जाता येता बंद करा रे दार मनाचे
खुले न राहो मुळीच कोषागार मनाचे
समोर दिसली मान फिरवुनी निघून गेली
मस्त निखळले शेवटचे आधार मनाचे
माझ्या असण्यासाठी सारे जग असते हे
असे वाटणे हेसुद्धा उपकार मनाचे
जे झाले ते व्हावे वाटत होते माना
स्वप्न हवे ते होते मग साकार मनाचे
तुला मानतो माता भगिनी जगासमोरी
कशास सांगू सांग तुला व्यभिचार मनाचे
खुद्दारी फुसकी माझ्या लाचार मनाची
लाचारी वैशिष्ट्य तुझ्या खुद्दार मनाचे
देह जाळला अस्थि बुडवल्या कविता विकल्या
कुणी चोरले समजेना भंगार मनाचे
बरी चांगली हलकट स्वार्थी खरी नि खोटी
दुनिया म्हणजे निव्वळ आविष्कार मनाचे
तुझ्यात काही विशेष आहे म्हणेनही मी
भेट तिथे नसतात जिथे संचार मनाचे
मग मी आहे कसा तुला समजेल कदाचित
फक्त एकदा गृहितक तू झिडकार मनाचे
आत कुणी का येईना हे समजत नाही
भरलेले तर दिसते की आवार मनाचे
मन मारत बसते ना मन?... दे शिक्षा त्याला
'बेफिकीर' हो अन् खुशाल मन मार मनाचे
-'बेफिकीर'!
जे झाले ते व्हावे वाटत होते
जे झाले ते व्हावे वाटत होते माना
स्वप्न हवे ते होते मग साकार मनाचे>>>>> हे नाही समजल....
बाकी मस्त!
मधुरा, जे घडलय ते तसच घडावं
मधुरा,
जे घडलय ते तसच घडावं असं मला वाटत होतं अशी भावना ठेव किंवा असच मनाला समजाव
म्हणजे मग तुझ्या मनाची स्वप्ने साकार झाल्यासारखं वातेल
असा काहीसा अर्थ मला लागला...
एकुण एक शेर आवडला
खुप मस्त!
ओके.....
ओके.....

मनाचे शेर ! मनोव्यापारांना
मनाचे शेर ! मनोव्यापारांना साजेशा व्यामिश्र द्विपदी सर्वच.
तुझ्यात काही विशेष आहे म्हणेनही मी
भेट तिथे नसतात जिथे संचार मनाचे..
मनोमन आवडली गझल.
कोषागार, भंगार, आविष्कार हे
कोषागार, भंगार, आविष्कार हे सर्वात विशेष वाटले.
सुंदर... समोर दिसली मान
सुंदर...
समोर दिसली मान फिरवुनी निघून गेली
मस्त निखळले शेवटचे आधार मनाचे ... आवडला ( मस्त चे काहीतरी करा)
एकूण एक शेर आवडला. खुप
एकूण एक शेर आवडला.
खुप अर्थगर्भ गझल.
धन्यवाद बेफिजी !
-सुप्रिया.
आप्रतिम गझल. शामशी सहमत.
आप्रतिम गझल.
शामशी सहमत.
अप्रतीम गझल खूप खूप
अप्रतीम गझल
खूप खूप आभार
'मस्त'च मस्त !!!! मनाचे आधार निखळताना पाहून तेही शेवटचे ..."मस्त निखळले नै" असे म्हणणे हीच उपहासगर्भित संवेदनशीलता शेरास मदमस्त बनवत आहे ..टची बनवत आहे _______वै म !!
अर्धगर्भ <<<< ??? लिंगनिदान
अर्धगर्भ <<<<
???
लिंगनिदान केल्यासारखे वाटले.

धन्यवाद
शामराव - वैवकुने दिलेलेच उत्तर मला अभिप्रेत होते.
सर्वांचे आभार!
छान आहे, आवडली!
छान आहे, आवडली!
अच्छा! मधुरा परत येऊन वाच ग
अच्छा!
मधुरा परत येऊन वाच ग
लोलादेवी, खुद्द आपला
लोलादेवी, खुद्द आपला प्रतिसाद? मैत्रीपूर्ण आभार
रिये, तुला त्या मधुरा कोण ते
रिये, तुला त्या मधुरा कोण ते बरे माहीत आहे?
नाही माहीत मला ती तीच नाव
नाही माहीत मला ती
तीच नाव मधुरा आहे (म्हणजे पुर्वी तीने तसं लिहिलेलं) म्हणून म्हणतेय मी
ओक्क्क्के
ओक्क्क्के
गोल्डनस्टार= मधुरा कुलकर्णी..
गोल्डनस्टार= मधुरा कुलकर्णी.. रिया, आयडी जसा घेतलाय, तशी हाक मारत जा.. संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी..
तुला मधेच कोणी प्रियंका म्हणून हाक मारली, तर लोक म्हणतील, कोण ही? तसंच.. 
'अर्थगर्भ' म्हणायचे होते....
'अर्थगर्भ' म्हणायचे होते....:-)
चुकून 'थ' च 'ध' झाल ! ......:-(
समोर दिसली मान फिरवुनी निघून
समोर दिसली मान फिरवुनी निघून गेली
मस्त निखळले शेवटचे आधार मनाचे
आत कुणी का येईना हे समजत नाही
भरलेले तर दिसते की आवार मनाचे
शेर फार आवडले.
खूप छान गझल!
खूप छान गझल!
मस्त हा शब्द '' विषादाने''
मस्त हा शब्द '' विषादाने'' उच्चारल्यास अर्थाला एक वेगळीच छटा लाभते हे जाणवले.
मस्त मस्त
मस्त मस्त
संपूर्ण गझल आवडली.
संपूर्ण गझल आवडली.
समोर दिसली मान फिरवुनी निघून
समोर दिसली मान फिरवुनी निघून गेली
मस्त निखळले शेवटचे आधार मनाचे ... आवडला ( मस्त चे काहीतरी करा)>>>>> मस्त ऐवजी 'पूर्ण' कसा वाटेल?
_____________________________________________________________________
धन्यवाद सानी,
You always support me!!! Sooo sweet of you!!! Thanks!
रिया / प्रिया,
आता मी ID खर नाव ठेवलेला आहे...सो, आता कन्फ्युजन होणार नाही.....मायबोलीवरचे ID पाहून वेगळा ID घेऊन पाहावा म्हणून Golden Star हा ID घेऊन पाहिला....
छान !!
छान !!
सगळेच शेर बढिया.
सगळेच शेर बढिया.
जस्ट लव्हड धीस
जस्ट लव्हड धीस
मस्तच!
मस्तच!
उपकार, साकार, आवार हे शेर फार
उपकार, साकार, आवार हे शेर फार आवडले!
एकूणच गझल मस्त!!