Submitted by विदेश on 25 July, 2013 - 00:53
जीव जाई, जीव जाई, कंत्राटदारा
थैली झटकुन खड्डेदुरुस्ती करा ||
साटे लोटे तुमचे जमले असेल
आगाऊ रक्कम घेतली असेल
लाज शर्म थोडी शिल्लक असेल
नैतिकता काही ध्यानीमनी धरा ||
पावसाळ्यात नेमके खड्डे पडावे
सगेसोयरे तुमचे त्यात धडपडावे
विरोधी प्रतिनिधीनी गृही ओरडावे
खाल्लेल्या पैशावर उपकार करा ||
अपचन अजीर्ण होऊ देऊ नका
डोळ्यावर कुणाच्या तुम्ही येऊ नका
आयकरवाले पहा घालतील डाका
घरच्या लक्ष्मीची आठवण करा ||
.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
याला म्हणतात कविता ! यमक
याला म्हणतात कविता !
यमक जुळवले आहेत, व्यवस्थित पद्यात लिहीली आहे. शाब्बास विदेश !
अतीउत्तम !!!! धन्स पण
अतीउत्तम !!!!
धन्स
पण कंत्राटदार ही आरती ऐकून प्रसन्न होतील का नक्की ???
जिव्हाळ्याचा विषय !!! छान !!
जिव्हाळ्याचा विषय !!! छान !!
कंत्राट दाराच्या आणलेत
कंत्राट दाराच्या आणलेत ध्यानी
लक्ष्मीची आठवण ठेवून मनी
त्याने कसे वर्तावे जनी
सुंदर रचना तुमची देखणी
शुभेच्छा
विदेशा..कॉपीराईट ठेवा याला...
विदेशा..कॉपीराईट ठेवा याला... नाहीतर कुण्या पक्षाच्या होर्डिंगवर छापतील इतकी सुंदर आहे....