माझे ड्रायव्हिंग व्हेकेशन - लेह लडाख - भाग ४

Submitted by केदार on 2 August, 2013 - 02:20

माउंटेन्स टेक टोल, ऑन बॉडी अ‍ॅन्ड ऑन सोल !

ज्यांना डोंगर-दर्‍यांचा त्रास आहे त्यांच्यासाठी हिमालयातील ट्रॅव्हल एक प्रचंड स्ट्रेसफुल अ‍ॅक्टीव्हिटी असते. कित्येक अ‍ॅडल्टसना आम्ही भेटलो ज्यांना हा प्रवास सहन होत नव्हता. मनालीच्या अगोदर एक सिसू नावाचे गाव आहे, येताना मी तिथे दोन मराठी पुरूषांना भेटलो. ते ही त्याच हॉटेल मध्ये राहत होते आणि बुलेट वर "MH" प्लेट होती. साहजिकच मराठी म्हणून गप्पा सुरू झाल्या आणि त्यातील एकाच्या डोळ्यात ऑलमोस्ट पाणी आले. त्याच्याच शब्दात सांगायचे तर " this trip was biggest mistake of my life" त्याला मी कसे समजावून सांगणार की बाबा, तू ह्या ट्रीप साठी "मनानेच" प्रिप्रेअर्ड कधी नसशील, केवळ उत्साहात आला असशील. पण त्याला ते बहुदा कळाले व तो म्हणाला, ही ट्रीप आमच्या दोघांसाठी नव्हतीच मुळी.

लाँग स्टोरी शॉर्ट - माउंटेन्स टेक टोल, ऑन बॉडी अ‍ॅन्ड ऑन सोल. ( हे स्वरचीतच आहे. Happy )

तर आपण आपल्या इष्टोरी कडे वळूया! रात्री जेवताना आम्हाला आणखी तीन मराठी कपल्स (सर्व ६० +/-) भेटली. सर्व जण अगदी अमेरिकन जोडप्यांसारखी उत्साही होती. (या वयात). आणि ते सर्व नाशिकचे होते. मग गप्पा टप्पा / त्यांचे, "अरे बापरे मुलांसहीत, ड्राईव्ह करून? पुण्याहून? असे विचारून झाले. मग मी त्यांना लेह बद्दल बरच काही सांगीतले. जे की त्यांना अर्धे माहित नव्हते. आणि दे वर ऑलमोस्ट हिटिंग द रोड. कारण ते श्रीनगरला फ्लाईटनी आले होते. आणि ते ही सकाळीच निघणार होते तर त्यांनी मला त्यांच्या गाडीसोबतच गाडी ठेवायला सांगीतली, जेणेकरून त्यांनाही ते सर्व स्थळ पाहाता आली असती, शिवाय कंपनीही झाली असती. मी त्यांना मग माझ्या जवळील एक मॅप दिला. माझ्याजवळ तीन कॉप्या होत्या. तर ते काका म्हणाले, तुम्ही पुण्याचे आहात हे नक्की? तीन तीन कॉपी करून फिरताय म्हणजे काय? मी म्ह्णालो अहो, मुलं आहे, पाणी बिनी पडले तर Happy पण सकाळी त्यांच्यापैकी एकाला त्रास झाला मग आम्ही थोडे पुढे निघालो, कारगील मध्येच भेटायचे असे ठरवून. तेंव्हा साधारण ८ वाजले होते.

आजचे डेस्टीनेशन - कारगील. २०४ किमी दचकलात ना? केवळ २०४, ते ही एका पूर्ण दिवसात? हिमालयात प्लेन्स सारखे ९००,१००० किमी एका दिवसात जाता येत नाही. तिथे केवळ २०० किमी एका दिवसात गाठायला संध्याकाळ होते.

Kargil_map.JPG

श्रीनगर - सोनामर्ग हे ८५ किमीचे अंतर आम्ही दिड एक तासात कापले कारण अमरनाथ मुळे रस्त्यावर खूपच वाहने होती. सोनामर्ग मधून सिंध नाला वाहतो. ( इथे नाला म्हणजे महाराष्ट्रातील नाला हा शब्दशः अर्थ नव्हे तर ग्लेशिअर मधून येणारे पाणी, एकदम स्वच्छ ). त्याच्याच आजूबाजूला खूप सारे रेस्तराँ ( ढाबे) आहेत जिथे मस्त बसून कहावा किंवा चहा पिता येतो! अमेझिंग जागा ! आम्ही मग तिथे आमचा पहिला स्टॉप कहावा साठी घेतला. ज्या टपरीतून आम्ही कहावा, त्याने इतका सुंदर कहावा दिला की बास! लगेच अर्ध्या तासानंतर सोनामर्ग गावात थांबलो तर तेथील चांगल्या हॉटेल मधील कहावा एकदम बकवास होता. ती पहिली चव अजून रेंगाळत आहे.

सिंध नाल्याशेजारचा फोटो

आणि तिथून दिसणारे दृष्य

आणि हा आदित्य. बाबा थंडी वाजतेय!

ह्या ठिकाणी भरपूर खेळून आम्ही थोडे पुढे जाऊन नाष्ता उरकला. एक सुंदर हॉटेल होते. सोनामर्गला जाणार्‍या प्रत्येकालाच ते दिसेल.

वर फोटोत जे ग्लेशिअर दिसतय तिथे अनेक जण घोडा घेऊन ( तिथे घोडेवाले आहेत) बर्फात खेळायला जातात. त्या ग्लेशिअरचे नाव्ह कोल्होय ग्लेशिअर आहे. तिथेच जवळ आणखी बरेच ग्लेशिअर्स आहेत. एकुण मस्त जागा. निदान २ दिवस इथे तंबू टाकावा असे वाट्त होते. श्रीनगर पेक्षा सोनामर्ग, पहलगाम आणि गुलमर्ग खूप जास्त सुंदर आहेत. पण आम्ही बर्फात खेळणे टाळले. कारण पुढे बर्फ होताच आणि बर्फ आम्हाला नवीन नव्हता. Happy

झोझिलाची चढाई सुरूवात झाली. इथे सकाळी ६ वाजण्याच्या आधी आलात तर मिल्ट्री तुम्हाला पुढे जाऊ देत नाही कारण "गेट्स ६ ला उघडे होतात". मग डावीकडे रांग लावून थांबावे लागेल. पण आम्ही आलो तेंव्हा १० वाजले होते म्हणून पुढे गेलो.

झोझिलाची चढाई. ११५७५ फुट - पहिला अवघड पास

झोझिला चढण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक अप्पर आणि दुसरा लोअर! अप्पर मार्ग तुलनेने खूप सोपा आहे. मी अप्परच घ्यायच्या विचार करून निघालो होतो पण जेंव्हा तुम्ही चढता तेंव्हा कुठेही "अप्पर" असे लिहिलेले नाही, अर्धे चढल्यावर मध्येच एक "डावा टर्न " येतो. तो पर्यंत तुम्ही सगळे विसरलेले असता, आणि कधी एकदा हे चढण संपते असे वाटायला लागते. तो डावा टर्न मी पाहिला पण मला वाटले ही एखाद "शॉर्ट कट" असेल. शॉर्ट कट म्हणजे अनेक ४X४ वाले स्वतःचा रस्ता तयार करतात त्या जागा, शिवाय माझी ४X४ नसल्यामुळे मी तो घेतला नाही आणि तसाच पुढे निघालो. विचारणार तरी कोणाला? कारण पुढची गाडी कदाचित आज येईल, वा येणारच नाही !

झोझिलाला टार रोड नाही. त्यामुळे होतं काय की मोठमोठ्या ट्रक्सची त्यांचे ट्रॅक्स तयार केले आहेत. त्यात रस्त्यात मग उचंवटे तयार झालेत आणि दे कॅन लिटरली किल युर व्हेईकल. दोन चार अण्डरबेली हिट तर ठरलेलाच. मग अशावेळी काय करायचे तर आपले एक चाक त्या उंचवट्यावर कायम ठेवायचे. त्यामुळे गाडी तिरकी चालते पण ते परवडते. त्यामुळे लडाख इज लॅन्ड ऑफ एसयुव्हीज! कारण हाय ग्राउंड क्लिअरंस..

झोझिला हा तसा ११५०० वरच आहे पण तो दम काढतो ! ह्यापुढे मग खार्दुंगला जो १८००० फुटांवर आहे तो चढताना काही त्रास होत नाही! ( बिलिव्ह मी इतके खराब रस्त झोझिलाचे आहेत)

चढताना दिसणारे ग्लेशिअर्स.

चढता चढता बालताल लागते. बालताल म्हणजे अमरनाथचा बेस कॅम्प! बालतालला उजवीकडे न वळता सरळ येत राहायचे. वर आल्यावर बालताल ते टेम्पररी कॅम्प असे दिसतात.

थोडे वर आलो आणि आमची पहिली लॅण्ड स्लाईड ऑलरेडी चालू होती. मग तिथे थांबावे लागले.

वर उजव्या कोपर्‍यात तुम्हाला काम चालू दिसेल. वरचा रस्ता म्हणजे "अप्पर राऊट"

अमरनाथाचे दर्शन घ्या.

हा जो पिक आहे. तो आहे अमरनाथ पीक.

लॅन्डस्लाईड नंतर लोकं डोक्याला हात लावून बसली होती. पण आदित्य?

हा जो डोक्याला हात लावेलला म्हातारा माणूस दिसतोय ना? त्याची आणि माझी चांगलीच जमली. तो अर्थातच लोकल होता. बटालिक सेक्टर मध्ये राहणारा. बटालिक पासून पाक सीमारेषा काही किमींवर आहे. सांगने न लगे की तो मुसलमान आहे. पण त्याचे बोलणे मी इथे देतो.

अंकलजी आप बटालिक मे सीम के नजदिक रहते है क्या?
तो : हां तो. छत हे उस तरफ पाकीस्तान.
मी : बटालिक से तो रोज कुछ ना कुछ सुनने को मिलता है न्युज मे.
तो : हा मादरचोद लोग रोज कुछ ना कुछ करते है
मी : कोण मादरचोद?
तो : अरे बो बॉन्ड्री के पार वाले
मी : रोज गोला दालते है क्या?
तो : फिर ! साले ! मगर हम कुछ कम नही, वो १० दालेंगे तो हम १०० तो दालते है, रोज भुंकप होता है?
मी : भुंकप?
तो: अरे अपनी हॉवित्सर चलती है ना? एक गोला दालोगे तो पुरा घर हिल जाता है?
मी : डर नही लगता?
तो : डरना का? हमेशां का बघेडा है. वो जो दाढीवाले है ना?
मी : कोण दाढीवाले? ( मला कळाले होते की तो सुन्नी मिलिटंट बद्दल बोलतोय)
तो: अरे वो जो मिलिटंट, उनकी वजयसे शांती निकल गयी! (अर्थातच काश्मिरी बद्दल विषय सुरू झाला)
पुढचे २० मिनिटांचे संभाषण क्लासिफाईड आहे. जे मी इथे देऊ शकत नाही.

अ‍ॅण्ड द इंडियन आर्मी !

मग आम्ही आर्मी सोबत गप्पा मारल्या. एक जण मराठीच निघाला. सांगलीचा! त्याने प्रज्ञाला जाम घाबरवले. तिने विचारले की पुढचा रस्ता देखील असाच आहे का?

तर तो म्हणाला, "तुम्ही इथे का आलात?, विमान सेवा आहे की."
प्रज्ञा : अहो पण आता आलोत, पुढचा रस्ता कसा आहे?
तो " हे सगळं असंच, अजून डेंजर होणार मॅडम हे.
मी : ( त्याला डोळा मारून) अहो साहेब, अहो चांगला रस्ता आहे समोर,
तो : काय बी का राव?
आणखी एक जवान : आगे देखो मॅडम (एका दरीकडे बोट दाखवत)
यामिनी : कंहा आगे?
दुसरा : वो जो ऑरेंज कपडा दिख रहा है क्या?
दोघी : हो
दुसरा : वो ट्रक था! लोडेड था! गिरगया ! सब मर गये?
यामिनी : बाबा? (जोरात) तरी मी म्हणलं होते विमानाने जाऊ.
मी : अरे यार उसका अब क्या?
मी : चला रे, मग आम्ही सर्व त्यांची रजा घेतो.

पण प्रज्ञाच्या डोक्यातून काही ते जात नव्हते. मी सटकलो, ती आणखी दोन मिल्ट्रीवाल्यांकडे जाऊन गप्पा मारत बसली. नेताना तिथे काका हलवाईची मिठाई देखील नेली!

विरळ हवे मुळे काहींना इथेही त्रास झाला. लॅन्ड स्लाईड होणे आपल्या हातात नसते. ती झाली मग कितीही वेळ तुम्हाला त्याच जागी अडकून पडावे लागते. आम्हाला आधी ETA १२:३० चा दिला, मग नंतर अचानक १ वाजता ३:०० (दुपारी) चा दिला, पण २ वाजता सोडले. मग सोडतानाही आधी एकासाईडच्या गाड्या पूर्ण सोडतात, मग दुसर्‍या. आम्ही ३ तास इथे अडकून पडलो होतो.

मग सोडल्यावर अर्ध्यातासात आम्ही झोझिला पास च्या हायस्ट पाँईट आलो. कारगील जवळ तीन व्हॅली आहे. सिंध व्हॅली जी काश्मीर मध्ये उतरते, सुरू व्हॅली जी झंस्कार कडे जाते आणि खुद्द झंस्कार व्हॅली. आम्ही अर्थातच सिंध व्हॅली पार केली.

पोझिंग Happy

तिथून पुढे बराच चांगला रस्ता लागतो. एका रस्त्यावर आलेल्या ग्लेशिअरवर पब्लिक मस्ती करताना !

थोडे पुढे गेल्यावरचे एक दृष्य.

फायनली ! चीता लडाख मध्ये ! ह्याच साठी केला होता अट्टहास !

ह्या पाटीपाशी आम्ही थोडावेळ थांबलो. टुक अवर स्टॉक, सगळे खूप आनंदात होते, केवळ अर्ध्या तासापूर्वीचा झोझिला आता काहीच वाट नव्हता !

इथून पुढे निघाल्यावर आम्हाला एका लोकलने राईड मागितली, जी आम्ही आनंदाने दिली. त्याने आम्हाला खूप कारगील युद्धा बद्दल खूप माहिती सांगीतली. जसे टोलोलिंग रेंज आली, तसे रत्यावर आम्ही अनेक भिंती पाहिल्या. ज्या पाक ने केलेल्या दगडांच्या वर्षावापासून रस्त्याचा बचाव करण्यासाठी बांधल्या होत्या.

द टायगर पाँईट.

आता आम्हाला "कारगील वॉर मेमोरियल" चे वेध लागले होते. हे मेमोरियल द्रास मध्ये आहे. कारण द्रास मध्येच जास्त युद्ध झाले.

झंडा ऊंचा रहे हमारा.

पाठीमागे दिसतायत त्याच टोलोलिंग रांगा !

फॉरेनर पेइंग रिस्पेक्ट टू हिज फादरलँड.

ह्या झेंड्या पाठीमागे एक पीक दिसते आहे, तिथे पण पाकने एक चौकी बसवली होती.

आणि ही वीर भूमी.

बाप तो बाप, बेटा उससेभी सवाई !

लिटल डिड आय नो, की ह्या कॅप्टन विजयंत थापरच्या बॅच मेट आणि मित्रा ले.क. प्रसन्नाला मी चुंगथांग डेझर्ट मध्ये भेटणार आहे. त्याने त्या दोन तासात खूप काही सांगीतलं. योगायोग !

आर्मी तिथे एक कॅन्टीनही चालवते आणि त्यांचे भेटवस्तू साठी एक दुकानही आहे. तिथे आम्ही काही खरेदी केली. कालचे मराठी ३ कपल्स परत आम्हाला इथे भेटले. त्यांच्याशी काही वेळ गप्पा मारल्या व कारगील कडे निघालो. संध्याकाळ होत आली होती. इथे परत आम्ही आमच्या गाडीत जागा करून ६ मुलींना राईड दिली. शाळेतून निघाल्या होता. ११-१२ वीत असतील पुढे शिकायला दिल्ली किंवा पुण्यात येणार होत्या.

कारगील मध्ये आम्ही कारगीलला "दि झोझिला" नावाच्या हॉटेल मध्ये उतरलो. २५०० रू मध्ये रात्रीचे जेवण आणि सकाळच्या ब्रेकफास्ट सहीत. जेवणाच्या टेबलवर तुरळक भारतीय सोडले तर उर्वरित फॉरेनर्स होते. त्यापैकी एका ग्रूप ला घेऊन आली होती 'अमो' ही अमो आदिल्याला खूपच आवड्ली. आदित्यमुळे मग आम्हा सर्वांची ओळख झाली आणि लडाख मध्ये काय करावे, काय करू नये ह्याचा एक शॉर्ट पाठच अमोने दिला. सकाळी देखील अमोबरोबर गप्पा झाल्या.

माझा अनुभव असा आहे की लोकल्स बरोबर जास्त मिसळायचे, गप्पा मारायच्या. त्यातून आपल्याला जी "नेट" वर नसते ती माहिती मिळते आणि आपण अनुभवसंपन्न होतो. आज झोझिला नंतर आमच्या गाडीत कोणी ना कोणी सारखे होते त्यामुळे प्रवासात नवीन माणसांची ओळखही झाली आणि आपल्याला माहितीही मिळालीच. अन्यथा त्या भिंती तश्या का बांधल्यात? बटालिक मध्ये काय होते हे कळले नसतेच.

जाता जाता मला Border Road Organization (BRO) ला धन्यवाद द्यायचे आहेत कारण ती लो़ंक हिमालयात रस्ते बांधतात. हाय माऊंटेन पासेस मध्ये दर दहा मिनिटाला वेगळे वातारवरण असते. ऑक्सिजन विरळ तर असतोच. पण हे लोकं ( स्त्री आणि पुरूष) ज्या रितिने काम करतात आणि इतके चांगले रोडस बांधतात ते पाहून महाराष्ट्रातील PWDला त्यांच्याकडे क्लास साठी पाठवावे असे मला वाटते. हॅटस ऑफ टू बिआरओ.!

क्रमशः

भाग एक
भाग दोन
भाग तीन
भाग पाच

PS मी जे मनात येते, आठवतोय ते लिहितोय आणि परत न "फेअर" न करता पोस्ट करतोय. मला माहितेय की कित्येक चुका (व्याकरणाच्या) असतील त्याबद्दल दिलगीर आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त चालू आहे. मुलंही गोड दिसतायत. तुझ्या अवलोकनात ह्या लिंक्स चिकटवून ठेव प्लीज. काही दिवस नेट ब्रेक असणार आहे. आल्यावर सगळं शोधून वाचणं कटकटीचं होईल.

सावली- काय माहित, त्याला भिती दाखवायची होती की का न कळे पण त्याच्यामुळे तिच्या माऊंटेन्सच्या भितीत थोडी वाढ झाली हे नक्की ! आख्खा वेळ त्याने अशीच बडबड केली. तो तेथील पोस्टिंगला वैतागला होता बहुदा.

भारी!! हा भाग पण मस्त होता...परदेशातले सुंदर फोटो आणि वर्णने आता नेहमीची झाली आहेत.पण आपल्या देशातही त्याला तोडीस तोड निसर्ग आणि वैविध्य आहे हे पुन्हा एकदा जाणवले आणि अभिमान वाटला.
कारगिल मेमो. बद्दल नंदिनीने लिहिले आहे तसे कि काय वाटले शब्दात व्यक्त करता येणार नाही.
ते तुम्ही प्रत्यक्ष बघितले म्हणजे भारीच!

एक राहिलेच, त्या मेमोरियल मध्ये देशभक्तीपर गीतं वाजत असतात. उदा कर चले हम फिदा किंवा मेरे देश की धरती, त्या गाण्यांचे महत्व तिथे गेल्यावरच पुन्हा उलगडते.

हे कर चले जिथे खरे झाले आहे तो भाग म्हणजे चुशूल ! मी माहे ब्रिज (जो खास त्या १९६२ वॉर साठीच) बांधला आहे तिथे गेलो (फोटोही आहेत, पण तिथे फोटो काढणे अलाउड नाही, म्हणून वेबवर टाकणार नाही) पण मला सध्याच्या चीनी आक्रमनामुळे परमीट मिळाले नाही अन्यथा चुशूलला पण गेलो असतो. ती भूमी पाहिल्यावर इंडियन आर्मी बद्दलचे मत बदलते / आदर अजून वाढतो.

हॅविंग सेड दॅट जिथे खूप कमी लोक जातात अशा सियाचीन बेस च्या ट्रान्सिट कॅम्पला मात्र मी भेट दिली आहे. तिथले अनेक फोटो आहेत पण तो भाग ही स्र्कुटनीखाली असल्यामुळे मी ते इथे अपलोड करणार नाही.

सुरेख--- अत्यंत सुरेख ! लिखाण, फोटो आणि लडाख, सगळेच.
अगदी हाताला धरून फिरवतो आहेस केदार.

धन्यवाद !
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

वाचतोय केजो,

>>वॉर मेमोरीयल आणि तिथली ती पाटी वाचून जे काही वाटलंय ते इथे लिहिता येणार नाही... >>.
+१ .....

सहीच! कमाल वाटतीय वाचताना! तुमची, सहकुटुंब जाताय म्हणुन.. मुलांची, निसर्गाची, हिमालयाची व आर्मीची .. कमाल आहे सगळ्यांची! सगळं भारी आहे हे!!
रारंगढांग आठवत होते हा भाग वाचताना मला. Happy

याला म्हणतात लेह लडाख सहल .स्वतंत्र जाणऱ्याकडूनच ऐकणाऱ्यांनाही सहलीचा आनंद घेता येतो .अगदी दोन तीन कुटुंबे एकत्र गेली तरी ते आपसापातच गप्पा आणि चर्चा(जुन्या निरर्थक) करत बसतात .आणि प्रतिसादाला दिलेल्या उत्तरांमुळे लेख रंजक आणि जिवंत झरा झालाय .कारने जाणाऱ्यांसाठी फारच उपयुक्त ठरणार आहे .तुमची मुलगी अजून दहा पंधरा वर्षाँनी मायबोलीवर वाचेल तिच्यासाठी खास लहानपणची आठवण ठरेल .

Pages