Submitted by अभय आर्वीकर on 25 June, 2013 - 11:11
आडदांड पाऊस
अडदांड बेत ओला शिजवून पावसाने
केला शिवार खच्ची भिजवून पावसाने
गाळून घाम विणले मी वस्त्र स्वावलंबी
केल्यात पार चिंध्या खिजवून पावसाने
आले मनात जेव्हा तेव्हाच निग्रहाने
केले सपाट डोंगर झिजवून पावसाने
खाण्या-पिण्यात झाला पाऊसही अधाशी
हंगाम फस्त केला निजवून पावसाने
नाही दिले कुणाला थोडे 'अभय' परंतू
खरडून दैव नेले थिजवून पावसाने
- गंगाधर मुटे
--------------------------------------------
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सॉरी फारशी नाही आवडली तुमच्या
सॉरी फारशी नाही आवडली तुमच्या मुटे शैलीची सवय झाल्याने असेल कदाचित
मतला चांगला झालाय फक्त हळूवार
मतला चांगला झालाय फक्त हळूवार हा शब्द चपखल नाही वाटला. ओला बेत, खच्ची शिवार वगैरे संकल्पना भावल्या.
विदिपा, हळूवार हा शब्द चपखल
विदिपा,
हळूवार हा शब्द चपखल नाहीच शिवाय आशय व्यक्त होण्यातही तो शब्द अडसर ठरतोय. पण पर्यायी शब्दही मला अजून गवसला नाहिये.
हळूवार या शब्दाला पर्यायी शब्द कोणी सुचवला तर स्वागत आहे.
(मात्र केवळ एकच शब्द तेवढा बदलायचा, अख्खी ओळ बदलायची नाही.)
अलवार करा अलवार !!!! मीही
अलवार करा अलवार !!!!
मीही कालच माझ्या एका नव्या शेरात हाच बदल केलाय ......
अर्थात हा योग्य की नाही ते मलाही माहीत नाही मला अलवार ह्या शब्दाचा नेमका अर्थ माहीत नाही ... पण स्वतःच्या जबाबदारीवर आपन निर्णंय घ्यावा ..:)
आले मनात जेव्हा तेव्हाच
आले मनात जेव्हा तेव्हाच निग्रहाने
केले सपाट डोंगर झिजवून पावसाने<<वा वा!
(अलवार चाही अर्थ हळुवार प्रमाणेच आहे की काय असे वाटते......
त्या गाण्याच्या ओळी नव्हत्या का....
'अलवार तुझी चाहूल......' )
अलवार, अलगद आणि हळुवार या
अलवार, अलगद आणि हळुवार या शब्दांच्या अर्थछटा वेगळ्या असल्यातरी सर्वसाधारण अर्थ काहीसा समानच आहे, असे मलाही वाटते.
आता अडदांड हा शब्द वापरून बदल केला आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मुटे साहेब, शेवटच्या सहा ओळी
मुटे साहेब, शेवटच्या सहा ओळी सुप्पर लाईक.
आले मनात जेव्हा तेव्हाच निग्रहाने
केले सपाट डोंगर झिजवून पावसाने
वरील ओळींना पैकीच्या पैकी गुण दिले .
लैच आवडल्या या ओळी.
लिहित राहा.
-दिलीप बिरुटे
अडदांड <<<< अग्गैsssगं !!!
अडदांड <<<< अग्गैsssगं !!!
असो .... मुटेशैली म्हण्तात ती हीच !!!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आडदांड पावसाची कविता(गझल)
आडदांड पावसाची कविता(गझल) भावली ..
सर्व प्रतिसादकांचे मन:पूर्वक
सर्व प्रतिसादकांचे मन:पूर्वक आभार....!
आडदांड आहे ! अडदांड नाही
आडदांड आहे !
अडदांड नाही
बंडोपंत, कोण आडदांड आहे? कोण
बंडोपंत,
कोण आडदांड आहे?
कोण अडदांड नाही?
--------------------------------------![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अवांतर- मायबोलीवरील बर्याच गझलकारांना आणि प्रतिसादकांना नेमकी काय "बिमारी" झाली आहे?
हा कुठल्या साथीचा रोग आहे?
अवांतर- मायबोलीवरील बर्याच
अवांतर- मायबोलीवरील बर्याच गझलकारांना आणि प्रतिसादकांना नेमकी काय "बिमारी" झाली आहे?
हा कुठल्या साथीचा रोग आहे?<<<
मुटेंच्या या गझलला बिरुटे सुपर लाईक करणार आणि बाकीचे बीमार होय? हा न्याय बरा आहे राव.
बेफि, बरेच म्हणजे बिरुटे
बेफि,
बरेच म्हणजे बिरुटे सोडून बाकीचे, असा अर्थ होतो काय?
बरेच म्हणजे बिरुटे सोडून
बरेच म्हणजे बिरुटे सोडून बाकीचे, असा अर्थ होतो काय?<<<
बिरुटे गझलकार आहेत? धन्यवाद, हे माहीत नव्हते. माझ्या मनात त्यांच्याबद्दल असलेला आदर दशगुणित झाला.
बेफि, बिरुटेंची हजामत
बेफि,
बिरुटेंची हजामत करण्याच्या पवित्र्यात दिसताय. कारण कळेल काय?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बिरुटेंची हजामत करण्याच्या
बिरुटेंची हजामत करण्याच्या पवित्र्यात दिसताय. कारण कळेल काय? <<<
कारण इतकेच आहे की मी माझे नसलेले काही व्यवसाय सहज म्हणून करून बघतो.
<<< कारण इतकेच आहे की मी माझे
<<< कारण इतकेच आहे की मी माझे नसलेले काही व्यवसाय सहज म्हणून करून बघतो. >>>
चुकीचे उत्तर.
तुम्ही हा व्यवसाय का करता, असा प्रश्न नसून बिरुटेंची(च) हजामत करण्यामागचे कारण अपेक्षित आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दिलिप बिरुटे जुने मायबोलीकर
दिलिप बिरुटे जुने मायबोलीकर आहेत असे अवलोकनात दिसते
तरी यांनी लेखन म्हणावे तितके केले नाही
मी येवून मला १.५ -२ वर्षे झाली मी आजकालच याना पाहतोय तेही गझल्च्या धाग्यावर
ते उगाच चांगल्या गझलांचा उद्धार करत असतात अनेकदा
मलाही त्यांचा राग येतो कधीकधी
आणि ते असे मुद्दाम करतात हे पाहून खरेतर राग येतो बाकी चांगला शेर बरा शेर वाईट शेर यातले त्यान काही समजत नसावे अस माझा प्रत्यय आहे
मुटे सर तुमचे या गझलेतील शेर चांगलेच आहेत आम्हालोकाना आवडले यातही शंका नसावी गैरसमज नसावा विषय बिरुटे महाशयांच्याबद्दल आहे
>>>> दिलिप बिरुटे जुने
>>>> दिलिप बिरुटे जुने मायबोलीकर आहेत असे अवलोकनात दिसते
तरी यांनी लेखन म्हणावे तितके केले नाही
मायबोलीकर असल्यावर लिहायलाच पाहिजे असा काही नियम आहे का, आता लिहिणे जमत नाही.
पण शिकू आम्ही तुम्हा थोरा मोठ्यांच्या गझला वाचून वाचून आणि करु उत्तम लेखन. आमचेही दोन चार शेर कधीतरी वाचकांना आवडतील आणि देतील आम्हालाही लोक स्टँडिंग ओव्हेशन. (दोन चार जरी जागेवर उभे राहीले तरी पुष्कळ आहे)
>>> गझल्च्या धाग्यावर ते उगाच चांगल्या गझलांचा उद्धार करत असतात अनेकदा
अरेरे, असे तर मी काही केले नाही. पण, जे आवडलं नाही त्यावर जरुर लिहिले आहे. पण, तरीही ज्यांना ज्यांना असं करणं म्हणजे 'उद्धार आहे' असे वाटत असल्यास त्याला माझा काही विलाज नाही.
>>>>आणि ते असे मुद्दाम करतात हे पाहून खरेतर राग येतो
अजिबात नाही. आता काही शेर अजिबात अपिल होत नाही तर त्याला तरी मी काय करु. आता उदाहरणच द्यायचं तर...आपले शेर तर मला कुठेच 'वाह, उस्ताद वाह' अशी दाद द्यायला प्रवृत्त करत नाही. आपल्या गझलेवर मी काही बोललो का, मुकाट सहनच करतो. गझलेचं व्याकरण उत्तम असलं म्हणजे ती रचना उत्तमच असते, असं मला कधीच वाटलेलं नाही.
>>>>>चांगला शेर बरा शेर वाईट शेर यातले त्यान काही समजत नसावे अस माझा प्रत्यय आहे
खीखीखी...खोखोखो.... शेर समजतोच असा आपला काही दावा नाही, समझने कोशीश जरुर करता हू....पण काही शेर आवडले तर आमच्यासारखी दाद कोणी देणार नाही. शेर,कविता, समजायला खूप आकलन लागते ही गोष्ट खरी आहे, तेव्हा गझल आस्वादाच्या बाबतीत माझ्या मर्यादा जरुर असतील. पण, चांगला शेर आणि वाईट शेर यातला फरक थोडाफार नक्की कळतो.
आपण सर्वांनी वेळात वेळ काढून माझ्याबद्दल चर्चा केली मनःपूर्वक आभार. लोभ आहेच तो वाढवावा.
भट साहेबांच्या एल्गार मधे प्रशंसा नावाची सुंदर गझल आहे. त्यातल्या दोन ओळी पेश करतो-
चार शब्दांनीच आले का तुझ्या डोळ्यात पाणी ?
सोड त्यांचे बोलणे तो एक वेडापीर होता.
-दिलीप बिरुटे
(वेडापीर)
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार...!