सारखा

Submitted by मिल्या on 8 July, 2013 - 14:12

समजायचो मी ज्यास देवासारखा
तोही निघाला थेट... माझ्यासारखा

मंदिर, कचेरी, बार, संसद, चावडी
कलगीतुरा रंगे तमाशासारखा

सैतान का इतका अमानुष वागला?
अंगामधे माणूस शिरल्यासारखा

मित्रा मला थोडे तरी स्वातंत्र्य दे
बिलगू नको आजन्म दु:खासारखा

तलखी मनाची भर दुपारी थांबली
आला अचानक शेर वळिवासारखा

झुळुकेप्रमाणे मी खरे तर जायचो
भेटायचा तो बंद दारासारखा

पाऊस तू आहेस... पाऊसच रहा
वागू नको भगवान असल्यासारखा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जियो मिल्याशेठ जियो

ज्जामच आवडली अख्खी गझल

धन्स

अधून मधून येत जा अश्या गझला घेवून आम्हाला आनंद द्यायला ..... Happy

मित्रा मला थोडे तरी स्वातंत्र्य दे
बिलगू नको आजन्म दु:खासारखा >>> सह्हीच!
मस्त. आवडली.

झुळुकेप्रमाणे मी खरे तर जायचो
भेटायचा तो बंद दारासारखा

-------- सुन्दर गझल! वरचा शेर खास!

जयन्ता५२

आवडलीच गझल ...
आणि त्यातही

सैतान का इतका अमानुष वागला?
अंगामधे माणूस शिरल्यासारखा <<
हा म्हणजे.... ग्रेट!!

मिल्या, आवडली, रे.
झुळुकेप्रमाणे मी खरे तर जायचो
भेटायचा तो बंद दारासारखा
... खास.
(असतोस कुठे? कायम गायबून काय म्हणून?)

तलखी मनाची भर दुपारी थांबली
आला अचानक शेर वळिवासारखा

झुळुकेप्रमाणे मी खरे तर जायचो
भेटायचा तो बंद दारासारखा

पाऊस तू आहेस... पाऊसच रहा
वागू नको भगवान असल्यासारखा

व्वा व्वा!

हे शेर फार आवडले. ठळक केलेले खूप अधिक आवडले.

आख्खी गझल काबिल-ए-तारीफ !
२ रा अन शेवटचा शेर थोडे कमी वाटले इतरांच्या तुलनेत (वै.म.गै.न.)

-सुप्रिया.

समजायचो मी ज्यास देवासारखा
तोही निघाला थेट... माझ्यासारखा

व्वा. दाराचा शेरही छान आहे.

समजायचो मी ज्यास देवासारखा
तोही निघाला थेट... माझ्यासारखा
.
सैतान का इतका अमानुष वागला?
अंगामधे माणूस शिरल्यासारखा
.
मित्रा मला थोडे तरी स्वातंत्र्य दे
बिलगू नको आजन्म दु:खासारखा
.
तलखी मनाची भर दुपारी थांबली
आला अचानक शेर वळिवासारखा
.
झुळुकेप्रमाणे मी खरे तर जायचो
भेटायचा तो बंद दारासारखा

अहाहा. झक्कास. (कमी लिहावे पण असे लिहावे, असे वाटून गेले. Wink )

समजायचो मी ज्यास देवासारखा
तोही निघाला थेट... माझ्यासारखा

अहाहा !! कस्सला सहज उतरलाय मतला !! अप्रतिमच !

मंदिर, कचेरी, बार, संसद, चावडी
कलगीतुरा रंगे तमाशासारखा

चिमटा... चपराक... लाथ.... आसूड...
च्यायला, सगळं काही एकत्र !

सैतान का इतका अमानुष वागला?
अंगामधे माणूस शिरल्यासारखा

व्वाह ! विरोधाभास खूप बोलका आणि बोचरा आहे. जाम आवडला.

मित्रा मला थोडे तरी स्वातंत्र्य दे
बिलगू नको आजन्म दु:खासारखा

ठीक वाटला हा शेर.

तलखी मनाची भर दुपारी थांबली
आला अचानक शेर वळिवासारखा

हाही फक्त 'आवडला'. विशेष वाटला नाही.

झुळुकेप्रमाणे मी खरे तर जायचो
भेटायचा तो बंद दारासारखा

जबरदस्त ! भारी शेर !

पाऊस तू आहेस... पाऊसच रहा
वागू नको भगवान असल्यासारखा

नीटसा कळला नाही. त्यामुळे फारसा आवडला नाही.

एकूणात जब्बरदस्स्त गझल रे !! खूप आवडली !
मतला तर अविस्मरणीय !

Pages