"गेम ऑफ थ्रोन्स"

Submitted by लोला on 21 August, 2013 - 21:33

"गेम ऑफ थ्रोन्स" ही George R. R. Martin यांच्या पुस्तकांवर आधारीत एचबीओची लोकप्रिय मालिका तुम्ही बघता का? बघत नसाल तर बघू लागा. तीन सीझन्स पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सीजनचे १० एपिसोड http://www.hbogo.com वर उपलब्ध आहेत. तुम्ही केबलवर एचबीओ घेतले असेल तर या साईटवर तीनही सीझन्सचे सर्व एपिसोड संपूर्ण पहाता येतील.

ऑफिशियल वेबसाईट (spoiler)
http://www.hbo.com/game-of-thrones/index.html

हा अतिशय लोकप्रिय शो most pirated show आहे. तिसर्‍या सीझनच्या प्रिमियरनेपायरसीचे रेकॉर्ड केले आहे.पाहिल्यावर कारण कळेलच.

वरच्या लिंक्सवर शोबद्दल माहिती मिळेलच.

जे पहात आहेत त्यांनी न लाजता इथे चर्चा करा. हा माझा फार आवडता शो आहे. मी सर्व एपिसोड पाहिलेले आहेत. चौथा सीझन मार्च २०१४ मध्ये सुरु होईल. त्यापूर्वी आधीचे पाहून घ्या. कोणी कितपत पाहिले आहे ते लिहीलेत तर बरे होईल. पुढचे काही फोडले जाणार नाही याची दक्षता घेता येईल.

हा interactive map तुम्हाला उपयोगी पडेल. कोणते राज्य कुठे आहे तसेच एपिसोड प्रमाणे कोणते पात्र कसे ट्रॅव्हल करते ते दिसेल. तुम्ही पाहिलेत तिथपर्यंतच जा, फार पुढे जाऊ नका.

करा तर मग सुरुवात. बघाल तर हसाल, न बघाल तर फसाल!

"When you play the game of thrones, you win or you die. There is no middle ground." - Cersei

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कडक वॉर... मला अगदी पहिल्या season पासून आर्यावर विश्वास होता.. आणि पुढे तिचं ते शिक्षण, मृत्यूदेवतेकडे उपसलेले कष्ट, यातून हीच खरी राणी हे तेव्हाच वाटत होतं. तसा खलिसी साठी सॉफ्ट कॉर्नर आहे, पण ती बया कधीकधी जरा मूर्खपणा का करते हे कळत नाही! असो, ती जी काही आहे ती तिच्या चुकांमुळेच आहे !

जबरी एक्सायटिंग एपिसोड!! पण मिक्स्ड फीलिंग्ज. विचार करतेय अजून!!
डेड आर्मी अटॅक स्केरी होता! सुरुवातीलाच डोथ्राकी आरोळ्या मारत जातात आणि मग हळू हळू शांतता.. ते खतरनाक होतं. बिचारे सस्त्यात मेले सगळे.
जॉन आणि डॅनीने नेतृत्व करताना, डिसिजन घेताना दाखवायला हवं होतं असं वाटलं. त्यांनी बराचसा वेळ भलत्याच लढाईत ( स्नो स्टॉर्म मधे उडण्यात) घालवला. आणि मग जॉन ने बॅटल ऑफ बास्टर्ड्स प्रमाणेच आततायी मूव करून संकटात सापडणे Happy पण ते त्याच्या कॅरेक्टर प्रमाणेच होतं अर्थात. ब्रेव,पण इमोशनल. जोरा मोर्मॉन्ट अपेक्षेप्रमाणे डॅनीला वाचवताना शहीद! बायदवे डॅनीने जोरा ला आधार देऊन उठवताना दुसर्‍या बाजूने एक भला थोरला वाइट आला तेव्हा जोराला त्याच्यासमोर ढकलले असे कुणाला वाटलं का? सूट्स द 'न्यू डॅनी' Happy (असं मला वाटलं)
मेलिसान्ड्रेची अचानक एन्ट्री आणि तिचा रोल पण अनपेक्षित होता यात. दॅट वॉज इंटरेस्टिंग.सो आर्या वॉज द प्रॉमिस्ड वन!! मस्त होता तो पूर्ण सीक्वेन्स! बेरीक फायनली आर्याला डीफेन्ड करताना शहीद. ( अवतार कार्य!)
ब्रॅन मधेच कावळ्यात शिरून कुठे आणि का गेला ते कळले नाही. थिऑन ची एकाकी लढत आणि मरणं टचिंग आणि त्याच्यासाठी रीडीमिंग मोनेट होती. त्यावेळेचं बॅकग्राउंड म्यूझिक हाँटिंग आहे. ब्रॅन चे थिऑन ला मरण्यापूर्वी थंड पणे "गुड मॅन" असल्याचे सर्टिफिकेट आणि थॅन्क्यू म्हणणे हे भयंकर चिलिंग होतं!
नाइट किंग हळु हळू चालत ब्रॅन कडे आला तेव्हा मी श्वास रोखून धरला होता!! आता काय होणार ?!! नाइट किंग मौन सोडून फायनली काहीतरी डायलॉगबाजी करेल का? आता ब्रॅनच नाइट किंग ची थिअरी खरी ठरते का ?? एक क्षण असंही वाटलं की ये आया नाट्यमय ट्विस्ट - अब नाइट किंग एकदम ब्रॅन के पांव छुएगा क्या ??? Rofl
पण नाही. आर्या एन्टर्ड अँड स्टोल द शो!! सॉल्लेट ! तिनेच नाइट किंग ला मारावे असे वाटत होतेच. पण ते जरा अजून अवघड/नाट्यमय दाखवले असते तर आवडले असते जास्त.
आता पुढचे ३ भाग सगळी इक्वेशन्स बदलणार. सगळ्यात अल्टिमेट एनिमी नाइट किंग आणि द डेड आर्मी आहे यावर बेस्ड समीकरणे आता व्हॅलिड नाहीत !! आता प्रश्न पडलेत , केवळ त्या "ग्रेटर कॉज" साठी एकत्र आलेल्यांचे काय होणार? ह्यूमॅनिटीसाठीची ग्रेटेस्ट फाइट एकदा होऊन गेली मग आता आयर्न थ्रोन साठीची फाइट फार "पेटी फाइट" वाटेल का? मग आर्या चं अवतार कार्य संपलं की काय ?? तीच सर्सीला पण मारेल का? की ती परत जाईल मेनी फेस्ड गॉड च्या सेवेत ?!!

येय!!!! Arya shut the blue eyes!

एपिक एपिसोड. इतकी इम्प्रेस मी कधीही कशाहीमुळे झाले नव्हते.

युद्धातली हतबलता प्रचंड प्रमाणात अधोरेखित करून देखिल आणि अत्यंत असमान ताकदीच्या दोन सेना असूनही शेवटी मानवांचा विजय झाला. रेड वुमननं आर्याला तिच्याहातून जे महान कार्य होणार आहे त्याची जाणीव करून हिंमत दिली. नाहीतर आर्याही घाबरली होती.

डोथ्रोकींचा विनाश झाला पुन्हा जिवंत झाले आणि मेले. हाऊस ऑफ मरमोन्टचे फार नुकसान झाले - सर जोराह आणि लेडी मरमॉन्ट दोघेही शौर्याची परीसीमा गाठून मेले.

आता - मिशन सर्सेई.

बायदवे डॅनीने जोरा ला आधार देऊन उठवताना दुसर्‍या बाजूने एक भला थोरला वाइट आला तेव्हा जोराला त्याच्यासमोर ढकलले असे कुणाला वाटलं का? >>>> Yeah, she did it and it was the most shocking moment for me. I was her great fan initially, पण 7व्या सिझनपासून ती मला अतिशय इगोइस्टिक आणि कधी कधी मूर्ख वाटायला लागली. तिची बॉडी लँग्वेज तिची उभं राहणं आणि चालण्याची स्टाईलच बदलून गेली. ( अर्थात हे सगळं कॅरेक्टर बद्दल, एमिली is the best. She acted n projected the character so well).
I hated her today for what she did to my favorite Sir Jorah and I do not want her to sit on the iron throne ever. ती एवढी रडली म्हणून मी तिला क्षमा तरी केली आणि तिने वॉरमध्ये मरावं अशी इच्छा केली नाही. Proud

Arya shut the blue eyes। >>>> अजूनही विश्वास बसत नाहीए. एवढे सिझन्स एवढी हवा, इतका सस्पेन्स आणि प्रचंड टेरर असताना फार स्वस्तात गेला असं फिलिंग येत आहे. जॉन स्नोबरोबर थोडी तलवारबाजी आणि ब्रॅन बरोबर थोडी डायलॉगबाजी हवी होती. शेवटपर्यंत आवाज ऐकायला मिळाला नाही.

आता विचार करताना, नाईट किंग असा मरणे हेच लॉजिकल वाटते आहे. नाहीतर गोष्ट पुढेच जाणार नाही. हे थोडेसे किंगच्या 'द स्टँड' सारखे झाले. अल्टीमेट इव्हीलचा नाश होताच परत जुने, क्षुद्र हेवेदावे सुरु होणारच.
मला सगळ्यात इंटरेस्ट डॅनीच्या 'आय अ‍ॅम गोईंग टू ब्रेक द व्हील' वाल्या पाराडाईम शिफ्ट मध्ये आहे
डोथ्राकी गेले, बरेचसे अनसलीडही म्हंजे परत सर्सी म्हणते तसे 'वाचतील त्यांना घेऊ बघून'
मला वाटले जॉन आगीत जळत नाही असा एक तरी सीन असेल पण तो ड्रॅगनवर बसतोय एवढेही संशय घ्यायला पुरेसे आहे.
सान्साबाय परत लगिन लावतात की काय टिरिअनशी?!!

आता जेव्हढे उत्तरेत आहेत खास करून विंटरफेलवाले दक्षिण्यांवर चाल करून जाणार. डॅनी नायतर जॉन बाकीच्यापुढे ऑप्शन ठेवणार आलात तर तुच्यासोबत, नाही आलात तर तुम्हाला वगळून, आडवे आलात तर तुम्हाला चिरडून आम्ही आक्रमक करणार वैगरे वैगरे

जॉन स्नोबरोबर थोडी तलवारबाजी आणि ब्रॅन बरोबर थोडी डायलॉगबाजी >>> अगदी तलवारबाजी नाही तरी आधी वाइट्स , मग त्यांच्या अटॅक च्या वरची लेवल म्हणजे त्यांच्या नंतर ते लांब केसांचे घोड्यावर बसलेले व्हाइट वॉकर ( त्यांची वाइट्स हून अ‍ॅडव्हान्स्ड लेवल असावी पण ती बाहेर आलीच नाही काही) येतात असे दाखवले असते, त्यांच्याशी लढायला फक्त वॅलेरियन स्टील असलेले लोक, त्यांना मारताना ब्रिएन आणि त्या लेवल चे लोक धारातीर्थी पडणे, आणि मग नाइट किंग येणे, तो अनस्टॉपेबल होणे आणि मग आर्याने येऊन त्याचा खातमा असे काहीतरी ड्रॅमॅटिक सीक्वेन्स आवडले असते. जास्त लॉजिकल वाटले असते.

डोथ्राकी गेले तरी बरेचसे अनसलीड, नॉर्थचे मावळे, मरीनमध्ये असलेले सेकंड सन्स, वाइल्डलिंग्ज असे बरेच योद्धे अजून विंटरफेलमध्ये शिल्लक आहेत. सर्सीशी पंगा घेणे त्यालाच जमू शकेल जो जास्तीत जास्त राज्यांना मोबिलाईझ करू शकेल. व्हेल, टलीज, फ्रे, हायगार्डन, डॉर्न ही राज्ये उध्वस्थ झालीयेत. आणि मुळातच किंग्ज लॅंडिग्जमध्ये असंतोष आहे. या जनतेला पटवणे, तिथे राज्यकर्ते म्हणून आपल्या मर्जीतली माणसं बसवणं तेदेखिल कमीतकमी हिंसा करता हे टिरियन, वॅरीस, दावोस वगैरे करू शकतील. जॉन कि डॅनी हे ठरण्यासाठी शांतीच्या काळात कोण योग्य शासक ठरेल यावर विचार होईल. पुढील भागांत या स्वरूपाचे शह काटशह असतील असे वाटते. सर्सी युरॉनच्या हातातले प्यादे होऊन बसलीये, ती नक्की काय करते यावर किती कमीत कमी खुर्दा खर्ची पडणार हे कळेल.

**** इथल्या सगळ्या पोस्ट्ससाठी स्पॉइलर वॉर्निंग ****
हे एपिसोड्स अजून पाहिले नसल्यास इथून निघून थेट आपल्या क्रिप्टमध्ये जाऊन लपावं. एपिसोड पाहून झाल्याशिवाय बाहेर येऊ नये.
व्हॉट इजन्ट सीन मे नेव्हर बी सीन! Proud
*****************************************************

मला हा एपिसोड काहीसा अन्डरव्हेल्मिंगच वाटला. लढाईत तयारी दिसत होती त्या मानाने स्ट्रॅटेजी अशी काही दिसली नाही. बहुधा नाइट वॉकर्सच्या संख्येमुळे तसं झालं असावं - विंटरफेलमध्ये सहज शिरले ते असं वाटलं. आणि ब्रॅन-नाइट किंग समोरासमोर आल्यावर श्वास रोधला गेला खरा, पण त्यांच्यात काही घडलंच नाही! ज्या नाइट किंगच्या येण्याबद्दल गेले सात सीझन बोलबाला होता, तो बिचारा एकही शब्द न बोलता मुकाट मेला. Proud
एम्टीने लिहिल्याप्रमाणे ब्रॅन कुठे वॉर्ग करून बसला होता कोण जाणे!

>> बायदवे डॅनीने जोरा ला आधार देऊन उठवताना दुसर्‍या बाजूने एक भला थोरला वाइट आला तेव्हा जोराला त्याच्यासमोर ढकलले असे कुणाला वाटलं का?
हो!!

लेडी मर्मॉन्ट-जायन्ट आणि आर्या-एन्के यांच्यातले फायनल सीन्स पॅरलल वाटले! ती बिचारी गेली. मर्मॉन्ट्सचा निर्वंश झाला.

आर्या इज द न्यू हीरो!! Happy

पुढच्या भागाचा छोटासा प्रीव्ह्यू दाखवला त्यात डॅनीच अजून लीड करताना दिसत आहे ...

बाकी ते नाइट वॉकर्सचे स्पायरल सिम्बॉल्स, चिल्ड्रन ऑफ द फॉरेस्ट, क्रिप्टमधले स्टार्क पितर वगैरे वगैरेंचं काय? त्याचं काही एक्स्प्लनेशन येणार की नाही? उगा डोक्याला भुंगे लावले होते एकेक!

>>ती नक्की काय करते यावर किती कमीत कमी खुर्दा खर्ची पडणार हे कळेल.<<

माझ्या मते ड्रेगान्+र्हेगार समोर दे आर लाइक सिटिंग डक्स. ड्रॅगन्सना आगीमुळे हानी पोचत नाहि; वाइल्ड फायर माइट डु दि ट्रिक. बाकि, मलाहि वाटलं नाइटकिंगला खुप स्वस्तात कटवला. जॉन आणि त्याची बाउट दाखवायला हवी होती...

अनुमोदन @maitreyee , अगदी अटीतटीची लढाई, हुरहूर उत्कंठा आणि भिती शिगेला नेऊन ठेवली त्या मानाने शेवट नाही आवडला थोडा मसाला पाहिजे होता.

आर्या ची लढाई अप्रतिम .

खूप छान प्रश्न आहे. What night king wanted from Bran? Red lady kon asate? White Walker

कोणी तरी explain Kara please

नाइटकिंगला आगीने काही झालं नाही ते का आणि? तोही टार्गेरियन होता कीकाय? Proud

बाकी कालच्या एपिसोडचं नाव 'कट्यार काळजात घुसली' ठेवायला हरकत नाही. Proud

>>बाकी कालच्या एपिसोडचं नाव 'कट्यार काळजात घुसली' ठेवायला हरकत नाही.<<
हाहा. भाडिपा वाले हि लाइन आता चोरणार...
नाइटकिंगचा जन्म आणि मृत्यु काळजात कट्यार खुपसुनच झाला शेवटी.

>>What night king wanted from Bran?<<
याचं उत्तर सॅमने S8E2 मध्ये दिलेलं आहे...

नाइटकिंगला आगीने काही झालं नाही ते का आणि?>>> साधी आग नाईट किंगचं काहीच वाकडं नाही करू शकत, ब्रान आणि होडोर जेव्हा गुहेत असतात तेव्हा फर्स्ट मेन गुहेभोवती आग लावतात पण नाईट किंगने त्या आगीवर पाय ठेवताच ती विझते. जी डेड आर्मी असते तिला फक्त भीती असते आगीपासून.

नाइट किंग ला नसतेच काही होत फायर ने. ते हार्ड होम च्या एपिसोड मधे दाखवले होते. फायर फक्त वाइट्स ना थांबवू शकतो. नाइट किंग ला फक्त वॅलेरियन स्टील किंवा ड्रॅगन ग्लास लागतो त्याला!

ओह राइट!
'मेला नाइट किंग आगीला भीत नाही!' अशी नवीन म्हण कॉइन करायला हरकत नाही. Proud
मग डॅनीला ते माहीत नसतं? कोणी सांगितलं नाही लढाईची आखणी करताना?

Night king usually doesn't show any expressions , but the way he laughed at Dany after her Dracarys, epic!! Lol

What night king wanted from Bran?
<<
ब्रॅन हा मानवतेचा इतिहास आहे. तो पुसून टाकला की मग जिवंत माणसं संपवणे सोपे. अशी काहीतरी कन्सेप्ट आहे म्हणे.

जॉन आणि डॅनीचे ड्रॅगन जिवंत आहेत की मेले? अंधारामुळे मला काय कळलं नाही.
जॉन डॅनी आकाशात नुसतेच घिरट्या मारत होते. ते बोअर झाले. नाईट किंग पण किरकोळीत संपला.
कोणी सेक्स केला नाही पूर्ण एपिसोडमध्ये रात्र असून देखील

जॉन आणि डॅनीचे ड्रॅगन जिवंत आहेत की मेले?
<<

आहेत की.

तो जोरा मरताना ही रडत असते तेव्हा डॅनीला येऊन अगदी क्यूट मिठी मारतो ना तो तिचा ड्रॅगन.

हो, डॅनीने स्वतःला वाचवण्यासाठी त्याला पुढे ढकलले , निदान दिसले तरी तसे !
मला एक क्षण वाटत्लं आता जोराह तिला वाचवणार नाही आणि मोक्याला डॅनीला पुढे करेल पण तो पडला अस्सल डॅनीप्रेमी ! सर्सीदेवी म्हणून गेल्या आहेत “ The more people you love, the weaker you are. You'll do things for them that you know you shouldn't do. You'll act the fool to make them happy, to keep them safe. Love no one but your children."

>>> मला एक क्षण वाटत्लं आता जोराह तिला वाचवणार नाही
मेन डू स्टुपिड थिंग्ज फॉर विमेन! - सान्सा

बरोबर, कारण सान्सा सर्सीकडूनच शिकली आहे !

ज्यांना हे युध्द अजुन इन्टेन्स हवे होते, लक्षात ठेवा, सबपी बाप सर्सी है , अल्टीमेट टार्गेट आयर्न थ्रोन आहे , नाइटकिंग नाही !
अत्तापर्यन्त सर्सीने टाकलेले सगळे फासे बरोबर पडलेत , तिनी स्वतःची आर्मी विंटरफेलला पाठवून धारातिर्थी पाडली नाही, तिची पॉवर सहीसलामत आहे , त्याविरुध्द डॅनीची मात्र बरीच आर्मी उध्वस्त झाली आहे.
डॅनी तशीही आयर्न थ्रोनसाठी हल्ला करणारच होती किंग्ज्कँडींग वर, जरी सर्सीने लॅनिस्टर आर्मी पाठवली असती तरीही, त्यामुळे तिनी त्यांना नाइटकिंगशी लढू देऊन मरतील तितके परस्पर नाइटकिंगकडून मरु दिले आणि स्वतःला जास्तं बळकट करण्याकडे लक्ष दिले !
जिस स्कुलमे डॅनी पढती है, सर्सी उस स्कुलकी प्रिन्सिपॉल, ट्रस्टी सबकुछ है !
खरं अवघड लक्ष्य आयर्न थ्रोन आहे जिथे परस्परातच सर्सीच्या शत्रुंचे मतभेद होणार आहेत !
जॉन / डॅनी/ टिरियन आणि गेंड्रीही दावेदार आहे, आता कोण कोणाला सपोर्ट करेल कोण कोणाशी युती करेल ?
नाइटकिंगसारख्या सुपरनॅचरल पॉवरशी लढून हारवलय पण जेंव्हा बहिण -भाऊ /आत्या -भाचा रक्ताची नाती एकमेकांविरुध्द जातील तिथे मार खातील का ?

ड्रॅगन्सच्या जोरावरच टार्गॅरियन्सनी सेवन किंगडम वर राज्य केलं होतं. डॅनीच्या ड्रॅगन्स समोर गोल्डन आर्मी कापरा सारखी जळुन नाहि का जाणार?

Pages