माझ्या मित्राने शिरूर तालुक्यातल्या स्वच्छ पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्यासाठी रिक्षावर पाणी स्वच्छ करण्याची यंत्रणा उभारली. या उपक्रमाचं ट्रेनिंगही ते केंद्र सरकारच्या सहाय्याने देत असतो. त्याच्या या पायलट प्रकल्पाचा मी देखील एक हिस्सा आहे. अशा काही उपक्रमामधे अनेक भारतीय असतात जे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करीत असतात. स्वतःबद्दल खरं तर लिहू नये या मताचा मी आहे.

- याच मित्राचं आणखी एक मोठं काम आहे. कारखान्यालगतच्या गावांमधे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देऊन रोजगार दिला. वैशिष्ट्य म्हणजे बचत गटाच्या सर्व महिलांना संधी मिळावी म्हणून आठ तासांची शिफ्ट स्पेशल केस म्हणून चार चार तासांच्या दोन टप्प्यात केली आणि पहिल्या शिफ्टमधे काहींना आणि दुस-या शिफ्टमधे काहिंना सामावून घेतले.

- अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यात सक्रीय सहभाग. त्याची मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला होता, पण एकंदरीतच या प्रसिद्धीच्या प्रकाराला त्याचा नकार आहे.

- सातारा तालुक्यातल्या एका निवृत्त शिक्षकाने आपली ग्रॅच्युइटीची रक्कम आणि पेन्शन विकून येणारी रक्कम खर्चून अनाथ आणि अतिमागास मुलांसाठी वसतीगृहे बांधली. रयतच्या परंपरेत बसणारं हे काम आहे.

- नगर जिल्ह्यात एका शेतक-याने ३३ वर्षे राबून डोंगर फोडून एकट्याने रस्ता केला. या रस्त्यामुळे गावक-यांचा तेवीस किमीचा वेढा वाचला. शासनाला बोल लावून अनेक ठिकाणी प्रश्न प्रलंबित असताना या ग्रामस्थाला बोल लावले नाहीत म्हणून दोष द्यायचा कि एव्हढे मोठे काम करूनही लोकांना तो फ्री वापरावयास दिल्यावद्दल सत्कार करायचा ? अशाच प्रकारे अनेक ठिकाणी श्रमदानातून पाणतळी, रस्ते अशी कामं झाल्याची अनेक उदाहरणं आहेत.

- आठवतील तशी उदाहरणं इथे अपडेट करीनच.

ही गोष्ट ऐकूनही न घेणा-या, आपला देश काय आहे आणि कुठे आहे याचं भान विसरलेल्या आणि पैसे फेकतोय ना मग या सुविधा का मिळत नाहीत असा सूर अस्णा-या भारतियांबद्दल काय वाटते ? ज्यांना काँट्रीब्यूट करायची इच्छा नाही त्यांच्या येण्याने इतरांना काही फरक पडणार आहे असं वाटतं का ? किमान आपल्याला ज्या देशात परतायचं आहे तिथे मिळून मिसळून राहून चांगले बदल घडवूयात हा बेसिक विचार करता न येणा-यांच्या स्वागतासाठी कुणी उत्सुक असेल का ?

( सकारात्मक रित्या भारतात परतणारे लोक आहेत. त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मनापासून माफी मागतो).

लोकहो, कृपया खालील मुद्यांचा विचार करावा.

१. धागा परतोनि पाहे मधून कोतबो ग्रुपमधे हलवण्यात आलेला आहे.
२. पूर्ण वाचल्याशिवाय प्रतिसाद देऊ नयेत. द्विरुक्ती होण्याची शक्यता आहे.
३. दुस-या कुठयाही धाग्याचा विचार या धाग्यावर करण्याची आवश्यकता नाही. हा विषय स्वतंत्र आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर नाना. सवयीने आपले डोळे / नाक देखील सरावतात. समुद्राचा वास, मासळीचा वास, धुराशेणाचे वास सवय असल्यास त्रास देत नाहीत.
आणि उदयनने दिलेले उदाहरण देखील अपवादात्मकच आहे.

निंदकाचे घर असावे शेजारी हे खरच आहे. टीकेमुळे सकारात्मक घटनांचा आढावा घ्यावासा वाटला. टीका कोण करतो यापेक्षा काय करतो हे महत्वाचं असं म्हटलं जातं. पण प्रत्यक्षात कोण हा फॅक्टर देखील महत्वाचा ठरतो. रामदेव महाराज, अण्णा हजारे यांच्या विचारसरणीबद्दल मतभेद असतील पण त्यांच्यावर विश्वास ठेवणारे लोकांना त्यांनी केलेली टीका आत्मपरीक्षणासाठी भाग पाडते. आधी केले मग सांगितले हे कारण असेल का ? संत गाडगेबाबा स्वतः झाडू मारायला लागायचे त्यामुळं आपोआपच ग्रामस्थांना झाडू हाती घ्यावा लागे. कमरेवर हात देऊन नापसंती दर्शवणा-याच्या मताला किंमत कशी मिळणार ?

भारतातल्या ठळक सकारात्मक घटनांचा आढावा घेऊयात. कदाचित लेखस्पर्धेत यावर लेख येऊ घातले असतील तर सविस्तर वाचायला मिळेल.

१. भाक्रा - नांगल धरण आणि इरीगेशन प्लान : १९४२ साली डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्लान मांडला. यात दामोदर व्हॅली आणि इतरही योजनांचा समावेश होता. सतलज नदीवरील या योजनेला पं नेहरुंनी ड्रीम प्रोजेक्ट बनवले. धरण प्रत्यक्षात यायला वीसेक वर्षांचा अवधी गेला. त्याचे दूरगामी परिणाम भारताच्या विकासात ठळकपणे उठून दिसतात.

२. हरीतक्रांती - डॉ स्वामिनाथन यांना काम करण्याचे अधिकार देऊन भारतात घडवून आणलेली हरीतक्रांती ही एक विकासात महत्वाची घटना ठरेल. हरीतक्रांतीसाठी इरीगेशनचं जाळं कामाला आलं, त्याचबरोबर स्वामिनाथन यांचं प्रसिद्ध मॉडेलही.

३. धवलक्रांती - गुजरातच्या आणंद जिल्ह्यात डॉ वर्गिस कुरीयन यांच्या पुढाकाराने झालेली धवलक्रांती ही एक महत्वाची घटना आहे. शेतक-यांना शेतीबरोबरच दूध आणि दूचाचे उत्पादन याद्वारे जोडउत्पन्न देणारी ही चळवळ होय.

४. अवकाश कार्यक्रम - डॉ सतीश धवन यांच्या सारख्यांच्या पुढाकाराने शून्यातून उभा राहीलेला हा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम. याची फळं काय आहेत हे सांगायला नकोत. आजही अनेक विकसनशील देशांमध्ये याची वानवा आहे. आजच्या इस्त्रोच्या जडणघडणीमध्ये अनेक लोकांचा हातभार लागलेला आहे. अत्यंत अपु-या सुविधा आणि बुद्धीमत्तेच्या मानाने तुटपुंजा पगार यांना महत्व न देता या लोकांनी केलेल्या अथक परिश्रमाची फळं आजच्या पिढीला चाखायला मिळताहेत.

५. अणू कार्यक्रम - कुठल्याही विकसनशील देशाच्या विकासात या कार्यक्रमाला स्थान मिळणे ही आश्चर्याची गोष्ट आहे. पण डॉ होमी भाभा सारख्यांच्या मेहनतीने आज आपण या क्षेत्रात किती नेत्रदीपक प्रगती केली आहे हे सांगायला नकोच.

६. क्षेपणास्त्र कार्यक्रम - नासा आणि इस्त्रो मध्ये काम करता करता डॉ एपीजे अब्दुल कलामांकडे हा महत्वाकांक्षी कार्यक्रम आला. विकसनशील देशाने असा कार्यक्रम यशस्वीरित्या आखल्याचे दुर्मिळ उदाहरण आहे हे. कसलाच पूर्वेतिहास किंवा सुरुवातीसाठी लॉन्चिंग प्लॅटफॉर्म ( कार्यक्रमासाठी, मिसाईलसाठी नाही ) नसताना आणि कुणी तंत्रज्ञान द्यायला तयार नसताना इस्त्रोच्या मदतीने मिसाईल कार्यक्रम यशस्वी झाला. अर्थात हे सर्वांनी वाचलेले आहे. आजच्या पिढीला आणि इतरांना भारताच्या सर्वंकष विकासाबद्दल विश्वास वाटण्यासाठी हा कर्यक्रम महत्वाचा ठरला. त्याचबरोबर डॉ कलामांनी दिलेलं व्हिजन २०२० हे विचारात बदल करण्यासाठी उपकारक ठरलं. इथेही व्हिजन २०२० चा प्रभाव व्यक्तीविशेषाने जाणवला. आधी केल मग सांगितले हे सूत्र पदोपदी अशा प्रकारे जाणवत राहतं.

७. सहकार चळवळ - यशवंतराव चव्हाणांनी दूरदृष्टीने सहकार चळवळ राज्यात राबवली. केंद्राला ही योजना पटवून देऊन थोड्या तडजोडींसहीत ती राज्यात आणण्याचं श्रेय त्यांच्या नेतृत्वाकडे जातं. सहकारमहर्षी यशवंतराव मोहीते यांच्या सहकार्याने आजचं मॉडेल त्यांनी आणल. जे प्रमाणाबाहेर यशस्वी झालं. कुठल्याही चांगल्या योजनेमधे अपप्रवृत्ती शिरल्या कि त्याला ग्रहण लागते. पण त्यामुळे मूळ मॉडेल वाइट होतं अशी टीका होते जी अस्थानी आहे.

८. रेल्वेचं जाळं - भारतातलं रेल्वेचं जाळं थक्क करणारं आहे. रेल्वेचा पसारा इतका आहे कि रेल्वेच्या बजेटला अनन्यसाधारण महत्व आहे. भारताच्या विकासात हे जाळं रक्तवाहीन्यांचं काम करतं असं म्हटलं तरी चालेल.

इतरही घटना असतील ज्यांच विस्मरण याक्षणी झाल्याने आता त्यांना इथे जागा मिळाली नसेल. आपणही यामधे भर घालू शकता.

स्वातंत्र्यानंतर लगेचच तीन मोठी युद्धे, प्रचंड दुष्काळ आणि महापूराशी झुंजणा-या या देशाने स़ंकटांवर कशी मात केली याचा आढावा घेताना या सकारात्मक घटनांचं योगदान खूप ठळक होत जातं. हे राष्ट्र तगलं ते अशा घटनांनी आणि व्यक्तींनी.

सत्यमेव जयते या कार्यक्रमात साध्या साध्या माणसांनी केलेलं अद्वितीय काम हे सूत्र घेऊन सादर केलेला हिरोज हा एपिसोड देखील असाच प्रचंड सकारात्मक होता.

स्वातंत्र्यानंतरची साठ वर्षेच पहायची, तर अमेरिकेला July 4, 1776 रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतरच्या साठ वर्षांत अमेरिकेकडे काय होते? त्याची तुलना, सगळे रिसोर्सेस ब्रिटिशांनी लुटून नेल्यानंतर उरलेल्या भारताच्या स्वातंत्र्याच्या साठीशी करायचा जरा प्रयत्न करावा, असे सुचवू इच्छितो.>> ह्या वाक्याला प्रचंड अनुमोदन. लंडनची सार्वजनिक व्यवस्था उत्तम आहे त्या मध्ये हां फार मोठा फरक आहे आणि तितकाच फरक लोकल टॅक्स प्रचंड आहे ह्याचा पण आहे.

परंतू खटकणारी गोष्ट आपल्या बाराचाश्या सिस्टम ब्रिटीशांनी बसवलेल्या होत्या. बऱ्याच सुरळीत चालू होत्या. सध्या गोष्टी. रस्त्याच्या बाजूला उतार असावा जेणेकरून पाणी निघून जाईल. त्याचबरोबर फुटपाथ हे जास्त उंच नसायचे. पावूल जेवढे उचलले जाईल त्या उंची वर होते. आता काय झाले आहे? थोडा पावूस पडला की रस्त्यावर पाणीच पाणी होते. आमची आई फुटपाथ वरून न चालता वैतागून रस्त्यावरून चालले. तिच्या सारखेच बरेच लोक रस्त्यावरूनच चालतात. कारण फुटपाथ वर सतत चढ उतार की पाय दुखून येतो. आता ह्यात कुठेही बाहेर जायची आवश्यकता नाही. पूर्वी बरेच होते तेच फक्त इम्प्लिमेण्ट करायचे होते. मग ते का होत नाही? साध्या साध्या गोष्टी आहेत. १९९४ साली लायसन काढायला सहज रांगेत उभे राहून नियमाप्रमाणे टेस्ट घेवून मिळाले. पण २००७ साली नविन काढायला गेलो तेंव्हा जो काही मनस्ताप झाला ज्याचे नाव ते. म्हणजे आधी सुरळीत होते तेच करायला आता वैताग का व्हाव्हा. लोकसख्या वाढली वगैरे करणे आहेतच पण मुळातच हे माझे काम आहे आणि ते मी प्रामाणिकपणे करिन असे का वाटू नये?
बाहेर आल्यावर ते जास्त जाणवते. बी.आर.टी. सारखी उत्तम व्यवस्था धड का नाही राबवायची? रस्त्याच्या मधून बस जाते हे जेंव्हा पुणे सोडले नव्हते तेंव्हाही विचित्र वाटले होते आणि आता रोज लंडन मध्ये बी.आर.टी. बघून अजून वैताग येतो. म्हणजे जिथून सिस्टम घेतली ती तशी साधी राबवता पण येऊ नये.
ज्यांच्या हातात निर्णय घेण्याची ताकद आहे त्यांना मुळात सामान्य लोकांचे जीवन सुखावर व्हावे असे वाटते का हां प्रश्न आहे असे वाटते का? माझे आता असे स्पष्ट मत झाले आहे की हे वर लीडरशिप पासून होते. नाहीतर कायम फक्त वैयक्तिक पातळीवरच प्रयत्न होत राहणार. शेवटी सरकारकडे ते सगळीकडे राबवण्याची क्षमता नक्कीच आहे फक्त इच्छाशक्ती नाहीये. कारण मग लोक जास्त मागणी करतील आणि त्यांची खाबुगिरी कमी होईल. असो किरण ह्यांनी चांगले लिहिले आहे पण मुळात चीड चीड होते ती सध्या गोष्टींची होते.

>>आठवतील तशी उदाहरणं इथे अपडेट करीनच
उदाहरणे आठवायला लागतात यातच सगळे आले Proud

चांगल्या गोष्टी नक्कीच आहेत पण वाईट कैकपटीने अधिक आहेत
नुसते नाकं मुरडण्याने किंवा चुकचुकण्याने काही होणार नाही हे १००टक्के मान्य!

सगळ्यांचीच खुद्द फील्डवर उतरुन काम करण्याची तयारी असतेच असे नाही किंवा सगळ्यांनाच ते जमते असे नाही पण ते आपले रुटीन काम जर सिन्सीअरली करुन या सगळ्या कांमासाठी लागणारा पैसा कररुपाने उभा करत असतील तर त्यांचेही योगदान कमी नाही.... त्या पैश्याच्या विनियोग जर योग्य प्रकारे होत नसेल तर चिडचिड होणे स्वाभाविक आहे (परत एकदा नुसत्या चिडचिडीचा काही उपयोग नाही हे नक्की).... पण ते स्वता रस्त्यावर उतरुन काही करत नाहीत म्हणून त्यांना व्यक्त होण्याचा अधिकार नाही हे मात्र चुकीचे आहे!

उदाहरणे आठवायला लागतात यातच सगळे आले >>>> स्वरुप, हे एक वाक्य सोडून अख्ख्या पोस्ट ला प्रचंड अनुमोदन!
एखाद्यानी तक्रार केली की त्याच्या मागे भारताचा झेंडा घेऊन सत्यमेव जयते गात त्यावर चाल करुन जायची गरज नाही. मनस्मी फक्त बाहेरुन परत आले म्हणून लगेच त्यांनी केलेल्या तक्रारी काही भारताच्या सॉवरिनिटी वर घेतलेल्या शंके इतकी घातकी होत नाहीत.
ज्या तक्रारी केल्या त्या बर्‍याच कायमचे भारतात असलेल्यांचा सुद्धा असतील फक्त त्यांनी मुद्दाम त्या कोणाला सांगितले नाही, का? तर १) भारतात ज्या बाकी चांगल्या गोष्टी आहेत त्याकडे बघून ते समाधानी आहेत किंवा २) पुर्ण आयुष्य भारतातच गेल्यामुळे त्यांना ह्या गोष्टींची सवय झालीये आणि आपला देश आहे हा असा आहे हे त्यांनी स्विकारले आहे. ह्या दोन्हींमधला कुठला मुद्दा नेमका जास्त कारणीभूत आहे हे सगळ्यांनी स्वतःला प्रश्न विचारुन ठरतील.
मनस्मी ह्यांनी तो लेख फक्त त्यांचा दृष्टिकोन म्हणून खास्करुन जे त्यांच्या सारखे परत यायला बघत आहेत त्या करता लिहिला होता. त्यात कुठेही भारताची चेष्टा, ताशेरे ओढले नव्हते. तसं करायचा मुलभूत हक्क कोणालाच नाहीये. जे भारताच्या विकासाकरता काही ठोस कामं करत आहेत ते एकवेळ बोलले तर समोरचा ऐकून हे घेइल पण ते (भारताच्या विकासाच्या कामात सक्रिय असणारे) बिचारे आपलं काम करत आहेत गपगुमान इकडे तिकडे तक्रार करणार्‍या लोकांवर धावून जाण्यापेक्षा. भारताच्या विकासाबद्दल कोण कसं सक्रिय नाहीये, प्रजा काय झोपलीये का, सरकार झोपलेय का? हे मुद्दे असते तर बाकी लोकांनी केलीये ती आगपाखड समजू शकता आली असती.
मुद्दा तो नव्हताच मुळी. भारताबाहेर भारतापेक्षा जास्त प्रगत असलेल्या देशामध्ये नोकरदार म्हणून बराच काळ राहिल्यावर परत भारतात आल्यावर काय अनुभव आला हा मुद्दा होता. त्यांना थोडाफार वाईट अनुभव आला आणि त्यांनी त्याबद्दल लोकांना सांगायचं ठरवलं, संपलं. असे वाईट अनुभव सांगितले की लगेच भारताचे नाव खराब होतं का? आता लोकांना आवडत नाही म्हणून आपली मतं मांडताना वाईटाबरोबर चांगली मतं ही मांडलीच पाहिजेत असा काही नियम आहे? अजब चक्रमपणा आहे!
राहिला प्रश्न हे असले प्रत्युत्तरादाखल काढलेल्या लेखांचा, तर त्यांनी तरी काय प्रगती वगैरे होतेय भारताची असं वाटतय की काय? इथे बसून लोकांची अक्कल काढत फक्त "झोडपण्यातून भारताचा आर्मचेअर विकास" असा मानसिक खेळ खेळून काय बोडक्याचा विकास होणार आहे भारताचा?

मला त्या मनस्मि च्या लेखावरच्या बहुतांश विरोधी प्रतिक्रिया व येथीलही (त्यावरच्या) बर्‍याच प्रतिक्रिया ही स्ट्रॉमॅन आर्ग्युमेण्ट्स वाटतात. ज्यावर आक्षेप घेतलेला आहे ते त्या मूळ लेखात मला दिसले नाही.

मनस्मि यांच्या लेखाच्या संदर्भाने इथे प्रतिक्रिया का दिल्या जात आहेत. लेखात उद्देश पूर्ण स्पष्ट केलेला आहे. मनस्मी यांच्या लेखाबद्दल तिथेच प्रतिक्रिया द्याव्यात. या लेखाचा उद्देश त्याच्याशी सुसंगत नाही. विषय भरकटू शकतो. दुस-या कुठल्या लेखाचा उद्देश काय आहे याचा इथे विचार करणे हे असंबद्ध ठरेल, सबब लक्ष देण्याची गरज नाही.

का दिल्या जात आहे म्हणजे? त्या लेखामध्ये येवढी मरणप्राय चर्चा झाल्याशिवाय तुमच्या डोक्यात आयडिया आली का हा लेख इथे टाकायची? कैत्तरी आपलं! मतीतून सुसंगतीने सुंबाल्या केलाय वाटतं. दर दोन मिनिटानी तुम्ही नवा स्ट्रॉमॅन उभा करता राव!

कारण दोन्ही विषय परतणार्‍या लोकांबद्द्लच आहेत, रिलेटेड आहेत.

ण तीन चार वर्षे झाल्यानंतरही नकारात्मक अनुभवांचा पाढा वाचणा-यांबद्दल इथल्यांना आश्चर्य का वाटू नये ?>> असा येथेही त्याचा अप्रत्यक्ष संदर्भ आहेच की.

एक नेहमी दिले जाणारे उदाहरण आहे. एक मनुष्य वडापाव विकून मुलाला शिकवतो. अर्थशास्त्री बनवतो. त्यासाठी अहोरात्र काम करतो. एक दिवस मुलगा घरी येतो. वडिलांना म्हणतो बाबा तीव्र मंदीकडे जग वाटचाल करतंय. अडाणी असलेले वडील मंदी म्हणजे काय विचारतात. त्यावर मुलगा मंदी म्हणजे काय हे समजावून सांगतो. मंदीच्या परिणामांमुळे लोकांचे रोजगार जातील, परिणामी त्यांच्याकडे पैसे कमी राहतील. या कमी पैशामुळे त्यांच्या गरजा कमी होतील. वडील म्हणाले याचा आपल्यावर काय परिणाम होईल ?
मुलगा म्हणाला, लोक गरजा कमी करतील, बाहेर खाणं कमी करतील. आपल्याकडे येणं कमी होईल. आपला खप कमी होत जाईल. वडिलांना हे पटलं. मुलगा शिकून आलेला असल्याने तो सांगतो ते खरंच असणार म्हणून मंदीच्या भीतीने त्याने माल कमी घ्यायला सुरुवात केली. आता तो थोडीच भजी आणि वडापाव ठेवू लागला. नुकसान कमी व्हावं हा त्याचा उद्देश. त्याचा परिणाम असा झाला कि नेहमीच्या गि-हाईकांनीही याचं धंद्यातलं लक्ष उडालय असं समजून त्याच्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे धंदा इतका कमी झाला कि हातगाडी बंद पडली. त्या अडाणी माणसाला वाटले मुलाचे भाकित खरे ठरले.

नकारात्मक विचारांचा असा प्रभाव पडू शकतो. केवळ नकारात्मक दृष्टीने देशाकडे पाहणा-यांच्या टीकेकडे लक्ष देण्यापेक्षा सकारात्मक बाबींचा विचार करून मानसिक बळ वाढवायला हवे, या सकारात्मकतेतून नकारात्मक गोष्टींवर मात करण्याची ताकद मिळू शकते. टीकेला विरोध नाही, पण त्यामागे ठोस प्लान हवा. विश्लेषण हवे. हे काही न करताच टीका करणा-यांची कुणालाच गरज नाही.

पुढे देशातल्या कमींवर कशी मात करता येईल, आपला रोल काय याचं आपापल्या क्षमतेनुसार विश्लेषण करूयात.

@किरनु, का हो तुम्हि मनस्मि च्या लेखावर असम्बध्ध प्रतिक्रिया दिल्या ते बरोबर होते, नाहि का? तेव्हा लेखा चा उद्देश वगैरे विसरलात का?

इथल्या लोकांना येणा-या अनुभवाबद्दल लोकांचे मत मांडण्यासाठी हा बाफ आहे. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कुठेही दुस-या बाफचा या बाफशी संबंध नाही. टीकेतून काय सकारात्मक करता येईल हा बाफचा आणखी एक उद्देश आहे. फक्त टीका करणा-यांनी या बाफचा वापर करू नये ही नम्र विनंती. त्यासाठीचं व्यासपीठ उपलब्ध आहे.

उदाहरणात चक्क सुसंगती आहे (आणि उदाहरण म्हणून चांगलं देखिल आहे) पण मग तुमच्या बाकी विधानांमध्ये आणि त्यामागच्या विचारसरणीत ती का दिसत नाही ते माहित नाही.
मनस्मी, ह्यांनी टिका करायला लेख लिहिला नव्हताच. हे तुम्ही आणि इतर झोडपू लोकांनी स्वतः काढलेलं कन्क्लुजन आहे.

मिना आणि इतर. न्यायाधीश होऊ नका. त्या प्रतिक्रिया तिथेच द्या. हे शेवटचं सांगणं आहे. त्या पहायच्या कि नाही हा प्रश्न अलाहिदा ! मायबोलीबाहेरच्या जगात असे अनेक लोक भेटतात. त्यांचे जे अनुभव आले त्यावर आधारीत हे लिखाण आहे. मनस्मि यांचा लेख नकारात्मक नाही हे तुमचं काढलेलं कन्क्लुजन तुम्ही सोडणार नाही हे जसं खरं तसंच त्या विषयावर चर्चा करण्याची इच्छा राहीलेली नाही हे ही तितकंच खरं. वितंडा मध्ये कुठलाही रस नाही. कृपया त्या बाफवर आपले निगेटीव्ह विचार लिहा. इथे नकोच. प्लीज !

पण याच लोकांनी आपलं तिथलं काम संपल्यानंतर भारतात परतताना भारतियांना नावे ठेवणे हे कितपत योग्य आहे ?>> खरतर इतरत्र कुठे जी नावे ठेवली आहेत, ती आधी कुठेही परदेशात न जातासुद्धा ठेवली जात होती. गंमत म्हणजे लहानपणापासून, सतत आजूबाजूला जो तो उठतो तो सरकारला प्रत्येक गोष्टीसाठी जवाबदार धरतो, हे पाहिले होते, त्यामुळे भारतामध्ये जे काही चालू आहे, त्याला फक्त सरकारच जवाबदार आहे, अश्या भ्रमात होते.
परदेशात गेल्यावर पटकन जाणवले, ते तिथल्या लोकांचे सामाजिक भान. आपल्याला देश, जागा, हॉटेलं, पर्यटनस्थळे गहाण दिलेली नाहीत. आपण एका समाजाचा भाग आहोत, आपल्यामुळे शक्यतो दुसर्‍यांना त्रास होऊ नये, याची काळजी घेणे, याचे भान लोकांना असल्याचे जाणवले.

तुम्ही जे वर विकास प्रकल्प दिले आहेत ना, त्यावर जरुर निबंध लिहा. भारत सरकार चांगली कामे करतच आहे, पण भारतातील लोकं? छे, त्यांना फक्त मिळेल तिथून ओरबाडायचे आहे, सिग्नलला दुसर्‍याचा जीव गेला तरी चालेल , पण न थांबता भर्कन निघून जायचे. लायनीत पटकन मध्येच घुसायचे. (आत्ता संध्याकाळीच एकाला त्यावरुन झापून आले. साधं पेट्रोल भरायच्या लाइन मध्ये मधे घुसायची हौस.) दुसर्‍याची गाडी पार्क केलेली दिसली, मनात आले, मारले स्क्रॅचेस, रस्त्यात मुलगी दिसली, घाबरवले तीला. कोणी अडचणीत अडीनीडीला असेल, तर फसवा त्याला, उकळा पैसे, विश्वास म्हणून कोणावर ठेवणे म्हणजे इथे मुर्खपणा समजला जातो. अश्या अजून कित्येक अगणित गोष्टी आहेत. वर सरकार काही करत नाही म्हणून लोकं दोष देणार, भारतातील मेजॉरीटी लोकांना मी माणूस म्हणून आणि समाजाचा भाग म्हणून कसा वागतो याचे काही जास्त पडलेले नाही. हा एक मुख्य आणि ठळक मुद्धा परतोनी पाहिल्यावर जाणवला. आणि असे वागणारा समाज फार मोठा आहे आणी तो सुधारण्याची चिन्हे काही जास्त दिसत नाहीयेत ही मोठी खिन्नाता आहे. बाकी सर्व गोष्टींमध्ये पाश्चात्यांच्या मागे जायचे आहे (चाललो आहेतच!) पण त्यांचे समाजात वागणे कसे आहे, त्याकडे सोयीस्कर डोळेझाक केली आहे.

कृपया त्या बाफवर आपले निगेटीव्ह विचार लिहा.>>>>> परत फारकत झाली क्वामन सेन्सशी. आम्ही फक्त ते त्यांचे मत, त्यांचा अनुभव आहे असं म्हणत होतो. कुठेही नेगेटिव विचार मांडलेत का भारताविषयी? फक्त एखाद्याचे नेगेटिव असतील तर त्याला बदडायची गरज नाही हे सांगतोय.

परदेशात गेल्यावर पटकन जाणवले, ते तिथल्या लोकांचे सामाजिक भान. >> गार्बेज गर्लचं उदाहरण यासाठीच दिलं आहे. हे भान येण्यासाठी तिच्यासारख्या कॄतीची आवश्यकता आहे.

इथे काय नाही याबद्दल चर्चा जरूर करा, त्याचबरोबर ते कसं येईल याबद्दलचे विचार देखील मांडा. तटस्थ निरीक्षकाचा रोल अपेक्षित नाही. प्रत्यक्ष काम करायची गरज नाही. पण विचार देणं हे देखील महत्वाचं आहे. तो विचार एक्झेक्युट करताना काय काय अडचणी येतील याचाही विचार मांडावा लागेल. अशी चर्चा झाली तर बरं होईल.

न्यायाधिश मी स्वतः ला कधिच समजत नाही हो.. तुम्हि बाकी बाफ वर आक्रस्ताळे पणा करता पण स्वतः च्या बाफ वर मात्र लोकान्नि सुसन्गत प्रतिक्रिया द्याव्यात अशी अपेक्शा करता...मला फक्त हे दखवायचे होते एव्हढेच...

किरणु
लेख आणि उदाहरणे चांगली आहेत.

हा बाफ भारतात परतणा-यांचे जे अनुभव इथल्या लोकांना येतात त्यांच्यासाठी आहे >> फक्त चांगले अनुभव लिहायचे आहेत का? खटकणारे अनुभव लिहिले तर चालतील का?
चांगले कमी आणि खटकणारे जास्त आहेत म्हणून विचारले Happy

जाऊदे, उगाच वाद होतील खटकणारे अनुभव लिहिले तर! मला परिचयातील बरेच लोक जे परतून आले ते आनंदी वाटले आणि एन्जॉय करताना दिसले. इथे जो सूर आहे तो मला कुठेही जाणवला नाही. त्यामुळे इथल्या लोकांना त्यांच्याकडून जास्त जाणून घेण्याची इच्छाही दिसली. हा मला चांगला अनुभव वाटतो.

परदेशात गेल्यावर पटकन जाणवले, ते तिथल्या लोकांचे सामाजिक भान. आपल्याला देश, जागा, हॉटेलं, पर्यटनस्थळे गहाण दिलेली नाहीत. आपण एका समाजाचा भाग आहोत, आपल्यामुळे शक्यतो दुसर्‍यांना त्रास होऊ नये, याची काळजी घेणे, याचे भान लोकांना असल्याचे जाणवले.
<<
पऽर्फेक्ट!
हेच इंग्रजीत सांगतोय कालपासून.
हे करा. या देशाप्रती आपले सामाजिक भान दाखवा.
स्वतःचे उदाहरण दाखवा. इथे येऊन तुमच्याच सारखे या देशाला वर आणण्यासाठी झटणारे इथे आहेत, त्यांना हिणवत 'जाब' विचारू नका. तसा सूर दिसला, तर सगळ्यांचीच धुणी धुवायला आम्ही समर्थ आहोत.

तुम्ही जे वर विकास प्रकल्प दिले आहेत ना, त्यावर जरुर निबंध लिहा. भारत सरकार चांगली कामे करतच आहे, पण भारतातील लोकं? छे, त्यांना फक्त मिळेल तिथून ओरबाडायचे आहे, सिग्नलला दुसर्‍याचा जीव गेला तरी चालेल , पण न थांबता भर्कन निघून जायचे. लायनीत पटकन मध्येच घुसायचे. (आत्ता संध्याकाळीच एकाला त्यावरुन झापून आले. साधं पेट्रोल भरायच्या लाइन मध्ये मधे घुसायची हौस.) दुसर्‍याची गाडी पार्क केलेली दिसली, मनात आले, मारले स्क्रॅचेस, रस्त्यात मुलगी दिसली, घाबरवले तीला. कोणी अडचणीत अडीनीडीला असेल, तर फसवा त्याला, उकळा पैसे, विश्वास म्हणून कोणावर ठेवणे म्हणजे इथे मुर्खपणा समजला जातो. अश्या अजून कित्येक अगणित गोष्टी आहेत. वर सरकार काही करत नाही म्हणून लोकं दोष देणार, भारतातील मेजॉरीटी लोकांना मी माणूस म्हणून आणि समाजाचा भाग म्हणून कसा वागतो याचे काही जास्त पडलेले नाही. हा एक मुख्य आणि ठळक मुद्धा परतोनी पाहिल्यावर जाणवला. आणि असे वागणारा समाज फार मोठा आहे आणी तो सुधारण्याची चिन्हे काही जास्त दिसत नाहीयेत ही मोठी खिन्नाता आहे. बाकी सर्व गोष्टींमध्ये पाश्चात्यांच्या मागे जायचे आहे (चाललो आहेतच!) पण त्यांचे समाजात वागणे कसे आहे, त्याकडे सोयीस्कर डोळेझाक केली आहे. >>>

या सर्व गोष्टी कशा बदलतील असं वाटतं ? काहीच होणार नाही हा नकारात्मक विचार आहे हे चूक आहे का ? हे बदल करण्यासाठी आपण काय करू शकतो असं वाटतं ? कि निराशा व्यक्त केल्याने बदल होईल ? डॉ दाभोळकरांचं उदाहरण आहेच ना. दुसरा काय करतो यापेक्षा आपण काय करू शकतो हेच त्यांच सूत्र होतं. शासनाने विधेयक मंजूर केलं किंवा नाही म्हणून त्यांनी कुणाला वेठीसही धरलं नाही, किंवा आपलं कामही थांबवलं नाही. प्रत्येक जण स्थानिक पातळीला काही न काही उपक्रमात भाग घेतो, मदत करतो. नकारात्मक अनुभवांचा पाढा वाचण्याने बदल कसे होतात हे समजले नाही. हाच प्रश्न विचारला कि त्याला बदडणे म्हणत असतील तर आपण चर्चा थांबवूयात. आपल्या विचारात जमीन अस्मानाचं अंतर आहे.

धन्यवाद.

बरं आता उदाहरण घेऊयात
१. ओपन पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आहे- दुसर्‍या दिवशी सकाळी स्क्रॅचेस. - काय करावे? वॉचमन ठेवावा? येणार्‍या जाणार्यांना चांगल्या वागणूकीची पत्रके वाटावीत की भाषणे द्यावीत?

२. कोणी एकाने पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आहे- टू विलरचे टायर पंक्चर करुन ठेवलेले आहे. एकदा रिपेअर करून आणले, दोनदा आणले, तिसर्‍यांदा परत तेच.
उपायः वॉचमन ठेवावा? सीसी टीवी सिस्टिम बसवावी? सोसायटीतल्या सदस्यांवर संशय घ्यावा? जास्त संशय त्याला चेअरमनला सांगून ओरडावे?

साध्या साध्या गोष्टींमधे किती आणी कोणाशी भांडायचे आणी सुधारणा कशा करायच्या यावर तुमच्याकडे उपाय असतील तर नक्कीच सुचवा.

@त्यांना हिणवत 'जाब' विचारू नका>> त्या लेखात कुठेही जाब विचारल्याचा आव नव्ह्ता...तुम्ही तसा अर्थ काढलाय

स्वतःचे उदाहरण दाखवा. इथे येऊन तुमच्याच सारखे या देशाला वर आणण्यासाठी झटणारे इथे आहेत, त्यांना हिणवत 'जाब' विचारू नका. तसा सूर दिसला, तर सगळ्यांचीच धुणी धुवायला आम्ही समर्थ आहोत.>> सर्वप्रथम, मी कधी कोणाला जाब विचारला हे काही समजले नाही. पण एक मात्र सांगते, या सगळ्या गोष्टींशी लढून लढून खूप शक्ती खर्च होते आणि आपल्याच देशात नको त्या गोष्टींमध्ये किती वेळ, शक्ती, बुद्धी वाया जाते, हे वाटून दु:ख होते.

मिना,
पुन्हा एकदा,
तिकदे जाऊन वाचा.
मी काय लिहिले आहे तेही वाचा.
अन अजूनही काय लिहित आहे ते वाचा.

अनेक लोकांशी एकाच वेळी बोलतो आहे मी कालपासून.

असो.

स्वाती,
जाब तुम्ही विचारला नाहिये.
तुम्ही बोललात ते पर्फेक्ट आहे, व त्याच्याशी मी सहमत आहे इतकेच बोललो.
तो लेख वाचा परत. त्यांच्याबद्दल लिहिले आहे ते.
'स्लीप ऑन इट'
एल ओ एल.
भारतात परतण्याचा आमंत्रणपत्रिका वाटत फिरलोय का मी? किंवा आणिक कुणीही?

यावर तुमच्याकडे उपाय असतील तर नक्कीच सुचवा. >> नक्की सुचवेन. फक्त ऐकून घ्यायचे पेशन्स हवेत. हे असं का घडतं याच्या कारणांचा शोध घेतल्याशिवाय उपाय शक्य नाही हे आता सांगता येईल. दुस-याच्या मालमत्तेचं नुकसान करू नये हे शिक्षणाने आणि संस्काराने समजतं. त्याचा प्रचंड अभाव आहे. त्यासाठी जिथे शिक्षण नाही तिथे पदरमोड करून काम करणारे कार्यकर्ते आहेत. माझ्या भावाचे सासरे स्वतः या कामात आहेत. आम्ही काही मित्रांनी आमच्या कॉलेजला गरीब मुलांच्या फी साठी निधी दिला होता. कॉलेजला ही कल्पना पसंत पडली आणि त्यांनी कायमस्वरुपी फंड उभारून सर्व माजी विद्यार्थ्यांना आवाहन केले. त्याचा परिणाम म्हणून, चेक्सचा वर्षाव झाला. गरीब मुलांच्या समस्या थोड्या तरी सुटल्या असाव्यात अशी आशा आहे.

स्क्रॅचेस पडण्याचं आणखी एक कारण म्हणजे कुरापतखोर स्वभाव, त्याला देशाच्या सीमांची मर्यादा नाही. असे लोक फक्त भारतातच असतात असं समजण्याचं कारण नाही. अमेरिकेत शाळेत गन घेऊन हत्या करणा-या मुलांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यावर काहीच उपाय दिसत नाहीये. त्यासाठी काही भारतीय पालक देशात परतण्याचा विचार करत आहेत.

( परदेशात स्वर्ग आहे. भारतात तिथल्या अनेक गोष्टी नाहीत. तरीही का परतावंसं वाटतं ? कारण तिथल्या संस्कृतीशी नाळ जोडली जात नाही. मला एकाने तर तरूण होतो तेव्हां मुक्त संस्कृतीचं आकर्षण होतं, आता मुलं मोठी व्हायला लागल्यावर भीती वाटते हे कारण सांगितलं होतं. एके दिवशी अचानक मुलगी एखाद्या ब्लॅक किंवा व्हाईट मुलाला घरी घेऊन येईल आणि डॅड हा जॉन, तुमचा सन इन लॉ अशी ओळख करून देईल याची भीती. तिथे मुलांना बोलताही येत नाही. त्यांच्या निर्णयाचा आदर करणं इतकंच तुमच्या हातात असतं.

भारतात आल्यानंतर खटकणा-या गोष्टींबरोबरच स्वस्ताई. होणारी बचत, कमी पैशात रोज मिळणा-या ताज्या भाज्या, थेट शेतातून मिळू शकणारी उत्पादने, ताजी फळं यांचा अनुल्लेख केला तर हे अनुभव आले नाहीत यावर विश्वास कसा बसेल ? काही न काहीतरी प्लस असतंच कि. फ्रोजन/प्रोसेस्ड/प्रिझर्व्ह्ड फूड चा कंटाळा येत नाही का ? लिंबू. संत्रं, मोसंबी यांच्या ताज्या रसात १००% सी जीवनसत्व मिळतं. मोरांब्यात ३० %, च्यवनप्राश मधे १५% आणि ग्लुकॉन सी मध्ये फक्त ५ % . ( संदर्भ - फूड रिसर्च लॅब, म्हैसूर ). अजूनही शहरात देखील ताजं दूध मिळू शकतं. मुंबईसारख्या शहरात आजही घरी ताजं दूध घेउन येणारा भैय्या आहे. ऑफीसमध्ये घरचं ताजं जेवण पुरवण्याची जबाबदारी घेणारा मुंबईचा डबेवाला हा जगभराच्या औत्सुक्याचा विषय आहे. शेजा-यांशी गप्पा मारायाला अपॉइण्टमेण्टची गरज पडत नाही. अडीअडचणीला शेजारी पाजारी धावून येतात. भले अँम्ब्युलन्स थोडी उशिरा पोहोचत असेल पण जवळच राहणारा डॉक्टर शेजारधर्म म्हणून धावत येतो. इथे आणिबाणीच्या प्रसंगात तुम्ही कुणालाही मदत मागू शकता. त्यासाठी प्रायव्हसी भंग होते का याचा विचार करण्याची गरज पडत नाही. इथे तो तुमचा हक्क समजला जातो.

त्याचबरोबर थोडे जास्त पैसे खर्च करण्याची तयारी दाखवली तर दारात अँब्युलन्स, पोस्ट ऑफीस, सुसज्ज हॉस्पिटल, हाकेच्या अंतरावर असलेला शॉपींग मॉल, क्लस्टर वाईज मिनी मार्केटस, हाय फाय सिक्युरिटी सर्विस, जवळच असलेली अत्याधुनिक शाळा अशा सुविधा देणा-या मगरपट्टा सिटी, अ‍ॅमेनोरा सिटी सारख्या अनेक टाऊनशिप उभ्या राहताहेत. तिथे राहण्याचा पर्याय स्विकारला तर तक्रारींचं कामच नाही राहत. त्या इंडीयातून बाहेर पडलात तर थोडा वेळ भारतियांशी संपर्क येतो तेव्हढं सहन केलंत कि झालं. अमेरिकेत कारजवळून कृष्णवर्णिय माणूस चालला कि गोरे लोक नकळत काच वर करतात तसं. हा अनुभव दस्तुरखुद्द बराक ओबामा यांनी सांगितला असल्याने शंकेस वाव नसावा ).

एकतर्फी अनुभव आहेत हे कसलं ऑर्ग्युमेंट आहे हे सांगता न येणा-याला हे अनुभव खूपच एकांगी आहेत असं जाणवतं आहे आणि अशांची संख्या थोडीथोडकी नाही.

Pages