एका उधाणलेल्या क्षणी !

Submitted by राहुल नरवणे. on 4 July, 2013 - 08:35

नदी खळखळून वाहते, मंजुळ हसते, नाजूक वळण घेते. अल्लडपणा, नखरेलपणा सर्वाना आवडतो. पण ज्याने एकदा समुद्राच खळखळाणं पहिल, त्याच गुढ गीत ऐकलं, तेव्हा त्याच्या गांभिर्याची, खोलतेची महानता कळते. त्याला स्वतःला माडण्याची वेगळी गरज नाही. त्याचा पोरकटपणा नसतो, तो उधाणलेला नसला तरी गंभीर जाणवतो, उधाणलेला समुद्र पाहणं हि वेगळी पर्वणीच असेल. कित्येक नद्यांचा शेवट म्हणजे समुद्र. कित्येकीचा अल्लडपणा, नखरा, सुकुमारता त्याच्यात विलीन झालेली असते. भकासता नसते, पण एक अधिकारी धाक नक्कीच असतो.
त्याचा शांतपणा, गंभीरपणा सारखा खुणावतो. वाटत अगदी मधोमध झेप घाव्यी, समुद्रात विलीन व्हावं. काळजाला काळीज भिडवावं . . . विचाराव, पुसावं महानतेचे धडे घ्यावे, नतमस्तक व्हावं.
हं ... हसायाला येतं .. अथाग, खोल समुद्राच्या लाटेच्या सगळ्यात वरच्या बारीक थेंबाइतकचं माझ काळीज, काय सामवणार. हे सर्व जरी खर असलं तरी एवढ्या खोलात काय, पण मी वरणंसुद्धा कधी समुद्र बघितला नाही. आवाज पण ऐकला नाही.
.......... हा .... तो काळज्याच्या कुठल्यातरी कोपऱ्यात गर्जतो, तेवढ मात्र खर .... !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users