आंबोळ्या

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 May, 2013 - 08:03
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

तांदुळ १० वाट्या
मुगडाळ, तुरडाळ, मसुरडाळ, चणाडाळ, उडीदडाळ प्रत्येकी १ वाटी, पाव वाटी मेथी दाणे.

मिठ
ताक
तेल

क्रमवार पाककृती: 

आंबोळ्यांचे पिठ बनवण्यासाठी तांदूळ व सगळ्या डाळी एकत्र धुवाव्यत व उन्हात वाळवाव्यात. वाळलेल्या डाळीत मेथीदाणे घालून पिठ दळून आणावे.

आंबोळ्या करायच्या ५-६ तास आधी पिठ पाण्याने जाडसर भिजवायचे. ५-६ तासांनंतर करताना त्यात थोडे ताक घालून सैलसर करायचे व चवीनुसार मिठ घालायचे.


नंतर तव्यात जरासे तेल पसरवून त्यावर आंबोळीचे पिठ पसरायचे.

आता तव्यावर लगेच झाकण द्यायचे.

२ मिनिटांत चर्रर्र आवाज होतो मग झाकण काढायचे आणि आंबोळी उलटी करुन १-२ मिनिटे ठेवायची.

नंतर गरमा गरम आंबोळी चटणी बरोबर सर्व्ह करायची.

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी २ संपतातच.
अधिक टिपा: 

काही जण घावण, आंबोळी उलटत नाहीत. पण मी उलटते कारण त्यामुळे कुरकुरीत होतात.
पाककृती हवी आहे माहीत आहे का ह्या धाग्याच्या ८२ व्या पानावर अजुन वेगवेगळ्या टिप्स मुग्धा, मंजूडी आणि सुचारीता यांनी दिलेल्या आहेत. http://www.maayboli.com/node/24273?page=81

माहितीचा स्रोत: 
पाककृती हवी आहे माहीत आहे का ह्या धाग्यावर मुग्धा, मंजूडी, सुचारिता व जुन्या मायबोलीवरील सोनचाफा यांच्या मदतीने ही रेसिपी मिळाली
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त जाळीदार दिसताहेत आंबोळ्या. नक्की करून ठेवणार मी पीठ पण सुरवातीला निम्म्या प्रमाणातच.

मस्त दिसताहेत. याच प्रमाणात डाळ तांदूळ भिजवून वाटले ( डोशासारखे ) तर जमेल का ?
मिक्सरवर एवढे सगळे दळणे म्हणजे फारच व्याप होईल असं वाटतंय ?

मेथीदाणेपण टाकले आहेत पण टाईप करायचे विसरून गेले. धन्स आठवण केल्याबद्दल.

अंकू, दिनेशदा, राखी, मृण्मयी, लाजो, चिन्नू, सामी, स्वाती, सिंडरेला, अमेय, स्वाती, शूम्पी धन्यवाद.

वत्सला मला वाटत मिक्सरमध्ये भरड होईल. दळून आणलस तर जास चांगल. मिस्करमध्ये केलस तर चाळून घे.

सारीका आखिर आंबोळीने तुम्हे खुष कर दिया. Lol

आंबोळ्याम्चे पीठ घरी कायम असणे हा केव्हढा आधार असतो घाईगडबडीच्या दिनक्रमांमधे.
शर्मिला अगदी खरे ग.

मंजूडी तुझ्या टिप्स आता वापरणार आहे प्रत्येक वेळेस.

अवनी मी घरातलेच वापरणारे तांदूळ घेतले तरी छान झाल्या.

मामी ये आपण नॉनव्हेज बरोबर खाऊ. Happy

कविन अग छान लागतात मटण चिकन सोबत. मी केल्या तेंव्हा सकाळी चटणी सोबत आणि दुपारी मटणा सोबत खाल्या.

सायो गोड नारळाच्या दूधासोबत खातात ते रसघावन.

विजय आम्ही त्याला घावन म्हणतो.

चनस पुर्वी बीडाच्याच तव्यावर करायचे.

मस्त दिसतायत. Happy
माझ्याकडेही आईने दिलेलं तयार पीठ असतं सहसा.
मी करताना त्यात ताक, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण घालते.
झटपट करायच्या तर तांदुळाची पिठी आणि थोडंसं डाळीचं पीठ मिसळून त्याच्या अशाच घालते.

स्वाती, मी मध्यंतरी तांदळाच्या पिठात थोडं ज्वारी, बाजरी पीठ मिसळून, कुरकुरीतपणाकरता थोडा रवा, त्यात आयत्या वेळी जिरं, ठेचलेला लसूण, ताक वगैरे घालून केलेल्या. त्याही चांगल्या लागतात.

जागू, मस्त जाळी पडली आहे Happy पहिल्यांदा १० वाट्या तांदूळ वाचल्यावर हबकले. पण नंतर लक्षात आलं की तुमची जॉइंट फॅमिली असल्याने तेवढं प्रमाण तर लागतच असणार Happy

शर्मिला +१
माझ्याकडेही आठवड्यातून २ वेळा आंबोळ्या असतात. मला तयार पीठ ग्राहकसंघातून मिळतं. मी फक्त त्यात लसूण, लाल तिखट किंवा मिरची, मीठ आणि कोथिंबीर घालते. कधीतरी ताक घालते. नेहमी चटणी करतेच असं नाही. सुट्टीच्या दिवशी चटणी, ऑफिसच्या दिवशी दही, टॉमेटो केचप, लोणचं असं काहीही चालतं Proud

आंबोळी भाजली जात असताना मेथीचा दरवळ सुटतो तेव्हा रसना अजून चाळवते.

काय देखणे फोटोज आहेत जागू!
एकदम करायचा मूड आला!

आता वीकेंडला धिरडी (तांदूळ, मूग आणि ह.डाळीचं पीठ घालून) करण्यात येतील.. Happy

वावा... शनिवारी सकाळी सकाळी इतका सुर्रेख आंबोळीचा फोटो... अजून थोडा जोर लावला तर आंबोळी पण मिळेल (:स्वप्नातली बाहुली:)

मस्त जाळीदार आंबोळ्या आणि चटणी. आंबोळ्या नाही पण डोसे करावेच लागणार.
सायो, मी खाल्लेत डोंबिवलीचे अप्पम्, इडल्या, मेदुवडे, डोसा .....माझ्या बहिणीकडे गेले कि एकदा तरी होतेच खाणे.

आंबोळ्यांचे पिठ बनवण्यासाठी तांदूळ व सगळ्या डाळी एकत्र धुवाव्यत व उन्हात वाळवाव्यात. <<<< हे किती दिवस वाळवायला हवंय? मी मंगलोरला असताना एकदा असंच तांदूळ वाळवून त्याचं पीठ एका गुजरातीणीच्या घरघंटीतून करून आणलं तर त्याला चार पाच दिवसांत बुरशी आली, म्हणून हा बावळट प्रश्न. Proud

सायो Lol

नंदिनी, यात डाळी आणि तांदूळ वाळवल्यावर भाजायचे नसल्याने ३-४ दिवस कडक उन्हात खडखडीत वाळवायचे असणार.

नंदिनी सुकवल्यावर तांदुळ आणि डाळ पुन्हा पहिल्यासारखी म्हणजे धुण्याअगोदर होती तशी खणखणीत झाली पाहीजेत. दातात धरुन चावल्यावर डाळ लगेच तुटता कामा नये. तांदळाचा दाणा हाताने तुटता कामा नये. तांदुळ लवकर सुकतो, त्या मानाने डाळ सुकायला बराच वेळ लागतो. शक्य असल्यास वेगवेगळे सुकवावेत. मी तरी निदान पंधरा दिवस कडक उन्हात रोज ठेवते.दोन किलो दळून आणत असल्याने रिस्क घेववत नाही. निट सुकले नसावेत अशी शंका असेल तर झिपलॉकमधे भरुन फ्रिझमधे ठेवते आणि लागेत तसे काढते.

तों पा सु......................

सायो, गुजराती-मारवाडी नाहीत असे गाव कुठाय भारतामधे? इथे चेन्नईमधे तर एक अख्खी बाजारपेठ या लोकांची आहे. सावकारपेट असंच नाव आहे त्या भागाचं.

शर्मिला, पंधरा दिवस सुकवायचे का? मी मागच्यावेळेला दोन तीन दिवसच सुकवले होते. म्हणूनच बुरशी आली असावी. नेक्स्ट टाईम पंधरावीस दिवस सुकवेन. (तेवढाच इथल्या उन्हाचा काहीतरी उपयोग!)

मस्त रेसिपी आणि सुंदर तोंपासू फोटो!! किती छान जाळी पडलीय! (आत्ताच्या आत्ता खायला मिळाली तर किती बरं होईल :स्मित:)
शर्मिलाला पूर्ण अनुमोदन.

नंदीनी मी दोनच दिवस वाळवले. कारण सध्या खुप कडक उन आहे. चांगले सुकले.

जयवी, दाद, झकासराव, सशल, वर्षू, किशोर धन्यवाद.

मस्त जागु! Happy मी फक्त एकदाच खाल्ल्या आहेत Sad
ज्यांच्याक्डे खाल्ल्या आहेत.त्यांच्याकडे जाड कडा असलेला(बिड) असा तवा होता.त्यांनी आम्हाला पण आणुन दिला,पण आमच्या कडुन काय त्याच्यावर कधी आंबोळ्या झाल्या नाहीत. Sad तो तवा काहीतरी मुरवायला लागतो असे म्हणतात.

आमचे बीडाचे तवे नवर्‍याने मासे तळुन तळुन मत्स्याहारी करुन टाकले.:अरेरे:

जागू खूप धन्यवाद रेशेपीबद्दल. मस्त जाळी पडलीय.:स्मित:

बीडाचे तवे धुवुन त्यावर तेल टाकुन ते पुसुन मग कोरडेच गरम करावे, असे ३ ते ४ वेळा करावे लागते, त्याला सिजनिंग म्हणतात. मग खुशाल वापरा. कारण नाहीतर ते तडकतात.

नंदिनी, पंधरा दिवस सुकवलेस तर भाजणी होईल त्याची Wink
ते मिश्रण इतके सुकवायची आवश्यकता नाही. तुझ्याकडे तर नुसत्या पंख्याखालीही एका दिवसात चांगले खडखडीत वाळतील. इकडे मुंबईतही एका दिवसात वाळतात. उन्हात ठेवलेस तर छान खमंग होईल. मापाची वाटी छोटीच घे. अधूनमधून त्यातून हात फिरवत रहा.

वत्सला, मिक्सरमधे बारीक केलंस तर जितकं जास्तीत जास्त बारीक करता येईल तितकं बारीक करून घे. मग ते पीठ भिजवून ठेव पाच - सहा तास. आणि आंबोळ्या करायच्या आधी ब्लेंडर फिरव त्यात, म्हणजे उरलासुरला रवाळपणा जाईल. इडलीचं पीठ नाही का करत आपण.. तसं होईल साधारण.

सायो, पीठ पाच-सहा तास भिजवून ठेवलं (की आंबतं) म्हणजे त्या आंबोळ्या, आणि आयत्यावेळी पीठ भिजवून केलेली ती धिरडी/ घावन अशी आपली मी मनाची समजूत करून घेतली आहे Wink

सामी, काळ्या वाटाण्याच्या उसळीबरोबर करतात त्या आंबोळ्या तांदूळ्-उडीद्डाळीच्या असतात का? त्याचं प्रमाण सांगशील का? आणि कृतीही... म्हणजे पीठ कितीवेळ भिजवून ठेवावं लागतं वगैरे. मला त्या मऊमऊ पांढर्‍याशुभ्र आंबोळ्या आवडतात. पण करताना तर त्याचा रंग हमखास चॉकलेटी-ब्राऊन होतोच.

अगं जास्त प्रमाणात आंबोळ्यांचं पीठ करुन ठेवताना लागतं सुकवायला जास्त. नाहीतर नाही टिकत.

Pages