दगडावर कोरलेले क्षण..
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
36
माझ्या ब्लॉगवर चार एक वर्षांपूर्वी लिहीलेली पोस्ट... फार रँडम आठवणी आहेत.
गायत्रीच्या ब्लॉगवर असं लक्षात राहीलेले/आनंदाचे क्षण असे पोस्ट पाहीले.. म्हटलं आपणही करावी यादी! फक्त आनंदाचेच असे नाहीत, लक्षात राहीलेले.. बघू किती आहेत असे क्षण!
- अगदी लहानपणापासून आठवायचे म्हटले, तर सगळ्यात आधी आठवते.. आई आणि बाबा मला सकाळी उठवायला यायचे तो क्षण! एकदम लाडाने उठवायला सुरवात व्हायची! काहीतरी लाडीक बोलत बसायचे.. तेव्हा मी जागी असूनही पडून राहायचे.. पण आपोआप एक हसू फुटायचे आणि मग आई बाबांना समजायचे की मी जागीय!
तरीही मी पुढे लोळत पडायचे.. मग त्या लाडाची जागा आधी ४-४ दा हाका मारण्यात, नंतर ओरडण्यात .. क्वचित एखाद्या धपाट्यात व्हायची!
काहीही असलं तरी तो क्षण मला खूप आवडायचा! तसेच दादा उठवायला आला की तो प्रथम माझ्याबरोबर झोपून टाकायचा, आणि मग १५ मिनिटांना उठून पायाला ओढून रेल्वे रेल्वे खेळून उठवायचा! ते ही भन्नाट!
- शाळेत असतानाची हिवाळ्यातली सकाळ.. ती कडाकडा दात वाजवणारी थंडी मला अजुनही आवडते.. (तिचा कितीही त्रास झाला तरी!)
- लहानपणी मामा अमेरिकेतून पेपरमेट्सची पेनं आणायचा ढीगभर! त्याचा तो गुळगुळीत आणि स्लीम स्पर्ष अजुन हातात आहे! परवा मुद्दाम जाऊन घेऊन आले पेपरमेट! i just love those pens!
- सातवीत असताना वर्गात पहीली आले होते .. बहुतेक शैक्षणिक वर्षांत एकदाच झाले असेल असे!
- आठवीत असताना लोखंडे बाईंनी सायन्सचा धडा वाचून अवघड स्पेलिंग्स लिहून आणायला सांगितली होती.. (सेमी-इंग्लिश तेव्हापासूनच चालू होते ना.. जाम अवघड वाटायचे सायन्स इंग्लिशमधून .. पण नंतर मराठीतून वाचल्यावर कळले.. इंग्लिशमधूनच बरेय!) सर्व वर्गाने बरेच लिहीले होते.. माझी वही कोरी.. तीच बाईंनी बघितली! चिडून पुढे बोलवले.. आणि मिसलेनिअसचे स्पेलिंग विचारले! ते पर्फेक्ट सांगता आल्यावर झालेला त्यांचा चेहरा! तसेच त्याचबरोबर आठवणारी आठवण म्हणजे त्या सेमिस्टरला सायन्समधे पहीली आलेली मी! LOL.. याचीही कधीच पुनरावृत्ती झाली नाही!
- आनंददायक नाही! पण ९वी १०वी ही निरस वर्षं होती , हे ही आठवते लगेच!
- १०वी मधे मात्र जेव्हा माझ्या दातांचे ब्रेसेस काढले तेव्हा फुटलेले हसू! अवर्णनिय होते! तोंडात दातच नाहीत की काय असं वाटलं होते!
- ४-५वी पासून सुरू झालेले बॅडमिंटन! PYC, डेक्कनच्या ग्राउंडवर मारलेल्या वॉर्मअपच्या फेर्या! त्यानंतर झालेल्या बॅडमिंटनच्या मॅचेस.. आणि ९०% वेळा जिंकणारी मी! ते दिवस मी कधीच विसरू शकणार नाही! मी कोणीतरी बेस्ट आहे हे फिलिंग त्याकाळात खूप मिळाले!
- ४थीत झालेली लक्षद्वीपची ट्रीप! तिथल्या अरबी समुद्रात शिकलेले पोहणे!
- नंतर सुरू झाले स्विमिंगचे दिवस! उन्हाळ्याच्या सुट्टीत रोज सकाळी ७-८ भरपूर पोहण्याच्या लॅप्स करून,पोटात भुकेचा डोंब घेऊन घरी यायचे.. झोपाळ्यात बसून ठकठक-चंपक-किशोरच्या साथीने ऑम्लेट आणि मॅन्गो मिल्कशेप चापायचे ते क्षण!!
- बाबांना कधी चुकुनमाकून कॅरममधे हरवले असेल, तर तो क्षण!
- आमच्या कॉलनीतल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांच्या प्रॅक्टीस सेशन्स! ऍक्चुअल गणेशोत्सव!
- इंजिनिअरिंगला जाम त्रास देत असलेला क्रिटीकल झालेला ऍप-मेक सुटला तो आख्खा दिवसच !
- थर्ड इअरनंतर मात्र पीएल्समधे MIT library च्या पायर्यांवर बसून केलेला जीवतोड अभ्यास! स्वीटीबरोबरचा अभ्यास! रात्री फोनवरून मैत्रिणींबरोबर केलेला अभ्यास! तेही दिवस अफलातून! पहील्यांदाच जिगर्सच्या वाटेला न जाता, रेफरंस बुक आणून, नोट्स काढून वगैरे केला होता अभ्यास!
- डिस्टींक्शन हुकल्याने झालेली निराशा! सर्व जग चांगले मार्क्स पडले म्हणून कौतुक करत होते.. तर मी लिटरली निराश होते!
- नंतरचा जॉबसाठीचा वाईट्ट स्ट्रगल!
- इन्नीआज्जीच्या घरच्या लाल-वेल्वेटच्या दुलईत दुपारी झोपणे!
- आज्जीनीच शिकवलेल्या कविता..
- दादाने घेतलेले माझे फिजिक्सचे बौद्धीक! :(((
- रात्री गार्डन कोर्टमधले जेवण.. त्याहीपेक्षा तो माहौल!
- माझी रोजची कॉलेजमधली एन्ट्री!
जीन्स, क्रीम जॅकेट, क्रीम साईड बॅग, आणि डाव्या हातात काळे हेल्मेट!
i used to feel like i am a hero! please note not heroine! a hero !
- आयुष्यात जेव्हा जेव्हा (आणि त्या वेळा कमीच आहेत!) मला दादागिरी करता आली!
उदाहरणार्थ : SE ला NCPL नावाच्या प्रॅक्टीकलला मी जी सुटायचे प्रोग्रॅम्स करत, तो स्पीड, माझी विचारशक्ती, ग्रास्पींग पॉवर.. मलाच खरं नाही वाटत.. रीना मॅडम म्हणायच्या क्लासच्या जरातरी बरोबर राहा! नेक्स्ट सेमचे प्रोग्स आताच करणार का? :">
- स्वीटी, स्कुटी अन मी.. अशक्य फिरलो.. पालवी मधे किती चहा ,दुर्गाची कोल्डकॉफी ढोसलीय कल्पना नाही! इंजिनिअरिंगच्या त्या रखरखाटातले छान क्षण!
- वेताळ/हनुमान/ARAI/लॉ-कॉलेजची टेकडी ! मैत्रिणींबरोबर गप्पा मारत टेकडी चढून वरच्या खडकावर बसून, समोरच कलत जाणारा सूर्यास्त बघायचा! आणि..
- नेहेमीचा आणि आजन्म आवडीचा क्षण राहील तो म्हणजे पहीला पाऊस, पहीला ’तो’ मातीचा वास.. त्यापुढे सारं फिक्कं!
अजुन खूप खुप्प आहेत! पण कसं सगळं लिहीणार.. त्याहीपेक्षा ते आठवणार? त्यामुळे इथेच बास करते.. यातही जमतील तशा ऍडीशन्स होतीलच याची खात्री! Obviously.. Life does not stop surprising you with those moments.. you just have to notice them!
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
(No subject)
मला खुप आवदले......
मला खुप आवदले......
वा! खुप छान वाटलं. आणि नेमकं
वा! खुप छान वाटलं. आणि नेमकं आजच शाळेतली एक मैत्रीण तब्बल १२ - १३ वर्षानी फेबु वर भेटली आणि फोनवर बोलणंही झालं. आठवणी दाटुन आल्या.
एकदम नॉस्टॅल्जिक व्हायला
एकदम नॉस्टॅल्जिक व्हायला झालं. आणि अशाच माझ्या आठवणीही लिहिण्याची प्रेरणाही मिळाली. आता नोटपॅड मधे काय काय आठवणी लिहायच्या त्यांचा ड्राफ्ट बनवतोय. त्यामूळे सगळ्या आठवणींची अनायासे सफर पण घडतेय!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद बस्के!
सहीच!! येऊदेत तुमच्याही
येऊदेत तुमच्याही आठवणी!!
आठवणी मस्तच... लिखाण ईष्टाईल
आठवणी मस्तच... लिखाण ईष्टाईल भारीच ...
Pages