मध्यंतरी सुमन कल्याणपूरकरचे ‘हरिनाम मुखी रंगते’ हे गाणे ऐकत होतो. त्यातील एक कडवे मनाला अतिशय भिडले. मीरा श्रीकृष्णाला विनवणी करते की, ‘‘घरट्यात माझीया आनंदाचा ठेवा । तूच यदुनाथा सदा असू द्यावा ॥ इतुकेच मागणे तुझ्यापाशी मी मागते । गोड नामी तुझ्या रंगते ॥‘‘ आणि त्यानंतर मी माझ्या घरट्यातील आनंदाचे क्षण टिपण्यास सुरुवात केली.
पहिलाच प्रसंग रात्री कामावरून दमून उशिरा घरी आलो. सौ काही तरी वाचनात असल्यासारखे दाखवत होती. पण मी टिपले की तिचे वाचनात लक्ष नव्हते. खरं तर माझी जेवणासाठी वाट पाहात होती. मुले दिवसभर भरपूर खेळून शांतपणे झोपलेली होती. लहानग्याचा पाय दुसर्याच्या अंगावर पडलेला होता. दिवसभर दंगा-मस्ती करत मनसोक्त बागडल्याची मुलांच्या मुखावरील तृप्ती मी टिपली आणि माझा दिवसभरचा शिणवटा कुठल्या कुठे निघून गेला.
मित्रांनो सुख हे मानण्यावर असते. अगदी एका लहान खोलीत राहणार्या सर्वसामान्य कुटुंबात देखील असे आनंदाचे क्षण वरचेवर येत असतात. वर वर अगदी क्षुल्लक दिसणार्या गोष्टींमधून कधी कधी अवर्णनीय असा आनंद मिळत असतो. मात्र डोळे उघडे ठेवून त्याची अनुभूती घेण्यास आपली दृष्टी कमी पडते.
असे आनंदी क्षण आपण येथे जरूर लिहावेत व आम्हाला आपल्या आनंदात सहभागी करून घ्यावे.
असाच एक दुसरा प्रसंग - बायको
असाच एक दुसरा प्रसंग -
बायको मुलांना घेऊन सुटीसाठी माहेरी गेलेली होती. त्यामुळे आईवरच सर्व कामांचा ताण पडलेला होता व तो वयोमानाने झेपत नव्हता. त्यात कामवाल्या बायांनी सलग तीन-चार दिवस दांडी मारली. त्यामुळे आईची तब्येत बिघडली. तरीही ती जमेल तेवढे ओढून काढत होती. मी देखील माझ्यापरीने करत होतो. नंतर नेहमीप्रमाणे मी पहाटे फिरायला गेलो. जाताना आई झोपलेली होती आणि जेव्हा फिरून आलो तेव्हा दरवाजात चैत्रांगण काढलेले दिसले. एरवी कधीही रांगोळीकडे लक्ष जात नाही. पण त्यादिवशी मात्र रांगोळी पाहून आईला बरे वाटते आहे हे लक्षात आले. तेव्हा जो आनंद झाला त्याचे वर्णन करू शकत नाही. पंचज्ञानेंद्रियाद्वारे आपण आनंदाचा अनुभव घेत असतो. त्यादिवशी नेत्रसुखाने मनोमनी आनंदी झालो.
आता फिरायला जाताना कळत नकळत रांगोळ्यांकडे लक्ष जाते. आणि रांगोळी पाहिल्यावर मूड फ्रेश होऊन जातो.
छान विषय आहे. सुख मानण्यावर
छान विषय आहे. सुख मानण्यावर आहे याचा अनुभव मि पण खुप वेळा घेते. असेच छोटे प्रसंग डोकं भानावर आणतात. मि कधिकधि खुप दमते, घरचं बाहेरचं, मुलाचं, स्वयंपाक. मग वाटते, कुणाला काहि जाणिवच नाहि. पण मग दिसते कि, कुणितरि माझा लेपटोप, सेल चार्र्ज केला आहे. माझ्या आवडिचा साबण माझ्या सिंक वर ठेवला आहे. मुलगा चमत्कार झाल्याप्रमाणे, खेळणि आवरतो आहे,..मग समजतं कि आपलं आयुष्य छान तर आहे
अगदी! छान जमलंय! भा पो!
अगदी! छान जमलंय! भा पो!
राया +१०००००००००
राया +१०००००००००
चांगला धागा ! बरेच प्रसंग
चांगला धागा ! बरेच प्रसंग आहेत आठवुण लिहील.