प्रसाद - केशर बदाम पेढे / मोदक

Submitted by लाजो on 7 August, 2013 - 09:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आजपासुन श्रावण सुरू... म्हणजे एकामागे एक सणासुदींचे दिवस....म्हणजेच गोडधोड-प्रसाद यांची रेलचेल....

श्रावणाची सुरूवात आपल्या सगळ्यांच्या आवडत्या पेढ्यांपासुन Happy

लागणारे जिन्नसः

२ कप मिल्क पावडर,
१ कप बदामाची पावडर,
२५०मिली क्रिम *
१ टीन कंडेन्स्ड मिल्क (३९५ ग्रॅम च टीन मिळतो इथे),
वेलची पूड / केशर / इतर स्वाद आवडीनुसार,
सजावटीसाठी बदाम्/पिस्ते काप इ इ आवडीनुसार.

क्रमवार पाककृती: 

हे पेढे / मोदक करायला अगदी सोप्पे पण चवीला एकदम झक्कास Happy

१. एका मायक्रोवेव्ह सेफ बोल मधे मिल्क पावडर आणि बदाम पावडर मिक्स करा.
२. यात आता कंडेन्स्ड मिल्क घाला आणि मिश्रण सारखे करा.
३. या मिश्रणात थिकन्ड क्रिम आणि आवडीनुसार वेलची/केशर इ इ घालुन नीट ढवळा. अजिबात गुठळ्या रहाता कामा नयेत.
४. मिश्रण हाय पॉवर वर मावे मधे २ मिनीटे गरम करा. बाहेर काढुन एकदा सारखे करा आणि परत मावे मधे २ मिनीटे ठेवा.
५. अश्या प्रकारे साधारण ८ मिनीटे मिश्रण मावे मधे गरम करा. आता बाहेर काढुन कन्सिस्टंसी चेक करा. आणि परत १-१-१ मिनीटाच्या अंतराने मावेमधे गरम करा.
६. साधारण १०-११ मिनीटात मिश्रण एकत्र यायला लागले की बाहेर काढा.
७. हाताला (आणि साचा वापरणार असाल तर साच्याला) तूप लावा आणि आपल्या आवडीनुसार पेढे वळा. वरती हवे असल्यास पिस्ता/बदाम काप इ इ ने सजवा.

प्लेन मोदकः

आंबा पेढे:

पिस्ता पेढे:

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात मध्यम आकाराचे ३० एक पेढे सहज होतात
अधिक टिपा: 

१. मावेमधे लागणारा वेळ हा घेतलेले प्रमाण/घटक आणि तुमच्या मावेची पॉवर यावर अवलंबुन आहे. माझ्या ११००W च्या मावेमधे वरील घटक आणि प्रमाणासाठी १०-११ मिनीटे लागतात.
२. मिश्रण जास्त वेळ मावे मधे गरम करु नये... कोरडे पडेल.
३. मिश्रण कोरडे वाटलेच तर थोडे तूप लावुन मळून घ्या.
४. यात बदामा ऐवजी काजू/पिस्ता पावडर घालु शकता. मी केलेल्या पिस्ता पेढ्यांमधे ५०-५० बदाम-पिस्ता पावडर आहे.
५. आंबा पेढा/मोदक बनवायचे असल्यास आंब्याचा रस न घालता आंब्याचा मावा/आटवलेला रस घाला.
६. डेकोरेशन करताना मोल्डच्या तळाला काप घालुन त्यावर पेढ्याचे मिश्रण दाबुन भरा आणि मग मोल्ड किंचित टॅप करुन पेढा बाहेर काढा.
*७. थिकन्ड क्रिम, साधे फ्रेश क्रिम किंवा साय फेटुन वापरता येइल पण प्रमाण अंदाजाने कमी/जास्त करावे लागेल.
८. मिल्क पावडर लो फॅट/ फुल्ल फॅट कुठलिही चालेल. मी फुल्ल फॅट वापरली आहे.
९. हे पेढे मावे नसल्यास गॅसवर पण करता येतिल.
१०. ट्रे ला तूपाचा हात लावुन त्यात थापुन याचे काप करून बर्फी पण बनवता येते.

हे पेढे फ्रिजमधे ठेवल्यास बरेच दिवस टिकतात.

पुढच्यावेळेस करताना स्टेप बाय स्टेप फोटो काढेन Happy

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. नक्कि करेन बाप्पा (आणि पर्यायाने स्वतः)साठी...
बाय द वे, १ टीन कंडेन्स्ड मिल्क म्हणजे किती ग्रॅम/ मिलि घेउ?

परत एकदा थँक्यु Happy

@ मंजुडी, ट्राय करायला हरकत नाही, कदाचित प्रमाण थोडे अ‍ॅडजस्ट करावे लागेल. Happy अर्ध्या/पाव मापात करुन बघ आधी म्हणजे अंदाज येइल Happy

@ झंपी<<< पेढे दुधाळ नसतिल तर मग ते पेढे कसले??? मी म्हंटलय की अति दुधाळ होत नाहित... काहि पेढे खल्ले तुपकट दुधकट चव तोंडात रहाते.. तशी रहात नाही. बाकी पसंद अपनी अपनी..... तुमची आवडती रेसिपी आणि त्या पद्धतीने तुम्ही केलेले पेढ्यांचे फोटो बघायला आवडतिल Happy

@ गोगो, इथे मिळणारा टीन ३९५ग्रॅम चा असतो.

बरं.

तू वापरतेस त्या थिकन्ड क्रिमची कन्सिस्टन्सी कशी असते?
बदामाची पावडर इथे मिळणार नाही, त्याऐवजी मिल्क पावडरच घ्यावी लागेल. म्हणजे साय+मिल्क पावडर+ कन्डेन्स्ड मिल्क असे पेढे होतील. म्हणजे साधारणपणे सायोच्या मलई बर्फीसारखीच कृती-प्रमाण होईल.

बदामाची पावडर इथे मिळणार नाही, >> हो पण बदाम भिजवुन, सोलुन, वाळवुन पावडर करता येइल. काजु कतली साठी काजुची करतो तशी.

क्रीम एवजी साय वापरायची असल्यास किती तो प्रश्न मलाही पडलाय. आणि साय नसेल तर अमुलचे क्रीम चाले का Uhoh

मंजुडी, बदाम पावडर घरी करता येते की... साल काढलेले बदाम आपल्याकडे मिळतात ना?... नाहीतर काजु/पिस्ता पावडर घरी कर आणि वापर....

क्रिम ची कंसिस्टंसी साधारण रबडी आणि बासुंदीच्या मधली. आपल्याकडे जे टेट्रापॅक मधे क्रिम मिळते ते वापरता येइल, थोडे प्रमाण अ‍ॅडजस्ट करावे आगेल.

साल काढलेले बदाम/काजु पावडर करायला भिजवायची गरज वाटत नाही वर्षे..

बदाम पावडर घरी करता येते की>>> नाही, तेल सुटतं. काजूचंही तेच होतं.

वर्षा, काजू/ बदाम भिजवून सोलून वाळवून मग त्याची पावडर करायची का? वाळायला किती वेळ लागतो साधारण?

एकदम बारीक पावडर केली तर तेल सुटेल.. थोडे भरड म्हणजे बारीक रव्यासारखी केली तरी सुटतं का तेल? कारण या रेसिपीला तशी बारीक रव्याच्या साईजची बदाम पावदर वापरली तरी चालेल. मी माझ्याकडच्या पावडरचा फोटो टाकते मग.

मंजुडी बंगलोरचे एक उत्पादन आहे बघ बदाम पावडरचे, नाव आठवत नाही आणी कंपनी पण लक्षात नाहीये माझ्या. पण घरी वापरले होते, नेमका डबा गेला कचर्‍यात्.:अरेरे:

बंगलोरमध्ये कुणी असेल तर विचारुन बघ.

खूपच सुंदर दिसत आहेत पेढे. लेकीचा वाढदिवस आला आहे तेव्हा करते आता त्या दिवशी. तसेही तिला पेढे खूप आवडतात पण पावसाळ्यामुळे बाहेरुन आणणे टा़ळले जाते.

मंजुडी मिक्सरच्या कोरड्या पावडरीच्या जारमधे बदामांसोबत थोडी साखर मिक्स करुन फिरव. छान होते पावडर. मिक्सर एकावेळी जास्त वेळ फिरवू नकोस. थोडा थोडा वेळ फिरव. भरड किंवा बारीकही पूड होते चांगली.

नुसते कोरडेच काजू, बदाम मिक्सरला फिरवून ( सालं न काढता, न भिजवता ) चांगली पावडर होते. माझ्या एका मैत्रिणीने अशी पावडर + तूप एवढंच घालून पाकात केलेली अप्रतिम बर्फी खिलवली होती एकदा. माझ्यासमोरच पावडर केली तिने.

मिक्सरच्या कोरड्या पावडरीच्या जारमधे बदामांसोबत थोडी साखर मिक्स करुन फिरव. छान होते पावडर. मिक्सर एकावेळी जास्त वेळ फिरवू नकोस. थोडा थोडा वेळ फिरव. भरड किंवा बारीकही पूड होते चांगली. >> हो मी काजु-कतली साठी अशीच करते. फक्त साखर न घालता. आणि पोहे चाळायच्या चाळणीने चाळुन घेते.

अंजलीचे एक किसणीसारखे उपकरण मिळते. त्यातून कुठल्याही नट्सची चांगली पूड करता येते. हे हातानी चालवायचे उपकरण आहे. त्यामूळे तेलकट न होता कोरडीच पूड होते.

केवळ अफलातून!!..........:स्मित:

गॅस वर करायचे झाल्यास..........................

<<<< मिश्रण हाय पॉवर वर मावे मधे २ मिनीटे गरम करा. बाहेर काढुन एकदा सारखे करा आणि परत मावे मधे २ मिनीटे ठेवा.
५. अश्या प्रकारे साधारण ८ मिनीटे मिश्रण मावे मधे गरम करा. आता बाहेर काढुन कन्सिस्टंसी चेक करा. आणि परत १-१-१ मिनीटाच्या अंतराने मावेमधे गरम करा.
६. साधारण १०-११ मिनीटात मिश्रण एकत्र यायला लागले की बाहेर काढा.>>>>>> ही कृती सेम करायची का?

वाह! काय सुरेख दिसतायेत मोदक, पेढे. मी नेहमी मलई बर्फीच्या रेसिपीने मोदक/पेढे करते. यंदा ह्या रेसिपीने करून बघायला हवे.
थिकन्ड क्रीम म्हणजे कोणतं इकडे अमेरिकेत?

@दिनेशदा, हो आठवतयं मला ते यंत्र. आईकडे होतं..

@शांकली,

गॅसवर करायचे झाल्यास नॉनस्टिक पॅन मधे स्टेप ३ मधे तयार झालेले मिश्रण ओतुन, मंद आचेवर करावे लागेल. मिश्रण लाकडी स्पॅच्युला/चमच्याने ढवळत रहावे लागेल. खाली लागता कामा नये. मिश्रण पॅनच्या कडा सोडुन जवळ यायला लागले की गॅस बंद करुन एखाद मिनीट ढवळुन मऊसर गोळा तयार होइल. मग त्याचे पेढे/मोदक वळायचे.

@बिल्वा, थिकन्ड क्रिम म्हणजे लाईट व्हिपींग क्रिम ऑर हेव्ही क्रिम कहिही चालेल असे वाटत्येय विकीनुसार Happy

USA[edit source | edit]In the United States, cream is usually sold as:

Half and half (10.5–18% fat)
Light cream (18–30% fat)
Light Whipping cream (30–36% fat)
Heavy cream (36% or more)

Australia[edit source | edit]In Australia, the levels of fat in cream are not regulated, therefore labels are only under the control of the manufacturers. A general guideline is as follows:

Extra light (or 'lite'): 12–12.5% fat.

Light (or 'lite'): 18–20% fat.

Pure cream: 35–56% fat, without artificial thickeners.

Thickened cream: 35–36.5% fat,

Pages