दुनिया खुशाल म्हणुदे चंदन असेल बहुधा
माझेच पोळलेले ते मन असेल बहुधा
"आलोच मागुनी मी, तू हो पुढे" म्हणाला
मृत्यूकडे स्वतःचे वाहन असेल बहुधा
सध्या कुठे कुणावर करतात प्रेम कोणी
सध्या कबूतरांचा सीझन असेल बहुधा
इतक्या उघडपणे ती का लाजली असावी
चोरून घेतलेले चुंबन असेल बहुधा
बाकी तिच्याकडेही आहेच काय दैवा
अर्पण करून बसली तन मन असेल बहुधा
मी ज्या दिशेस जातो तेथे अजाण ठरतो
चौफेर या जगाचे वाचन असेल बहुधा
शोधून शायराला गेली थकून झोपी
नशिबामधे गझलच्या लंघन असेल बहुधा
आशेवरी अश्या मी जीवन जगायचो की
मेल्यावरी हवे ते जीवन असेल बहुधा
लाखात लोळताना नाही मला कळाले
माजून बोलणारा निर्धन असेल बहुधा
जग का मला अताशा झिडकारते कळेना
माझे सुधारलेले वर्तन असेल बहुधा
बघण्यामधे तिच्या त्या भलताच घोळ होता
बंधन नसेल किंवा बंधन असेल बहुधा
नुकतेच टाकले जे कचर्यात नांव तुम्ही
त्या 'बेफिकीर'चे हे लेखन असेल बहुधा
-'बेफिकीर'!
"आलोच मागुनी मी, तू हो पुढे"
"आलोच मागुनी मी, तू हो पुढे" म्हणाला
मृत्यूकडे स्वतःचे वाहन असेल बहुधा......... व्वा !
सध्या कुठे कुणावर करतात प्रेम कोणी.......अफलातून मिसरा ! सहज, सुंदर !
मी ज्या दिशेस जातो तेथे अजाण ठरतो
चौफेर या जगाचे वाचन असेल बहुधा........क्या बात ! क्या बात !
जग का मला अताशा झिडकारते कळेना
माझे सुधारलेले वर्तन असेल बहुधा..................हासिल-ए-गझल !
बघण्यामधे तिच्या त्या भलताच घोळ होता
बंधन नसेल किंवा बंधन असेल बहुधा>>>>>>>>>सुरेख !
धन्यवाद !
बेफिकीर, पहिल्यांदा वाचली
बेफिकीर,
पहिल्यांदा वाचली तेव्हा शेर कळले, पण गझल कळली नाही. विस्कळीत वाटली. नंतर पहिली द्विपदी वाचली आणि उलगडा झाला!
जीवनाच्या विविध अंगांना स्पर्शायची तुमची हातोटी विलक्षण आहे.
आ.न.,
-गा.पै.
_/\_
_/\_
सर्वच शेर सहज सुंदर. बढिया
सर्वच शेर सहज सुंदर.
बढिया गझल.
गझल आवडली. हे शेर
गझल आवडली.
हे शेर विशेष,
"आलोच मागुनी मी, तू हो पुढे" म्हणाला
मृत्यूकडे स्वतःचे वाहन असेल बहुधा
मी ज्या दिशेस जातो तेथे अजाण ठरतो
चौफेर या जगाचे वाचन असेल बहुधा
आशेवरी अश्या मी जीवन जगायचो की
मेल्यावरी हवे ते जीवन असेल बहुधा
ठळक केलेला सर्वाधिक आवडला.
धन्यवाद
जग का मला अताशा झिडकारते
जग का मला अताशा झिडकारते कळेना
माझे सुधारलेले वर्तन असेल बहुधा << व्वा !>>
सुंदर
कुठला शेर कोट
कुठला शेर कोट करावा?????
अतिशय सुंदर गझल. पुन्हा पुन्हा वाचत आहे.
व्वा !!
शोधून शायराला गेली थकून झोपी
शोधून शायराला गेली थकून झोपी
नशिबामधे गझलच्या लंघन असेल बहुधा
पण आमचे नशीब चांगले आहे! फार फार सुंदर. अनेक द्विपदी मनाचा तळ गाठणार्या. ले.शु.
तुमच्या गझलेची वाट पाहतच
तुमच्या गझलेची वाट पाहतच होतो...
गझलवाचनाची हौस भागवलीत...जियो..:)
सगळेच शेर भयंकर आवडले!
सुंदर गझल.
सुंदर गझल.
कबितराचा शेर सोडुन सगळे शेर
कबितराचा शेर सोडुन सगळे शेर आवडले
)
(तो का आवडला नाही ते माहीत नाही
आशेवरी अश्या मी जीवन जगायचो
आशेवरी अश्या मी जीवन जगायचो की
मेल्यावरी हवे ते जीवन असेल बहुधा
जग का मला अताशा झिडकारते कळेना
माझे सुधारलेले वर्तन असेल बहुधा
हे दोन शेर सर्वात विशेष वाटले.
'असेल बहुधा' ही रदीफ छान वाटली.
गझल छान, आवडली `वाचन' जास्त
गझल छान, आवडली
`वाचन' जास्त आवडला. `वर्तन' सुध्दा मस्त
(शेवटच्या शेरात `तुम्ही'च्या चार मात्रा मोजायच्या का?)
सध्या कुठे कुणावर करतात प्रेम
सध्या कुठे कुणावर करतात प्रेम कोणी
सध्या कबूतरांचा सीझन असेल बहुधा
व्वा. वाचनही आवडला.
मात्र गझल एक रचना म्हणून फार भावली नाही.
काही शेर अगदी जबरदस्त आहेत.
काही शेर अगदी जबरदस्त आहेत.

एकूण आवडली...
मस्त आहे पण बेफिकिरांच्या इतर
मस्त आहे पण बेफिकिरांच्या इतर (मी जितक्या वाचल्यात तितक्या) गझलांइतकी flawless नाही वाटली.
फार सुंदर. जबरदस्त शेर आहेत
फार सुंदर. जबरदस्त शेर आहेत सगळे.
! दंडवत ! अख्खी गझल आवडली.
! दंडवत !
अख्खी गझल आवडली.
अप्रतिम दुसरा शब्द नाही.
अप्रतिम दुसरा शब्द नाही.
खूप छान!! "मी ज्या दिशेस जातो
खूप छान!!
"मी ज्या दिशेस जातो तेथे अजाण ठरतो
चौफेर या जगाचे वाचन असेल बहुधा "
क्या बात है!!!
सध्या कुठे कुणावर करतात प्रेम
सध्या कुठे कुणावर करतात प्रेम कोणी
सध्या कबूतरांचा सीझन असेल बहुधा>>>>>>>'सिझन' शब्द मराठीत कधी आला???
दुनिया खुशाल म्हणुदे चंदन असेल बहुधा
माझेच पोळलेले ते मन असेल बहुधा>>>>>> 'म्हणुदे'???? शुद्धलेखन बोंबलत फिरते आहे. (योग्य शब्द =''म्हणू दे''!)
इतक्या उघडपणे ती का लाजली असावी
चोरून घेतलेले चुंबन असेल बहुधा>>>>>>>>>>कोणी लाजताना चोरून किव्हा उघडपणे लाजते??????
बाकी तिच्याकडेही आहेच काय दैवा
अर्पण करून बसली तन मन असेल बहुधा>>>>>>>'दैवा'??? देवाऐवजी हे संबोधन वापरले आहे का??
छान आहे.
छान आहे.
Golden star, १. >> शुद्धलेखन
Golden star,
१.
>> शुद्धलेखन बोंबलत फिरते आहे. (योग्य शब्द =''म्हणू दे''!)
मी ऐकलंय की कवीला र्हस्वदीर्घ बदलण्याची व/वा शब्द जोडण्याची/तोडण्याची सूट असते. वृत्त साधण्यासाठी ही सूट दिलेली आहे.
२.
>> कोणी लाजताना चोरून किव्हा उघडपणे लाजते??????
चोरून लाजण्याचा संदर्भ लागला नाही. चोरून आहे ते घेतलेले चुंबन आहे, तर उघड आहे ते लाजणे आहे.
३.
>> 'दैवा'??? देवाऐवजी हे संबोधन वापरले आहे का??
नाही. कविवर्यांना दैव अपेक्षित होतं/असावं. त्यांचं मत अर्थात अंतिम असेल.
आ.न.,
-गा.पै.
गामा साहेब, त्यांच्या गझलेला
गामा साहेब,
त्यांच्या गझलेला प्रतिसाद न आल्याचा राग काढतायत ते, काढूदेत त्यांना तो! त्यांना अजुन गझलतंत्र माहीत नाही आहे, मतल्यात अलामत भंगली आहे त्यांच्या. होईल सुधारणा हळूहळू.
गझल आवडली !
गझल आवडली !
kami adhik saglech sher
kami adhik saglech sher awadle
matlyatla ula misra ajun sahaj vhawa
mrutyu cha sher afata jamlay
Goldenbai changli ekahi gosht
Goldenbai changli ekahi gosht /sher nai watla ka gazlet?
Goldenbai<<<
Goldenbai<<<
लाखात लोळताना नाही मला
लाखात लोळताना नाही मला कळाले
माजून बोलणारा निर्धन असेल बहुधा
जग का मला अताशा झिडकारते कळेना
माझे सुधारलेले वर्तन असेल बहुधा >>> सुरेख!
शंका विचारण्यात काही चूक आहे
शंका विचारण्यात काही चूक आहे का? मला गझल वाचून जे वाटले तेच लिहिले मी....यात राग काढण्याचा प्रश्नच येत नाही बेफिकीरजी. शाम, मला हि गझल आवडली म्हणूनच तर प्रतिक्रिया नोंदवली ना मी....मला कोणाला दुखवायचं नाहीये....

Pages