चतकोरभर तुकडा जरी...

Submitted by वैवकु on 20 June, 2013 - 04:05

ती पाहिजे आहे मला गझलेत माझ्या भाकरी
तो चंद्र पुनवेचा जणू .. चतकोरभर तुकडा जरी!

साधेसुधे जगण्यामधे आनंद मानावा खरा
मिरवायला जमते मला ही कल्पना नटमोगरी

ही चार कोसांची दुरी माझ्या तुझ्यामधली गळो
मी देवदायी वाखरी .......तू मोक्षदायी पंढरी

तू बोबड्या डोळ्यांतुनी हसलीस अन् मी जाणले ;
भेटायची गोष्टीतुनी ती हीच छोटीशी परी

जेव्हा तुला वाटेल ये ..जेव्हा तुला वाटेल जा
माझी कुठे ..आहे तुझीss ...माझ्या मनाची ओसरी

उलट्या मुळाचे , काळजाचे... पिंपळाचे झाड तू
झिडकारते आहे तुझा आधार माझी वल्लरी

तू सर्वसत्ताधीश वा काही कुणी नाहीस रे
आहेस तू जे विठ्ठला माझीच ती पैगंबरी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्या घोरणाऱ्या बंधू-भगिनींसाठी हे विडंबन-काव्य------!!

मूळ कविता ---------लाजून हसणे अन----------(कवी मंगेश पाडगावकर)

दणकून घोरणे अन इतरांस त्रास देणे
सखये/सखया तुला मिळाले हे जन्मजात लेणे !!धृ!!

झोपेत घोरता तू, दचकून जाग यावी
निद्रिस्त त्या जनांची,मग झोपमोड व्हावी
मारून चापटी ती , माझे तुला उठवणे ---------!!१!!

लावून एक सूर , तालात घोरताना
घन-गर्जना करून,ती शांती भंगताना
स्वर्गस्थ देवतांना कर जोडूनी आळवणे ---------!!२!!

डरकाळी वाघ फोडी त्याची स्मृतीच होते
पण तू न मानसी हे तव घोरणेंच होते
निर्वेध घोरताना ऐसे तुला पहाणे --------------!!३!!

साधना-------------

झिडकारते आहे तुझा आधार माझी वल्लरी<<<

मस्त शेर! खयालांमध्ये नावीन्य आणि जमीनीत मजा येत आहे. धन्यवाद व शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

धन्यवाद बेफीजी दोनही प्रतिसादांसाठी

_________________________________________

साधना झोपेत असताना हा प्रतिसाद टाकला असावात आता जाग आली असेल तर हटवा इथून (डिलीट करा )
इतरत्र योग्य विभागात प्रकाशित केलात तर मीही त्यावर तिथे येवून आवर्जून खास माझ्या शैलीतला प्रतिसाद देईन

धन्यवाद

जेव्हा तुला वाटेल ये ..जेव्हा तुला वाटेल जा
माझी कुठे ..आहे तुझीss ...माझ्या मनाची ओसरी

मनाची ओसरी .. खास आवडली

वा ! सुंदर गझल राव...

खूप आवडली..

एक शेर---

*
लावलेस इतके का,लोचनात तू काजळ !
ओल अंतरातलीच,गालावरचा ओघळ

--- अरविंद

....जेव्हा तुला वाटेल ये ..जेव्हा तुला वाटेल जा
माझी कुठे ..आहे तुझीss ...माझ्या मनाची ओसरी..... लय भारी. वैभवा... माका लय आवडली..!

वा वा! गझल फार आवडली वैवकु!

नटमोगरी, ओसरी आणि परी शेर तर क्या बात है. नटमोगरी विशेष - झणझणीत, थेट आणि पर्दाफाश शेर आहे.

>>
साधेसुधे जगण्यामधे आनंद मानावा खरा
मिरवायला जमते मला ही कल्पना नटमोगरी

तू सर्वसत्ताधीश वा काही कुणी नाहीस रे
आहेस तू जे विठ्ठला माझीच ती पैगंबरी
<<
आवडले शेर.

>>
तू बोबड्या डोळ्यांतुनी हसलीस अन् मी जाणले ;
भेटायची गोष्टीतुनी ती हीच छोटीशी परी
<<
Happy

साधेसुधे जगण्यामधे आनंद मानावा खरा
मिरवायला जमते मला ही कल्पना नटमोगरी>> खयाल तर भन्नाटच पण नटमोगरी हा शब्द विशेष आवडला..

ही चार कोसांची दुरी माझ्या तुझ्यामधली गळो
मी देवदायी वाखरी .......तू मोक्षदायी पंढरी

उलट्या मुळाचे , काळजाचे... पिंपळाचे झाड तू
झिडकारते आहे तुझा आधार माझी वल्लरी >>
सुर्रेखच! Happy

>>जेव्हा तुला वाटेल ये ..जेव्हा तुला वाटेल जा
माझी कुठे ..आहे तुझीss ...माझ्या मनाची ओसरी

उलट्या मुळाचे , काळजाचे... पिंपळाचे झाड तू
झिडकारते आहे तुझा आधार माझी वल्लरी
>>
सुंदर, वेगळे, अर्थपूर्ण खयाल, वैवकु, रंग येतो आहे..

छान.

ओसरी हा शेर आवडला. नटमोगरीही छान!

मिसरे दिलखेचक आहेत परंतु इतर शेर तितके परीणामकारक झालेले नाहीयेत असे माझे वैयक्तिक मत! काहीतरी चमत्कृतीपूर्ण आणायचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यासारखे मला वाटले.

भरपूर शुभेच्छा!

जमलिये गझल.

बोबड्या डोळ्यांतुनी" हे मात्र महाकठीण आहे पचवायला.

साधना, वृत्त हाताळणीतच कळते आपण कोण आहात ते... लगे रहो.

पाहिजे आहे मला गझलेत माझ्या भाकरी
चंद्र पुनवेचा जणू .. चतकोरभर तुकडा जरी ...?( तो, ती)