रताळ्याची सौदिंडियन भाजी

Submitted by नीधप on 26 June, 2013 - 03:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३ मध्यम रताळी, १ मोठ्ठा कांदा
जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता - फोडणीपुरते
तेल - फोडणीपुरते
लाल तिखट, सांबार पावडर - प्रत्येकी १ टेस्पू
पाणी - १ कप
मीठ - चवीपुरते
कोथिंबीर - आपल्या आवडीप्रमाणे

क्रमवार पाककृती: 

कांदा बारीक चिरून घ्या.
रताळी व्यवस्थित धुवून घेऊन, साल न काढता गोल गोल चकत्या कापा.

कढई गॅसवर, गॅस चालू, कढईत तेल, तेल तापले,
मोहरी-जिरे-हिंग, तडतडतड, कढीपत्ता, परता....
कांदा, परता
रताळ्याच्या चकत्या, परता
तिखट आणि सांबार मसाला वरून घाला, परता.
पाणी, खूप नको नाहीतर चिखल होईल. भाजी सुकी हवीये, चकत्या सुट्या हव्यात.
झाकण, ५ मिन मधे रताळी शिजतात.
चवीप्रमाणे मीठ घालून सारखे करून घ्या.
गॅस बंद, कोथिंबीर बारीक चिरून भुरभुरा...

वाढणी/प्रमाण: 
२ माणसांची एका जेवणाची भाजी.
अधिक टिपा: 

याबरोबर रस्सम, मऊसर भात आणि पापड्या/ कुरडया हे फार म्हणजे फार म्हणजे अतिच उच्च लागते... Happy

माहितीचा स्रोत: 
आंतरजाल
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त झाली भाजी! आणखी कोणकोणत्या भाज्या करता येतील साम्बार मसाला घालून? नीधप तुम्ही खूप छान पदार्थ दिलात,रताळ्याचा किसाव्यतिरिक्त दुसरा तिखट पदार्थ करत नव्ह्ते मी!

आज केली होती. फ्रोझन रताळी असल्याने जरा फोडी, चकत्या जास्त शिजल्या गेल्या. पण चव मस्तच आली. एकदम वेगळी टेस्ट. Happy

आज ही भाजी केली (व्हेरीयेशन करावी लागली.). सांबर मसाला नव्हता म्हणून रसम पावडर ४ चमचे वापरली. कांदा तसाही जरा आवडत नाही त्यामुळे तो कटाप. खूपच छान लागते. मस्त लिहिलत!!

ही भाजी आमच्या घरी सुपरहिट झालेली आहे. Happy

रताळी लगेच शिजतात हे माहिती असल्यामुळे मी भाजी करताना त्यात पाणी अजिबात घातलं नाही. नुसत्या वाफेवर अक्षरशः ४-५ मिनिटांत झाली भाजी.

Pages