तांदुळ १० वाट्या
मुगडाळ, तुरडाळ, मसुरडाळ, चणाडाळ, उडीदडाळ प्रत्येकी १ वाटी, पाव वाटी मेथी दाणे.
मिठ
ताक
तेल
आंबोळ्यांचे पिठ बनवण्यासाठी तांदूळ व सगळ्या डाळी एकत्र धुवाव्यत व उन्हात वाळवाव्यात. वाळलेल्या डाळीत मेथीदाणे घालून पिठ दळून आणावे.
आंबोळ्या करायच्या ५-६ तास आधी पिठ पाण्याने जाडसर भिजवायचे. ५-६ तासांनंतर करताना त्यात थोडे ताक घालून सैलसर करायचे व चवीनुसार मिठ घालायचे.
नंतर तव्यात जरासे तेल पसरवून त्यावर आंबोळीचे पिठ पसरायचे.
आता तव्यावर लगेच झाकण द्यायचे.
२ मिनिटांत चर्रर्र आवाज होतो मग झाकण काढायचे आणि आंबोळी उलटी करुन १-२ मिनिटे ठेवायची.
नंतर गरमा गरम आंबोळी चटणी बरोबर सर्व्ह करायची.
काही जण घावण, आंबोळी उलटत नाहीत. पण मी उलटते कारण त्यामुळे कुरकुरीत होतात.
पाककृती हवी आहे माहीत आहे का ह्या धाग्याच्या ८२ व्या पानावर अजुन वेगवेगळ्या टिप्स मुग्धा, मंजूडी आणि सुचारीता यांनी दिलेल्या आहेत. http://www.maayboli.com/node/24273?page=81
टिकेल ग ४-५ महिने किंवा
टिकेल ग ४-५ महिने किंवा त्यापेक्षा जास्तही. सगळ कोरडच तर आहे. फक्त व्यवस्थित वाळलेले हवे.
जागू, ह्या प्रमाणात आईने पीठ
जागू, ह्या प्रमाणात आईने पीठ करुन पाठवलयं. मस्त आंबोळ्या होतात. खुप धन्यवाद!
अरे हे आंबोळ्या पीठ मागे
अरे हे आंबोळ्या पीठ मागे केलेलं अजून शिल्लक आहे पण मी विसरलेच होते. बरं झालं परत रेसिपी वर आली. आता उद्या करीन
छान, करावे असे वाटते पण हे
छान, करावे असे वाटते पण हे घरी वाटता येते का ?
छान, करावे असे वाटते पण हे
छान, करावे असे वाटते पण हे घरी वाटता येते का ?
सायो मी पण खाल्ले आहे त्या
सायो मी पण खाल्ले आहे त्या चा कडे
जागू इथे उन्हात वाळवता येण
जागू इथे उन्हात वाळवता येण शक्य नाहीये मला
घरातच सावलीत वाळवल तर खराब होईल का ग?
Anushri gharat valavle tari
Anushri gharat valavle tari chalte. Fankhali ratrabhar theun purn korde karun ghe.
harsha thodya pramanat ghari dalta yete na.
ह्या आमच्या आंबोळ्या
ह्या आमच्या आंबोळ्या
जागु, प्रश्न विचित्र वाटेल.
जागु, प्रश्न विचित्र वाटेल. उन्हात ठेवल्यावर पक्षी खातील ना? वर जाळीदार काही ठेवतेस का?
मी केल्या होत्या परवा, जाळी
मी केल्या होत्या परवा, जाळी नाही पडली, का बरं असे झाले असेल?
लीना मला वाटते पीठ घट्टच
लीना मला वाटते पीठ घट्टच राहिले की जाळी नाही पडणार
सुनिधी उन्हात वाळवायला ठेवले की वरून साधारण खालच्या पेक्षा मोठा सुती कपडा पसरून दगड लावले चारही बाजूनी की नाही पक्षी खाणार, प्लॅस्टिक पसरू नका कारण धान्य सुकत नाही, उन झिरपत नाही प्लॅस्टिक मधून
सही.
सही.
माझ्याकडे तयार केलेले पीठ
माझ्याकडे तयार केलेले पीठ नसते त्यामुळे मी अडीच वाट्या तांदूळ आणि त्याच प्रमाणात म्ह्णजे पाव वाटी प्रत्येक डाळ साधारण ५ - ६ तास भिजवून वाटते. भिजवताना थोडे धने पण घालते.
मला घावणे पीठ असे लिहिलेले
मला घावणे पीठ असे लिहिलेले पीठाचे पाकिट एकाने मालवण हून आणून दिले आहे . घटक तांदूळ असे छापले आहे. तर ते कसे वापरायचे???
Dhanashril त्यातच सगळे घटक
Dhanashril
त्यातच सगळे घटक असतील. वरीलप्रमाणे भिजवून काही वेळाने करायचे. ताक गरज वाटली तरच घालायचे. मीठ बहुतेक घालावे लागेल. कोकणातील काही तांदळाना मूळचाच चिकटपणा असतो ( असेच तांदूळ आंबोळ्यांसाठी वापरतात. ) त्यामूळे चांगल्या आंबोळ्या होतात, नुसते तांदूळ असले तरी.
दिनेशदा इतर कुठलेहि घटक
दिनेशदा इतर कुठलेहि घटक लिहिले नाहीत. ह्यात कांदा वगैरे घातले तर चालेल का???आणि आंबवायचे वगैरे नाही ना???
पीठ करताना तांदूळ कुठले
पीठ करताना तांदूळ कुठले वापरावे ?
तान्दूळ व डाळी भाजायचे नाही
तान्दूळ व डाळी भाजायचे नाही का ?
कसं नाही पाहिलं आधीच,
कसं नाही पाहिलं आधीच, "पाककृति" व "जागू" एकत्र असताना !
सलाम !!
छान
छान
Pages