वेगवान चेन्नई एक्स्प्रेस (Movie Review - Chennai Express)

Submitted by रसप on 9 August, 2013 - 03:10

झुळझुळ वाहणारं पाणी खळखळ नाद करतं. एक चैतन्य, उत्साह निर्माण करतं. कधी त्याचा फेसाळ, दुधाळ रंग चित्तवेधक असतो तर कधी त्याच्या स्वच्छ प्रवाहातून दिसणारा तळ ! पण हेच पाणी साचून राहिलं की ? नकोसंही होतं.
प्रवासही प्रवाही असायला हवा. कुठेही अडून राहावं लागलं, खोळंबा झाला की नकोसं होतं. दिशा चुकली, भरकटली की संयम सुटतो. गती ही प्रवासासाठी अत्यावश्यक.
'चेन्नई एक्स्प्रेस' हा एक गतिमान प्रवास आहे. ही गाडी कुठेही 'सायडिंग'ला पडत नाही. औरंगाबाद-पुणे रेल्वे दौंड मार्गे जाऊन ८ तास खाते, तशी ही चेन्नई एक्स्प्रेस वेड्यासारखी भरकटत नाही. ह्या गाडीचं तिकीट काढताना आपल्याला माहित असतं की ही कुठल्या मार्गाने जाणार आहे, किती थांबे आहेत, किती वेळ लागणार आहे आणि अर्थातच कुठून सुरु व कुठे संपणार आहे. सगळं काही माहित असतानाही हा प्रवास कंटाळवाणा होत नाही. डब्यातल्या शौचालयाच्या वासाने गुदमरायलाही होत नाही आणि विदाउट तिकीट चढलेल्या उपऱ्या लोकांचा त्रासही होत नाही.

गाडी मुंबईहून सुरु होते. जसा अमिताभ 'विजय' असायचा, तसा शाहरुख 'राज' किंवा 'राहुल' असतो. इथे तो राहुल आहे. भूमिकेत शा.खा. फिट्ट होण्यापेक्षा भूमिका शा. खा. साठी फिट्ट व्हावी म्हणून आधीच सांगून ठेवलेलं आहे की तो चाळीशीचा आहे. वयस्कर व्यक्तिची प्रेमकहाणी दाखवायची आहे म्हणून त्याचं आधी एखादं लग्न झालेलं आणि बायको गचकलेली वगैरे भावनिक ठिगळं इथे नाहीत. आई-बापाविना वाढवलेल्या नातवावरील अपार प्रेमासमोर, आजोबा नातवाचं लग्न वगैरे क्षुल्लक गोष्टी बाजूला ठेवतात, इतकंच. सचिन तेंडुलकरचे परमचाहते असलेले राहुलचे आजोबा, स्वत:च्या शंभराव्या वाढदिवशी भारत-पाकिस्तान सामना पाहत असतात. सचिन आणि आजोबा दोघेही ९९ वर असतात आणि एक चेंडू दोघांचीही विकेट काढतो. तिकडे पाकिस्तानी खेळाडू सुटकेचा निश्वास टाकतात आणि इकडे राहुल मुक्त हवेत मोकळा श्वास घेतो. मित्रांसोबत आधीच ठरलेला गोव्याला जायचा प्लान 'ऑन' ठेवतो आणि तयारी करतो. पण आजोबांची एक विचित्र इच्छा असते. त्यांच्या अर्ध्या अस्थींचं विसर्जन गंगेत आणि अर्ध्या अस्थींचं विसर्जन रामेश्वरमला करावं ! (ही अशी इच्छा का असते ? ह्याचं कारण/ संदर्भ कुठेच मिळणार नाही. बस्स. असते. कारण चित्रपट पुढे जायचा असतो.) राहुलला आजीला दाखवण्यासाठी चेन्नई एक्स्प्रेसने जाण्याचं नाटक करावं लागतं. प्रत्यक्षात कल्याणला उतरून, मित्रांसोबत गोव्याला जाऊन तिथेच अस्थि विसर्जित करण्याचा नतद्रष्ट प्लान केला जातो. मृत व्यक्तीच्या भावनांशी खेळ केल्याबद्दल त्याला तळतळाट लागतो आणि सगळ्या प्लानचा खेळखंडोबा होतो. चालू गाडीतून उतरताना मिनम्मा (दीपिका) गाडीसोबत धावताना त्याला दिसते. हात देऊन तो तिला आत घेतो. (असा सीन चित्रपटात असणार हे मला आधीच माहित होतं आणि त्याला पार्श्वसंगीत काय असेल, हे तुम्हालाही नक्कीच माहित आहे.) दीपिकापाठोपाठ ३-४ सांडसदृश मनुष्यसुद्धा धावत येतात आणि त्यांनाही राहुल आत घेतो. दीपिका एका डॉन (सत्यराज) ची मुलगी असते, 'थंगबली' (निकितिन धीर) नामक होतकरू डॉनशी होऊ घातलेल्या लग्नापासून ती पळालेली असते, हे आपल्याला ट्रेलरमधूनच माहित झालेलं असतं. पुढे सगळे जण तमीळनाडूतल्या त्यांच्या गावी येतात आणि परिस्थितीशरण राहुललाही त्यांच्यासोबत यावंच लागतं. निकितिन हा खरं तर 'शाखातिन' आहे. (शा. खा. X ३ इतका धिप्पाड) त्यामुळे इथून पुढे पळापळी असणार असते. होते. आणि सगळ्या धावपळीनंतर, काही गाड्या-माणसं उडून-उडवून झाल्यानंतर कहाणी अपेक्षित शेवटाला पोहोचते.

chennai-express-movie.jpg

चेन्नई एक्स्प्रेस ही काही रोलर कोस्टर राईड नाही. लागणारे धक्के पोटात गोळा आणत नाहीत. पण ही अगदीच संथगती ट्रामही नाही. काही सिनेमे सुरु होण्याआधीच 'आपकी यात्रा आनंददायी एवं सुखकाकरक हो, यही हमारी शुभकामानायें' वाली भारतीय रेलची अनाउन्समेण्ट करतात. तसाच चे.ए. आहे.

तमिळनाडू म्हणून दाखवलेला भाग गोवा असावा, असं वाटलं. कोम्बण गावाला जाण्यासाठी जिथे ट्रेन थांबवली जाते, तो बहुतेक गोवा-कर्नाटक सीमेवरचा नयनरम्य दुधसागर धबधबा असावा, असंही वाटलं.

दीपिकाच्या 'मिनम्मा'च्या अ‍ॅक्सेन्टवरून बरेच लिहिले-बोलले गेले आहे. हा अ‍ॅक्सेन्ट खरोखर तमीळ आहे की मल्याळी माहित नाही. पण तो काही काळ गंमतीशीर वाटतो. तिच्यासोबत राहून राहून राहुल थोडंसं तमिळ बोलायला लागतो तरी तिचा अ‍ॅक्सेन्ट जराही बदलत नाही. शेवटी शेवटी तिने जपलेलं ते बेअरिंग बोअरिंग वाटायला लागतं. पण दिसलीय लै भारी ! Happy
शा. खा. 'जतहैंजा'मध्ये दिसला त्यापेक्षा तरूण दिसलाय आणि त्यामुळे चाळीशीचाच (Not more) वाटलाय. शा. खा. ह्या चित्रपटाची जान आहे. बाकी काहीही असलं, तरी त्याचा उत्साह नेहमीच बेजोड असतो. (त्या उत्साहापोटी तो बरेचदा ओव्हर अ‍ॅक्टिंग करतो, हा भाग वेगळा) त्याचा उत्साह पडदा व्यापतो. विनोदनिर्मितीत अनेक ठिकाणी अचूक टायमिंग त्याने साधले आहे. एकंदरीत मला शा. खा. आवडला असेल अश्या काही मोजक्या चित्रपटांत मी चे.ए. ला मोजेन ! (Have I made it too large??)
साऊथ इंडियन पार्टी आणि निकीतीन धीरला विशेष काम नाहीये. जे आहे, जितकं आहे, ते आणि तितकं ते व्यवस्थित निभावतात.
कॉलीवूडमध्ये नावाजलेला 'सत्यराज' त्याच्या शारीरिक अभिनय व भेदक नजरेने लक्षात राहतो. ह्या अभिनेत्याला हिंदीत अधिकाधिक संधी मिळावी, असे वाटते.

संगीत विशाल-शेखरचं आहे. संपूर्ण स्कोअरवर पुन्हा एकदा विचार करावा, अशी शा. खा. आणि रोहित शेट्टीची इच्छा वजा मागणी होती आणि अर्थातच त्यासाठी विशाल-शेखरने विनम्र नकार दिला होता म्हणे. बरोबरच आहे. विशाल-शेखर ह्याहून चांगले काम करतील अशी आशा वाटणेच चुकीचे आहे. कुठलेच गाणे लक्षात राहील असे दमदार नाही. प्रत्येक गाणे कुठल्या न कुठल्या गाण्याची नक्कल किंवा दोन-तीन गाण्यांची भेसळ वाटते. चांगल्या संगीताची अपेक्षा रहमानशिवाय इतर कुणाकडून करावी का ? असा प्रश्न आजकाल पडायला लागला आहे.

रोहित शेट्टीचे सिनेमे वैचारिक उंची गाठत नसतातच. ते अगदीच वैचारिक दिवाळखोरीसुद्धा दाखवत नाहीत. नर्मविनोदाचा जमाना गेला आहे. आताचा विनोद अंगावर आपटतो आणि शेट्टी इज मास्टर ऑफ इट. अनेक प्रासंगिक विनोद मस्त जमले आहेत. अनावश्यक पसारा न करता कहाणीला वेग देण्यावर लक्ष केंद्रित केल्याचं जाणवतं आणि त्यामुळेच पटकथेतल्या काही 'भोकां'कडे लक्ष जात नाही. जसं - कल्याणचा प्लान बदलून कर्जतला भेटणार असलेला आपला मित्र आला नाही. त्याचा फोन लागत नाही. ह्याची काळजी न वाटून, काहीच न करण्याच्या वयाचे राहुलचे मित्र नसतात. चाळीशीत इतपत तर समज येते, नाही का ? मोबाईल फोन जवळ नाही, पण एखादा नंबरही पाठ नसतो, असं नसतं ना ? किमान घरचा नंबर तरी प्रत्येकालाच पाठ असतो.

एकंदरीत चे. ए. एकदा बघायला नक्कीच हरकत नसावी, (शा. खा. भक्त पारायणंहीकरू शकतील) असा नक्कीच आहे. फक्त चित्रपटाचं तिकीट आणि रेल्वेचं खरंखुरं तिकीट एकाच किमतीचं नसावं !

रेटिंग - * * १/२
http://www.ranjeetparadkar.com/2013/08/movie-review-chennai-express.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याच्या एका चित्रपटात "आssssग" फक्त इतकच म्हणायचं असतं, त्यात त्याने केलेली ओव्हर अ‍ॅक्टींग खुप आवडली होती. बाकी पिक्चर बकवास.... नेहमीप्रमाणे.
तुमच्या मते "भाग मिल्खा भाग" गल्ला भरु चित्रपट आहे ? >>>>>>>>> नाहिच आहे... तो पण चालला हे अलहिदा ....तो त्याच्या क्वलिटी वर चालला... पण चालावा म्हणुन त्यात मुद्दाम माकड उड्या नव्ह्त्या टाकल्या हे विषेश ....>>>>> भारी... १००%

मी काल एका दिवसात तीन वेळा पाहिला हा सिनेमा Happy
मला आवडला... शहारुख तर मला आवडतोच पण दिपिकाही आवडली.लूंगी डान्स गाण्याची गरज कळाली नाही.
तमीळ थोडं थोडं समजत असल्याने मला इरिटेट नाही झालं पण माझ्या बहिणीला मध्ये मध्ये तोढी चिडचिड होत होती कारण कळत नव्हतं काय चाल्लय ते. सबटायटल्स हवेतच. बाकी इरिटेट झालेला शाहरुख कसलाच मस्त साकारलाय.
शाहरुखपेक्षा जास्त फुटेज दिपिकाला दिलं गेलय आणि दोघही आपल्या जागी परफेक्ट
स्टोरी काहीच नाही
टिपिकल रोशे स्टाईल फिल्म.
कथा प्रेडिक्टेबल........
तरिही ऑसम ::
या कथेत 'राहुल' म्हणून ज्याला घेतलं गेलं असतं त्याच्याच टाईपचा हा सिनेमा झाला असता Happy
निखळ मनोरंजन..... मी पण १०० टाईम्सपाहू शकते Happy

माझा बॉफ्रे म्हणे मी या आधी तुला कोणत्याच सिनेमाच्या वेळेला इतकं खुष नव्हतं पाहिलं Proud

स्मिते Happy

लुंगी डान्सच्या गाण्यात रजनीच्या फोटोसमोर नाचणारा शाहरुखखान पाहिल्यावर मला तालुका पातळीवरच्या एखाद्या नेत्याने फुटकळ निवडणूकीत "आमचे मार्गदर्शक" म्हणुन दिल्लीतल्या नेत्याचे फ्लेक्स लावल्यासारखे फिलींग आले. Biggrin

लुंगी डान्सच्या गाण्यात रजनीच्या फोटोसमोर नाचणारा शाहरुखखान पाहिल्यावर मला तालुका पातळीवरच्या एखाद्या नेत्याने फुटकळ निवडणूकीत "आमचे मार्गदर्शक" म्हणुन दिल्लीतल्या नेत्याचे फ्लेक्स लावल्यासारखे फिलींग आले. >>>> Rofl

रजनीच्या समोर तर मी कार्यकर्ता म्हणेल त्याला............तु तरी नेता म्हणालास Biggrin

नोटः फक्त रजनी आणि अमिताभ समोरच

बाकी इतर जण शाहरुख समोर सडकछाप कार्यकर्ते आहेत Wink

हं!

माझा बॉफ्रे म्हणे मी या आधी तुला कोणत्याच सिनेमाच्या वेळेला इतकं खुष नव्हतं पाहिलं फिदीफिदी>>>>>>>> अरररर्र्र्र्र्र देवा ..... शा.खा नसेल तर कस होइल हिचं सोरि त्याचं कसं खुश होइल हि पोर Proud

शाहरूख खान म्हणजे ओव्हर एक्टींगचा कळस...आणि दिपिका पडूकोण..मला अजिबातच आवडत नाही.सो,"चैनई एक्सप्रेस" कितीही चांगला चित्रपट असला तरी पण मी बघणारच नाही.तसेही मराठी आणि Hollywood चे चित्रपट वगळता Bollywood चे चित्रपट मी थिएटरात जाउन बघणे मी सोडूनच दिले आहे...

शाखाप्रेमी नसलो तरी त्याची कॉमेडी आवडते.. म्हणूनच शेवटचा अर्धातास वगळता टिपी म्हणून बरा वाटला.. काही विनोद तर अगदी मराठी विनोदीपटासारखे वाटले.. रसपने अगदी योग्य परिक्षण केलेय.. मला तर 'ये जवानी ये दिवानी' च्या साखळीतलाच सिनेमा वाटला.. ! रच्याकने रोशे ने 'नानाची टांग, आxx घो' अशी मराठी वाक्यं घालून मराठीप्रेम सिद्ध केलेच

बाकी इतर जण शाहरुख समोर सडकछाप कार्यकर्ते आहेत >>>>>>> नसिरुद्दिन , नाना , आमिर , दिलिप कुमर, राजेश खन्ना, देवानन्द , ओम पुरि, परेश रावल, मनोज बाजपेयी, अनुपम खेर, इर्फान खान, रण्बीर कपूर, रितिक, कमल हसन, फर्हान अख्तर हे सगळे सडकछाप ...शाखा याच्या वरचढ........... अरे रे ... मानलं बुवा तुम्च्या चोइस ला :-|

हे जरा अति होतंय...
शाखा सारखा सडकछाप हीरो दुसरा झाला नाही. तो फक्त डिरेक्टर'स अ‍ॅक्टर आहे. त्याच्यासमोर इतरांना सडकछाप ठरवणं हास्यास्पद आहे.

तुमची चॉईस तुमच्या कडे ठेवा...>>>>>>>>नाहिच देनार .... देउन उपयोग काय ? हि लोक कळायला पण हवीत ना Proud नुस्तेच त्याच्याकडुन हि उड्या मारायच्या अपेक्शा ठेवल्यात तर कसं होनार ...... :)))))))) असु द्या आमच्याकडे योग्य जागि आहेत Wink

आमिर सलमान सारखे सडकछापच आहेत.. . रस्त्यावरचे खोटे भिकारी सुध्दा चांगले अ‍ॅक्टींग करतात>>>>>>>>>> टु मच

हॅ .....तलाश ची तुलना तर मी "रामगोपाल वर्मा के शोले" आणि हिंमतवाला शी करेन...... "जोकर" त्यापेक्षा बरा होता Wink

असु द्या ना... मी उदय आहे Biggrin .... माझ्या पेक्षा ___ जास्त सापडणार नाही... शोधु ही नका...
.
.
.
( सगळेच काड्या पेटवत होते मुद्दामुन......म्हणुन मी पेट्रोल घेउन आलो Wink )

नानाची टांग, आxx घो' अशी मराठी वाक्यं >> अरे त्याची बायको मराठी आहे बहुतेक.. ही ऐकीव माहिती.
त्याच्या टीम मध्ये कास्टीन्गच्या कामात गांगाधर टिपरे यांच्या नातवाची भुमिका केलेला शिर्‍या आहे.
हे मात्र एका मुलाखतीत वाचलय. शिर्‍याची मुलाखतच.
कमी तिथे आम्ही म्हणुन त्याने गोलमालच्या दुसर्‍या भागात कामही केलय..
श्रेयस वर फिदा असलेला एक पुरुष,.

Pages