जगणं

Submitted by राहुल नरवणे. on 19 July, 2013 - 03:05

पाप-पुण्य, सुख दुःख, या माणसाच्या त्याच्या स्वत:च्या कल्पना आहेत.त्याच्या स्वत: च्या वलयाभोवती फिरत असतात. तो स्वत: आपल्या परिवेशाशी निगडीत व टिकून राहण्यासाठी झगडत असतो. स्वतःचा समाज, परिसर यातच गुरफूटून जातो. त्यातून विलग होऊन त्याच्यावर स्वार होऊन कधी विचार करत नाही. आपलं पृथ्वी नामक ग्रहावर माणूस या जमातीत येण्याचं कारण शोधत नाही.
माझा आसपास चा समाज पाहतो, तेव्हा स्वत: हाला शोधात नाही. त्यांना काय अपेक्षित आहे, हे ओळखताना मला 'मी' ला काय हवंय याचा शोध घेत नाही, त्याची कल्पना पण करत नाही, एकाग्र होत नाही. काळावर स्वार होऊन जगण्याचा विचार करत नाही. विचार वैश्विक पातळीवर जात नाही. मनाचं परीघं आकाशगंगा काही सेकंदात पार करू शकतं. पण त्याला कल्पनेच्या मर्यादेत सामवून ठेवतं. बुद्धी आणि मनाची सांगड घालणं सोडून फ़क़्त बुद्धीचे ऐकूण दोघांत युद्ध लावून स्वत:ची फरपट करून घेतो. मनाचे श्लोक विसरून बुद्धीचे व्यवहार्य चातूर्याचे गोडवे गातो. मन मारतो, पिळवटतो, आणि बुद्धीवर स्वार होऊन जग जिंकायला निघतो. पण समजत नाही, बुद्धी ही मनाची रसद आहे. तिला कोमेजून शरीरात कुठलाच भाग स्थिर राहत नाही. बुद्धी काम करेनाशी होते. मग उंच उडणारा घोडा अगदी खोल जातो, ढासळतो, मनोरे पडतात. पर्यायी व्यक्तीमत्व, व्यक्ती खंगत जाते. अकार्यक्षम होते, निस्तेज होते.
मला या जगात माझ्या मनाच्या पातळीवर मुक्त विहार करायला पाठवलं आहे. मुक्त जगायला, बागडायला. बंधणाच जाळ करून त्यात अडकायला नाही. तर ते सोडवून, त्याची वीण जाणून मुक्त जगायला . .!

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users