Submitted by वैवकु on 28 July, 2013 - 16:43
बरेच काही मनात आहे
तुझा अबोला भरात आहे
खुशाल करुदेत लोक चर्चा
तसे कुठे आपल्यात आहे
सुरूप ,साधा स्वभाव ,संगत...
तुझी खुमारी कशात आहे
मला नको सावली जगाची
मजा तुझ्या ह्या उन्हात आहे
निघेल तो अर्थ लाव माझा
मला कुठे काय ज्ञात आहे
अजून थोडाउशीर थांबू.....
किती सुखद वेळ जात आहे
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा, अतिशय सुरेख गजल, सुरेख
वा, अतिशय सुरेख गजल, सुरेख चर्चा ....
तुझा अबोला भरात आहे तसे कुठे
तुझा अबोला भरात आहे
तसे कुठे आपल्यात आहे
मजा तुझ्या ह्या उन्हात आहे
किती सुखद वेळ जात आहे
हे काही मिसरे खूप सहज आलेत आणि खूप आवडले.
)
पूर्ण शेर एकही आवडला नाही, वैभू आणि असे तुझ्या गझलेबाबत मला पहिल्यांदाच अनुभवायला मिळाले. (बहुतेक विठ्ठल 'मिसिंग' असल्याने असेल !!
------------------------------------------
नंतर दिलेला विठ्ठलाचा शेर अप्रतिम सुंदर वाटला.
शुभम , फाटक साहेब , शशांकजी
शुभम , फाटक साहेब , शशांकजी व जितू खूप खूप धन्स
जितू तुझे निरीक्षण पटले स्पेशल धन्स
वैभवजी...खूप मस्त गझल आहे
वैभवजी...खूप मस्त गझल आहे
>> खुशाल करुदेत लोक चर्चा तसे
>>
खुशाल करुदेत लोक चर्चा
तसे कुठे आपल्यात आहे
<<
'किती करेनात का लोक चर्चा'
असं चालेल का? अर्थही बदलणार नाही.
तसंच 'निघेल तो अर्थ लाव माझा' यात 'निघेल'च्या जागी 'रुचेल' जास्त योग्य वाटेल असं माझं वैयक्तिक मत.
अर्थ 'लावणे' ही जाणूनबुजून केलेली क्रिया आहे. अनेक अर्थ निघू शकतील - त्यातला तुला रुचेल तो तो खरा समज - असं हवं ना?
किंवा मग 'अर्थ काढ माझा' असं तरी?
हा अर्थाचा शेर मला आवडला.
धन्यवाद जोशी साहेब स्वातीजी
धन्यवाद जोशी साहेब
स्वातीजी धन्यवाद
अपण सुचवलेल्या बदली ओळीत का हा शब्द बसणार नाही वृत्तानुसार ! अर्थ बदलणार नाही हे खरे मला >>उगाच करतात लोक चर्चा <<असा मिसरा आधी सुचला होता पण त्यावर विचार करताना लोक चर्चा करतात तर खुशाल करूदेत असे म्हणण्यातला ह्या दोन शब्दातला बिनधास्तपणा सहज सुचला तो मला भिडला माझ्या स्वभावाशी जास्त सुसंगत वाटला म्हणून ती ओळ तशी आहे
निघेल तो अर्थ ... : निघेल असे म्हटल्याने मला , माझ्त्या मनातला अर्थ जास्त खुलतो आहे असे वाटते रुचेल तो अर्थ ...म्हणताना ती अर्थ काढेल वाट पाहा मग तीला आवडेल असा अर्थ तीने काढावा अशी अपेक्षा करा हे असले उपद्व्याप करायचेच कशाला जो काय अर्थ तिच्या डोक्यानुसार निघेल तो तिला लावत बसूदे दे आवडला तर आवडला नाही तर नाही !! सिपलय !! मला स्वतःलाच काही त्या अर्थाबद्दल काही माहीत नाही मीही तिला काही मदत करू शकत नाही ....:)
अर्थ काढ असे म्हणणे मला जाणून बुजून केलेले काम वाटते अर्थ लागणे आपोआप सहज खूप आतून घडते असे मला वाटते
स्वातीजी पुनश्च धन्स आपण माझ्या रचनामध्ये इतकी रुची घेत आहात हे पाहून खूप आनंद होतो आहे
अर्र! 'का' चुकला का! सॉरी.
अर्र! 'का' चुकला का! सॉरी.
>>उगाच करतात लोक चर्चा उगीच
>>उगाच करतात लोक चर्चा
उगीच माझ्यातुझ्या मिठीच्या अजूनही रंगतात चर्चा
कधीतरी मात्र चांदण्याचा तसा इरादा जरूर होता
हा शेर सहज आठवला त्या मिसर्यावरून.
वाह मस्तय शेर !!! कुणाचाय ??
वाह मस्तय शेर !!! कुणाचाय ??
सुरेश भटांचा आहे.
सुरेश भटांचा आहे.
वाह !! मला माहीत नव्हते भट
वाह !! मला माहीत नव्हते
भट साहेब व मराठीतल्या अनेक उत्तमोत्तम गझलकारांना वाचण्याचा अजून म्हणावा तसा माझा योग आलेला नाही ह्याची मला तीव्र खंत वाटत आलेली आहे
Pages