Submitted by नीधप on 27 July, 2013 - 01:23
एका मैत्रिणीच्या तिने अर्धवट सोडलेल्या कवितेला उत्तर म्हणून हे खरडलं...
----------------------------------------------------------------------------------------
असंवेदनशीलतेचा ठप्पा चालणारे तुला?
कठोर, रूक्ष, दगडी म्हणलेलं चालणारे तुला?
आणि शेवटी
धाय मोकलून रडत नाहीस
म्हणजे बहुतेक स्त्री म्हणून कमीच असावीस...
हे चालणारे तुला?
फिकीर नसेल असल्या विशेषणांची तर
ये..
आपण उभारू
निर्भय, घट्ट, चिवट बायांचं जग...
- नी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चालणारे तुला?... हा प्रश्नंच
चालणारे तुला?... हा प्रश्नंच जबरी.
प्रचंड आवडली.
कमी शब्दांत मोठ्ठा विषय
कमी शब्दांत मोठ्ठा विषय हाताळणारी कविता.
सृजनाला आणखी काय हवे.
आवडली कविता.
छान.
छान.
एकदम थेट...!! पोहोचली..!
एकदम थेट...!!
पोहोचली..!
आवड्ली!
आवड्ली!
जगातील करोडो स्त्रियांना
जगातील करोडो स्त्रियांना अजिबात नको असलेली भूमिका घेण्यास सुचवणार्या ओळींची मालिका आहे ही! स्त्री आणि पुरुष किंवा स्त्री आणि इतर जग हे एकमेकांचे कट्टर वैरी असण्याच्या वैचारीक अधिष्ठानावर असे विचार लिहिले जातात.
स्त्री मुळात असतेच संवेदनशील! ती असंवेदनशील असेल असे गृहीत धरून तिला असे विचारणे की हा ठपका तुला चालेल का, (ठप्पा??) हे मला बायॉलॉजिकली इनकरेक्ट वाटले. क्षमस्व!
.
.
जगातील करोडो स्त्रियांना
जगातील करोडो स्त्रियांना अजिबात नको असलेली भूमिका >> म्हण्जे कोणती ??
पुरुष किंवा स्त्री आणि इतर जग हे एकमेकांचे कट्टर वैरी >> अरे बाप रे , हे कुठे आले ? बळेच का धागा पेटवण्यासाठी ?
स्त्री मुळात असतेच संवेदनशील! ती असंवेदनशील असेल असे गृहीत धरून >> गैरसमज होतोय असे वाटते स्त्रीला असंवेदनशील असेल असे गृहीत धरलेले नाहीये. तर तिच्या निर्भय वागण्यामुळे लोक तिच्यावर असंवेदनशीलतेचा आरोप करतील तो तिला चालणार आहे का असे विचारलेले आहे.
बेफिकीर , एकंदरीत तुमची स्त्री स्वभावची व्याख्या -
' स्त्री ही बंदीनी !! ह्रद्यी पान्हा नयनी पाणी ' या ओळीत संपतेअसे बरेचदा अनुभवास आलेय .
स्त्री = सालस, लोभस, गोड गोड बोलणारी, भित्री , रडकी , बिच्चारी , अबला ई ई
पण FYI , 'स्त्री' ही माणुसच असल्याकारणाने मनुष्य स्वभावातले इतरही बरे वाईट गुण स्त्रियांच्यात असतात बरे.
जसे की करारी , स्वाभिमानी , निर्भय
किन्वा तापट , तुसडी, आक्रस्ताळी असंवेदनशील सुद्धा ई.
तुमच्या दृष्टीने हे गुण्/अवगुण बायकांना शोभत नसले तरी ते असतात हे खरेय. त्यात बायोलॉजिकली इनकरेक्ट असे काही नाही.
स्वानुभवाला प्रासंगिक
स्वानुभवाला प्रासंगिक उत्तर(जवळच्या मैत्रिणीने लिहीलेली असल्यामुळे अधिक) म्हणून ही कविता स्फूर्तीदायी ठरू शकते असे मला वाटले.
ठप्पा हे स्टँप(छाप) ह्या अर्थी आले असावे असे एक वाटले.
ये..
आपण उभारू
निर्भय, घट्ट, चिवट बायांचं जग...
मस्त, ह्या ओळींत खरी कविता आहे असे म्हणावेसे वाटते.
आवडेश! लिहीत रहा....
आवडेश!
लिहीत रहा....
गैरसमज होतोय असे वाटते
गैरसमज होतोय असे वाटते स्त्रीला असंवेदनशील असेल असे गृहीत धरलेले नाहीये. तर तिच्या निर्भय वागण्यामुळे लोक तिच्यावर असंवेदनशीलतेचा आरोप करतील तो तिला चालणार आहे का असे विचारलेले आहे. <<<
गैरसमज आपलाच होत आहे डेलिया! असंवेदनशील या विशेषणाची फिकीर नसली तर निर्भय बन असे सुचवलेले आहे. 'स्त्री आधीच निर्भय आहे म्हणून तिला विचारण्यात येत नाही आहे की असंवेदनशील हा ठपका चालेल का?'! लक्षात घ्या. म्हणजे 'फिकीर असलेल्या अनेक बायका असतात' हे कुठेतरी मान्य केले जात आहे आणि त्या निर्भय बनण्यास पात्र नाहीत असेही गृहीत धरले जात आहे. यावर माझा आधीचा प्रतिसाद असा होता की स्त्री मुळातच संवेदनशील असते. तिला असे विचारणे, की तुला असंवेदनशील म्हंटल्याची फिकीर वाटेल का आणि पुढे म्हणणे की फिकीर वाटत नसेल तर चल निर्भय बनू, हे बायॉलॉजिकली इनकरेक्ट आहे. हे असे असण्यामागे काही ठाम गृहीतके दिसतात, ती खालीलप्रमाणे:
१. संवेदनशील स्त्री निर्भय असू शकत नाही, चिवटपणे जगू शकत नाही.
२. स्त्री निर्भय असली की तिच्यावर समस्त मानवजात ठपके, शिक्केच लावते. (असंवेदनशील वगैरे असल्याचे)
३. स्त्री धाय मोकलून रडल्याशिवाय समस्त मानवजातीचे आंतरिक समाधान होतच नाही
वगैरे!
डेलिया, अधेमधे पूर्वग्रह बाजूला सारून काही प्रतिसाद लिहिता येतात का याचाही सराव करून पाहा एखादवेळी!
धन्यवाद!
- कवितेला बायोलॉजिकल निकष
- कवितेला बायोलॉजिकल निकष लावणे हेच मुळात चुकीचे आहे. कविता कविता असते. अणुबाँम्ब निर्मात्यालासुद्धा ऐनवेळेस ते विराट दर्शन अनुभवताना भग्वदगीतेतील उपमा 'Brighter than a Thousand Suns ' आठवावी याचे मला सतराशेवेळा नवल वाटलेले आहे. कोणाला काय,कुठे, कसे, केव्हा 'भिडेल' सांगता येत नाही. कित्येकवेळा तो श्लोक वाचून सुद्धा माझ्या डोक्यात अंधूक इंग्रजीचा प्रकाश पडतो, ते सुद्धा ओपेनहायमरला ती उपमा वापरावीशी वाटली म्हणून.
http://trivia.serendip.in/trivia/gita-and-bomb
- वर उल्लेखिलेला तथाकथित 'बायोलॉजिकल' निकष बरोबर आहे किंवा नाही याबाबतच मूलभूत शंका आहे. माझ्यामते बायोलॉजिकल नसावा. सामाजिक असावा.
हे इथे लिहायला प्रवृत्त झाल्याबद्दल माझाच निषेध आणि वैताग.
गेला बाजार 'भावनेला येवू दे गा, शास्त्र काट्याची कसोटी' हे लिहीणार्या मर्ढेकरांचाही निषेध.
कवितेला कोणतेच निकष नसतात!
कवितेला कोणतेच निकष नसतात!
पण कवितेमध्ये काही विधाने केली जातात. ती विधाने करणे हे कवीचे स्वातंत्र्य असतेच. पण त्या विधानांचा अर्थ जर एकुणच नकारात्मक स्थिती दर्शवणारा असेल (किंवा तसे एखाद्याला वाटत असेल) तर ते तसे लिहिणे हे वाचकाच्या स्वातंत्र्यातही येत असावे.
या रचनेत एक विधान आहे:
'स्त्री कायम सोशिक असावी व तिने कायम सोसावे आणि रडावे अशी धारणा या समाजात आहे. त्या समाजाच्या टिकेची तुला फिकीर नसेल तर चल आपण निर्भय बनूयात'
हे ते विधान!
माझ्या अल्पमतीनुसार समस्त स्त्रीजमातीची अगदी अश्शीच अवस्था नाही आहे. मोठ्या प्रमाणावर वगैरेही आहे की नाही हे एखाद्या चांगल्या सर्वेक्षणातून वगैरे समजू शकेल. गावोगावी मुली शिकत आहेत, त्यांचे एक्स्पोजर भरपूर आहे, नेट, मोबाईल ही सर्व तंत्रज्ञाने त्यांच्याकडे आहेत. त्या फक्त रडत नसतात, त्यांना फक्त रडवलेच जात नाही.
हा झाला पहिला भाग!
दुसरा भाग अधिक महत्वाचा वाटला.
असंवेदनशीलपणाचा ठपका तुला चालेल का, असा एक प्रश्न विचारला गेलेला आहे. स्त्री इतके जगात संवेदनशील दुसरे कोणी नसते. याच्यामागे स्त्रीचा शारीरिक कमकुवतपणा, स्त्रीदेहाची निसर्गाशी असलेली अधिक जवळीक, पिढ्यानुपिढ्यांच्या अपेक्षांचे थर इत्यादी घटक असतात / असू शकतात / असावेत. (यामुळे बायॉलॉजिकल इनकरेक्ट असे म्हणालो). मला वाटते की असंवेदनशील या शब्दाऐवजी निगरगट्ट, कोडगी, पाषाणहृदयी असले काहीतरी हवे होते की काय!
हे सगळे म्हणताना कवितेची चीरफाड झाली याबद्दल क्षमस्व! हे माझे शेवटचे पोस्ट! चु भु द्या घ्या
ये.. आपण उभारू निर्भय, घट्ट,
ये..
आपण उभारू
निर्भय, घट्ट, चिवट बायांचं जग...
मस्त
असतील स्त्रिया संवेदनशील,
असतील स्त्रिया संवेदनशील, अगदी ९०% ही असतील. त्यांना उद्देशून ही कविता नाही. त्यांच्यावर टीका म्हणूनही नाही. कदाचित त्यांच्याबद्दल काहीच म्हणायचे नाहीये.
ज्या संवेदनशील नसतील पण ज्यांना ते तसे दाखवायचे नाही त्यांच्याबद्दलही काही म्हणायचे नाही आहे.
पण त्यांच्यापैकी ज्यांना कवितेत उल्लेख केलेल्या गोष्टी चालणार आहेत त्यांना हे आवाहन आहे.
अशी मला समजली ही कविता. माझे वर्णन जरा सामाजिक लेखाच्या वळणावर गेले असावे
Pages