Submitted by बेफ़िकीर on 8 August, 2013 - 14:05
जग गोधडी मानून मी ही गोधडी लाथाडतो
झोपेतही माझा अहं उद्दाम स्वप्ने पाडतो
काढून घे पायातला हा पाय आयुष्या तुझा
ही गाढवे म्हणतात की हाही दुगाण्या झाडतो
भेटून ती भेटू नको म्हणते तरीही भेटते
त्यालाच देते लाच ती जो पावतीही फाडतो
या कायद्याला एकटा अपवाद ठरतो आरसा
मी चेहरे पाहून सार्या माणसांना ताडतो
पाणी तुला पाजू कसे असल्या फिकीरी सोडुनी
ओले करत डोळे तुझे हा 'बेफिकिर' ओसाडतो
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वेगळेपणा मस्त आलाय सगळेच शेर
वेगळेपणा मस्त आलाय सगळेच शेर आवडले
अर्थ अजून नेमके समजण्यासाठी पुन्हा पुन्हा वाचत आहे पण ३,४.५ अवघड दिसत आहेत वेळ लागेल
धन्यवाद
भेटून ती भेटू नको म्हणते
भेटून ती भेटू नको म्हणते तरीही भेटते
त्यालाच देते लाच ती जो पावतीही फाडतो<<< वा... ती तशीच आहे>>
या कायद्याला एकटा अपवाद ठरतो आरसा
मी चेहरे पाहून सार्या माणसांना ताडतो << सुंदर >>
--आवडली गझल
पाणी तुला पाजू कसे असल्या
पाणी तुला पाजू कसे असल्या फिकीरी सोडुनी
ओले करत डोळे तुझे हा 'बेफिकिर' ओसाडतो>>> व्वा!
काढून घे पायातला हा पाय आयुष्या तुझा
ही गाढवे म्हणतात की हाही दुगाण्या झाडतो>>> मस्त!
आशय छान >>> झोपेतही माझा अहं
आशय छान
>>> झोपेतही माझा अहं उद्दाम स्वप्ने पाडतो <<< स्वप्नदृष्टांताबाबत याच्याही अर्थावर अधिक अभ्यास करता येणे शक्य आहे, कल्पनेबद्दल धन्यवाद.
सगळेच शेर आवडले... कारण
सगळेच शेर आवडले... कारण लिहिणारा पण लिखाणातील "शेर" आहे.
जग गोधडी मानून मी ही गोधडी
जग गोधडी मानून मी ही गोधडी लाथाडतो
झोपेतही माझा अहं उद्दाम स्वप्ने पाडतो
भेटून ती भेटू नको म्हणते तरीही भेटते
त्यालाच देते लाच ती जो पावतीही फाडतो >>
व्वा व्वा! क्या कहें ...ब्येस्ट!
ओले करत डोळे तुझे हा
ओले करत डोळे तुझे हा 'बेफिकिर' ओसाडतो
_/\_
आवडली गझल खुप
आवडली गझल खुप
ताडतो हासिल-ए-गझल ! सगळेच शेर
ताडतो हासिल-ए-गझल !
सगळेच शेर मस्त जमलेत !
धन्यवाद !
मला बरीचसी कळलीच नाही
मला बरीचसी कळलीच नाही
झोपेतही माझा अहं उद्दाम स्वप्ने पाडतो

>>
हे मी असं वाचलं
झोपेत माझा भ्रम भयाण स्वप्ने पाडतो
वैवकु, लावा लावा, जरूर अर्थ
वैवकु, लावा लावा, जरूर अर्थ लावा. कळला की एकदम मस्त आहे. मुद्दाम स्पष्ट करून सांगत नाहीये इथे.
बेफिकीर, या गझलेत तुम्ही जी खोली गाठली आहे तिला तोड नाही. या प्रकारचा खयाल कुणी इतर शायरीत (उर्दू, फारसी, इत्यादि) बघितलाय?
आ.न.,
-गा.पै.
आवडली. >> पाणी तुला पाजू कसे
आवडली.
>> पाणी तुला पाजू कसे असल्या फिकीरी सोडुनी
ओले करत डोळे तुझे हा 'बेफिकिर' ओसाडतो >> मस्त !
या कायद्याला एकटा अपवाद ठरतो
या कायद्याला एकटा अपवाद ठरतो आरसा
मी चेहरे पाहून सार्या माणसांना ताडतो
अफाट शेर.... हॅट्स ऑफ.
थोडा वेगळ्या जातकुळीतला असाच माझा शेर आठवला.
मी खर्या कैलासच्या शोधात आहे
शोधल्यावर काय सापडणार नाही ?
भेटून ती भेटू नको म्हणते
भेटून ती भेटू नको म्हणते तरीही भेटते
त्यालाच देते लाच ती जो पावतीही फाडतो
या कायद्याला एकटा अपवाद ठरतो आरसा
मी चेहरे पाहून सार्या माणसांना ताडतो>>>>>>खूप सुंदर!!
जग गोधडी मानून मी ही गधडी
जग गोधडी मानून मी ही गधडी लाथाडतो
झोपेतही माबो कवि वारेमाप गझला पाडतो
काढून घे हाताखालचा हा कळफलक तुझा
ही गाढवे म्हणतात की हाही 'जमीन' तुडवतो
भेटून तिला ती भेटू नको म्हणते तरीही हा भेटतो
त्यालाच देते लाथ ती जो कंबरेतही वाकतो
या कायद्याला एकटा अपवाद ठरतो आरसा
मी चेहरे पाहूनच सार्या चोविसांना टापतो
पाणी तुला पाजू कसे करुनिया तोबा अशी
पंचविसावी झेप घेण्या ही "शिबा" बोलावतो
प्रतिसाददात्यांचे मनापासून
प्रतिसाददात्यांचे मनापासून आभार!
छान जमली आहे. भेटून ती भेटू
छान जमली आहे.
भेटून ती भेटू नको म्हणते तरीही भेटते
त्यालाच देते लाच ती जो पावतीही फाडतो
हा शेर खास आवडला.
त्यालाच देते लाच ती जो
त्यालाच देते लाच ती जो पावतीही फाडतो<<< ह्या शेरात काहीच समजत नाहीये बाकी शेर ग्रेटच