Submitted by वैवकु on 13 August, 2013 - 13:02
कधी नव्हतीच माझी ना विरोधी बाकड्यासाठी
युती करणार नाही मी तुझ्या एका मतासाठी
कसे मग यायचे शिकता कसे वागायचे असते
बरे असतेच लोकांनी फसवणे आपल्यासाठी
तसे नुकतेच आकारास आले आपले नाते
तुला इतक्यात सल्ला व्यक्तिगत मागू कशासाठी
फलाटे रूळ यांसाठी श्रमवले दु:ख मी माझे
सुखा तू 'आग'-गाडी आण त्याच्या सार्थकासाठी
मनाचे कायदे हरतील ह्या एकाच भीतीने
कधीही भांडलो नाही स्वतःशी मी खर्यासाठी
मला जाणीव असते विठ्ठला तू स्तुत्य असल्याची
तुला बदनाम करतो मी स्वतःला निंदण्यासाठी
________________________________________________
मध्यंतराच्या काळातली ही गझल मायबोलीकरांसोबर शेअर करायला विसरलोय हेच विसरलो होतो .क्षमस्व .आज आठवले
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>> मनाचे कायदे हरतील ह्या
>> मनाचे कायदे हरतील ह्या एकाच भीतीने
कधीही भांडलो नाही स्वतःशी मी खर्यासाठी >> हे खूप आवडले.
मनाचे कायदे हरतील ह्या एकाच
मनाचे कायदे हरतील ह्या एकाच भीतीने
कधीही भांडलो नाही स्वतःशी मी खर्यासाठी
मला जाणीव असते विठ्ठला तू स्तुत्य असल्याची
तुला बदनाम करतो मी स्वतःला निंदण्यासाठी >>> सुरेख शेर..!
मतलासुद्धा खूप आवडला. ले.शु.
धन्यवाद!
पहिला आणि शेवटचे दोन खूप आवड
पहिला आणि शेवटचे दोन खूप आवड ले. मस्त.
छान...
छान...
कसे मग यायचे शिकता कसे
कसे मग यायचे शिकता कसे वागायचे असते
बरे असतेच लोकांनी फसवणे आपल्यासाठी
तसे नुकतेच आकारास आले आपले नाते
तुला इतक्यात सल्ला व्यक्तिगत मागू कशासाठी
मनाचे कायदे हरतील ह्या एकाच भीतीने
कधीही भांडलो नाही स्वतःशी मी खर्यासाठी
वा ! सहजता खुप आवडली शेरातील.
मनाचे कायदे हरतील ह्या एकाच
मनाचे कायदे हरतील ह्या एकाच भीतीने
कधीही भांडलो नाही स्वतःशी मी खर्यासाठी<<< छान
माशा ,सुशांतराव , परिजाता ,
माशा ,सुशांतराव , परिजाता , अरविंदजी , सुप्रियाताई व बेफीजी
मनःपूर्वक धन्स
तसे नुकतेच आकारास आले आपले
तसे नुकतेच आकारास आले आपले नाते
तुला इतक्यात सल्ला व्यक्तिगत मागू कशासाठी>>>>>मस्त!
अख्खी गझल जमून आलेली. मनाचे
अख्खी गझल जमून आलेली.
मनाचे कायदे हरतील ह्या एकाच भीतीने
कधीही भांडलो नाही स्वतःशी मी खर्यासाठी
मला जाणीव असते विठ्ठला तू स्तुत्य असल्याची
तुला बदनाम करतो मी स्वतःला निंदण्यासाठी
अगदी पटले, पोचले शेर.
शेवटचे दोन सर्वात विशेष
शेवटचे दोन सर्वात विशेष वाटले.
एकदम छान... "कसे मग यायचे
एकदम छान...
"कसे मग यायचे शिकता कसे वागायचे असते
बरे असतेच लोकांनी फसवणे आपल्यासाठी "
क्या बात है!!
Golden star , भारतीताई ,उकाका
Golden star , भारतीताई ,उकाका ,गणेशजी ...मनःपूर्वक धन्यवाद
सुंदर . शेवटचे दोन एकदम खास.
सुंदर . शेवटचे दोन एकदम खास.
बरे लिहिता तुम्ही कुलकर्णी.
बरे लिहिता तुम्ही कुलकर्णी.
अमेय धन्स मारुतीकांबळे खरे
अमेय धन्स
(आज आपणास प्रथमच पाहिले ..निदान ह्या नावाने तरी )
मारुतीकांबळे खरे लिहिल्याबद्दल विशेष आभार
मस्त. ..
मस्त. ..
धन्यवाद सचिन जी
धन्यवाद सचिन जी
मनाचे कायदे हरतील ह्या एकाच
मनाचे कायदे हरतील ह्या एकाच भीतीने
कधीही भांडलो नाही स्वतःशी मी खर्यासाठी
>> आवडला!!
वाह वाह.... विठ्ठलाचा शेर
वाह वाह.... विठ्ठलाचा शेर ग्रेट