फल ज्योतिषाला ग्राहक संरक्षण कायदा लावावा का? फल ज्योतिषाच्या नावाने फसवणूक करण्याचे प्रकार सर्रास चालू आहेत. अनेक भोळ्या भाबड्या ग्राहकांची फसवणूक होत आहे. पण फसवणूक होऊन सांगणार कोणाला जो तो आपल्या नशिबाला दोष देत बसतो.जर फलज्योतिष हे ग्राहक संरक्षण कायद्याखाली आले तर खरे ज्योतिषी हि खुश होतील आणि भोंदू ज्योतीषानाही शासन होईल. फलज्योतिषात काहीतरी तथ्य असले पाहिजे, या समजुतीमुळे मुलामुलींची लग्ने जुळवताना पत्रिका पहाण्याचा आग्रह धरला जातो. कित्येक वेळा चांगली अनुरुप स्थळे केवळ पत्रिका जुळत नाही या कारणासाठी नाकारली जातात. मुलीला मंगळ आहे म्हटल्यावर तर तिचे हाल बघायलाच नको. अशा मुलींना आणि त्यांच्या पालकांना जो मनस्ताप केवळ एका निरर्थक श्रद्धेच्या पायी लोक सोसत आहेत, . दुसरी गोष्ट म्हणजे ग्रहपीडा निवारण्यासाठी दैवी उपाय केले जातात, त्यापायी हजारो रुपयांचा चुराडा होतो.
फल ज्योतिषाला ग्राहक संरक्षण कायदा लावावा का?
Submitted by धडाकेबाज on 27 May, 2013 - 07:18
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>> आर्थिक विषयावर प्रवचन
>>>> आर्थिक विषयावर प्रवचन देण्यार्यानासुद्धा ज्योतिषी म्हणावं का <<<< म्हणा की!
तस तर सट्टामार्केट अर्थात शेअरबाजारावरील भाष्याकारान्नाही म्हणाव, आख्खा फायनान्शिअल एक्स्प्रेस्/इकॉनॉमिक्स टाईम्स इत्यादी वृत्तपत्रे त्यावरच जगताहेत!
गामा, चान्गली पोस्ट!
मृत्यू ठरलेला असतो असे
मृत्यू ठरलेला असतो असे मानणारे ज्योतिषी आपल्या घरच्यांना व स्वत:लाही औषधोपचार का करतात? ते डॉक्टरांची मदत का घेतात? जर मृत्यू ठरलेल्या क्षणीच होणार असेल तर डॉक्टरांची मदत घेऊन स्वत:चा व स्वत:च्या नातेवाईकांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करून पैसा फुकट घालविणे मूर्खपणाचे नव्हे का?इति धडकेबाज्बुवा
धडाकेबाज्बुवांचा हा मुद्दा आपल्याला पटला.....आमच्या इथे एक ज्योतिषी राहतात भास्करबुवा जरा तब्बेत बिघडली कि सारखे डॉक्टरकडे पळतात.
पूर्वी फलज्योतिष आणि
पूर्वी फलज्योतिष आणि खगोलशास्त्र एकत्र होते. ग्रीकांपासून, आर्यभट्टापासून ते गॅलिलिओ-कोपर्निकसपर्यंत अनेक सुप्रसिद्ध खगोलशास्त्री ज्योतिषीही होते, पण एकोणिसाव्या शतकात खगोलशास्त्र व फलज्योतिष वेगळे झाले, ते का? खगोलशास्त्र ही विज्ञानाची व वैज्ञानिक अभ्यासाची महत्त्वाची शाखा झाली. त्याचा अभ्यास जगभराच्या सगळय़ा विद्यापीठांमधून होतो; परंतु फलज्योतिष मात्र विज्ञानाने फेकून दिले. असे का?
ज्योतिषी जी तुमच्या कुंडलीत आकडेमोड करतो त्याला काही अर्थ नाही. आकडेमोड कशी असावी त्याचे उदाहरण.
खगोलशास्त्रज्ञ हैलेने १७०५ मध्ये भाकीत केले होते की १७५८ मध्ये धुमकेतू दिसेल. हे भाकित त्याने न्यूटनचे गुरूत्वाकर्षणाचे नियम व केपलरचे भ्रमणाचे नियम यांची सांगड घालून केले होते. या धुमकेतूची भ्रमणकक्षा, प्रकाशक्षमता किती असेल हे ही त्याने तपशीलवार लिहून ठेवले. हॅलेच्या मृत्यूनंतर एक वर्षाने म्हणजे १७५८ साली हॅलेने वर्णन केल्याप्रमाणे धुमकेतू दिसला. त्याला हॅलेचा धुमकेतू म्हणू लागले. इतके तंतोतंत, काटेकोर नेमके अचूक भाकित ज्योतिषी कधी करू शकेल का?.
कायदा लावताय ना?
कायदा लावताय ना?
1975 साली जगातील 186
1975 साली जगातील 186 वैज्ञानिकांनी एकत्र येऊन एक पत्रक काढलं आहे. त्यावर 19 नोबेल प्राईज विजेत्या शास्त्रज्ञांच्या सह्या आहेत. त्यातील एक भारतीय नोबेल प्राप्त शास्त्रज्ञ सी. चंद्रशेखर आहेत. सारे शास्त्रज्ञ खगोलशास्त्रज्ञ, अँस्ट्रोफिजिसिस्ट आणि इतर क्षेत्रांतील मोठे वैज्ञानिक आहेत. ते म्हणतात, ''आम्ही लोकांना सावध करू इच्छितो. ज्योतिषशास्त्रातील गृहीतकांना कोणताही पाया नाही, आधार नाही. दूर अंतरावरील आकाशस्थ ग्रहगोल ही विशिष्ट प्रकारची कृती करण्याकरिता काही दिवसांना किंवा काही कालावधीला शुभ वा अशुभ बनवितात किंवा एखादी व्यक्ती ज्या राशीत जन्माला येते ती राशी त्या माणसाची योग्यता किंवा अयोग्यता निर्धारित करते, हे मुळीच सत्य नाही. भविष्य हे आपल्यावर अवलंबून असतं; ग्रह, तार्यांवर नव्हे.
धडाकेबाज, १. >> पूर्वी
धडाकेबाज,
१.
>> पूर्वी फलज्योतिष आणि खगोलशास्त्र एकत्र होते.
साफ चूक. फलज्योतिष हा अर्वाचीन शब्द आहे. प्रकाश घाटपांड्यांच्या लेखात पहा :
>> पहिला सिद्धांत-स्कंध पूर्णपणे खगोलगणिताशी संबंधित होता. दुसरा संहिता-स्कंध हा ऋतूमानानुसार
>> नागरी जीवनातील कृत्ये व कर्तव्ये केव्हा म्हणजे कुठल्या नक्षत्रावर व मुहूर्तावर करावीत हे सांगणारा होता.
>> तिसरा होरा-स्कंध हा व्यक्तीच्या आयुष्यातील घटना वर्तवणारा होता, तो म्हणजेच आजचे फलज्योतिष.
उगीच थापा नका मारू! नाहीतर तुमच्यांत आणि कुडमुड्या ज्योतिषांच्यात फरक तो काय राहिला!
२.
>> ज्योतिषी जी तुमच्या कुंडलीत आकडेमोड करतो त्याला काही अर्थ नाही. आकडेमोड कशी असावी
>> त्याचे उदाहरण.
>> खगोलशास्त्रज्ञ हैलेने १७०५ मध्ये भाकीत केले होते की १७५८ मध्ये धुमकेतू दिसेल. ....
परत तुम्ही खगोलशास्त्र आणि फलज्योतिषाची सरमिसळ करताय! कशाबद्दल बोलायचंय ते नीटपणे ठरवा एकदा.
आ.न.,
-गा.पै.
धडाकेबाज, १. >> दूर अंतरावरील
धडाकेबाज,
१.
>> दूर अंतरावरील आकाशस्थ ग्रहगोल ही विशिष्ट प्रकारची कृती करण्याकरिता काही दिवसांना किंवा
>> काही कालावधीला शुभ वा अशुभ बनवितात
चंद्राचा पिकांवर परिणाम होतो. जर्मनीत बायोडायनॅमिक पिके घेतली जातात. ती चंद्रकलेनुसार पेरतात. अधिक माहितीसाठी : http://en.wikipedia.org/wiki/Biodynamic_agriculture
२.
>> किंवा एखादी व्यक्ती ज्या राशीत जन्माला येते ती राशी त्या माणसाची योग्यता किंवा अयोग्यता
>> निर्धारित करते,
ज्योतिषाच्या कुठल्या संहितेत हा दावा केला आहे?
आ.न.,
-गा.पै.
धडाकेबाज, >> मृत्यू ठरलेला
धडाकेबाज,
>> मृत्यू ठरलेला असतो असे मानणारे ज्योतिषी आपल्या घरच्यांना व स्वत:लाही औषधोपचार का करतात?
>> ते डॉक्टरांची मदत का घेतात? जर मृत्यू ठरलेल्या क्षणीच होणार असेल तर डॉक्टरांची मदत घेऊन स्वत:चा
>> व स्वत:च्या नातेवाईकांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करून पैसा फुकट घालविणे मूर्खपणाचे नव्हे का?
एकदा मेल्यावर पैशाचा काय उपयोग?
तसंही पाहता मृत्यू सगळ्यांना येणारच आहे. मग तुम्ही कशास अन्नभक्षण करता बरे? खाणं थांबवून अंतिम मुक्कामी थेट का बरं पोहोचत नाही तुम्ही? नाहीतरी जगाची लोकसंख्या वाढली आहे. तुमचं खाणारं एक तोंड कमी झाल्याने जगावर उपकारही होतील.
आ.न.,
-गा.पै.
जर मृत्यू ठरलेल्या क्षणीच
जर मृत्यू ठरलेल्या क्षणीच होणार असेल तर डॉक्टरांची मदत घेऊन स्वत:चा
>> व स्वत:च्या नातेवाईकांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करून पैसा फुकट घालविणे मूर्खपणाचे नव्हे का?
----- सामाजिक बान्धिलकीच्या कर्तव्यभावनेतुन डॉक्टर समुदायाला आर्थिक मदतीचा हात देत असावेत :स्मित:.
त्या Biodynamic agriculture
त्या Biodynamic agriculture च्या पानावर " Biodynamic agriculture has been criticized as pseudoscience by scholars. " हे वाक्य पाहून मी वारलो. म्हणजे अमुक गोष्ट वैज्ञानिक आहे ह्या तुमच्या दाव्याला पुष्टी देण्यासाठी तुम्हीच जो दुवा दिलात त्याच दुव्यावर पुष्टीचीच गोष्ट अवैज्ञानिक असल्याचे वाक्य बघून ' उंदराला उंदीर साक्ष ' म्हणणे जास्त योग्य की ' स्वतःच्या पायावर कुर्हाड ' ते मला माहीत नाही. अशीही एक गोष्ट जगात अस्तित्वात आहे हे लक्षात आणून दिल्याबद्दल आभार.
>>>> उगीच थापा नका मारू!
>>>> उगीच थापा नका मारू! नाहीतर तुमच्यांत आणि कुडमुड्या ज्योतिषांच्यात फरक तो काय राहिला! <<<<

गामा, छान उत्तरे, धन्यवाद.
चंद्राचा पिकांवर परिणाम होतो.
चंद्राचा पिकांवर परिणाम होतो. जर्मनीत बायोडायनॅमिक पिके घेतली जातात. ती चंद्रकलेनुसार पेरतात. >>
याचा व्यक्तीच्या भविश्याशी काय संबंध. त्यांनी काही प्रयोग केले असतील तर ते वैज्ञानिक दृष्टीकोण ठेवूनच केले असतील ना.
१. ज्योतिषशास्त्र म्हणजे
१. ज्योतिषशास्त्र म्हणजे ज्योतींचे शास्त्र …. हे खगोलशास्त्राचे नाव आहे … ते उचलण्याचा अधिकार फल-ज्योतिषी लोकांना कोणी दिला ? संस्कृत शिकलेल्यांनी तरी अशी गल्लत करणे बरोबर नव्हे नाही का ?
२. जे देव मानतात …. विश्वाचे नियंत्रण करणाऱ्या चांगल्या शक्तीचे मनापासून पूजन करतात त्यांना प्रारब्ध/ नियती/ ग्रहांचे कोप यांची भीती का वाटावी?
३. कोणतेही शास्त्र सिद्धांताला निर्विवाद पुष्टी मिळेपर्यंत त्याचा व्यावहारिक वापर करण्याची परवानगी देत नाही … तुम्हांला घाई का ?
४. ज्योतिषी कोणत्याही प्रकारचे लिखित दस्तऐवज जपून ठेवत नाहीत …. भाकिते रेकॉर्ड केली जात नाहीत, त्यांच्या प्रती दिल्या जात नाहीत असे का ?
५. आपल्या आयुष्यातील हळुवार गोष्टी ज्योतिष्याकडे उघड केल्या जातात … ताण-तणाव असतात … त्यांची काळजी घेऊन भाकिते द्यायची असतील तर मानसशास्त्राचा सखोल अभ्यास हवा …. तो न करता केस हातात घेणे म्हणजे फक्त पुस्तकात वाचून लोकांवर वैद्यकीय उपचार करण्याइतके बेजबाबदार नव्हे का ?
>>>> ३. कोणतेही शास्त्र
>>>> ३. कोणतेही शास्त्र सिद्धांताला निर्विवाद पुष्टी मिळेपर्यंत त्याचा व्यावहारिक वापर करण्याची परवानगी देत नाही … तुम्हांला घाई का ? <<<<<
अहो आम्हाला कस्ली आलीये घाई? हे शास्त्र तर हजारो वर्षे पुरातन आहे. तुम्ही असे का करीत नाही? तुमच्या विज्ञानाला मदतीला घेऊन टाईममशिन बनवून हजारोवर्षे भूतकाळात जाउन त्यावेळेस ज्यान्नी हे शास्त्र रचले, त्यान्नाच का हा प्रश्न विचारत नाही?
>>>>> ५. आपल्या आयुष्यातील हळुवार गोष्टी ज्योतिष्याकडे उघड केल्या जातात … ताण-तणाव असतात … त्यांची काळजी घेऊन भाकिते द्यायची असतील तर मानसशास्त्राचा सखोल अभ्यास हवा …. तो न करता केस हातात घेणे म्हणजे फक्त पुस्तकात वाचून लोकांवर वैद्यकीय उपचार करण्याइतके बेजबाबदार नव्हे का ? <<<<<
तस असेल तर इथ काय करताय? डीवाय किन्वा पतन्गरावान्ना भेटा! 
ज्योतिषीच कशाला? पोरंपोरी आयशीबापाककडे आपले प्रश्न घेऊन जातात, गुर्जीन्कडे घेऊन जातात, प्रियकर प्रेयसीकडे, अन प्रेयसी प्रियकराकडे, नवरा बायकोकडे अन बायको नवर्याकडे प्रश्न घेऊन जातात, अन आयशीबाप्/गुर्जी /प्रियकर वा प्रेयसी/नवरा वा बायको वगैरे प्रश्नान्ना उत्तरे देतात ते सगळे मानसशास्त्राचा सखोल अभ्यास केलेलेच अस्तात असे वाटते की काय तुम्हाला?
काय राव, मानसशास्त्र घुसवुन इन्जिनिअरिन्ग/डॉक्टरी सारखा मानसशास्त्राच्या शिक्षणाचा धन्दा देखिल उघडायचा आहे की काय तुम्हाला?
>>>> ४. ज्योतिषी कोणत्याही
>>>> ४. ज्योतिषी कोणत्याही प्रकारचे लिखित दस्तऐवज जपून ठेवत नाहीत …. भाकिते रेकॉर्ड केली जात नाहीत, त्यांच्या प्रती दिल्या जात नाहीत असे का ? <<<<<
लोकान्च्या खाजगी बाबी ज्या त्यान्नी विश्वासाने सान्गितलेल्या असतात/उघड केलेल्या असतात, त्या बाकि जगास माहिती होण्याकरता/उघड होण्याकरता लिहून ठेवायची पद्धत ज्योतिषात नाही! तसे केले तर तो विश्वासघात ठरतो.
१. आकाशस्थ ग्रह-तारे आपल्या
१. आकाशस्थ ग्रह-तारे आपल्या प्रारब्धावर परिणाम करतात की त्यांचे स्थान आपल्या प्रारब्धाची दिशा दाखविते ?
२. जर ते दिशादर्शक आहेत तर त्यांची पूजा-अर्चा करून प्रारब्ध कसे बदलणार ?
३. जर त्यांचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होतो … तर त्यामागील कार्य-कारणभाव स्पष्ट करा ..कोणते प्रयोग करून ही अनुमाने काढली गेली ?
४. त्यांच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होतो तर पृथ्वीसारखे आपल्या जवळचे प्रचंड वस्तुमान पत्रिकेत का नाही ?
५. मंगळ आणि गुरुच्या मधील उपग्रहांचा पट्टा का धरला जात नाही ? ज्यामध्ये सेरेस सारखे हजार किमी व्यासाचे प्रचंड गोल आहेत
६. शनीला टायटन आणि गुरूला गनिमिड नामक चंद्र आहेत ते बुधापेक्षा मोठे आहेत … शिवाय प्रत्येकी 60 चंद्र आहेत … त्यांच्या वस्तुमानाचे काय?
७. जर गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होतो तर राहू-केतू मुळात नाहीतच …. ते ग्रहणात भासणारे भासमान बिंदू आहेत … मग वस्तुमान नसताना गुरुत्व कोठून येणार ?
८. अवकाशातील या ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो असे आपले गृहीतक आहे … पण मुळात पत्रिकेतील त्यांचे स्थान हे खरे स्थान नाहीच …. तो आपल्या डोळ्यांना होणारा भास आहे हे आपण शोधून काढले आहे …. मग खऱ्या स्थानाप्रमाणे बदल कधी करणार ?
९. जग सपाट आहे पासून …. सूर्य-केंद्रित विश्व … नंतर आकाशगंगा अशा नवनवीन गोष्टी समजत गेल्या पण पत्रिकेत उजळणी का केली नाही ….
१०. अल्बर्ट आईन्स्टाईन ने सापेक्षतावाद सिद्धांत मांडला …त्यानंतर खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्रीय धारणेत क्रांतिकारी बदल झाले …. न्यूटनसारख्या विख्यात वैज्ञानिकाचे mechanics सुद्धा या बदलातून सुटले नाही …. मग फल-ज्योतिषात बदल का झाले नाहीत … सोपे करून सांगायचे तर … वेळ, वस्तुमान आणि वेग या तिन्हींच्या अभ्यासात सापेक्षतावादाने आमूलाग्र बदल आणले …. तरीही आमच्या पत्रिका आणि वेळेचे गणित तसेच !!!! अणुविज्ञान आणि लघुकणांचा अभ्यास असो किंवा खगोल शास्त्रातील कृष्णविवारांसारखे शोध असोत … ते लागले कारण भौतिकशास्त्री न्यूटनच बरोबर असा आंधळा आग्रह धरून तिथेच थांबले नाहीत
सूनटून्या, >> याचा
सूनटून्या,
>> याचा व्यक्तीच्या भविश्याशी काय संबंध.
नाहीच्चे मुळी. पण धडाकेबाज यांनी इथे एक वाक्य उद्धृत केलं होतं. त्यानुसार दूरस्थ ग्रहगोल पृथ्वीवरील कार्यास शुभाशुभ बनवत नाहीत.
या वाक्याच्या खंडनार्थ बायोडायनॅमिक पिकांचं उदाहरण दिलं आहे. या मतानुसार पेरणी आणि इतर कृषिकर्मे चंद्राच्या कलांनुसार करावीत. मूळ उतार्यात more favourable असा उल्लेख आहे. मूळ उतारा : http://goo.gl/Bg5Zu
दूरस्थ ग्रहगोलाचा (इथे चंद्राचा) पृथ्वीवरील सजीवावर कारक वा सूचक परिणाम होतो ही बाब स्पष्ट करण्यासाठी हे उदाहरण दिलं आहे. तसाच परिणाम फलज्योतिषास अपेक्षित आहे.
आ.न.,
-गा.पै.
झकास धडाकेबाज. जबरी अभ्यासू
झकास धडाकेबाज. जबरी अभ्यासू युक्तिवाद.
सूनटून्या, >> याचा
सूनटून्या,
>> याचा व्यक्तीच्या भविश्याशी काय संबंध.
नाहीच्चे मुळी. पण धडाकेबाज यांनी इथे एक वाक्य उद्धृत केलं होतं. त्यानुसार दूरस्थ ग्रहगोल पृथ्वीवरील कार्यास शुभाशुभ बनवत नाहीत.>>>>> गामाजी भर्मिष्ट झालेल्या पहिलवानासारखे वागु नका. आधी माझा प्रतिसाद नीट वाचा.
1975 साली जगातील 186 वैज्ञानिकांनी एकत्र येऊन एक पत्रक काढलं आहे. त्यावर 19 नोबेल प्राईज विजेत्या शास्त्रज्ञांच्या सह्या आहेत. त्यातील एक भारतीय नोबेल प्राप्त शास्त्रज्ञ सी. चंद्रशेखर आहेत. सारे शास्त्रज्ञ खगोलशास्त्रज्ञ, अँस्ट्रोफिजिसिस्ट आणि इतर क्षेत्रांतील मोठे वैज्ञानिक आहेत. ते असे म्हणतात मी नाही. प्रतिसाद देण्यापूर्वी गुड्ग्याचा वापर करा.
धडाकेबाज, >> गामाजी भर्मिष्ट
धडाकेबाज,
>> गामाजी भर्मिष्ट झालेल्या पहिलवानासारखे वागु नका. आधी माझा प्रतिसाद नीट वाचा.
>> 1975 साली जगातील 186 वैज्ञानिकांनी एकत्र येऊन एक पत्रक काढलं आहे. त्यावर 19 नोबेल प्राईज
>> विजेत्या शास्त्रज्ञांच्या सह्या आहेत. त्यातील एक भारतीय नोबेल प्राप्त शास्त्रज्ञ सी. चंद्रशेखर आहेत. सारे
>> शास्त्रज्ञ खगोलशास्त्रज्ञ, अँस्ट्रोफिजिसिस्ट आणि इतर क्षेत्रांतील मोठे वैज्ञानिक आहेत. ते असे म्हणतात
>> मी नाही. प्रतिसाद देण्यापूर्वी गुड्ग्याचा वापर करा.
तुम्ही दुसर्यांचं म्हणणं उद्धृत केलंत तरी तुम्हाला त्याची जबाबदारी घ्यायची नाहीये. ठीकाय! मी माझा गुढघा वापरायचा प्रयत्न करतो. ते मूळ परिपत्रक (इंग्रजी दुवा) इथे आहे : http://goo.gl/Bg5Zu
माझं मत खाली नोंदवतो.
१.
>> Scientists in a variety of fields have become concerned about the increased
>> acceptance of astrology in many parts of the world.
हे वाक्य इनोसंट पोपने काढलेल्या इन्क्विझिशनच्या फर्मानासारखं वाटतं. त्या फर्मानाची सुरुवात बघा :
‘It has indeed come to our ears, not without afflicting us with bitter sorrow, that in…’ – and now comes a long list of countries and counties – ‘many persons of both sexes, unmindful of their own salvation have strayed from the catholic faith and have abandoned themselves to devils…’
दोन्ही मसुद्यांतील साम्य लक्षणीय आहे.
२.
>> Those who wish to believe in astrology should realize that there is no scientific
>> foundation for its tenets.
हे tenets काय आहेत त्याबद्दल या परिपत्रकात काहीही भाष्य नाही. नुसत्या घोषणा करून काय साध्य होणार!
३.
>> In ancient times people believed in the predictions and advice of astrologers
>> because astrology was part and parcel of their magical world view.
पूर्वी लोकं काय म्हणत होते याचा आजच्या धारणांशी काय संबंध? त्यापेक्षा फलज्योतिषाच्या धारणा (tenets) लिहून ते खोडून काढायचे होते.
४.
>> They looked upon celestial objects as abodes or omens of the gods and, thus, intimately
>> connected with events here on earth; they had no concept of the vast distances from the
>> earth to the planets and stars.
दूरस्थ ज्योतींचे बल अंतराच्या व्यस्त प्रमाणात असते हे गृहीतक कितपत सत्य मानावे? जिथे पुंजगुंताडा (quantum entanglement) दिसतो तिथे गुंताड्यातील घटकांमधले अंतर कितीही असू शकते.
५.
>> It is simply a mistake to imagine that the forces exerted by stars and planets at the
>> moment of birth can in any way shape our futures.
हे कारक बळ नसून सूचक माहिती असू शकते.
६.
>> Neither is it true that the position of distant heavenly bodies make certain days or periods
>> more favorable to particular kinds of action, or that the sign under which one was born
>> determines one's compatibility or incompatibility with other people.
परत एकदा कारक आणि सूचक यांची सरमिसळ झाली आहे. प्रयोग करून तपासायला काहीच हरकत नाही. मात्र असा काही अभ्यास करून मत मांडण्याऐवजी केवळ विधान केलेलं दिसतंय.
७.
>> Why do people believe in astrology? In these uncertain times many long for the comfort
>> of having guidance in making decisions. They would like to believe in a destiny
>> predetermined by astral forces beyond their control. However, we must all face the world,
>> and we must realize that our futures lie in ourselves, and not in the stars.
हे लोकांना ठरवू द्या. तोवर विरोधकांनी फलज्योतिषाच्या धारणा खर्या किंवा खोट्या सिद्ध करणारे प्रयोग शोधून काढावेत.
८.
>> We are especially disturbed by the continued uncritical dissemination of astrological
>> charts, forecasts, and horoscopes by the media and by otherwise reputable newspapers,
>> magazines, and book publishers.
अगदी बरोबर. म्हणूनच फलज्योतिषाची कसून तपासणी केली पाहिजे. त्याकरिता दोन्ही बाजूंचं एकमत होईल असे प्रयोग निर्माण करायला हवेत. ते कुठे झाल्याचं दिसंत नाही.
असो.
धडाकेबाज, तुमचे पूर्वीचे युक्तिवाद कशावर बेतले आहेत ते कळलं. सरळ या परिपत्रकाचा संदर्भ द्यायचा होता की राव!
आ.ण.,
-गा.पै.
लिंबुटिंबु, http://articles.t
लिंबुटिंबु,
http://articles.timesofindia.indiatimes.com/2011-02-03/india/28356472_1_...
http://web.archive.org/web/20110512154221/http://www.education.nic.in/ci...
येथे दिलेली माहिती खरी असेल, तर मग तुम्हाला जे हवंय ते अस्तित्वात आहेच की!
गामा
गामा पैलवान,
http://www.openthemagazine.com/article/living/the-scientific-case-agains...
येथे दिलेल्या प्रयोगांबद्दल तुमचे काय म्हणणे आहे?
सध्या घाटपांडे सरांची दिलेली
सध्या घाटपांडे सरांची दिलेली लिंक वाचत आहे(((ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग १ ) १] कुंडली , पंचांग, राशीनक्षत्रे))) त्यातला हा मजेदार किस्सा.
पं महादेवशास्त्री जोशी यांनी त्यांच्या 'आत्मपुराण` पुस्तकात सांगितलेला एक मजेदार किस्सा विचार करायला लावणारा आहे. गुरु-शिष्य परंपरेतून शिकलेल्या महादेवशास्त्रींनी पणजीत दारावर पाटी लावून भविष्य सांगणे चालू केले. तिथल्या लोकांचे प्रश्न काय असणार तर आमची गाय हरवली आहे, ती केव्हा सापडेल ? बाहेरगावी गेलेला पाहुणा कधी परत येईल? असले प्रश्न. महादेवशास्त्री मारे प्रश्नकुंडली मांडून उत्तरे देत. पण गंमत काय व्हायची की गाय दोन दिवसांनी सापडेल असे सांगावे तर ती संध्याकाळीच गोठयात हजर व्हायची! पाहुणा पंधरा दिवसानी येईल असे सांगावे तर तो दुसऱ्याच दिवशी टपकायचा! त्यांची भविष्यवाणी खरी ठरेना. तेव्हा त्यांनी त्याच गावातील एका ज्येष्ठ ज्योतिषाचे शिष्यत्व पत्करले. मग त्यांच्या असं लक्षात आलं की हे महाशय पृच्छकालाच बोलायला लावीत. त्याच्याच कडून इतिहास-वर्तमान वदवून घेत. 'आशां कालवती कुर्यात्।` व 'कालं विघ्नेन योजयेत्।` अशा द्विसूत्रीचा वापर करून जातकाला संदिग्ध भाषेत भविष्य सांगत. ही त्यांची पद्धत पाहून, तिच्यात जातकशास्त्र कुठ आलं अशी भाबडी शंका महादेवशास्त्रींनी विचारली. '' जातकशास्त्र? तुम्ही ग्रंथाचे आधारे भविष्य सांगायला गेलात की मेलात. इथं शब्दजंजाळ कामाला येतं. समोरच्या माणसाचं सूक्ष्म निरीक्षण करून भविष्य सांगायचं ते बरं असंच सांगायचं अन् त्याला आशेच्या घोडयावर बसवून पाठवून द्यायचं. तुमच वाक्चातुर्य जेवढं प्रभावी तेवढं तुमचं भविष्य बरोबर........`` शेवटी महादेवशास्त्रींनी विचार केला. किती दिवस मी स्वत:ला व लोकांना फसवत राहू? त्यांनी आपलं चंबू गबाळ आवरलं व पणजीहून आंबेडयाला परत आले.
>>>> धडाकेबाज, तुमचे पूर्वीचे
>>>> धडाकेबाज, तुमचे पूर्वीचे युक्तिवाद कशावर बेतले आहेत ते कळलं. सरळ या परिपत्रकाचा संदर्भ द्यायचा होता की राव! <<<<

गामाजी, अचूक! खूपच अभ्यास करता राव तुम्ही!
भास्कराचार्य, वेळ मिळताच त्या लिन्का अन (मला काय हवे होते याचा) संदर्भ तपासतो, मग सान्गतो.
आपली मते मांडण्यापूर्वी इथे
आपली मते मांडण्यापूर्वी इथे किती लोकांनी ज्योतिष्याचा अभ्यास केला आहे? विशेषतः ज्यांना ज्योतिष आणि ज्योतिषी या विषयी खूपच शंका आहेत. कारण ज्याविषयी आपला अभ्यास नसेल तिथे माणसाने कसे काय मत बनवावे? भोंदू लोक मग ते doctor, ज्योतिषी असोत ती चुकीच सांगणार मग त्यांच्या वरून कस ठरवणार शास्त्र खर की खोट?
http://web.archive.org/web/20
http://web.archive.org/web/20110512154221/http://www.education.nic.in/ci...
भास्कराचार्य, येथे दिलेली माहिति वाचून अगदी कसे "भरुन" आले, मात्र भारतातल्या किती युनिव्हर्सिटीज मधे या शिक्षणाची सोय उपलब्ध करुन दिली आहे याचाही शोध याच निमित्ताने घ्यावा लागेल. कोणकोणत्या युनिव्हर्सिटीजनी हे शिक्षण देण्याचे निश्चित करताच त्यान्ना कसा कसा कोणी किती विरोध करुन ते ते प्रयत्न हाणून पाडले हा शोध घेणे देखिल उचित ठरेल.
१. आकाशस्थ ग्रह-तारे आपल्या
१. आकाशस्थ ग्रह-तारे आपल्या प्रारब्धावर परिणाम करतात की त्यांचे स्थान आपल्या प्रारब्धाची दिशा दाखविते ?
२. जर ते दिशादर्शक आहेत तर त्यांची पूजा-अर्चा करून प्रारब्ध कसे बदलणार ?
३. जर त्यांचा आपल्या जीवनावर थेट परिणाम होतो … तर त्यामागील कार्य-कारणभाव स्पष्ट करा ..कोणते प्रयोग करून ही अनुमाने काढली गेली ?
४. त्यांच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होतो तर पृथ्वीसारखे आपल्या जवळचे प्रचंड वस्तुमान पत्रिकेत का नाही ?
५. मंगळ आणि गुरुच्या मधील उपग्रहांचा पट्टा का धरला जात नाही ? ज्यामध्ये सेरेस सारखे हजार किमी व्यासाचे प्रचंड गोल आहेत
६. शनीला टायटन आणि गुरूला गनिमिड नामक चंद्र आहेत ते बुधापेक्षा मोठे आहेत … शिवाय प्रत्येकी 60 चंद्र आहेत … त्यांच्या वस्तुमानाचे काय?
७. जर गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होतो तर राहू-केतू मुळात नाहीतच …. ते ग्रहणात भासणारे भासमान बिंदू आहेत … मग वस्तुमान नसताना गुरुत्व कोठून येणार ?
८. अवकाशातील या ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो असे आपले गृहीतक आहे … पण मुळात पत्रिकेतील त्यांचे स्थान हे खरे स्थान नाहीच …. तो आपल्या डोळ्यांना होणारा भास आहे हे आपण शोधून काढले आहे …. मग खऱ्या स्थानाप्रमाणे बदल कधी करणार ?
९. जग सपाट आहे पासून …. सूर्य-केंद्रित विश्व … नंतर आकाशगंगा अशा नवनवीन गोष्टी समजत गेल्या पण पत्रिकेत उजळणी का केली नाही ….
१०. अल्बर्ट आईन्स्टाईन ने सापेक्षतावाद सिद्धांत मांडला …त्यानंतर खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्रीय धारणेत क्रांतिकारी बदल झाले …. न्यूटनसारख्या विख्यात वैज्ञानिकाचे mechanics सुद्धा या बदलातून सुटले नाही …. मग फल-ज्योतिषात बदल का झाले नाहीत … सोपे करून सांगायचे तर … वेळ, वस्तुमान आणि वेग या तिन्हींच्या अभ्यासात सापेक्षतावादाने आमूलाग्र बदल आणले …. तरीही आमच्या पत्रिका आणि वेळेचे गणित तसेच !!!! अणुविज्ञान आणि लघुकणांचा अभ्यास असो किंवा खगोल शास्त्रातील कृष्णविवारांसारखे शोध असोत … ते लागले कारण भौतिकशास्त्री न्यूटनच बरोबर असा आंधळा आग्रह धरून तिथेच थांबले नाहीत
या प्रश्नांची उत्तरे एकही प्रकांड पंडिताने दिलेली नाहीत
फलज्योतिषावर पोट भरून लोकांना गंडवनाऱ्या ज्योतिषांनी तरी याची उत्तरे द्यावीत
आजच्या महाराष्ट्र टाईम्स मधे
आजच्या महाराष्ट्र टाईम्स मधे वाचकांच्या पत्रात प्रा. य. ना. वालावलकर यांचे खालील पत्र छापुन आले आहे.
ज्योतिषाचे हमीपत्र असे हवे
’ज्योतिषी आपल्या आश्रयदात्याकडून (क्लाएंट) - भविष्याच्या परिणामाची कोणतीही जबाबदारी भविष्य सांगणार्यायवर नाही- असे हमीपत्र लिहून घेणार ’ हे वृत्त (मटा ११ डिसेंबर) वाचले. पृच्छकाकडून हमीपत्र घेणे योग्य नाही. ज्योतिषी पैसे घेउन भविष्य सांगतात.उपाय सुचवतात. तेव्हा त्यांनी पुढीलप्रमाणे हमीपत्र द्यावे ’ प्रतिज्ञापुर्वक लिहून देतो, की फलज्योतिष हे भविष्य कथनाचे शास्त्र आहे.आम्ही वर्तवलेले भविष्य खोटे ठरले, तर ग्राहकाने दिलेली सर्व फी त्यांना सव्याज परत करु. ’ पृच्छकाने जन्मदाखल्याची सत्यप्रत द्यावी. त्यावर जन्मदिनांक, वेळ व जन्मस्थान या नोंदी असतात. त्यामुळे ज्योतिषाला कोणतीही सबब सांगता येणार नाही. खरे तर ’पैसे घेउन भविष्यकथन’ या सेवेचा अंतर्भाव ग्राहक संरक्षण कायद्यात व्हावा. म्हणजे हा फसवणुक प्रकार बंद होईल.
----------------------------------------------------------------------
वरील पत्रानुसार अशी गॅरंटी कुणी ही ज्योतिषी देणार नाही हे तर खरेच. जन्मदाखल्यावर वेळेची नोंद आत्ताशी कुठ काही ठिकाणी होउ लागली आहे. अर्थात तो मुद्दा वेगळा. पण आता समजा कुणी असे म्हटले की जर डॉक्टरांनी ही ऑपरेशनच्या वेळी पेशंट वा त्याच्या नातेवाईकांच्या सह्या का घ्यावात? तो ही डॉक्टरांच्या सोयीच्या मजकूरावर.आम्ही आमच्या जबाबदारीवर ऑपरेशन करीत आहोत. आम्हाला धोक्याची जाणीव आहे अशा आशयाचा तो मजकूर. डॉक्टरही पैसे घेउनच सेवा देतात. वैद्यक शास्त्र देखील उपचाराचे विज्ञान आहे. थोडक्यात काय तर ग्राहक संरक्षण कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही क्लुप्त्या लढवत असतो. ज्योतिषी म्हणजे काही ब्रह्मदेव नाही. ग्यारंटी द्यायला. एवढा युक्तिवाद देखील जातकांना पुरतो. काही ज्योतिषी असेही म्हणतील अशी ग्यारंटी जर पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याकडे येउच नका. गॅरंटी न देताही त्यांच्याकडे आपखुशीने येणार वर्ग मोठा आहे.
त्यात काही चूक नाही.
त्यात काही चूक नाही. विज्ञानाचा जयघोष केला जातो ना, मग मग द्या की हमी ऑपरेशनच्या यश्स्वितेची असे कुणी म्हणाल्यास ते अजिबात चूक नाही. ते देऊ शकत नसतील डॉक्टर तर ज्योतिषाकडून हमी मागण्याचा कुणालाही काहीही अधिकार नाही.
एखाद ऑपरेशन च्या वेळी डॉक्टर
एखाद ऑपरेशन च्या वेळी डॉक्टर दिलासा देताना सांगतात कि तुम्ही काही काळजी करु नका. आता विज्ञानाने बरीच प्रगती केली आहे. अशा प्रकारची ऑपरेशन्स यशस्वी होण्याचे प्रमाण आता ९९ टक्के आहे.त्यांचे म्हणणे संख्याशास्त्रीय दृष्टया खरेच असते. फक्त तुम्ही त्या ९९ मधील एक आहात कि उरलेल्या एक मधील आहात हे ते सांगु शकत नाही. समजा तुम्ही उरलेल्या एक मधले असाल तर तुमच्या साठी ते अपयश मात्र शंभर टक्के असते. पण तरीही डॉक्टरांचे म्हणणे खरेच असते. या ठिकाणी ज्योतिषी मंडळी मात्र १०१ टक्क्यांची गॅरंटी देतात. वरचा १ टक्का स्वतःचा वाढवून देतात. रुग्ण कुटुंबियांना मात्र दिलासा मिळतो. शिवाय ऑपरेशनच्या यशापयशाची जबाबदारी त्याच्यावर नसते. या ठिकाणी डॉक्टर ने जर निष्काळजीपणा केला व तो सिद्ध झाला तर त्यावर कायदेशीर केस होउन शिक्षा होउ शकते.ज्योतिषी मात्र सुरक्षित राहतो.
Pages