माझा कोंकण

Submitted by कोकण्या on 30 May, 2013 - 07:26

घरी कोकणात जात असताना सड्यावर आल्यावर पहाटे पहाटे सुमद्र किनारा आणि लाल झालेले आकाश, थोड्याच वेळात पावसाने त्या लाल रंगावर ओठलेली काळि झालर आणि बदलनारा सगळा परिसर पाहुन सुचलेले ..

माझाहि एक प्रयत्न!

माझा कोंकण

माझे सुंदर कोकण, माझे सुंदर कोकण!
दर्‍या खोर्‍यांचे आंगण, त्याला ढगांचे गोंदन!
माझे सुंदर कोकण, माझे सुंदर कोंकण!!१!!

हिरवा मावळा होउन, उभा सह्याद्रिचा कडा,
नीळ्या सागर किनारी, शांत पहुडला सडा,
सड्याच्या काळ्या तनुवरी फुलली आमराई,
सह्याद्रीच्या कुशितुनी उगवली काजुचि हिरवाई
झंजु मुंजु कातरवेळी शांत सागराचे भाळी
सुर्य नारायन करी, कुंकु बनुन वंदन!!२!!

कुंकवाच्या लालीने रंगतात धाही दीशा
हिरव्या नारळ पोफळी झाल्या सागराच्या उशा
काळ्या ढगांनी व्यापली आकाशाची तरुनाई
लाल रंगात मिसळली, काळ्या अबिराचि शाई
सुरया चंदरा सवे उन पावसाच्या शाली
सुमुद्राच्या कुशिवर, पहुडला माझा कोंकण!!३!!

-पुंडलिक सावंत (कोकण्या)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोकण्या, मेल्या हे गुण लपवंन ठेवलंलस काय??
चांगलीच जमलीहा, अगदी तुझ्या टपरीवरच्या चाय सारखी.
फकस्त काही शब्द नीट लिही म्हणजे झाला. असोच लिहितो रव. Happy

आभारी आहे भाऊ, भ्रमा, आणि शोभा.
भ्रमा खयचे शब्द नीट करुक व्हये रे, तेव सांग लगेच करुन टाकतय...

. म्या काय म्हणतय.. अशाच कोकणवर कविता लिवत जा...>>>>>>>>>>>.दगडाक १००००००००००००००००% अनुमोदन. Happy