आजपासुन श्रावण सुरू... म्हणजे एकामागे एक सणासुदींचे दिवस....म्हणजेच गोडधोड-प्रसाद यांची रेलचेल....
श्रावणाची सुरूवात आपल्या सगळ्यांच्या आवडत्या पेढ्यांपासुन
लागणारे जिन्नसः
२ कप मिल्क पावडर,
१ कप बदामाची पावडर,
२५०मिली क्रिम *
१ टीन कंडेन्स्ड मिल्क (३९५ ग्रॅम च टीन मिळतो इथे),
वेलची पूड / केशर / इतर स्वाद आवडीनुसार,
सजावटीसाठी बदाम्/पिस्ते काप इ इ आवडीनुसार.
हे पेढे / मोदक करायला अगदी सोप्पे पण चवीला एकदम झक्कास
१. एका मायक्रोवेव्ह सेफ बोल मधे मिल्क पावडर आणि बदाम पावडर मिक्स करा.
२. यात आता कंडेन्स्ड मिल्क घाला आणि मिश्रण सारखे करा.
३. या मिश्रणात थिकन्ड क्रिम आणि आवडीनुसार वेलची/केशर इ इ घालुन नीट ढवळा. अजिबात गुठळ्या रहाता कामा नयेत.
४. मिश्रण हाय पॉवर वर मावे मधे २ मिनीटे गरम करा. बाहेर काढुन एकदा सारखे करा आणि परत मावे मधे २ मिनीटे ठेवा.
५. अश्या प्रकारे साधारण ८ मिनीटे मिश्रण मावे मधे गरम करा. आता बाहेर काढुन कन्सिस्टंसी चेक करा. आणि परत १-१-१ मिनीटाच्या अंतराने मावेमधे गरम करा.
६. साधारण १०-११ मिनीटात मिश्रण एकत्र यायला लागले की बाहेर काढा.
७. हाताला (आणि साचा वापरणार असाल तर साच्याला) तूप लावा आणि आपल्या आवडीनुसार पेढे वळा. वरती हवे असल्यास पिस्ता/बदाम काप इ इ ने सजवा.
प्लेन मोदकः
आंबा पेढे:
पिस्ता पेढे:
१. मावेमधे लागणारा वेळ हा घेतलेले प्रमाण/घटक आणि तुमच्या मावेची पॉवर यावर अवलंबुन आहे. माझ्या ११००W च्या मावेमधे वरील घटक आणि प्रमाणासाठी १०-११ मिनीटे लागतात.
२. मिश्रण जास्त वेळ मावे मधे गरम करु नये... कोरडे पडेल.
३. मिश्रण कोरडे वाटलेच तर थोडे तूप लावुन मळून घ्या.
४. यात बदामा ऐवजी काजू/पिस्ता पावडर घालु शकता. मी केलेल्या पिस्ता पेढ्यांमधे ५०-५० बदाम-पिस्ता पावडर आहे.
५. आंबा पेढा/मोदक बनवायचे असल्यास आंब्याचा रस न घालता आंब्याचा मावा/आटवलेला रस घाला.
६. डेकोरेशन करताना मोल्डच्या तळाला काप घालुन त्यावर पेढ्याचे मिश्रण दाबुन भरा आणि मग मोल्ड किंचित टॅप करुन पेढा बाहेर काढा.
*७. थिकन्ड क्रिम, साधे फ्रेश क्रिम किंवा साय फेटुन वापरता येइल पण प्रमाण अंदाजाने कमी/जास्त करावे लागेल.
८. मिल्क पावडर लो फॅट/ फुल्ल फॅट कुठलिही चालेल. मी फुल्ल फॅट वापरली आहे.
९. हे पेढे मावे नसल्यास गॅसवर पण करता येतिल.
१०. ट्रे ला तूपाचा हात लावुन त्यात थापुन याचे काप करून बर्फी पण बनवता येते.
हे पेढे फ्रिजमधे ठेवल्यास बरेच दिवस टिकतात.
पुढच्यावेळेस करताना स्टेप बाय स्टेप फोटो काढेन
काय कातिल फोटो आहेत. मी गणपति
काय कातिल फोटो आहेत. मी गणपति पर्यंत गोड पदार्थ करायचे नाहीत असं ठरवलं आहे त्यामुळे तेव्हाच करणार.
मस्स्त.
मस्स्त.
झक्कास!! काय फोटो आलेत.तुझ्या
झक्कास!! काय फोटो आलेत.तुझ्या घरि हे मोदक/पेढे संपवायला येऊ का??
लाजो, कसले कातिल दिसताहेत
लाजो, कसले कातिल दिसताहेत पेढे / मोदक-पेढे.
दुकानचं काढ आता तिथे. शिवाय १ ते ४ या वेळात तुला वामकुक्षीलाही वेळ मिळेल.
देवाशप्पथ मी शूम्पीचा शब्द
देवाशप्पथ मी शूम्पीचा शब्द चोरला नाही. माझी कमेंट टाईपल्यावर मी तिची कमेंट वाचली. याचा अर्थ हे फोटो बघून नेमका तोच भाव सगळ्यांच्या मनात येतोय. जय लाजो!
पहिल्या फोटोवरून आठवलं ..... मी कॉलेजला असताना १ एप्रिलला कोणीतरी कणकेचे पेढे करून त्यावर हिरव्या मिरचीचा तुकडा लावून प्रसाद म्हणून वाटले होते.
सुपर!
सुपर!
जबरदस्त दिसताहेत! सही आहे
जबरदस्त दिसताहेत! सही आहे कृती! थोडीफार मलई बर्फी सारखी आहे का?
वॉव! एकदम सही!
वॉव! एकदम सही!
व्वा ! ..... छानच. पेढे तर
व्वा ! ..... छानच.
पेढे तर अगदी तोंपासू
आम्च्या इमारतीत एक कुटुम्ब
आम्च्या इमारतीत एक कुटुम्ब आहे. ते आमच्या सोसयटी च्या गणपती ला काहीही नैवेद्य दाखवतात.
वडापाव, मसाला डोसा, उत्तपा, हक्का नूड्ल्स.
हे बरोबर आहे का? कुणी प्रकाश टाक्ल्यास उत्तम.
कुणी प्रकाश टाक्ल्यास उत्तम.
कुणी प्रकाश टाक्ल्यास उत्तम. >>> या धाग्यावर कसला प्रकाश टाकणारे कोण !
उगाच असे अंधारात चाचपडण्यापेक्षा याकरता नवा धागा उघडल्यास तिथे भरपूर प्रकाश पडेल....
ते आमच्या सोसयटी च्या गणपती
ते आमच्या सोसयटी च्या गणपती ला काहीही नैवेद्य दाखवतात.
वडापाव, मसाला डोसा, उत्तपा, हक्का नूड्ल्स.
>>> दाखवू द्या की! गणपतीला तेवढाच रूचीपालट.
याचा अर्थ हे फोटो बघून नेमका
याचा अर्थ हे फोटो बघून नेमका तोच भाव सगळ्यांच्या मनात येतोय. जय लाजो! >>>>>> अगदी अगदी
कातील , जबरी, क्लास, तोंपासु वगैरे वगैरे ......
नक्कीच करणार.. लवकरच... ह्या मध्ये पण मलई बर्फी सारखे वेरीएशन करता येतील ना??
मी काठमांडूला गेले होते
मी काठमांडूला गेले होते तेव्हा तर तिथे गणपतिला २१ उकडलेल्या अंड्यांचा नेवैद्य दाखवलेला पाहिला होता. आपण जे खातो तेच देवाला पण दिलं तर काय फरक पडतो
फोटो बघून नेमका तोच भाव सगळ्यांच्या मनात येतोय>> येस टोटली.
सुपर्ब!!! पेढ्यांचा साचा
सुपर्ब!!!
पेढ्यांचा साचा विकत घ्यावाच आता :).
लाजो ताई- फोटू एक्दम
लाजो ताई- फोटू एक्दम रापचांडूस आहेत...
बाप्पा प्रसन्न होणार !
बाप्पा प्रसन्न होणार !
व्वा.. जबरी दिसतायतं_/\_
व्वा.. जबरी दिसतायतं_/\_
सुरेख, रेखीव पेढे आहेत एकदम
सुरेख, रेखीव पेढे आहेत एकदम !!
अत्यंत सुरेख दिसतायत पेढे आणि
अत्यंत सुरेख दिसतायत पेढे आणि मोदक आणि त्या मुदा एकदम प्रोफेशनल!!!
मस्त आम्ही पण आमच्या
मस्त
आम्ही पण आमच्या सोसायटीच्या गणपतीला असाच आम्हांला आवडणार्या पदार्थांचा नैवेद्य दाखवतो आणि नंतर सगळ्यांना वाटतो. यांत दाण्याच्या कुटाच्या लाडूपासून वडापाव, उपमा, टॅमरिंड राइस असं काहीही असू शकतं.
लाजवाब! नक्की करुन पाहील!
लाजवाब! नक्की करुन पाहील!
हाय्ला, फोटू पाहूनच वजन वाढलं
हाय्ला,
फोटू पाहूनच वजन वाढलं माझं
आता डायेटिंग म्हणून २-४ उकडीचे मोदक हाणावे लागतील
लाजो तुझ्या पाककौशल्याला
लाजो तुझ्या पाककौशल्याला ___/\___
एकदम किलर दिसताहेत.
कातिल कातिल कातिल..... हा एकच
कातिल कातिल कातिल..... हा एकच शब्द!!!
फोटो बघून अंतरात्मा खवळला आहे. मला हे पेढे आत्ता हवेत.
खुपच सुंदर......... लगेच
खुपच सुंदर......... लगेच खावेसे वाटत आहेत....
सुपर्ब! नक्की करणार.
सुपर्ब! नक्की करणार.
सुबक, सुंदर, देखणे...! व्वा!
सुबक, सुंदर, देखणे...! व्वा! मस्त!
फोटो मस्त!
फोटो मस्त!
लाजो,
लाजो,
अन्नपुर्णा................
आणि हलवायाच्या घरावर तुळसी पत्र ........
Pages