डोळ्यात गोठलेले....

Submitted by deepak_pawar on 15 June, 2013 - 01:05

डोळ्यात गोठलेले वाहून थेंब जावे

गालावरील आसू कोणी तरी पुसावे....

ती वेस उंबर्‍याची ओलांडतो कधी मी

तेव्हा कुणीतरी बाहूंचे कुंपण करावे....

वादळ निघूनी जाता घरटे कुठे दिसेना

तेव्हा कुणीतरी मायेचे छप्पर धरावे....

जाती उडून जेव्हा या रंग जीवनाचे

वेचून या फुलांचे उधळून रंग जावे....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्या घोरणाऱ्या बंधू-भगिनींसाठी हे विडंबन-काव्य------!!

मूळ कविता ---------लाजून हसणे अन----------(कवी मंगेश पाडगावकर)

दणकून घोरणे अन इतरांस त्रास देणे
सखये/सखया तुला मिळाले हे जन्मजात लेणे !!धृ!!

झोपेत घोरता तू, दचकून जाग यावी
निद्रिस्त त्या जनांची,मग झोपमोड व्हावी
मारून चापटी ती , माझे तुला उठवणे ---------!!१!!

लावून एक सूर , तालात घोरताना
घन-गर्जना करून,ती शांती भंगताना
स्वर्गस्थ देवतांना कर जोडूनी आळवणे ---------!!२!!

डरकाळी वाघ फोडी त्याची स्मृतीच होते
पण तू न मानसी हे तव घोरणेंच होते
निर्वेध घोरताना ऐसे तुला पहाणे --------------!!३!!

साधना-------------