फल ज्योतिषाला ग्राहक संरक्षण कायदा लावावा का? फल ज्योतिषाच्या नावाने फसवणूक करण्याचे प्रकार सर्रास चालू आहेत. अनेक भोळ्या भाबड्या ग्राहकांची फसवणूक होत आहे. पण फसवणूक होऊन सांगणार कोणाला जो तो आपल्या नशिबाला दोष देत बसतो.जर फलज्योतिष हे ग्राहक संरक्षण कायद्याखाली आले तर खरे ज्योतिषी हि खुश होतील आणि भोंदू ज्योतीषानाही शासन होईल. फलज्योतिषात काहीतरी तथ्य असले पाहिजे, या समजुतीमुळे मुलामुलींची लग्ने जुळवताना पत्रिका पहाण्याचा आग्रह धरला जातो. कित्येक वेळा चांगली अनुरुप स्थळे केवळ पत्रिका जुळत नाही या कारणासाठी नाकारली जातात. मुलीला मंगळ आहे म्हटल्यावर तर तिचे हाल बघायलाच नको. अशा मुलींना आणि त्यांच्या पालकांना जो मनस्ताप केवळ एका निरर्थक श्रद्धेच्या पायी लोक सोसत आहेत, . दुसरी गोष्ट म्हणजे ग्रहपीडा निवारण्यासाठी दैवी उपाय केले जातात, त्यापायी हजारो रुपयांचा चुराडा होतो.
फल ज्योतिषाला ग्राहक संरक्षण कायदा लावावा का?
Submitted by धडाकेबाज on 27 May, 2013 - 07:18
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अहो ज्योतिष हे भाकडच असते
अहो ज्योतिष हे भाकडच असते कसले वाद नि कसली चर्चा. माणसाला दहा मिनटा नंतर त्याच्या आयुष्यात काय घडणार हे माहिती नसते तर हे लोक म्हणे पुऱ्या जीवनाचे भविष्य सांगतात. भोळ्य़ा भाबड्या नव्हे मूर्ख लोकांना गंडवायचे धंदे आहेत हे.
माणसाला दहा मिनटा नंतर
माणसाला दहा मिनटा नंतर त्याच्या आयुष्यात काय घडणार हे माहिती नसते तर हे लोक म्हणे पुऱ्या जीवनाचे भविष्य सांगतात. भोळ्य़ा भाबड्या नव्हे मूर्ख लोकांना गंडवायचे धंदे आहेत हे.<<<
अन् मग त्या लालूंच्या धाग्यावर तुम्ही दिलयंत ठोकून की लोकसभेत काँग्रेसच येणार, त्याचे काय हो पगारे?
>>अन् मग त्या लालूंच्या
>>अन् मग त्या लालूंच्या धाग्यावर तुम्ही दिलयंत ठोकून की लोकसभेत काँग्रेसच येणार, त्याचे काय हो पगारे?<<
अहो तो त्यांचा अंदाज. ज्योतिषी सांगतो ते भाकित.
या ज्योतिषाच काय करायच या धाग्यावर आम्ही ज्योतिषाच भाकित वर्तवले आहे
घाटपांडे, छान विनोद
घाटपांडे, छान विनोद
त्यावरुन एक जोक आठवला. एक
त्यावरुन एक जोक आठवला. एक नाटककार पोटतिडकीने समाजातल्या ट्रॅजिडीवर नाटक लिहितात. त्याचा प्रत्यक्ष रंगमंचावर प्रयोग होतो. त्यात त्यांनाही निमंत्रण अर्थात असतेच. नाटक संपल्यावर लोक त्यांचे अभिनंदन करतातात वा! वा! काय कॉमेडी नाटक लिहिलत हो तुम्ही!
प्रकाश
प्रकाश
I rest my case
I rest my case
अहो ज्योतिषी हे भाकडच असतात
अहो ज्योतिषी हे भाकडच असतात स्वताच्या पायाखाली काय जळतय ते त्यांना माहित नसत सार लक्ष आकाशातल्या ग्रह गोलांकडे. ज्यांना ह्यांच्याकडे जावून नुकसान करून घ्यायच्य त्यांना करू द्या. मराठीत एक म्हण आहे पायावर कुऱ्हाड मारून घेणे. ज्योतिषाकडे जाने हे मात्र कुऱ्हाडी वर स्वत जावून पाय मारून घेण्यासारखे आहे.
त्यात काही चूक नाही. विज्ञानाचा जयघोष केला जातो ना, मग मग द्या की हमी ऑपरेशनच्या यश्स्वितेची असे कुणी म्हणाल्यास ते अजिबात चूक नाही. ते देऊ शकत नसतील डॉक्टर तर ज्योतिषाकडून हमी मागण्याचा कुणालाही काहीही अधिकार नाही>>>>>
गप्पिष्ठ काय पोरकट युक्तिवाद करतायत उद्या तुमचे पोट दुखत असेल तर डॉक्टरांकडून औषध मागाल का हमी ? विज्ञानाचे फायदे घ्यायचे नि त्यालाच शिव्या द्यायच्या, हमी मागायची असा तुमचा भोंगळ कारभार. डोक्यावरचे भगवे पागोटे नि भगवा चष्मा काढा मग तुम्हाला दिसेन कि जग हे किती रंगबिरंगी आहे.
डॉक्टर नि ज्योतिषाची तुलना हि काजवा नि सूर्याची तुलना ठरेल . (डॉक्टर अर्थातच सूर्य.)
परवाच आमच्या इथल्या एका
परवाच आमच्या इथल्या एका ज्योतिषी महाराजांच्या घरी चोरी झाली.
सचिन पगारे | 19 December,
सचिन पगारे | 19 December, 2013 - 20:58 नवीन
परवाच आमच्या इथल्या एका ज्योतिषी महाराजांच्या घरी चोरी झाली.
<<<
परवाच भाजपला चार राज्यात सर्वाधिक मतेही मिळाली. मायबोलीवरचे एक बिनपगारी राजकीय प्रतिनिधी जनसामान्यांना बहकवत आहेत, त्यांच्या हातात बेड्या पडायला हव्यात.
मी: काहीही करा अन माझाच धागा
मी: काहीही करा अन माझाच धागा वर आणा!
मी: माझाच ब्लाग वाचा.
मी: मी म्हणतो तेच ऐका.
मी: माझ्या पुस्तकाला कशी प्रस्तावना मिळवली ते ऐका.
आवरा!
घाटपांडे, आवरा आता स्वतःला !!
कंटाळलो तुमच्या टुरटुरीला.
छळवाद करता तुम्ही.
ते ज्योतिष नको आणि तुमचा ज्योतिष विरोधही नको!
काही चांगले वाचायला यावे तर यांची बौद्धिकं!
झाला ना कायदा?
बास मग आता!!
तुमचे म्हणणे सरकार दर्बारी पोहोचले.
सरकारने त्यावर कायदा केला. आता बास्स!!
दुसरा काही विरंगुळा शोधा आता...
(नशीब आमचे; तो *डा वलवलकर इथे नाहीये. तो नाही तरी त्याचे एजंट काही बाही चिकटवतातच म्हणा. म्हणजे सुटका नाहीच.)
येथून पुढे; लहान मुलांचे
येथून पुढे;
लहान मुलांचे दंतआरोग्य,
जुन्या , नविन गाण्यांची ओळख....,
मॅटर्निटी सुट्टीचा कालावधी,
टमाट्याच लोणचं,
बाळगुटी आणि इतर माहीती वगैरे विषयांवरही संशोधन करायला वाव आहे याची नोंद घ्यावी ही कळकळीची विनंती!
(तुम्ही लिहिलेलं लग्नावरचं पुस्तक आधीच झालेलं आहे म्हणून पुढील बाबी सुचवत आहे.)
खालील विधाने मला उद्देशून
खालील विधाने मला उद्देशून असतील तर..
>>मी: काहीही करा अन माझाच धागा वर आणा!<<
हा धागा माझा नाही
>मी: माझाच ब्लाग वाचा.<<
ही विनंती वजा आवाहन असते. सक्ति नाही.
>>मी: मी म्हणतो तेच ऐका.<<
असे मी म्हटले नाही. म्हटले असल्यास दाखवा.
>>मी: माझ्या पुस्तकाला कशी प्रस्तावना मिळवली ते ऐका.<<
बहुतेक तुम्हाला माझ्या ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातून सुसंवाद या पुस्तकाविषयी म्हणायचे असावे.जयंत नारळी करांनी या पुस्तकाचा परिचय / परिक्षण लोकसत्ता १३ एप्रिल २००३ च्या लोकरंग मधे लिहिले होते. ती म्हणजे पुस्तकाची प्रस्तावना नव्हे. पुस्तकाला प्रस्तावना नाही. मनोगत आहे.
>>आवरा!
घाटपांडे, आवरा आता स्वतःला !!
कंटाळलो तुमच्या टुरटुरीला.
छळवाद करता तुम्ही. <<
अहो जॉभा ( सदस्यत्वाचा कालावधी १२ आठवडे २ दिवस), न वाचण्याचा अथवा प्रतिक्रिया न लिहिण्याचा पर्याय हा वाचकांना खुला असतोच आपल्याला जर खरोखरच कंटाळा आला असेल तर आपण तो पर्याय वापरु शकता. मी म्हणतो तेच खरे वा तेच प्रमाण, असे मी म्हटलेलच नाही. जगात वेगवेगळी मते असू शकतात. याठिकाणी ज्योतिषाला ग्राहक संरक्षण कायदा लावण्या /न लावण्याविषयी आपण काही मत व्यक्त केली असती तर योग्य ठरले असते. मत पटली नाही तरी चर्चा होउ शकते. परंतु चर्चा होण्यासाठी व्यासपीठाची काही शिस्त बाळगली पाहिजे. आपल्या मतांचे स्वागतच आहे.
फल ज्योतिषाला ग्राहक संरक्षण
फल ज्योतिषाला ग्राहक संरक्षण कायदा लावावा का?\
ही प्रोसेस कशी असते? जर सरकारने ठरवले की असा कायदा लावाला तर ते काय मुहुर्त काढुन घेणारेत ज्योतिषांकडुन? डॉक्टरी पेशाला हा कायदा लावलेला आहे बहुतेक (मला नक्की माहित नाही, इथेच माबोवर कुठेतरी वाचलेले), जेव्ह लावला तेव्हा समस्त डॉक्टरांचे मत विचारात घेतलेले का? की मायबोलीवर धागा काढुन इथल्या तज्ज्ञांचे मत घेतलेले?
लावावासा वाटेल तेव्हा लावेलच की सरकार... काय फरक पडतोय आम जनतेला? एकुण लोकसंख्येच्या किती टक्के लोक ग्राहक संरक्षण कायद्याचा फायदा घेतात हे शोधण्याचा उद्योग कोणीतरी करायला हवा.
पगारे, तुम्ही मला पोरकट
पगारे, तुम्ही मला पोरकट युक्तीवाद करतो म्हणणे म्हणजे प्रदीप कुमारने अमिताभ बच्चन हा सुमार अभिनय करतो असे म्हणण्यासारखे आहे.
गप्पिष्ठ म्हणजे बच्चन
गप्पिष्ठ म्हणजे बच्चन ....????
नुस्तं मधलं अक्षर जोडाक्षर आहे, यापलीकडे काही जरातरी साम्य आहे का?
गप्पिष्ठ खरच अमिताभ आहेत पण
गप्पिष्ठ खरच अमिताभ आहेत
पण 'पा' मधले ...
प्रकाश घाटपांडेजी तुम्ही
प्रकाश घाटपांडेजी तुम्ही चांगले समाजकार्य करत आहात तुम्हाला शुभेच्छा ...विघ्नसंतोषी लोकांकडे लक्ष देवू नका!
परवाच भाजपला चार राज्यात
परवाच भाजपला चार राज्यात सर्वाधिक मतेही मिळाली. मायबोलीवरचे एक बिनपगारी राजकीय प्रतिनिधी जनसामान्यांना बहकवत आहेत, त्यांच्या हातात बेड्या पडायला हव्यात.>>>>>>वाट बघा !
मायबोलीवरील एक बिगर रोयल्टी गझलकार साहित्यिक अत्याचार करत आहेत त्यांनाच बेड्या घातल्या पाहिजेत्त.
असो काय्दा लावायचा का नाही ते
असो काय्दा लावायचा का नाही ते ज्योतिषी आन सर्कार पातील.
माला आणि तुम्हाला कोण विचारतंय असं पण?
तेव्हा फाल्तुक चर्चा कशाला?
परंतु चर्चा होण्यासाठी व्यासपीठाची काही शिस्त बाळगली पाहिजे. हे रोचक आहे. असे जर तुमचे मत असेल तर आधी मी, मी, मी ची आत्मस्तूती आवरा.
माझा ब्लॉग, माझा ब्लॉग, माझा ब्लॉग...
माझे पुस्तक, माझे पुस्तक , माझे पुस्तक...
जोतिष, जोतिष , जोतिष...
नारळीकर, नारळीकर, नारळीकर
हे सतत सांगत राहण्याचा दुराग्रह तुम्हीपण थांब्वा!
अति झाले आहे, म्हणून स्पष्ट सांगायची वेळ आली.
सगळ्या संस्थळांवर तीच ती पिप्पाणी पुंगवून पुंगवून कंटाळा कसा येत नाही?
मिपावर कुत्र हुंगत नाही तर मिमवर, तेथे तेच झाले की माबोवर.
ऐसीवर काही चालत नाही कारण तेथे पब्लिकला काही 'शिकवता' येत नाही.
पण टुरटूर चालूच...
आम्हाला स प श्ट कळले आहे ज्योतिष यात अर्थ नाही.
तेव्हा
धन्नुवाद!
थायंकु!
मेर्सी बोकु!
बाय अ डांकी!!! (ठळक केले आहे!)
आता बास! पुरे! थांबा!! इष्टोप!!! stop!!!! (हे ठळक केले नाही, पण समजा!)
काही चांगले लिहा!!
येथून पुढे;
लहान मुलांचे दंतआरोग्य,
जुन्या , नविन गाण्यांची ओळख....,
मॅटर्निटी सुट्टीचा कालावधी,
टमाट्याच लोणचं,
बाळगुटी आणि इतर माहीती वगैरे विषयांवरही संशोधन करायला वाव आहे याची नोंद घ्यावी ही कळकळीची विनंती!
(तुम्ही लिहिलेलं लग्नावरचं पुस्तक आधीच झालेलं आहे म्हणून पुढील बाबी सुचवत आहे.)
याला इग्नोरास्त्र का मारले?
विषयांवरही संशोधन करायला वाव आहे याचीही नोंद घ्यावी ही परत विनंती!
Pages