"गेम ऑफ थ्रोन्स"

Submitted by लोला on 21 August, 2013 - 21:33

"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.

ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html

हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्‍या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.

वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.

जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.

हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.

करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!

"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाइल्डफायर अख्या शहरात केला तर आयर्न थ्रोन सकट शहर राख होईल, सर्सीबाईंचा जोहार Happy
तसही वाइन पिऊन जोहाराच्या तयारीत होतीच ब्लॅकवॉटर वॉर एपिसोडमधे पण बापानी वाचवलं !

जोरा ला आधार देऊन उठवताना दुसर्‍या बाजूने एक भला थोरला वाइट आला तेव्हा जोराला त्याच्यासमोर ढकलले असे कुणाला वाटलं का? सूट्स द 'न्यू डॅनी'!>>> टोटली.. मला पण वाटलच.

ब्रॅन ने रेवेनमध्ये जाउन का टीपी केला त्याचं प्रयोजन पण समजलं नाही.

सान्सा & टिरियन मधली मोमेंट फार छान होती खरच.

सॅम मरायला टेकला होता आणि जॉन त्याच्याकडे वळून वळून बघत होता पण मदतीला थांबला नाही हे पण अन्लाइक हिज कॅरेक्टर होतं असं वाटलं.

बॅक्ग्राउंड म्युझिक अफाट होतं कालच्या एपिसोड मध्ये.

रेड वुमन ची मी वाटच बघत होते त्यामुळे तिचं येणं अनपेक्षित नाही वाटलं. व्हॉट टुक यू सो लाँग असं वाटलं. मात्र तिचं मरण बाय फायर हवं होतं असं वाटलं जोरकसपणे.

लियाना मॉर्मंट भारी होती. खाली क्रिप्ट मध्ये दफन केलेले लोक जीवंत होतात ते बघून क्षणभर वाटलं की लियाना, नेड वगैरे मंडळी पण जीवंत होतात की काय आता..

आर्या तिच्याकडची नाइफ्/डॅगर सान्साला देते, ती नाइट किंग ला वेलेरियन स्टीलच्या डॅगर ने मारते. मग ती सास्नाला देते ते काय होतं?
तिथे माझं थोडं कंफ्यूजन झालय. आर्याकडे वेप्न्स नक्की किती होती/आहेत?
नीडल
ब्रॅन ने दिलेला वलेरियन स्टीलचा डॅगर ज्याने नायट्याचा नायनाट केला
गेंड्याने बनवलेलं ड्रॅगनग्लास चं भालासदृष वेपन.

ती सास्नाला त्यातलं काय देते? ता भाल्याचं पुढचं फक्त पातं की काय?

तिथे त्यांनी ढीगभर हत्यारं बनवलेली असतात की ड्रॅगन ग्लास वापरून. दिला असेल त्यातला एखादा. पण वॅलेरियन स्टील वाला नसेल दिला. तो वेगळा दिसतो.
एकूण त्या मोजक्या वॅलेरियन तलवारींचे महत्त्व समोर आले नाही! कारण त्या व्हा.वॉ च्या विरुद्ध वापरायच्या होत्या आणि त्यांना एलिमिनेट च केलं एकदम Uhoh

तेव्हा डॅनीला येऊन अगदी क्यूट मिठी मारतो ना तो तिचा ड्रॅगन.
>>>

ओह, मला वाटलं तो असा खाली बसला म्हणजे मेलाच!
अंधारात कोण ड्रॅगन काय करतोय ते कळतच नव्हतं

नाईट किंग तसा किरकोळीत मेला. मुख्य कुस्ती मिनिटात संपावी तसं झालं

एक तक्रार आहे माझी. सगळं वॉर रात्री होतं त्यात तो हिमवर्षाव , मिडिया रूम मह्द्ये मोठ्या स्क्रीन्वर सर्व धूसर दिसत होतं. वैताग आला. अग पॉज करून लहान स्क्रीन्च्या टीव्हीवर लावलं तर फरक पडला पण किंचितच.. त्या क्रिस्टल क्लियर दृश्य न दिसण्याचा जरा मानसिक त्रास झाला मला.

तिथे त्यांनी ढीगभर हत्यारं बनवलेली असतात की ड्रॅगन ग्लास वापरून. दिला असेल त्यातला एखादा.>>>> हां मग ठीके. माझ्या डोक्यात आपलं तिने सास्नाला काहितरी स्वतःकडचं पर्सनल वेपन दिलं असच येत होतं.

बर्याच लोकांकडून अंधार्या युध्दाबद्दल नापसंती वाचली.. पण....... आय थिंक दे आर मिसिंग पॉईंट !

रात्र वैर्याची होती, लाँग नाइट , हिमवादळात धुसर नाइट हीच तर नाइटकिंगची ताकद आणि विन्टरफेलची अडचण होती !
कोणता सैनिक कोणाचा हे न ओळखण्याइतका अंधार-कोलाहल , प्रतिकुल हवामान हाच तर खरा रुद्रावतार होता त्या युध्दाचा आणि म्हणूनच गॉड ऑफ लाइटचं महत्त्व !

डिज्जे एकटीच लढते आहे डिरेक्टरच्य बाजूने. तिला एखादा ड्रॅगन पाठवा मदतीला. Proud

हिंदी आर्ट फिल्मच्या तोंडात मारेल असा अंधार होता ह्या भागात, जाम वैताग आला. सांसा-टिरियन चा सीन मस्त Happy नाईट किंग मेला तर एकदम बरं वाटलं! किती वाताहत केली होती undead आर्मी नी नॉर्थ ची.

डीजे, तुझा मुद्दा तस बरोबरे पण शेवटी प्रेक्षकांसाठी बनवली ना सिरियल, मग त्यांना दिसायला नको का? नाहेतर तिथे स्क्रीन वर डिस्क्लेमर टाका की तुम्हालाच नव्हे तर विंटर्फेलात पण कोणालाच काही दिसत नाहीये. ड्रॅगन पण काही न दिसून एकमेकांवर आपटत आहेत. टीव्हीचा काँट्रास्ट्/ब्राइटनेस कृपया अ‍ॅडजस्ट करू नये Wink

डॅनीने जोरा ला आधार देऊन उठवताना दुसर्‍या बाजूने एक भला थोरला वाइट आला तेव्हा जोराला त्याच्यासमोर ढकलले असे कुणाला वाटलं का?
पहिल्यांदा तसे वाटलं पण
यासाठी दोनदा रिवाईंड करून पाहिला , जोराह तिला मागे ढकलतो स्वतः पुढे होतो.

>>नाहेतर तिथे स्क्रीन वर डिस्क्लेमर टाका की तुम्हालाच नव्हे तर विंटर्फेलात पण कोणालाच काही दिसत नाहीये.<<
तुम्ही कुठे रहाता इरीत का कॅसर्ली रॉक? यावेळेच्या ब्लिझर्डमध्ये वरच्या किंगडम्समधलं इंफ्रा कोसळल्याने कनेक्टिविटीचे वांदे झालेले आहेत. आणि त्यात भर म्हणजे S8E3 च्या व्युअर्शिप मध्ये अचानक स्पाइक आल्याने बँडविड्थ साठी मारामारी सुरु झाली, आणि याकारणाने बर्‍याच जणांना बफरिंग, लो पिक्चर क्वालिटीचा सामना करावा लागला. पलिकडे एसॉस च्या रहिवाश्यांकडुन सुद्धा काहि किरकोळ तक्रारी कानावर आल्या आहेत. इरीत बरेच लोक फायर सोर्ड टिवीसमोर घेउन बसले होते, अशी बातमी आहे.

आम्हि बरेच खाली, डोर्न मध्ये रहात असल्याने आम्हाला याची झळ बसली नाहि... Proud

युद्ध आता ऐन मोक्याला आलंय. तिथे जानराव बर्फाळ ड्रॅगनला मारण्याच्या खटपटीत आहेत. इथे थिऑनचं सुरक्षाकवच नाहीसं झाल्यानं सहज प्राप्त होणारा ब्रान आहे. मागे म्युझिक आता दृतलयीत आलंय आणि आपलं काळीज इथे धकधक करतंय.

नाईट किंग स्लो मोशनमधे अगदी ब्रानच्या समोर येऊन उभा ठाकलाय. त्याची नजर ब्रानवर खिळलेली.... मागे म्युझिक cresendo वर पोचलेय आणि आपण जीव डोळ्यात आणून बघतोय.

तोच एका क्षणी ब्रान मान वळवून नाईट किंगकडे बघतो आणि त्याचक्षणी म्युझिक थांबतं.... अफलातून.

................ फक्त प्रॉब्लेम असा झाला की ते म्युझिक थांबतं तिथून अचानक आता 'अलगूज वाजं नभात' सुरू होणार असं वाटलं ना भाऊ!

Crypt मध्ये जमा झालेले सगळे शेवटी डोळे फाडून काहीतरी बघू लागतात. तिथे काहीतरी सापडणार असं मला वाटतंय

डिज्जे एकटीच लढते आहे डिरेक्टरच्य बाजूने. तिला एखादा ड्रॅगन पाठवा मदतीला
< हो, शपथच घेतली आहे शो ची भक्त झाल्यापासून Proud
I shall shield reputation of your show and give tough fight on social media if needed be. I swear it by the old gods and the new !

जब्राट एपिसोड होता.
शेवटी आर्यानेच वाचवले जगाला
पण एकाच एपिसोड मध्ये नाईट किंग खपला राव अजून एक एपिसोड असता युद्धाचा तर मजा आली असती
आणि ड्रॅगन ची फाईट पण नाही दाखवली जास्त फायर अँड आईस वाली

आता लॉन्ग विंटर आलाय म्हणजे रात्रच राहणार का ? आणि लॉन्ग नाईट एव्हडीच होती का?
रेड वूमन मरताना उजाडताना दाखवलंय ?

कालच्या भागाकडून खरंतर फार मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु ......
तरीही श्वास रोखून धरायला लावणारं, शांत भेदक पार्श्वसंगीत काळजाचा ठोका चुकवते. डोथ्राकी, अनसलीड, बरेचसे वीर धारातीर्थी पडले.
मेलिसँड्राचा प्रवेश तसा अपेक्षितच होता. तीच घाबरलेल्या आर्याला आश्वस्त करते आणि सांगते की आर्या बदामी(ब्राउन), हिरवे आणि निळे डोळे कायमचे बंद करणार.
आतापर्यंत या मालिकेत मेलिसँड्राने आणि इतरांनी इतक्या भविष्यवाण्या केल्या आहेत की कोणतीतरी नक्कीचं खरी ठरते.
१) स्टॅनीस बॅराथियन
२) जोन स्नो
३) आर्या स्टार्क
४) ब्रान स्टार्क
५) बेरीक डंडारियन

या भागात जोनचा डायरवुल्फ घोस्ट, डोथ्राकी आणि जोराह सोबत पहिल्या आक्रमणात आघाडीवर दाखवला आहे. नंतर तो कुठेही दिसला नाही. कदाचित त्याच आक्रमणात तो गेला असावा. कोणते दोन ड्रॅगन मारामारी करत होते ते समजण्यात बराच घोळ होत होता.

नाईट किंगला जंगलाच्या मुलांनी (चिल्ड्रेन ऑफ फॉरेस्ट), ड्रॅगनग्लास वापरून बनविला (तीन डोळ्यांच्या रेव्हननी सांगितल्याप्रमाणे), प्रथम माणसांविरुद्व (फर्स्ट मेनविरुद्व) लढण्यासाठी. आणि जेंव्हा तो आवाक्याबाहेर गेला तेंव्हा फर्स्ट मेन आणि चिल्ड्रेन ऑफ फॉरेस्ट, एकत्र येऊन व्हाईट वॉकर्सविरुद्व लढले.

आणि एक नाईट्स किंगही आहे, जो वॉलचा १३ वा लॉर्ड कमांडर असतो. तो आणि त्याची जादूगर बायको त्यांची मुले व्हाईट वॉकरला समर्पित करतात, क्रेस्टरप्रमाणे.

जेव्हा हजार वर्षानंतर पुन्हा खेळ सिंहासनाचा (गेम ऑफ थ्रोन्स), पुढचा भाग तयार होईल, नवीन भाषेत आणि नवीन संकल्पनेत, तेंव्हा कदाचित नाईट किंग परत उगवेल. कदाचित आजच्या असण्याऱ्या भाषेपैकी कोणतातरी भाषा पुनर्निर्मित होईल लुप्त झालेली भाषा म्हणून, आणि मराठी भाषा मित्र मंडळ स्थापित होईल, व्हॅलेरियन आणि डोथ्राकी भाषे प्रमाणे.

आत्ताच एक मीम पाहिले, आर्या आणि टोनी दोघेही स्टार्क आहेत. डोक्याला शॉट!

>> जर्मन मधे (इतरही भाषामधे असेल कदाचित) स्टार्क म्हणजे स्ट्राँग , कदाचित त्यामुळे असेल Happy

जॉन स्नो चा ड्रॅगन गेला का ?>>> हो तेही नाहीच कळलं. नुसता ड्रॅगन कोसळताना दिसला.

डॅनीने जोरा ला आधार देऊन उठवताना दुसर्‍या बाजूने एक भला थोरला वाइट आला तेव्हा जोराला त्याच्यासमोर ढकलले असे कुणाला वाटलं का?
पहिल्यांदा तसे वाटलं पण
यासाठी दोनदा रिवाईंड करून पाहिला , जोराह तिला मागे ढकलतो स्वतः पुढे होतो.>> +१ मी पण २ वेळा रिवाइंड करुन पाहिलं. तो डाव्या हाताने तिला बाजूला ढकलतो व स्वतः तलवारीपुढे येतो.

घोस्टचं काय झालं?>>>>काही लढताना वगैरे नाही दिसली म्हणजे जिवंत असेल. पुढच्या एखाद्या भागात हळूच येउन दाखल होईल मागच्यावेळी प्रमाणे

आर्या: टकटक!
जॉन : कोन हाय?
आर्या : आर्या..
जॉन : आर्या कोन?
आर्या : आरं याला आता मी बी आठवना काय!

**********

डॅनी : टकटक!
जॉन : कोन हाय?
डॅनी : आत्ते..
जॉन : आत्ते कोन?
डॅनी : आत ये तरी बोल की रं

********************************

ब्रान : टकटक!
जॉन : कोन हाय?
ब्रान : ब्रान..
जॉन : ब्रान कोन?
ब्रान : ब्रान्डेड परफ्यूम हाय काय कोणता? ताईनं मागितलाय.

**********************************

सॅम : टकटक!
जॉन : कोन हाय?
सॅम : सॅम..
जॉन : सॅम कोन?
सॅम : सॅम्पल म्हणून पाठवलेलं लोणचं आवडलं काय विचारत होती गिली.

घोस्ट आणि दोन्ही ड्रॅगन जिवंत आहेत, e4 च्या preview मध्ये दिसतात एक एक क्षण>>>हो दिसला. १८व्या सेकंदाला सॅमच्या मागे उभा आहे तोच बोलताय ना?

दुसरा सिझन संपला.
फेसलेस मॅन आवडला. (तो साकारणारा कलाकार आऊटलँडर मधे स्टिफन बोनेट म्हणून छान वाटला असता.)

Pages