Submitted by अभय आर्वीकर on 12 May, 2013 - 23:42
रक्त आटते जनतेचे
रक्त आटते जनतेचे, देश सुंदर घडवायला
एकटा रावण पुरेसा, राज्य धुळीत मिळवायला
सारे काही सवलतीत; धान्य, इंधन, साखर, तेल
कोण तयार होईल मग, इथे हाडे झिजवायला
निघून गेलेत शहाणे, सर्व ’साहेब’ बनायला
मूर्ख आम्ही उरलो इथे, मोफत अन्न पिकवायला
टाळले होते फुलांनी, आयुष्यभर भेटायचे
आज मात्र सडा पडलाय, मस्त तिरडी सजवायला
दार गेले, धुरा गेला अन कर्जापायी कुंकू
दोन्ही हात उरले मात्र, दररोज उर बडवायला
किती सीता पळवायच्या, तुम्ही लागा पळवायला
श्री बजरंग येत आहे, ’अभय’ लंका तुडवायला
- गंगाधर मुटे
---------------------------------------------------
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लयीचे एक तूर्त नंतर बोलू, पण
लयीचे एक तूर्त नंतर बोलू, पण घडवायला आणि मिळवायला नंतर सटकायला तरी घेऊ नका की मुटे? आता तुम्ही काय नवे आहात की काय?
बेफिजी, चूक होतेय याचा अर्थ
बेफिजी,
चूक होतेय याचा अर्थ मी नवा आहेच.
पण अजूनही चूक काय ते कळले नाही.
मुटे, अहो मतल्यात 'वायला' ने
मुटे,
अहो मतल्यात 'वायला' ने संपणारा काफिया स्पष्ट झालाय ना मग नंतर 'कायला' ने संपणारा कसा चालेल?
समजले की नाही अजून?
हात्तीच्या मारी. गझल भयो रामा
हात्तीच्या मारी. गझल भयो रामा हझल भयोरे.
माजंच टाळकं सटकायला झालं.
मी आत्तापर्यंत सटकायलामध्ये वायला हाच काफिया आहे असे समजत होतो.
आता तो शेर सटकवला आहे गझलेमधून.
विदिपा आणि बेफीजी धन्यवाद.
(No subject)
तिरडी आणि ऊर हे शेर विशेष
तिरडी आणि ऊर हे शेर विशेष वाटले.
निघून गेलेत शहाणे, सर्व
निघून गेलेत शहाणे, सर्व ’साहेब’ बनायला
मूर्ख आम्ही उरलो इथे, मोफत अन्न पिकवायला
मुटेजी,
गझल आवडली !
तुम्ही पिकवत असलेलं अन्न ज्यावेळी खुप महाग होईल त्यावेळी हे शहाणे पुन्हा परततील अन्न पिकवायला ..
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार.
छान विषय आणि आशय.... आवडली
छान विषय आणि आशय....
आवडली
सामाजिक आशय संपन्न !
सामाजिक आशय संपन्न !
अरविंदराव,
अरविंदराव, प्रभाकरराव
धन्यवाद!
छान आहे
छान आहे
UlhasBhide | 17 May, 2013 -
UlhasBhide | 17 May, 2013 - 14:28
तिरडी आणि ऊर हे शेर विशेष वाटले.
<<<
उल्हासराव,
..................
मुटे सर, छान आहे गझल.
मुटे सर, छान आहे गझल.
बेफि, ही कोणती सांकेतीक भाषा
बेफि, ही कोणती सांकेतीक भाषा आहे? कि उल्हासरावांना धमकावता आहात?