फल ज्योतिषाला ग्राहक संरक्षण कायदा लावावा का?

Submitted by धडाकेबाज on 27 May, 2013 - 07:18

फल ज्योतिषाला ग्राहक संरक्षण कायदा लावावा का? फल ज्योतिषाच्या नावाने फसवणूक करण्याचे प्रकार सर्रास चालू आहेत. अनेक भोळ्या भाबड्या ग्राहकांची फसवणूक होत आहे. पण फसवणूक होऊन सांगणार कोणाला जो तो आपल्या नशिबाला दोष देत बसतो.जर फलज्योतिष हे ग्राहक संरक्षण कायद्याखाली आले तर खरे ज्योतिषी हि खुश होतील आणि भोंदू ज्योतीषानाही शासन होईल. फलज्योतिषात काहीतरी तथ्य असले पाहिजे, या समजुतीमुळे मुलामुलींची लग्ने जुळवताना पत्रिका पहाण्याचा आग्रह धरला जातो. कित्येक वेळा चांगली अनुरुप स्थळे केवळ पत्रिका जुळत नाही या कारणासाठी नाकारली जातात. मुलीला मंगळ आहे म्हटल्यावर तर तिचे हाल बघायलाच नको. अशा मुलींना आणि त्यांच्या पालकांना जो मनस्ताप केवळ एका निरर्थक श्रद्धेच्या पायी लोक सोसत आहेत, . दुसरी गोष्ट म्हणजे ग्रहपीडा निवारण्यासाठी दैवी उपाय केले जातात, त्यापायी हजारो रुपयांचा चुराडा होतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> जर फलज्योतिष हे ग्राहक संरक्षण कायद्याखाली आले तर खरे ज्योतिषी हि खुश होतील आणि भोंदू ज्योतीषानाही शासन होईल <<<<
आयडियेची कल्पना चान्गली आहे, पण त्यासाठी फलज्योतिष हे शास्त्र आहे हे सरकारदरबारी मान्य व्हायला हवे.
तसे मान्य झाल्यानन्तर, अर्थातच ते शिकण्याची, त्याच्या पदव्यान्ची सोय सरकारी पातळीवर व्हायला हवी.
(कुणी सान्गाव? गेल्या काही वर्षात जसा इन्जिनिअरिन्ग अन मेडिकलचा शिक्षणाचा बाजार मान्डला गेलाय, तसा ज्योतिषविद्यालयान्चा बाजारही मान्डला जाईल Proud )
त्याशिवाय, कायद्याच्या अभ्यासक्रमातही फलज्योतिषविषयक सर्व शाखातील जसे की हस्तसामुद्रिक/ कुन्डली/ फेसरिडिन्ग/ शरिर अवयव रिडिन्ग/ स्वप्नदृष्टान्त/अन्गावर पाल झुरळ इत्यादीक पडणे, कावळ्याचा स्पर्ष होणे/ सहदेव भाडळीचे दृष्टान्त इत्यादी इत्यादीबाबतचे हिन्दू धर्मशास्त्रातील नियम मान्य करुन शिकवावे लागतील, व त्यानियमानुसारच भविष्य वर्तविले पाहिजे अशी सक्ति करुन तसे न झाल्यास ग्राहकास पैशे परत असा कायदा करावा लागेल.
मग यावर सर्व्हिस ट्याक्स घ्यावा की प्रोफेशनल ट्याक्स घ्यावा, की सरळ हे प्रकरण एलबीटी/व्ह्याट मधे घालावे, अन तो किती ट्याक्स टक्के घ्यावा यावर मारामार्‍या कराव्या लागतील Proud
त्याचबरोबर, सध्याच्या एलबीटीबाबतच्या व्यापार्‍यान्च्या सम्पाबाबत सरकार जसे अत्यावश्यक सेवेचा कायदा लागू करु पहाते आहे तसेच, ज्योतिषान्च्या सम्पाबाबत काय योजना करावी त्याचि निश्चिती करावी लागेल.
वकिल डॉक्टरान्ना जशी जाहिरात करता येत नाही, त्यान्चे नावाचा बोर्ड विशिष्ट रन्ग आकारातच बनवावा लागतो, तसेच काही ज्योतिषान्चे बाबतीतही करावे का याचा विचार करावा लागेल.
तुमची आयडीयेचि कल्पना छानच आहे, मला वाट्टे की ब्रिगेडी अन जोडीला राष्ट्रवादी यान्चे साथीने पुण्यातील तमाम समाजवाद्यान्ना हाताशी धरुन तुम्ही हा प्रश्न विधानसभेत रेटून नेऊन कायदा करुन घेऊ शकता.
येऊन जाऊन एकच माशी शिन्केल, ती म्हणजे अन्निस वाल्यान्ची, ते असला काही कायदा करायला विरोध करतील, कारण त्यान्चे आपले एकच पालूपद असते की ज्योतिष /धर्म वगैरे थोतान्ड!
पण तुम्ही हे कराच! म्हणजे खच्चून टाळ्या पडतील अन बक्कळ प्रसिद्धी मिळेल, प्रसिद्धी तर इतकी की अजुन पाऊणशे / शम्भर वर्षान्नी लोक तुमच्या नावाचीही एक मन्डई पुण्यात बान्धतील! Proud
आपापल्या पोरीबाळीन्ना "धडाकेबाजबुवान्च्या कन्या" किन्वा धडाकेबाजबुवान्चे पुत्र" असे सम्बोधतील! Biggrin
लोक जिकडे तिकडे तुमचे पुतळे उभारतील, अन तुमची जयन्ती/पुण्यतिथीसुद्धा साजरी करतील. तसे करताना त्यावेळेस अस्तित्वात असलेल्या एतत्देशीय पण आता युरोपाअमेरिकास्थित मायाराज्यस्थित असलेल्या सर्व उच्चवर्णियान्च्या नावाने खडे फोडतील व त्यान्चे नाशाकरता हल्लीचे तालिबान्यान्प्रमाणे सन्घटनाही उभारतील. Wink
तुम्ही हे धडाकेबाजप्रमाणे मनावर घ्याच अन कराच!

यालाच म्हणतात ज्योतिषाचा कल्पनाविलास. ज्योतिषी बुवा भविष्यात डोकावून पहा ना हा कायदा अस्तित्वात येईल का?
नाहीतर कायदा अस्तित्वात यायचा आणि तुमीच खडी फोडायला जायचे.मग शंभर वर्षांनी जर ज्योतिषांचे राज्य आले तर सारे म्हणतील हाच तो ज्योतिषी शिरोमणी याला तेव्हाच्या सरकारने खोट्या कलमात खडी फोडायला पाठवले होते .मग पाठ्यपुस्तकात तुमच्या नावाचा धडाही येईल आणि तुम्हाला ज्योतिषांच्या असंतोषाचे जनक म्हणून एकादी मस्त पैकी पदवीही मिळून जाईल

'फलज्योतिष संबंधाने विचारी माणसाचे कर्तव्य' या चित्रमय जगत च्या जानेवारी १९२१ च्या अंकातील लेखात सत्यान्वेषी लिहितात," .........एक कमिटी स्थापन करावी व तिने गणित व तर्कशास्त्राचा अभ्यास केलेल्या विद्वानास या शास्त्राच्या संशोधनाचे कामी निधितुन द्रव्यसाहाय्य द्यावे. या शास्त्राचा शोध करणारांस तर्कशास्त्राचे ज्ञान असणे का इष्ट आहे हे उघड आहे. कोणत्या नियमास अनुसरुन सिद्धांत केलेला खरा असतो, सिद्धांतात चुक राहु नये यास्तव कोणते दोष टाळायचे असतात हे तर्कशास्त्रज्ञास माहित असते. यास्तव काहीतरी अनुमान काढायचा प्रमाद त्याच्याकडून फारकरुन घडत नाही. ह्या शास्त्राच्या सध्याच्या स्थितीत कोणत्या गोष्टी निश्चयाने सांगता येतात व कोणत्या नाही हे आकडेवार माहितीने ठरवुन ते शोध कमिटीने प्रसिद्ध करावे, आणि व्यक्तिला उपयुक्त अशा गोष्टी ज्योतिषास सांगता येतात अशी खात्री होईल तर फलज्योतिषशास्त्रात परिक्षा घेउन लायक माणसास सर्टिफिकेट द्यावे व ढोंगी ज्योतिषाविरुद्ध सरकार कडुन एखादा कायदा पास करवून घ्यावा."

>>> या चित्रमय जगत च्या जानेवारी १९२१ च्या अंकातील लेखात सत्यावेषी लिहितात <<<<<
अजुन हार्डली ८/९ वर्षात या गोष्टीला शम्भर वर्षे पूर्ण होतील ! Proud

लिंबूटिंबू
अहो विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेला तर सव्वाशे वर्ष होउन गेली. त्यात त्यांनी लोकभ्रम या प्रकरणात ज्योतिषाची चिकित्सा केली आहे. हा पहा दुवा

माझ्या एका मित्राने गम्मत म्हणून त्याच्या स्वर्गीय आजोबांची कुंडली स्वतःची म्हणून ज्योतिषाला दाखवली व आपले लग्न कधी होणार हा प्रश्न विचारला ज्योतिषी म्हणाला २ वर्षानंतर. ह्या नंतर त्याने तीच कुंडली जवळ जवळ ७० ज्योतीषाना दाखवली आहे सर्वांनी वेगवेगळी उत्तरे दिली.आजोबा मरून ७ वर्षे झालीत तरी ज्योतिषी उत्तरे देतायत. म्हणजे माणूस मेलाय कि जिवंत आहे हेही ह्या कुंडल्यांवरून ज्योतिषांना ओळखता येत नाही.

धडाकेबाज
त्या मित्राने ज्यांना कुंडली दाखवली त्यांनी ते कदाचित कुडमुडे असतील. पत्रिकेवरुन वय समजते. नातवाने आजोबांची कुंडली स्वत:ची म्हणुन दाखवली तर ते समजते. अर्थात संशय आला तरच ते व्हेरिफाय करणार. नाहीतर आपले चाल्लय ग्रहयोगांची इंटरप्रिटेशन
जिवंत का मृत हे समजत नाही हे आता अनेक ज्योतिषी मान्य करतात.
आपल्या अधिक माहिती साठी ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद वाचावे.

ह्या नंतर त्याने तीच कुंडली जवळ जवळ ७० ज्योतीषाना दाखवली आहे
त्या मित्राने ज्यांना कुंडली दाखवली त्यांनी ते कदाचित कुडमुडे असतील<<

माझ्या माहिती प्रमाणॅ खरा आभ्यासू ज्योतिषी दुसर्‍याने तयार केलेली कुंडली न पहाता तुमच्या जन्मतारिख आणि वेळे नुसार स्वतः बनवून घेतो

>>>> माझ्या माहिती प्रमाणॅ खरा आभ्यासू ज्योतिषी दुसर्‍याने तयार केलेली कुंडली न पहाता तुमच्या जन्मतारिख आणि वेळे नुसार स्वतः बनवून घेतो <<<< अगदी अगदी
सशा, नेमके वर्मावर बोट ठेवलेस. जन्मतारीख/वेळ्/स्थळ याव्यतिरिक्त पुढे केलेली कुन्डली मी तरी कचर्‍याच्या टोपलित टाकून देतो, व समजा हे तपशील असतिल तरी ते व्हेरीफाय करतोच करतो. कारण समाजात वरीलप्रमाणे गचकलेल्या आजाबापाच्या कुन्डल्या दाखविणारे नाठाळ आहेत हे समजायला मला अजुन कोणत्या गुढ शास्त्राची आवश्यकत नाही. असो.
विशेष म्हणजे, ज्योतिषशास्त्रातील दंडकानुसार व्यक्तिच्या मृत्युचे भविष्य वर्तविण्यावर बन्दी आहे व हे कसोशीने पाळले जाते. सबब कोणतीही कुन्डली समोर आली, तरी त्यात त्या जातकाचा मृत्यु केव्हा आहे हा प्रश्नच ज्योतिषाचे मनात उद्भवला जात नाही.
वरील सारखी उदाहरणे, झोपडपट्ट्यातील वगैरे अडाणी व तथाकथितरित्या वंचित म्हणवुन माथी भडकविलेल्या लोकान्समोर सान्गायला व त्यान्ना पटायला सोप्पी असतात. असेकाही बोल्ले की खच्चून टाळ्या पडतात. गेल्या काहीवर्षातील ही गेम आहे. चालायचेच.
आख्खे राज्यच अशा बहुसन्ख्यान्नी निवडलेल्यान्चे आहे.

घाटपान्डेजी, अहो शम्भर वर्षे होत आली, तरी अजुन कायदा का झाला नाही हा प्रश्न मात्र नाही धागाकर्त्याला पडत नाही तुम्हाला! तुम्ही अजुन मागले उदाहरण देताय! अहो कायदा करा की मग! Happy

कायदा करण्यासाठी फलज्योतिष हे तुमच्या भविष्यातील / आयुष्यातील घट्ना सांगू शकते हे प्रथम गृहीत धरावे लागेल. आमचे मित्र ज्योतिर्विद नंदकिशोर जकातदार म्हणतात करा हा कायदा. बोगस ज्योतिषांवर तरी वचक बसेल. असे कायदे भारतात होउ शकणार नाही हे आम्ही जाणतो. म्हणुन कायद्या पेक्षा प्रबोधनावर भर द्या असे आमचे म्हणणे असते.ग्रहांकित मासिकाचे संपादक मा. चंद्रकांतजी शेवाळे उर्फ दादा यांचेशी गप्पा मारताना त्यांनी मर्मावर अचूक बोट ठेवले. ते म्हणाले, '' सर्वसामान्य माणसाला ज्योतिषाकडे जावंस वाटाव अशीच इथली सामाजिक परिस्थिती आहे. ती जेव्हा बदलेल त्या वेळी ज्योतिषाकडे जाणारा वर्ग आपोआप कमी होईल.``

धडाकेबाज | 28 May, 2013 - 05:01 नवीन
माझ्या एका मित्राने गम्मत म्हणून त्याच्या स्वर्गीय आजोबांची कुंडली स्वतःची म्हणून ज्योतिषाला दाखवली व आपले लग्न कधी होणार हा प्रश्न विचारला ज्योतिषी म्हणाला २ वर्षानंतर. ह्या नंतर त्याने तीच कुंडली जवळ जवळ ७० ज्योतीषाना दाखवली आहे सर्वांनी वेगवेगळी उत्तरे दिली.आजोबा मरून ७ वर्षे झालीत तरी ज्योतिषी उत्तरे देतायत. म्हणजे माणूस मेलाय कि जिवंत आहे हेही ह्या कुंडल्यांवरून ज्योतिषांना ओळखता येत नाही.

तुम्ही महाराष्ट्र ज्योतिष परिषदेने परिक्षा घेऊन प्रमाणित केलेल्या ज्योतिषालाच पत्रीका दाखवा. पण ज्योतिषावरच विश्वास नसेल तर वेळ वाया घालवु नका. महाराष्ट्रातले सुप्र्सिसाताश्री दाभोळकर यांनी आव्हान दिले होते की ही पत्रिका जिवंत की मृत व्यक्तीची ओळखा. हे आव्हान महाराष्ट्र ज्योतिष परिषदेने स्विकारले व दोन अटी घातल्या.

१) किमान डॉक्टर व ज्योतिष शास्त्री असलेल्या व्यक्ती याचा फैसला करतील.
२) जर हा अचुक निर्णय महाराष्ट्र ज्योतिष मंडळाने केल्याचे जर डोक्टर व ज्योतिषी असलेली मंडळी मान्य करतील तर श्री दाभोळकर ज्योतिष हे शास्त्र आहे असे लेखी मान्य करतील.

हा सारा पत्र व्यवहार महाराष्ट्र ज्योतिष परिषदेक्डे आहे. अर्थातच ह्या अटी दाभोळकरांनी मान्य केल्या नाहीत किंबहुना ह्या अटी मान्य नाहीत असे उत्तर देण्याचे सौजन्य दाखवले नाही.

वाचकांच्या माहितीसाठी.

महाराष्ट्रात एम बी बी एस आणि महाराष्ट्र ज्योतीष मंडळाची ज्योतिष शास्त्री परिक्षा पास असलेल्या अनेक व्यक्तींची यादी आहे.

सबब खुप जाणत्या व हुशार व्यक्ती याचा अभ्यास करतात. डॉ भा, नि पुरंदरे यांनी आपल्या आत्मचरित्रात " शल्यकौशल्य" पान १८९ ते १९५ इतकी पाने त्यांचे स्वतःचे ज्योतिष शास्त्राचे अनुभव यावर खर्च केलेली आहेत.

कै डॉ. भा नी पुरंदरे आंतरराष्ट्रीय किर्तीचे गायनोकोलोजीस्ट होते.

स्वातन्त्र्यविर सावरकर फलज्योतिषाद्वारे मुहूर्त पाहण्यावर कडाडून हल्ला करताना फार सुंदर युक्तिवाद वापरतात.''मुहूर्तावर मुळीच विश्वास न ठेवणार्या मूठभर इंग्रजांनी पृथ्वीवर सूर्य मावळणार नाही एवढय़ा विस्तीर्ण प्रदेशावर-भूमीवर साम्राज्य निर्माण केलं आणि मुहूर्तावर, शुभ-अशुभावर विश्वास ठेवणारे पेशवे, डावा पाय पुढे ठेवायचा की उजवा पाय पुढे ठेवायचा हे ज्योतिष्याला विचारून ठरविणारे पेशवे, संकट आलं की विघ्नहर्त्या गणपतीस पाण्यात बुडवून ठेवत असत. अशा पेशव्यांची पेशवाई इंग्रजांमुळं गणपतीसारखीच पाण्यामध्ये बुडाली.''

ग्रहाचा मानवी जीवन प्रवाहावर परिणाम होतो असे फलज्योतिषी सांगतात व त्यावरच त्यांचे शास्त्र अवलंबून आहे. याला वैज्ञानिक आधार काय? एकाच स्थळी व एकाच ठिकाणी राहणार्या माणसांवर एकाच ग्रहाचे, ते केवळ वेगवेगळ्या वेळी जन्मले म्हणून वेगवेगळे परिणाम कसे होतील? सगळे ग्रह व सूर्य यांची भ्रमणकक्षा व काळ निश्चित आहे. पुढील पाच हजार वा पाच लाख वर्षानंतर तो निश्चित ठरावीकच असणार आहे. याचाच अर्थ ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक मनुष्याचे भविष्य तो जन्मत:च ठरलेले असते. असे असतानाही अनेक ज्योतिषी ग्रहदशा बदलण्याचे व ग्रहांचे अरिष्ट टाळण्यासाठी अनेक पूजा, ताईत, खडे वगैरे उपाय सांगतात व ठरलेले आयुष्य बदलवता येते असेही सांगतात. ते कसे?

ग्रहांची दिशा, स्थान व भ्रमण निश्चित असूनही या उपायांनी माणसांचे भविष्य बदलतेच कसे? हे सगळे उपाय म्हणजे सामान्य लोकांना लुबाडण्याची ज्योतिष्यांची एक क्लृप्ती नव्हे काय?

मुळात माणसांचं आयुष्य ठरलेलं असतं हे सांगणंच लबाडी नव्हे काय? माणसाचा जन्म आणि मृत्यू ठरलेला असतो का? ठरलेला नसेल तर फलज्योतिषाला काही आधार उरेल काय?

पण जर जन्म ठरलाच असेल तर मनुष्य स्वत: निर्णय घेऊन आजच्या काळात भारतीय कायद्याच्या परवानगीने कृत्रिम गर्भपात करतो व जन्माला येणार्या नव्या मनुष्याचे अख्खे आयुष्यच थांबवतो, हे कसे? ठरलेला जन्म कृत्रिम उपायांनी थांबवणारा मनुष्य. ग्रहांपेक्षा वा नियंत्यापेक्षा मोठा मानायचा का? मृत्यू ठरलेला असतो का? अ) तो जर ठरलेला असेल तर, 1930 साली भारतीय माणसाचे सरासरी आयुष्य केवळ 18 वर्षे होते. आता ते 68 वर्षापेक्षा अधिक झाले आहे. हे अधिकचे सरासरी आयुष्य भारतीयांच्या वाटय़ाला कुठून आले? याचे उत्तर फलज्योतिष्यांना पत्रिकांमध्ये दाखवता येईल का?

मृत्यू ठरलेला असतो असे मानणारे ज्योतिषी आपल्या घरच्यांना व स्वत:लाही औषधोपचार का करतात? ते डॉक्टरांची मदत का घेतात? जर मृत्यू ठरलेल्या क्षणीच होणार असेल तर डॉक्टरांची मदत घेऊन स्वत:चा व स्वत:च्या नातेवाईकांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करून पैसा फुकट घालविणे मूर्खपणाचे नव्हे का?

धागाकर्ते धागा उघडताना ज्योतिषाबाबत कायदा करा असे म्हणताहेत, पण हळूहळू मूळरूपात येऊ लागलेत अन ज्योतिष थोतान्ड असे सिद्ध करू पहाताहेत. सावरकर जयन्तीला सावरकरान्चे उदाहरण दिले म्हणजे सावरकरान्चे भक्त त्या मेचक्या बाबी टाकाऊ ठरविणार नाहीत असे थोडेच आहे? सावरकरान्नी त्यान्चे पत्नीचे श्राद्ध घातले नव्हते, पण त्यान्चे अनुयायान्नि ते घातले. सावरकरान्चा भक्त असूनही त्यान्चे सर्वच विचार मानणे अशी सक्ति माझ्यावर नाही! असो, इथे सावरकर आणुन विषयान्तराचा प्रयत्न मात्र झकास होतोय हां! Wink

>>>>> ठरलेला जन्म कृत्रिम उपायांनी थांबवणारा मनुष्य. ग्रहांपेक्षा वा नियंत्यापेक्षा मोठा मानायचा का?<<<<<<
क्याथ्यालिक ख्रिश्चन धर्माप्रमाणे गर्भपात हा गुन्हा आहे, अर्थात त्याप्रमाणे असा मनुष्य खूनी मानायला लागेल. इंडियन कायद्याप्रमाणे पाचव्या महिन्यानन्तर गर्भपातास अनुमती नाही, तो खूनसदृष गुन्हाच ठरविला जातो, कारण पाचवे महिन्यानन्तर जीवधारणा झालेली असते असे कायदा गृहित धरतो.
पण तुमच्या प्रश्नातील छुप्या गर्भितार्थाप्रमाणे, एखाद्याच्या जीव घेणारा मनुष्य, वा मुम्बईवर हल्ला करुन शेकडो नागरिकान्ना ठार मारणारा कसाब व इतर हे गुन्हेगार देखिल नियंत्यापेक्षा मोठेच मानायचे का? अतिशय बावळट्ट प्रश्न आहे हा, त्या नियन्त्याने तुम्हाला हात पाय धड धाकट शरीर दिले आहे ना प्रतिकार करायला? वापरा की मग! की बसताय अहिन्सेची माळ ओढत? Wink
निदान हिन्दू धर्मशास्त्र तरी तसे शिकवित नाही! याच सावरकरान्नी दुर्गादेवीचे समोर बसुन साक्षात्कार घेऊन असेही सान्गितले होते की (दशावतारातील बुद्ध सोडलातर ) हिन्दून्चा एकही देवदेवी नि:श्स्त्र नाही, सदैव शस्त्रसज्जच आहेत, व त्यान्चे भक्तान्नी देखिल तसेच असावे! Wink
सावरकर आणायचेच असतील मधे, तर सावरकरान्नी इतरही असंख्य बाबिन्वर जे मार्गदर्शन केले होते त्याचे काय? Wink

एवढा मोठा अंतराळ, त्यात अनेक ग्रह, तारे, त्यात पृथ्वी, त्यानंतर अनेक खंड, त्यानंतर प्रदेश, गाव, मोहल्ला, अमूक एक कुटुंब आणि त्या कुटुंबीयातील सोम्या गोम्याचे भविष्य काढणारे ज्योतिषी खरच महान आहेत;) Wink

पेशव्यांची पेशवाई इंग्रजांमुळं गणपतीसारखीच पाण्यामध्ये बुडाली.'' << अटकेपार झेंडा रोवणार्‍या पेशव्यांची पेशवाई कसामुळे बुडाली हा इथला विषय नाही, त्यामागे बरीच कारणं आहेत.

सावरकर आणायचेच असतील मधे, तर सावरकरान्नी इतरही असंख्य बाबिन्वर जे मार्गदर्शन केले होते त्याचे काय?

राजकारण्यांसारखे विषय बदलू नका. सावरकरांनी इतर अनेक बाबीवर मतप्रदर्शन केले होते हे मान्य. परंतु विषय चाललाय फलज्योतिष बाबत. त्यामुळे सावरकरांचे त्याबाबतीत काय विचार होते ते दिले.

पेशव्यांची पेशवाई इंग्रजांमुळं गणपतीसारखीच पाण्यामध्ये बुडाली.'' << अटकेपार झेंडा रोवणार्‍या पेशव्यांची पेशवाई कसामुळे बुडाली हा इथला विषय नाही, त्यामागे बरीच कारणं आहेत.

बरोबर आहे तुमच.विषय पेशवाई कशी बुडाली ह्यावर नाही. विषय आहे फलज्योतिष. आणि फलज्योतिषातील मुहूर्त ह्या प्रकारावर हल्ला करताना सावरकरांनी ते विधान केले होते ते विधान माझे नाही.

वावावाचनीय धधागा. Wink
>> जन्मतारीख/वेळ्/स्थळ याव्यतिरिक्त पुढे केलेली कुन्डली मी तरी कचर्‍याच्या टोपलित टाकून देतो, व समजा हे तपशील असतिल तरी ते व्हेरीफाय करतोच करतो. कारण समाजात वरीलप्रमाणे गचकलेल्या आजाबापाच्या कुन्डल्या दाखविणारे नाठाळ आहेत हे समजायला मला अजुन कोणत्या गुढ शास्त्राची आवश्यकत नाही. असो.<<
१. तुमच्याकडे कचराटोपली आहे व तुम्ही तिचा वापरही करता याबद्दल अभिनंदन.
२. हे व्हेरिफाय कसे करतात? मुन्शीपाल्टीच्या जन्मदाखल्यावरून का?

>>सावरकरान्चा भक्त असूनही त्यान्चे सर्वच विचार मानणे अशी सक्ति माझ्यावर नाही! <<
41.gif लिंबाजीराव, एक्सेल शीट मधे तुमची ही शब्दमौक्तिक माला टाकून ठेविली आहे. पुन्हा कधी नक्कीच कामास येईल. Wink नै म्हणजे असावी तजवीज. (या मायबोलीमुळे का होईना एक्सेल नामक प्रकरण शिकायला मिळतंय. नायतर मायक्रोसॉफ्ट एक्सेलचा अन माझा काऽयबी संबंद नव्हता..)

***

ग्राहक संरक्षण लावा नका लावू, पण माझ्या मते, शॉप अ‍ॅक्ट अन इन्कमट्याक्स लावलाच पाहिजे. अन हो, प्रोफेशन टॅक्स व सर्विस टॅक्स देखिल.

>>>>> ठरलेला जन्म कृत्रिम उपायांनी थांबवणारा मनुष्य. ग्रहांपेक्षा वा नियंत्यापेक्षा मोठा मानायचा का?<<<<<<
क्याथ्यालिक ख्रिश्चन धर्माप्रमाणे गर्भपात हा गुन्हा आहे, अर्थात त्याप्रमाणे असा मनुष्य खूनी मानायला लागेल. इंडियन कायद्याप्रमाणे पाचव्या महिन्यानन्तर गर्भपातास अनुमती नाही, तो खूनसदृष गुन्हाच ठरविला जातो, कारण पाचवे महिन्यानन्तर जीवधारणा झालेली असते असे कायदा गृहित धरतो.

<<

मला वाटते ते गर्भपाताबद्दल बोलत नसून कंडोम व तत्सम गर्भनिरोधकांबद्दल बोलत आहेत.

एकाच ठिकाणी जन्मलेल्या उदा. हास्पिटलातील डिलीवरी रूम, मुलांची भविष्ये वेळेत साधारण किती फरक असला की वेगवेगळी होतील?

कुंडलीवरुन व्यक्ती जिवंत आहे कि मृत हे सांगता येते कि नाही? या बाबत ज्योतिषी लोकांच्यात सर्व्हे घ्यावा. प्रत्यक्ष आव्हान प्रक्रिया हा फार नंतरचा भाग आहे. सांगता यायला पाहिजे कि नाही हा देखील वेगळा भाग आहे. तुम्हाला या बाबतच ज्योतिषांची / ज्योतिषप्रेमींची भिन्न मते दिसतील.

<<ग्राहक संरक्षण लावा नका लावू, पण माझ्या मते, शॉप अ‍ॅक्ट अन इन्कमट्याक्स लावलाच पाहिजे. अन हो, प्रोफेशन टॅक्स व सर्विस टॅक्स देखिल.>>
इब्लिसराव अगदी खर आहे.मनातल बोल्लात. मला तर असा संशय आहे कि काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार देखील या ज्योतिषात होत असावा. या ज्योतिषातुन करोडो रुपयांची संपत्ती गोळा केलेले मी पाहिले आहेत. संख्येने कमी असतील पण आहेत. सगळा कॅशचा मामला आहे. अगदी डॉक्टरांसारख आहे. Lol

कुंडलीवरुन व्यक्ती जिवंत आहे कि मृत हे सांगता येते कि नाही? या बाबत ज्योतिषी लोकांच्यात सर्व्हे घ्यावा. प्रत्यक्ष आव्हान प्रक्रिया हा फार नंतरचा भाग आहे. सांगता यायला पाहिजे कि नाही हा देखील वेगळा भाग आहे. तुम्हाला या बाबतच ज्योतिषांची / ज्योतिषप्रेमींची भिन्न मते दिसतील.

पावसाबाबत सरकारी पगार घेऊन अंदाज वर्तवणार्‍याचे अंदाज दिवसागणिक बदलतात/ चुकतात अस म्हणल तर त्याला प्रेडिक्शन आहे अस म्हणल जात. हे अगदी बरोबर आहे कारण म्हणे १३९ फॅक्टर्स चा भाग लक्षात घेऊन हे प्रेडिस्क्श्न केले जाते.

१२ स्थाने, १२ राशी आणि त्यातलेब१२ ग्रह घेऊन अंदाज व्यक्त करायचा तोही जन्मवेळ किती खात्रीची आहे ह्या बाबत केवळ विश्वासावर ? जर अंदाज चुकलाच तर इतक आकाश पाताळ एक करण्यासारख काय आहे ?

मुळ मुद्दा ग्राहक संरक्षण कायद्याचा आहे.

<<एकाच ठिकाणी जन्मलेल्या उदा. हास्पिटलातील डिलीवरी रूम, मुलांची भविष्ये वेळेत साधारण किती फरक असला की वेगवेगळी होतील?>>
साती , जन्मवेळेबाबत हा प्रश्न मी थोड्या वेगळ्या पद्धतीने घेतला आहे

१२) जन्मवेळ चुकली तर भविष्य चुकते का?
समजा आम्ही उलट असा प्रश्न विचारला की, जन्मवेळ बरोबर असेल तर भविष्य बरोबर येईल याची खात्री ज्योतिषी देईल का ? काय उत्तर मिळेल ? मुळात, खरी जन्मवेळ कुठली मानावी या मुद्यावर ज्योतिषीलोकांतच वाद होते. तर्कदृष्टीनं विचार केला तर ज्या क्षणी गर्भधारणा होते ती खरी जन्मवेळ मानली पाहिजे. पण ती वेळ खुद्द आईबापांनासुद्धा माहीत नसते! बालक रडते म्हणजे पहिला श्वास घेते ती जन्मवेळ मानावी, असे आता मान्य केले आहे. पूर्वी बालकाचे डोके दिसणे, मूल पूर्णपणे बाहेर येणे, नाळ कापणे, अशा अनेक गोष्टीवरून जन्मवेळ ठरवीत असत. एक गोष्ट खरी की जन्मवेळ ही मिनिटांच्या हिशोबात अचूक सांगणे जवळजवळ अशक्य आहे. अचूक जन्मवेळेवर कुंडलीचा अचूकपणा अवलंबून असतो. अचूक कुंडलीवर भविष्यकथनाचा अचूकपणा अवलंबून असतो. त्यामुळे भाकीत खरे ठरले नाही तर जन्मवेळ चुकीची असेल हे निमित्त लगेच पुढे केले जाते व ते पटण्यासारखेही असते. आपण जेव्हा किती वाजले हा प्रश्न विचारतो तेव्हा "३ वाजून ५८ मिनिटे ५० सेकंद " असे काटेकोर उत्तर अपेक्षित नसते, तर "चार वाजले " असे उत्तर पुरेसे असते. डिजीटल घडयाळात ३.५९ नंतर ४.०० हा आकडा येतो. तिनाच्या ऐवजी चाराचा आकडा तिथे दिसू लागतो. प्रत्यक्षात एक मिनिटच उलटलेलं असतं पण तासाचा आकडा एकाने वाढतो. हे जसे घड्याळाच्या बाबतीत होते तसेच कुंडलीतही एखादे वेळी होते. अशा "बॉर्डर "वरची जन्मवेळ असेल तर ५-१० मिनिटांच्या अंतराने प्रथमस्थानातील राशीचा आकडा बदलू शकतो. पण ज्योतिषी लोक मात्र असा समज करून देतात की तेवढ्या थोडयाशा फरकामुळे कुंडलीत काहीतरी मोठी उलथापालथ होते. सामान्यत: भविष्यकथनासाठी ज्योतिषीलोक ठोकळा कुंडली वापरतात. दहा-पंधरा मिनिटांच्या फरकामुळे कुंडलीतला जो घटक बदलणार असतो तो घटक या ठोकळा कुंडलीत टिपलेला नसतोच. आणि जरी सूक्ष्म कुंडली वापरली तरी सर्वसाधारण भविष्यकथनासाठी ज्योतिषी तो घटक विचारात घेत नाहीतच. एकंदरीत काय तर जन्मवेळेच्या अचूकपणावर भविष्य फारसे अवलंबून नसते.

उधृत - ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी ... प्रश्नोत्तरातून सुसंवाद

नितीनचंद्र, मूळ धाग्यात भोंदू ज्योतिषांकडून होणारी फसवणूक ह्यावरदेखील भर आहे. ज्योतिष्याचा अंदाज चुकला तर त्याला सुळी चढवा असा ह्या कायद्याचा वापर नसावा. मात्र तुमच्याच उदाहरणात कोणीही सोम्यागोम्या कुठल्याही उपकरणांचा किंवा ज्ञानाचा वगैरे आधार न घेता मनाला येईल तसा नुसता आकाशाकडे पाहून हवामानाचा अंदाज वर्तवू लागला तर ती फसवणूक नक्कीच म्हणता येईल.

>>>> अशा "बॉर्डर "वरची जन्मवेळ असेल तर ५-१० मिनिटांच्या अंतराने प्रथमस्थानातील राशीचा आकडा बदलू शकतो. पण ज्योतिषी लोक मात्र असा समज करून देतात की तेवढ्या थोडयाशा फरकामुळे कुंडलीत काहीतरी मोठी उलथापालथ होते. <<<<
घाटपान्डेजी, वाक्यातिल पुर्वार्ध,""५/१० मिनिटाचे फरकाने प्रथम स्थानातील राशीचा आकडा बदलणे", याचेशी वाक्याचा उत्तरार्ध "समज करुन देतात की मोठी उलथापालथ" हे जुळत नाहीये हो. एकतर तुम्ही ज्योतिषाचा काहीही अभ्यास न करता, किन्वा सोईस्कर तेवढाच वर वर माहितीसदृष "अभ्यास(?)" करुन मत मान्डता आहात किन्वा जाणून बूजून गैरसमज पसरवत आहात.
रास बदलणे म्हणजे व्यक्तिमत्वाबाबत/भविष्याबाबत पूर्णतः वेगळे विश्लेषण येणे ही उलथापालथच नव्हे काय? कर्क राशीच्या हळव्या भावनाप्रधान भोळसट नाजुक व्यक्तिमत्वाविरुद्ध ५/१० मिनिटाचे फरकाने रास बदलल्याने पुढील हुकुमशाही, कठोर, शिस्तप्रिय अशी सिन्ह रास येत असेल, तर भविष्य / अंदाज कसे काय बरोबर येणार? असो.

>>>> पेशव्यांची पेशवाई इंग्रजांमुळं गणपतीसारखीच पाण्यामध्ये बुडाली.'' << अटकेपार झेंडा रोवणार्‍या पेशव्यांची पेशवाई कसामुळे बुडाली हा इथला विषय नाही, त्यामागे बरीच कारणं आहेत. <<<<<
सशा, अरे हे यान्चे नेहेमीचेच्च आहे. १७व्या १८व्या शतकातील पेशव्यान्चे छत्रपतिन्चे अखत्यारितील राज्य आज एकवीसाव्या शतकातही अनेक "देशी इन्ग्रजान्च्या" पोटशूळाचे कारण आहे हेच खरे. Proud
पण या धाग्याचा तो विषय नाही.

कायदा करायचा, तर ज्योतिषाचि मूलतत्वे समजुन घेऊन, मान्य करुन, त्यावर संशोधन करुन, नियम बनवायला लागतील. हे तर इथे कुणालाच करायचे नाहीये. केवळ साप साप म्हणून भूई धोपटत ज्योतिषशास्त्र व पक्षी शेवटी "बामणान्ना" झोडपणे याव्यतिरिक्त मला यात काही दम दिसत नाही.

इब्लिसा, जरुर नोन्दवून ठेव.

Pages