वाटते मजालाच तो ही,वरती आहे बैसला
पाहिले वरती कसा तो,कुठे आहे बैसला?
खेळ माझ्या मृदू मनाचा,मीच मोजून पाहिला
मि कुठे ना राहिलो,ना..देव कोठे राहिला...
आळसाची मीच माझ्या,ढाल मी केली जरी
प्रयन्तांचे वार तेथे,पडले कमी केंव्हा तरी
दु:ख आणी दुर्दैव सारे,त्यावरी मी झाकले
नशिबाने माझ्यावरी मग,पाश त्याचे टाकले...
नशिबावरी रडण्यास माझ्या,गाव सारा जमविला
लबाडिचा खेळ माझ्या,त्यांनी सुखे तो पाहिला
मी म्हणे माझ्या मनाला,आज यांना फसविले
मन ही माझे म्हणे...मग,'मीच तुजला फसविले!'...
उमगला हो 'अर्थ' मजला,नशिबाचा सारा इथे
कळले...नाही ढाल-ती,'मुखवटा' आहे तिथे
रोज रोजी मी स्वतःला,फसवू किती?हरवू किती?
आज मजला वाटते या,मुखवट्याची-ती भिती...
फेकुनी देऊन नशिबा,सत्य मी स्विकारिले
तरी माझ्या अंतरीने,सत्य ना स्विकारिले
'आहे' 'जसा' तैसाच मि ही,स्वतःला स्विकारितो.
कळले आज इतुके मलाही,म्हणून येथे थांबतो...
'आहे' 'जसा' तैसाच मि
'आहे' 'जसा' तैसाच मि ही,स्वतःला स्विकारितो.
कळले आज इतुके मलाही,म्हणून येथे थांबतो...