धाडस ___ शतशब्दकथा

Submitted by तुमचा अभिषेक on 14 August, 2013 - 11:51

लाकडी पुलावर जमलेल्या गर्दीचा कोलाहल क्षणाक्षणाला वाढत होता..
मी मी म्हणवणारे पट्टीचे पोहणारे पाण्याच्या उग्र रुपाला पाहून दबकले होते..
त्या बेफाम प्रवाहात काळ्या कातळांशी सामना म्हणजे आत्महत्याच जणू..
खुद्द तिच्या बापाने आशा सोडली होती..

इतक्यात पैलतीरावरून तीरासारखा तो धावत आला आणि मासोळीसारखा पाण्यात झेपावला..
काही काळासाठी सार्‍यांचे श्वास रोखले गेले, मात्र तो तिला घेऊनच काठावर आला..
वाहव्वा..! सर्वत्र एकच जल्लोष..!!

थोड्याच वेळात ती शुद्धीवर आली.. मात्र त्याची हालचाल मंदावली होती..
इतक्यात कोणीतरी अ‍ॅम्ब्युलन्स आली म्हणून आवाज दिला..
गर्दीला मागे सारत पांढर्‍याशुभ्र कपड्यातील कर्मचारी पुढे झाले.. अन त्या तरुणाला सोबत घेऊन गेले..

सुदैवाने एक फरार वेडा चोवीस तासांच्या आत सापडला होता !

- तुमचा अभिषेक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

Dhadas kartay mhanje vede asal................ashya ajun vedyanchi garaj ahe.......apratim

Pages