Submitted by नीधप on 26 June, 2013 - 03:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
३ मध्यम रताळी, १ मोठ्ठा कांदा
जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता - फोडणीपुरते
तेल - फोडणीपुरते
लाल तिखट, सांबार पावडर - प्रत्येकी १ टेस्पू
पाणी - १ कप
मीठ - चवीपुरते
कोथिंबीर - आपल्या आवडीप्रमाणे
क्रमवार पाककृती:
कांदा बारीक चिरून घ्या.
रताळी व्यवस्थित धुवून घेऊन, साल न काढता गोल गोल चकत्या कापा.
कढई गॅसवर, गॅस चालू, कढईत तेल, तेल तापले,
मोहरी-जिरे-हिंग, तडतडतड, कढीपत्ता, परता....
कांदा, परता
रताळ्याच्या चकत्या, परता
तिखट आणि सांबार मसाला वरून घाला, परता.
पाणी, खूप नको नाहीतर चिखल होईल. भाजी सुकी हवीये, चकत्या सुट्या हव्यात.
झाकण, ५ मिन मधे रताळी शिजतात.
चवीप्रमाणे मीठ घालून सारखे करून घ्या.
गॅस बंद, कोथिंबीर बारीक चिरून भुरभुरा...
वाढणी/प्रमाण:
२ माणसांची एका जेवणाची भाजी.
अधिक टिपा:
याबरोबर रस्सम, मऊसर भात आणि पापड्या/ कुरडया हे फार म्हणजे फार म्हणजे अतिच उच्च लागते...
माहितीचा स्रोत:
आंतरजाल
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आहे. नक्कीच करून बघेन.
मस्त आहे. नक्कीच करून बघेन.
तिखट आणि सांबार मसाला कधी
तिखट आणि सांबार मसाला कधी घालायचा?
मसाला कधी घालायचा?
मसाला कधी घालायचा?
ऊप्स लिहिते थांब.
ऊप्स लिहिते थांब.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
, ५ मिन मधे रताळी शिजतात. -
, ५ मिन मधे रताळी शिजतात. - तरी पण ४५ मिनिटे का लागतात. अजून काही तयारी आहे का??
मस्त... लिहिलयं पण
मस्त... लिहिलयं पण सार्ट्कटात!
रताळ्यांना लागलेला चिखल
रताळ्यांना लागलेला चिखल धुण्याचा वेळ, सगळ्या वस्तू ज्या त्या जागेवरून काढून ओट्यावर एकत्र ठेवायचा वेळ पण धरलाय गृहित त्या ४५ मिनिटात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण तुम्ही कमी वेळात करू शकता
ते पटकन फक्त टीवीशोत असतं...
ते पटकन फक्त टीवीशोत असतं... त्यांच्या कांद्याची साले काढून अर्धे करून तयार असतांत, लसूण सोलून तयार असतो, लागणारी भांडी तयार... आपल्याकडे आनंदी आनंद... त्यात कामवाली आलेली नसेल तर विचारूच नका...![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
योग्या एकदम माझ्यासारख्या
योग्या एकदम माझ्यासारख्या अ-गृकृद संसारी बाईसारखं बोललास..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
अर्रे, सह्हीच! नक्की करून
अर्रे, सह्हीच! नक्की करून पाहणार ही भाजी...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(कुठलाही पदार्थ करण्यासाठी जी पूर्वतयारी लागते, त्यासाठीचा वेळही पाककृतीच्या एकूण वेळात धरलाच जावा असं माझं नेहमीच म्हणणं असतं.)
लले 'तू' करणारेस?
लले 'तू' करणारेस?
योकु, माझ्याकडे स्वयंपाकाला
योकु, माझ्याकडे स्वयंपाकाला बाई असणारच हा जो काही तुझा गैरसमज झालेला होता, तो मी स्वतःच दूर केला होता ना एकदा फोनवर? आं?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
त्यासाठीचा वेळही पाककृतीच्या
त्यासाठीचा वेळही पाककृतीच्या एकूण वेळात धरलाच जावा असं माझं नेहमीच म्हणणं असतं<<<![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
है शाब्बास लले.. हाथ मिलाओ!
त्यात काय एवढं ५ मिंटात्त होईल अशी वाली रेसिपी ही फक्त काही सोपी फळे धुवून व गरज असल्यास चिरून घेणे याचीच असू शकते. किंवा मग प्याकेट उघडून गरम करून प्लेटीत घेणे..
वेगळी कृती आहे. पण समहाऊ,
वेगळी कृती आहे. पण समहाऊ, रताळं हा पक्का उपवासाचाच पदार्थ आहे हे ठसल्यामुळे रताळं-कांदा ह्या कॉम्बिनेशनपाशी अडखळायला होतंय!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
करून बघ. आपल्या पेठी टेस्टला
करून बघ. आपल्या पेठी टेस्टला पण आवडण्यासारखी आहे एकदम.
चतुर्थीसाठी आणलेली रताळी
चतुर्थीसाठी आणलेली रताळी आहेतच आजच करुन बघते.
शॉल्लेट. करको देखेंगा जी.
शॉल्लेट. करको देखेंगा जी. राँबा नल्ला.
कच्च्या केळ्याची अशीच करतो
कच्च्या केळ्याची अशीच करतो आम्ही.
पण कच्ची केळी पटकन शिजतात? मी
पण कच्ची केळी पटकन शिजतात? मी मेधाच्या रेस्पीने केली होती तेव्हा कच्ची केळी शिजायला खूप वेळ लागला होता. कच्च्या केळ्याची भाजी करताना साल नक्की किती खोलपर्यंत काढायचं यात भारी गोंधळ होतो माझा.
मला रेसिपी बरोबर रेसिपीची
मला रेसिपी बरोबर रेसिपीची लिहायची स्टाईल आवडली.. अगदी जवळचं कुणीतरी सांगतय असे वाटते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त आहे. करुन बघेन.
मस्त आहे.
करुन बघेन.
मस्त इश्टाइल्ने लिहिलेय
मस्त इश्टाइल्ने लिहिलेय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कच्ची केळी साल काढून जशी घेता येतात तशीच, बटाट्यासारखी कूकर मध्ये उकडून सोलल्यास साल काढणे सोपे जाते..
आधीचेही फोटो पेंडीग असल्याने,
आधीचेही फोटो पेंडीग असल्याने, मी प्रतिक्रिया दिलीच नाही, असेच समजायचे !
( या व्यक्तीकडून तरी सजावटीचे धडे मिळायला नकोत काय ? )
नी, कच्ची केळी कूकरला आधीच
नी, कच्ची केळी कूकरला आधीच शिजवली तर गिचका होतात म्हणून मी प्रेशर पॅनमधे फोडणी करून नंतर एक ते दोन मिनिटे शिजवते.
रताळ्याची अशीच भाजी आमच्याकडे केली जाते पण कांदा घालत नाही आणि टहाळभर कढीपत्ता घातला जातोच. शिवाय फोडणीमधे चार पाच दाणे मेथीचे पण घातले जातात.
रताळ्याचे अगदी बारीक काप काढायचे आणि मैद्याच्या पीठात बुडवून भजी तळायची. यम्मी लागतात.
मैद्याच्या पीठात बुडवून भजी
मैद्याच्या पीठात बुडवून भजी तळायची. <<<![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
ताई.... वजनाचं काय?
मस्त वाटतेय रेसिपी. करुन बघेन
मस्त वाटतेय रेसिपी. करुन बघेन नक्की![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कच्ची केळी धूवून घेवून
कच्ची केळी धूवून घेवून त्याची साल फक्त सोलाण्याने सोलायची. पांढरा गर दिसे पर्यंत.
मग पाण्यात टाकून ठेवायची.
अजिबात कूकरात शिजवून घ्यायची नाही, गिचका होतात. शिजतात फोडणीवर. नाहीतर चिकट गोळा होतात पाणी टाकले की.
करुन बघणेत येईल हे नक्की.
करुन बघणेत येईल हे नक्की. फ्लॉ ची साखी भाजी जिभेला आवडली होती म्हणजे ही पण आवडेलच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो कुठेय? ट्राय करेन .. तशी
फोटो कुठेय?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ट्राय करेन .. तशी थोडी सोप्पी वाट्तेय बटाटा काचर्यंसारखी
Pages