कैफ
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
1
चंद्र उगवण्याची वेळ झाली
चांदण झिरपण्याची वेळ झाली
संध्येच्या प्याल्यात
कैफ भरण्याची वेळ झाली!
कैफ?
प्रत्येकाचा वेगळा
जो तुझ्यात भिनेल
तुझ्या रंगात मिसळेल
तुझ्या रक्तात उष्ण होऊन वाहेल
तुझ्या डोळ्यात उतरेल
तुझ्या श्वासाश्वासात दरवळेल
..मदिरा नसेल,
कुणाचा टिनपाटी नखरा नसेल,
वैराग्याचा धुर नसेल,
व्यसनाचा स्पर्शही नसेल
कदाचित,
दाटत आलेला कुसुंबी प्रकाशात असेल
दोन पानांच्या खोपटीमधल्या फुलात असेल
पायवाटांना लगडलेल्या जांभूळ्या रसात असेल
गिरकी घेत जाणार्या पाखराच्या गाण्यात असेल
कैफ इथे प्रत्येकाचा वेगळा!
- यशवंत/बी
विषय:
प्रकार:
शेअर करा
अरे ही कविता कुणीच वाचली नाही
अरे ही कविता कुणीच वाचली नाही का? की वाचून अवाचनिय वाटली?