Submitted by आनंदयात्री on 15 July, 2013 - 00:34
सारे जुनेच आहे, काही नवीन नाही
नुसताच बहर वरती, खाली जमीन नाही
विस्तारली घराणी, झाली नवीन भरती
कुठलाच देव येथे, आता कुलीन नाही
शिरतात रोज भुरटे, भु़ंगे तरी अजुनही -
बागेतल्या फुलांची कीर्ती मलीन नाही
एका क्षणी समजते, सारे समान येथे!
कोणी महान नाही, कोणीच हीन नाही
मन वागते कसेही, माझे कसे म्हणू हे?
माझ्यात राहते पण, माझ्या अधीन नाही
- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2013/07/blog-post_13.html)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मतला आणि शेवटचा शेर मस्त....
मतला आणि शेवटचा शेर मस्त.... आवडली गझल.
मस्त सगळे शेर छानय्त कोणी
मस्त
सगळे शेर छानय्त
कोणी महान नाही ...वरून माझा एक शेर आठवला
धन्यवाद
मन वागते कसेही, माझे कसे
मन वागते कसेही, माझे कसे म्हणू हे?
माझ्यात राहते पण, माझ्या अधीन नाही
व्वा!
मन वागते कसेही, माझे कसे
मन वागते कसेही, माझे कसे म्हणू हे?
माझ्यात राहते पण, माझ्या अधीन नाही...
तोडलस रे ! जियो जियो !!!
मतलाही खासच !
-सुप्रिया.
आवडलीच... त्यातही... मन वागते
आवडलीच... त्यातही...
मन वागते कसेही, माझे कसे म्हणू हे?
माझ्यात राहते पण, माझ्या अधीन नाही
कुठलाच देव येथे, आता कुलीन
कुठलाच देव येथे, आता कुलीन नाही.
माझ्यात राहते पण, माझ्या अधीन नाही
>>>
दोन्ही ओळी भलत्याच आवडल्यात
मन वागते कसेही, माझे कसे
मन वागते कसेही, माझे कसे म्हणू हे?
माझ्यात राहते पण, माझ्या अधीन नाही >>>> हा सर्वात विशेष वाटला.
एका क्षणी समजते, सारे समान
एका क्षणी समजते, सारे समान येथे!
कोणी महान नाही, कोणीच हीन नाही
मन वागते कसेही, माझे कसे म्हणू हे?
माझ्यात राहते पण, माझ्या अधीन नाही<<<
शेर आवडले.
पहिला आणि शेवटचा शेर
पहिला आणि शेवटचा शेर आवडला.
भावनांची तीव्रता काहीशी कमी जाणवली.
समीर
छान
छान
गझल आवडली !
गझल आवडली !
मस्त्.......आवडली....
मस्त्.......आवडली....:)
शेवट जबरी
शेवट जबरी
गझल खूप आवडली .
गझल खूप आवडली .
>> मन वागते कसेही, माझे कसे
>> मन वागते कसेही, माझे कसे म्हणू हे?
माझ्यात राहते पण, माझ्या अधीन नाही
सही..
वाह! आवडेश
वाह! आवडेश
डॉक्टरसाहेबांशी सहमत. मलाही
डॉक्टरसाहेबांशी सहमत. मलाही मतला आणि अधीन शेर फार आवडले. अधीन तर विशेष!
वाह वाह!! सुरेख गझल.
वाह वाह!! सुरेख गझल.
मस्त रे!
मस्त रे!
सही! >>माझ्या अधीन नाही
सही!
>>माझ्या अधीन नाही
मनापासून धन्यवाद
मनापासून धन्यवाद
एका क्षणी समजते, सारे समान
एका क्षणी समजते, सारे समान येथे!
कोणी महान नाही, कोणीच हीन नाही
मन वागते कसेही, माझे कसे म्हणू हे?
माझ्यात राहते पण, माझ्या अधीन नाही
अप्रतीम नचिकेत !!!!
मस्तंच.......... मन वागते
मस्तंच..........
मन वागते कसेही, माझे कसे म्हणू हे?
माझ्यात राहते पण, माझ्या अधीन नाही >>>>>>>>>>>>
"एका क्षणी समजते, सारे समान
"एका क्षणी समजते, सारे समान येथे!
कोणी महान नाही, कोणीच हीन नाही " क्या बात है!
धन्यवाद
धन्यवाद
मतला आणि शेवटचा खूप आवडले!
मतला आणि शेवटचा खूप आवडले!
नुसताच बहर वरती, खाली जमीन
नुसताच बहर वरती, खाली जमीन नाही <<व्वाह !
मन वागते कसेही, माझे कसे म्हणू हे?
माझ्यात राहते पण, माझ्या अधीन नाही <<क्या बात !
मन वागते कसेही, माझे कसे
मन वागते कसेही, माझे कसे म्हणू हे?
माझ्यात राहते पण, माझ्या अधीन नाही >>>> क्या बात है ...
वा ! मक्ता great!
वा ! मक्ता great!
छान आहे.
छान आहे.
Pages