कधी तरी दु:खांनो माझेही घर टाळा
आता आला कंटाळ्याचाही कंटाळा
जळी स्थळी काष्ठी पाषाणी तुलाच बघणे
खिन्न मनाला सुन्न क्षणी हा सुचतो चाळा
एक दिवस जेव्हा सुटली नोकरी अचानक
छोट्या शिक्षा करणारी आठवली शाळा
जे म्हटले ना कळले, जे कळले ना म्हटले
नजर भिडवली नजरेला अन् हा घोटाळा ?
एकाही शेरातुन जेव्हा निघेल ज्वाला
तेव्हा माझ्या अवशेषांना खुशाल जाळा..
अर्धे खेळुन झाल्यावरती नियम बदलता
खेळातून मला ह्या देवा कृपया गाळा
एकदाच मी हवे तसे रस्त्यास वळवले
पुन्हा पुन्हा वळण्याला त्याच्या बसला आळा
शेर विठ्ठलाबद्दल होता, त्याचा नव्हता
तरी 'जितू' लोकांस दिसे माझ्यातच 'काळा'
....रसप....
१९ जून २०१३
-----------------------------------------------
अर्धे खेळुन झाल्यावरती नियम बदलता
देवा, तुमचा डाव रडीचा तुम्हीच खेळा
....रसप....
http://www.ranjeetparadkar.com/2013/06/blog-post_19.html
मतल्यातील दोन्ही मिसरे
मतल्यातील दोन्ही मिसरे स्वतन्त्ररित्या आवडले.बाकीसगल्ळीच गझल उत्तम .
कन्टाळ्याचाही आता कन्टाळा
कन्टाळ्याचाही आता कन्टाळा आला आहे.....हा बेफीन्चा मिसरा आठवला.
कन्टाळ्याचाही आता कन्टाळा आला
कन्टाळ्याचाही आता कन्टाळा आला आहे.....हा बेफीन्चा मिसरा आठवला. >>
ओह्ह !! का कुणास ठाऊक मला सुचला तेव्हाही वाचल्यासारखा वाटलाच ! बहुतेक ती गझल वाचलेली असावी.......!
धन्यवाद !
अलामत भंगली आहे ,असे
अलामत भंगली आहे ,असे वाटते
गझल आवडली ..
शाळेचा शेर विशेष!
जितू गझल खणखणीत वाजेते आहे
जितू गझल खणखणीत वाजेते आहे मजा आला
शेर खूप छानय्त मला सगळे आवडले
जे म्हटले ना कळले, जे कळले ना म्हटले<< ह्या ओळीत लयीत काहीतरी गडबड असावी म्हणताना इतर शेरातील ओळींमधून जशी लाट मनावर तयार होते तशी इथे होत नाही असे मला तरी जाणवले >>> जे म्हटले ना कळले.. कळले ते ना म्हटले <<< असे मी वाचले तर माझेमला तरी जरा बरोबर वाटते आहे
चूभूद्याघ्या!!
विठ्ठलाचा शेर छान !!
माझा एक आठवला .................
उभी हयात विठ्ठला तुझाच शेर मांडला
म्हणून उतरला असेल शायरीत काळिमा
धन्स
___________________________________
पिंपळे आपले मत योग्य असले तरी मला अनावश्यक वाटले
पुनश्च धन्स
म्हटले ते ना कळले, कळले ते ना
म्हटले ते ना कळले, कळले ते ना म्हटले - असे अधिक सुस्पष्ट व्हावे असे वाटते.
मतल्यातील अलामतीबाबत शिवम यांचे मत योग्य आहे.
गझल फार आवडली.
(अतीशहाणपणाचे वाटल्यास क्षमस्व - पण अनेक शेर वाचून मला असे वाटले की मी ही गझल साधारण अशीच लिहिली असती).
धन्यवाद!
जरा कंटाळतच लिहिल्यासारखी
जरा कंटाळतच लिहिल्यासारखी झालीय तंत्रदृष्ट्या (असं मला वाटलं), पण अर्थ पुरेसा झोंबरा अन जबरा..
'नोकरी' शेर बेफिकीर यांच्या
'नोकरी' शेर बेफिकीर यांच्या शेरांसारखा वाटला. आवडला.
इतरही अनेक शेर आवडले.
शुभेच्छा !
जे म्हटले ना कळले, जे कळले ना
जे म्हटले ना कळले, जे कळले ना म्हटले
नजर भिडवली नजरेला अन् हा घोटाळा ?
एकाही शेरातुन जेव्हा निघेल ज्वाला
तेव्हा माझ्या अवशेषांना खुशाल जाळा..>>
जबरदस्त!!
नोकरी शेर पण भिडला..
काही ठिकाणी वाचताना अडखळल्यासारखे झाले.
पण अर्थाच्या गहिरेपणामुळे अडखळण्याचा मुद्दा गौणच ठरला..
पण अनेक शेर वाचून मला असे
पण अनेक शेर वाचून मला असे वाटले की मी ही गझल साधारण अशीच लिहिली असती >>
__/\__ थँक्स !
-------------------------------------------------------------
'नोकरी' शेर बेफिकीर यांच्या शेरांसारखा वाटला. >>
खरं सांगायचं, तर लिहिताक्षणी मलाही अस्संच वाटलं होतं.
मला गझल आवडली. अर्धे खेळुन
मला गझल आवडली.
अर्धे खेळुन झाल्यावरती नियम बदलता
देवा, तुमचा डाव रडीचा तुम्हीच खेळा
हा जास्त आवडला....
बरेच कोट करता येण्यासारखे शेर. आवडलीच!
मतला फार आवडला.
मतला फार आवडला.
उत्तम गझल.
उत्तम गझल.
जे म्हटले ना कळले, जे कळले ना
जे म्हटले ना कळले, जे कळले ना म्हटले
नजर भिडवली नजरेला अन् हा घोटाळा ?
एकदाच मी हवे तसे रस्त्यास वळवले
पुन्हा पुन्हा वळण्याला त्याच्या बसला आळा >>>> हे दोन सर्वात विशेष वाटले.
म्हटले ते ना कळले, कळले ते ना
म्हटले ते ना कळले, कळले ते ना म्हटले - असे अधिक सुस्पष्ट व्हावे असे वाटत............+१००
शाळा, जाळा, खेळा.....मस्त मस्त !
छान...! मनकी बाते: काही मतं
छान...!
मनकी बाते: काही मतं आवश्यक असली तरी मला ती अनावश्यक वाटतात.
-दिलीप बिरुटे