झुळझुळ वाहणारं पाणी खळखळ नाद करतं. एक चैतन्य, उत्साह निर्माण करतं. कधी त्याचा फेसाळ, दुधाळ रंग चित्तवेधक असतो तर कधी त्याच्या स्वच्छ प्रवाहातून दिसणारा तळ ! पण हेच पाणी साचून राहिलं की ? नकोसंही होतं.
प्रवासही प्रवाही असायला हवा. कुठेही अडून राहावं लागलं, खोळंबा झाला की नकोसं होतं. दिशा चुकली, भरकटली की संयम सुटतो. गती ही प्रवासासाठी अत्यावश्यक.
'चेन्नई एक्स्प्रेस' हा एक गतिमान प्रवास आहे. ही गाडी कुठेही 'सायडिंग'ला पडत नाही. औरंगाबाद-पुणे रेल्वे दौंड मार्गे जाऊन ८ तास खाते, तशी ही चेन्नई एक्स्प्रेस वेड्यासारखी भरकटत नाही. ह्या गाडीचं तिकीट काढताना आपल्याला माहित असतं की ही कुठल्या मार्गाने जाणार आहे, किती थांबे आहेत, किती वेळ लागणार आहे आणि अर्थातच कुठून सुरु व कुठे संपणार आहे. सगळं काही माहित असतानाही हा प्रवास कंटाळवाणा होत नाही. डब्यातल्या शौचालयाच्या वासाने गुदमरायलाही होत नाही आणि विदाउट तिकीट चढलेल्या उपऱ्या लोकांचा त्रासही होत नाही.
गाडी मुंबईहून सुरु होते. जसा अमिताभ 'विजय' असायचा, तसा शाहरुख 'राज' किंवा 'राहुल' असतो. इथे तो राहुल आहे. भूमिकेत शा.खा. फिट्ट होण्यापेक्षा भूमिका शा. खा. साठी फिट्ट व्हावी म्हणून आधीच सांगून ठेवलेलं आहे की तो चाळीशीचा आहे. वयस्कर व्यक्तिची प्रेमकहाणी दाखवायची आहे म्हणून त्याचं आधी एखादं लग्न झालेलं आणि बायको गचकलेली वगैरे भावनिक ठिगळं इथे नाहीत. आई-बापाविना वाढवलेल्या नातवावरील अपार प्रेमासमोर, आजोबा नातवाचं लग्न वगैरे क्षुल्लक गोष्टी बाजूला ठेवतात, इतकंच. सचिन तेंडुलकरचे परमचाहते असलेले राहुलचे आजोबा, स्वत:च्या शंभराव्या वाढदिवशी भारत-पाकिस्तान सामना पाहत असतात. सचिन आणि आजोबा दोघेही ९९ वर असतात आणि एक चेंडू दोघांचीही विकेट काढतो. तिकडे पाकिस्तानी खेळाडू सुटकेचा निश्वास टाकतात आणि इकडे राहुल मुक्त हवेत मोकळा श्वास घेतो. मित्रांसोबत आधीच ठरलेला गोव्याला जायचा प्लान 'ऑन' ठेवतो आणि तयारी करतो. पण आजोबांची एक विचित्र इच्छा असते. त्यांच्या अर्ध्या अस्थींचं विसर्जन गंगेत आणि अर्ध्या अस्थींचं विसर्जन रामेश्वरमला करावं ! (ही अशी इच्छा का असते ? ह्याचं कारण/ संदर्भ कुठेच मिळणार नाही. बस्स. असते. कारण चित्रपट पुढे जायचा असतो.) राहुलला आजीला दाखवण्यासाठी चेन्नई एक्स्प्रेसने जाण्याचं नाटक करावं लागतं. प्रत्यक्षात कल्याणला उतरून, मित्रांसोबत गोव्याला जाऊन तिथेच अस्थि विसर्जित करण्याचा नतद्रष्ट प्लान केला जातो. मृत व्यक्तीच्या भावनांशी खेळ केल्याबद्दल त्याला तळतळाट लागतो आणि सगळ्या प्लानचा खेळखंडोबा होतो. चालू गाडीतून उतरताना मिनम्मा (दीपिका) गाडीसोबत धावताना त्याला दिसते. हात देऊन तो तिला आत घेतो. (असा सीन चित्रपटात असणार हे मला आधीच माहित होतं आणि त्याला पार्श्वसंगीत काय असेल, हे तुम्हालाही नक्कीच माहित आहे.) दीपिकापाठोपाठ ३-४ सांडसदृश मनुष्यसुद्धा धावत येतात आणि त्यांनाही राहुल आत घेतो. दीपिका एका डॉन (सत्यराज) ची मुलगी असते, 'थंगबली' (निकितिन धीर) नामक होतकरू डॉनशी होऊ घातलेल्या लग्नापासून ती पळालेली असते, हे आपल्याला ट्रेलरमधूनच माहित झालेलं असतं. पुढे सगळे जण तमीळनाडूतल्या त्यांच्या गावी येतात आणि परिस्थितीशरण राहुललाही त्यांच्यासोबत यावंच लागतं. निकितिन हा खरं तर 'शाखातिन' आहे. (शा. खा. X ३ इतका धिप्पाड) त्यामुळे इथून पुढे पळापळी असणार असते. होते. आणि सगळ्या धावपळीनंतर, काही गाड्या-माणसं उडून-उडवून झाल्यानंतर कहाणी अपेक्षित शेवटाला पोहोचते.
चेन्नई एक्स्प्रेस ही काही रोलर कोस्टर राईड नाही. लागणारे धक्के पोटात गोळा आणत नाहीत. पण ही अगदीच संथगती ट्रामही नाही. काही सिनेमे सुरु होण्याआधीच 'आपकी यात्रा आनंददायी एवं सुखकाकरक हो, यही हमारी शुभकामानायें' वाली भारतीय रेलची अनाउन्समेण्ट करतात. तसाच चे.ए. आहे.
तमिळनाडू म्हणून दाखवलेला भाग गोवा असावा, असं वाटलं. कोम्बण गावाला जाण्यासाठी जिथे ट्रेन थांबवली जाते, तो बहुतेक गोवा-कर्नाटक सीमेवरचा नयनरम्य दुधसागर धबधबा असावा, असंही वाटलं.
दीपिकाच्या 'मिनम्मा'च्या अॅक्सेन्टवरून बरेच लिहिले-बोलले गेले आहे. हा अॅक्सेन्ट खरोखर तमीळ आहे की मल्याळी माहित नाही. पण तो काही काळ गंमतीशीर वाटतो. तिच्यासोबत राहून राहून राहुल थोडंसं तमिळ बोलायला लागतो तरी तिचा अॅक्सेन्ट जराही बदलत नाही. शेवटी शेवटी तिने जपलेलं ते बेअरिंग बोअरिंग वाटायला लागतं. पण दिसलीय लै भारी !
शा. खा. 'जतहैंजा'मध्ये दिसला त्यापेक्षा तरूण दिसलाय आणि त्यामुळे चाळीशीचाच (Not more) वाटलाय. शा. खा. ह्या चित्रपटाची जान आहे. बाकी काहीही असलं, तरी त्याचा उत्साह नेहमीच बेजोड असतो. (त्या उत्साहापोटी तो बरेचदा ओव्हर अॅक्टिंग करतो, हा भाग वेगळा) त्याचा उत्साह पडदा व्यापतो. विनोदनिर्मितीत अनेक ठिकाणी अचूक टायमिंग त्याने साधले आहे. एकंदरीत मला शा. खा. आवडला असेल अश्या काही मोजक्या चित्रपटांत मी चे.ए. ला मोजेन ! (Have I made it too large??)
साऊथ इंडियन पार्टी आणि निकीतीन धीरला विशेष काम नाहीये. जे आहे, जितकं आहे, ते आणि तितकं ते व्यवस्थित निभावतात.
कॉलीवूडमध्ये नावाजलेला 'सत्यराज' त्याच्या शारीरिक अभिनय व भेदक नजरेने लक्षात राहतो. ह्या अभिनेत्याला हिंदीत अधिकाधिक संधी मिळावी, असे वाटते.
संगीत विशाल-शेखरचं आहे. संपूर्ण स्कोअरवर पुन्हा एकदा विचार करावा, अशी शा. खा. आणि रोहित शेट्टीची इच्छा वजा मागणी होती आणि अर्थातच त्यासाठी विशाल-शेखरने विनम्र नकार दिला होता म्हणे. बरोबरच आहे. विशाल-शेखर ह्याहून चांगले काम करतील अशी आशा वाटणेच चुकीचे आहे. कुठलेच गाणे लक्षात राहील असे दमदार नाही. प्रत्येक गाणे कुठल्या न कुठल्या गाण्याची नक्कल किंवा दोन-तीन गाण्यांची भेसळ वाटते. चांगल्या संगीताची अपेक्षा रहमानशिवाय इतर कुणाकडून करावी का ? असा प्रश्न आजकाल पडायला लागला आहे.
रोहित शेट्टीचे सिनेमे वैचारिक उंची गाठत नसतातच. ते अगदीच वैचारिक दिवाळखोरीसुद्धा दाखवत नाहीत. नर्मविनोदाचा जमाना गेला आहे. आताचा विनोद अंगावर आपटतो आणि शेट्टी इज मास्टर ऑफ इट. अनेक प्रासंगिक विनोद मस्त जमले आहेत. अनावश्यक पसारा न करता कहाणीला वेग देण्यावर लक्ष केंद्रित केल्याचं जाणवतं आणि त्यामुळेच पटकथेतल्या काही 'भोकां'कडे लक्ष जात नाही. जसं - कल्याणचा प्लान बदलून कर्जतला भेटणार असलेला आपला मित्र आला नाही. त्याचा फोन लागत नाही. ह्याची काळजी न वाटून, काहीच न करण्याच्या वयाचे राहुलचे मित्र नसतात. चाळीशीत इतपत तर समज येते, नाही का ? मोबाईल फोन जवळ नाही, पण एखादा नंबरही पाठ नसतो, असं नसतं ना ? किमान घरचा नंबर तरी प्रत्येकालाच पाठ असतो.
एकंदरीत चे. ए. एकदा बघायला नक्कीच हरकत नसावी, (शा. खा. भक्त पारायणंहीकरू शकतील) असा नक्कीच आहे. फक्त चित्रपटाचं तिकीट आणि रेल्वेचं खरंखुरं तिकीट एकाच किमतीचं नसावं !
रेटिंग - * * १/२
http://www.ranjeetparadkar.com/2013/08/movie-review-chennai-express.html
पुण्यात असेल हे गटग तर मी
पुण्यात असेल हे गटग तर मी पण...
पुण्यात असेल हे गटग तर मी
पुण्यात असेल हे गटग तर मी पण...
शाखा रहातो कुठे?? मुंबैत.
शाखा रहातो कुठे?? मुंबैत. मग??? स्मित मुंबैला या सगळे >>> अच्छा मग गट्ग मुंबईत आहे तर. कधी जायचय ? मला पण बघायचाय चेई. आता उत्सुकता वाढलीय.
आणखी एक रजनी फंडा... सिनेमा
आणखी एक रजनी फंडा...
सिनेमा सुपरडूपर हिट करायचाय... ?
रजनीदेवाची आरती करा.
जय तल्लैवा !!!!!
हा बॉ ठीकठीकच आहे!!! आज
हा बॉ ठीकठीकच आहे!!! आज पँट्री आवरता आवरता बघितला. एकाही शॉटला हातातले काम थांबवुन बघावा असे झाले नाही! बरं झालं घरीच बघितला!
(No subject)
अरे देवा … शाखा च्या पलीकडे
अरे देवा … शाखा च्या पलीकडे पहायची थोडी नजर दे माझ्या या मित्रांना … लगेच वाद घालायला तुटून पडताहेत काहीही बोलले तरी …
अहो मी रिया ला सांगत होते मैत्रिणीचा सल्ला म्हणून ती त्यालाच बघून जाम खुश होते म्हणाली ना म्हणून …. तो माकड का दिसेना तुम्ही बघा ना मी कुठे 'नकाच' बघू असं बोलले …
राहिला प्रश्न अभिनयाचा तर …. निव्वळ अभिनय म्हंटला तर आमीरने अनेकदा आणि शाहरुखने पूर्वीच्या जमान्यात काहीदा चांगला अभिनय केला. सलमानने खरे तर फार कमी वेळा. >>>>>>>> बेफिकीरांशी संपूर्ण सहमत
तो माकड का दिसेना तुम्ही बघा
तो माकड का दिसेना तुम्ही बघा ना मी कुठे 'नकाच' बघू असं बोलले … फिदीफिदी >> मयी , आपल आपल मत असू दे , पण उगाच अती करू नये नाही
आता एक मस्त सुचलेले.......पण
आता एक मस्त सुचलेले.......पण जाउ दे तुमच्या सारखे अतीच होते..ते...;)
धागा किंवा परीक्षण चेन्नई
धागा किंवा परीक्षण चेन्नई एक्स्प्रेसचे आहे की शाहरुखचे?
शाहरुख चित्रपट खाऊन टाकतो, सारा पडदा स्वताच व्यापून टाकतो इथवर ठिक होते..
पण आता धागा सुद्धा त्याने आपल्याच खिशात टाकलेला दिसतोय.. उग्गाच नाही मेला सुपर्रस्टार..
कोणीतरी दिपिका विरुद्ध प्रियांका, रोहित शेट्टी विरुद्ध करण जोहर, विशाल-शेखर विरुद्ध अमुकतमुक..... असे ही वाद घाला रे..
मस्त चर्चा सुरु आहे. लवकरच
मस्त चर्चा सुरु आहे. लवकरच पाहायला हवा !
तसा अर्धा सिनेमा तर समजला आहे
मयी,मला कशाला फुकटचे सल्ले?
मयी,मला कशाला फुकटचे सल्ले?
काल अर्धा बघितला. दातात जसा
काल अर्धा बघितला. दातात जसा आंब्याचा केस अडकुन राहतो, तसा एकच प्रश्न छळत होता, की हा रोल नेमका लिहिलाय कुणासाठी. शाहरुख ह्या रोलसाठी फिट नसावा..... रात्री केव्हातरी आठवलं..................................................... गोविंदा....
पुन्हा बघताना गोविंदाला इमॅजिन करुन बघा....
स्क्रिप्ट जुनी आहे का हो.
याचाच अर्थ असा की गोविंदाचे चित्रपट ज्यांना आवडतात, त्यांना हा आवडणारच.
मी काही शाखा पंखा नाही पण एक
मी काही शाखा पंखा नाही पण एक सगळ्यांना मान्य कराव लागेल ह्या माणसाकडे जबरदस्त मार्केटीग प्राविण्य आहे, म्हणजे हल्ली सिनेमा प्रमोशन सर्वच करतात पण हा पठ्या अगदी मोठमोठ्या मॉलमध्ये / सिनेमाघरात जाऊन अजुनही लोकांना त्याचा सिनेमा पाहण्यासाठी जायला सांगतो म्हणजे मान गये ! ह्या सिनेमासाठी त्याने अगदी तमिळलोकांना थिएटरमध्ये येण्यास भाग पाडल ह्यातच सगळ आल. आजच्या घडीला असे किती सुपरस्टार आहेत जे सिनेमात स्वतावर विनोद करून देण्यास तयार असतात? त्याच्या सगळ्या "चेस्टा " लोकांना आवडतात हे त्याला बरोबर कळलय
शाखा दिग्दर्शकाच्या हातात असला तर स्वदेश , चक दे सारखे सिनेमे सुद्धा लोकांना त्याच्या कामाबद्दल आवडतात .
आपल्या कडचे हिंदी सिनेमा हे प्रत्येक हिरोला ठराविक पठडीत अडकावून ठेवतात, शाखा = ह्याच सिनेमा हा टाईमपास वालाच पाहिजे (डोक बाजूला ठेऊन पाहता येईल असे) , सुपरहिरो ( रा१ ) नाही चालत, अक्षयकुमार = विनोदी + थोडी मारामारी , आमिरखान = थोडे सिरीअस विषय , सलमान = धस्तपुष्ट प्रेमी
गोविंदा? यक
गोविंदा? यक
गोविंदा...........धेडगुजरी
गोविंदा...........धेडगुजरी कलाकार......
गोविंदा? यक >> अॅग्रीड
गोविंदा? यक >> अॅग्रीड !!
'गोविंदा' काय इमॅजिनायची गोष्ट आहे? विसरायची गोष्ट आहे ती !!
नशिब कोणी देवानंद साहेबांना
नशिब कोणी देवानंद साहेबांना नाही कल्पनेत आणले.....
हम तो कन्फुज हो जाते.................साला ट्र्रेन जादा हिल रही है या देवानंद
गोविंदा? यक >> अॅग्रीड !! >>
गोविंदा? यक >> अॅग्रीड !! >> नॉट अॅट ऑल.
पटत नसेल तर नक्किच बघ पिक्चर
पटत नसेल तर नक्किच बघ पिक्चर आणि गोविंदासाठी स्क्रिप्ट लिहिलि असावी अस वाटते की नाही ते सांगा.
पटत नसेल तर नक्किच बघ पिक्चर
पटत नसेल तर नक्किच बघ पिक्चर >>>>बघितला...
आणि गोविंदासाठी स्क्रिप्ट लिहिलि असावी अस वाटते की नाही ते सांगा.>>>>नाही
याचाच अर्थ असा की गोविंदाचे
याचाच अर्थ असा की गोविंदाचे चित्रपट ज्यांना आवडतात, त्यांना हा आवडणारच>>>>>>>> गोविंदाचे सुरवातीचे चित्रपट नाहीत कारण तेव्हा मी चित्रपट कळायच्या वयात नव्हते पण नंतरच्या काही मोजक्या चित्रपटात मला गोविंदा आवडला. जे काही करायचा ते मनापासुन असं नेहमीच त्याला बघताना वाटायचं. कॉमेडी तर छानच.
विशिष्ट व्यक्ती (नट/ नटी)
विशिष्ट व्यक्ती (नट/ नटी) साठी स्क्रीप्ट लिहिणे, म्हणजे त्या कहाणीत व त्या व्यक्तिरेखेत काही तरी विशेष असणे गरजेचे आहे, असं मला वाटतं. चे.ए. च्या कहाणीत आणि राहुलच्या व्यक्तिरेखेत असं 'विशेष' काहीच नाहीये. त्यामुळे ही स्क्रीप्ट कुणाला समोर ठेवून लिहिली किंवा हा रोल अमुक साठी परफेक्ट होता... वगैरे पटत नाही.
इथे 'रणबीर' का नसता चालला?
इथे 'अक्षय' (दोन्हीपैकी कुठलाही) का नसता चालला?
इथे 'हृतिक' का नसता चालला?
बेसिकली ह्या रोलमध्ये कुणीही चालला असता.
वर मी एके ठिकाणी लिहिलेय की
वर मी एके ठिकाणी लिहिलेय की काही वेळा इथे शाखाच हवा होता असं वाटलं... ते त्या-त्या सीनपुरतं.. अख्ख्या रोलसाठी नव्हे.
- डिस्क्लेमर !! नाही तर शब्दात पकडेल कुणी तरी !!
शाहरुखचा विषय गोविंदावर
शाहरुखचा विषय गोविंदावर न्यायचा डाव आता त्याचे विरोधक करत आहेत.... सावध राहा..
गोविन्दाला पहावं तर डान्स
गोविन्दाला पहावं तर डान्स करताना, स्टेज पर्फॉमन्स देताना.
मनापासुन स्टेज वर वावर असतो.
उगा पैसे घ्यायचं आणि पब्लिकला फसवायचं अस नाय हा त्याचं..
ज्यांना केवळ सूरज का सातवा
ज्यांना केवळ सूरज का सातवा घोडा, खंडहर, छचौले आणि तत्सम शिणुमे आवडतात त्यांना चेन्नई एक्सप्रेस सारखी चटकदार भेळ आवडण्याची शक्यता कमी आहे हे वाक्य खरं असेल तर खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे.
अ) ज्यांना सूसाघो आवडतो त्यांना सर्व शिणुमे आवडतात.
ब) ज्यांना चेई आवडतो त्यांना सूसाघो आणि तत्सम शिणुमे आवडत नाहीत.
क) ज्यांना चेई आवडतो त्यांना सूसाघो देखील आवडू शकतो.
ड) ज्यांना सूसाघो आवडत नाही त्यांना कुठलाच शिणुमा आवडत नाही.
क
क
सूसाघो काय आहे? अच्छा ! मला
सूसाघो काय आहे?
अच्छा ! मला नाही माहीत सुसाघो आणि लिस्टीतले इतर
त्यामुळे माझा पास
सूरज का सातवा घोडा, छत्तीस
सूरज का सातवा घोडा, छत्तीस चौरंगी लेन ...
Pages