बाहेर कोसळता पाऊस
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
7
बाहेर कोसळता पाऊस
आणि फायरप्लेस मध्ये जळणारी मंद आग
अशी ओली उबदार रात्र...
आणि तुझी साथ!
ढगांच्या आवाजाहूनही मोठी
माझ्या मनाची वाढती धडधड
तापलेले श्वास
पेटलेले स्पर्श
चहाहून जास्त वाफाळलेले तू आणि मी
पावसाच्या थेंबांसारखे
अलवार गाण्याचे सूर
तुझे माझे शब्द व्यक्त करणारे
आपल्या लयीशी होड घेणारे...
बाहेर कोसळता पाऊस
आणि आत चिंब होणारे आपण
अशी ओली उबदार रात्र
देशील?
विषय:
प्रकार:
शेअर करा
छान लिहिलंय. तुमची कविता
छान लिहिलंय.
तुमची कविता वाचून 'रुप तेरा मस्ताना' गाणं डोळ्यासमोर आलं.
लॉल माशा कविता खूपच छान आहे
लॉल माशा
कविता खूपच छान आहे रुपा
मलाही आराधनातले हेच गाणे आठवले.. आता तू नळीवर जाऊन बघतोच
माशा, बी... धन्यवाद!
माशा, बी... धन्यवाद!
र्म्द, छान आहे कविता!
र्म्द, छान आहे कविता!
धन्यवाद, फारएण्ड!
धन्यवाद, फारएण्ड!
शेवट अगदी नाट्यपूर्ण
शेवट अगदी नाट्यपूर्ण
धन्यवाद भारती!
धन्यवाद भारती!