तांदुळ १० वाट्या
मुगडाळ, तुरडाळ, मसुरडाळ, चणाडाळ, उडीदडाळ प्रत्येकी १ वाटी, पाव वाटी मेथी दाणे.
मिठ
ताक
तेल
आंबोळ्यांचे पिठ बनवण्यासाठी तांदूळ व सगळ्या डाळी एकत्र धुवाव्यत व उन्हात वाळवाव्यात. वाळलेल्या डाळीत मेथीदाणे घालून पिठ दळून आणावे.
आंबोळ्या करायच्या ५-६ तास आधी पिठ पाण्याने जाडसर भिजवायचे. ५-६ तासांनंतर करताना त्यात थोडे ताक घालून सैलसर करायचे व चवीनुसार मिठ घालायचे.
नंतर तव्यात जरासे तेल पसरवून त्यावर आंबोळीचे पिठ पसरायचे.
आता तव्यावर लगेच झाकण द्यायचे.
२ मिनिटांत चर्रर्र आवाज होतो मग झाकण काढायचे आणि आंबोळी उलटी करुन १-२ मिनिटे ठेवायची.
नंतर गरमा गरम आंबोळी चटणी बरोबर सर्व्ह करायची.
काही जण घावण, आंबोळी उलटत नाहीत. पण मी उलटते कारण त्यामुळे कुरकुरीत होतात.
पाककृती हवी आहे माहीत आहे का ह्या धाग्याच्या ८२ व्या पानावर अजुन वेगवेगळ्या टिप्स मुग्धा, मंजूडी आणि सुचारीता यांनी दिलेल्या आहेत. http://www.maayboli.com/node/24273?page=81
मला हे प्रचंड आवडत... पण अशी
मला हे प्रचंड आवडत...
पण अशी जाळीदार आंबोळी नाही होत
छान जमल्यात. आमच्याकडे
छान जमल्यात. आमच्याकडे मेथीदाणे पण घालतात.
मस्त फोटो. आंबोळ्याम्चे पीठ
मस्त फोटो. आंबोळ्याम्चे पीठ घरी कायम असणे हा केव्हढा आधार असतो घाईगडबडीच्या दिनक्रमांमधे. मी दळून आणताना यात मेथ्या आणि जिरेही घालते. किलोच्या प्रमाणात एक किलो जाड्या तांदळाला बाकीच्या डाळी प्रत्येकी शंभर ग्रॅम.
जागू, मस्त दिसताहेत
जागू, मस्त दिसताहेत आंबोळ्या!
मस्त जाळी पडली आहे. चुरचुरीत झाल्यात हे कळतंच आहे.
अगदी लगेच लोण्याचा गोळा घालून खायलाच घ्याव्यात असं वाटलं.
हे पीठ ५-६ तास भिजवून नाही ठेवलं तरी चालतं. भिजवून लगेच आंबोळ्या घातल्या तरी चालतात. मी यात कधी जिरं-मिरची वाटून घालते, कधी हळद-लाल तिखट-ओवा घालते, कधी कांदा-टोमॅटो घालून टोमॅटो आम्लेटही करते, ओली लसूण मिळाली तर ती पातीसकट बारीक चिरून घालते, मेथी / पालकपैकी घरात असेल ते बारीक चिरून घालते, वाळूतली मेथी मिळाली तर ती पण घालते कधी कधी.
काहीही घाला, आंबोळ्या चविष्ट होणारच. शर्मिला म्हणते ते खरं आहे, हे पीठ घरात असलं की फार मोठा आधार वाटतो.
सुरेख दिसतायत !
सुरेख दिसतायत !
अहाहा!! अतिशय आवडता प्रकार,
अहाहा!! अतिशय आवडता प्रकार, नारळाच्या गोड चटणीसोबत अप्रतिम लागतो.
मला रेसीपी माहीत नव्हती.
धन्स जागूडे
मी मुंबईला आले की आणेन तुझ्यासाठी लोणचं
मस्तच! आंबोळ्यांचे पीठ
मस्तच!
आंबोळ्यांचे पीठ मिक्सरवर होईल का? खुप बारीक दळावे लागते का?
आजच आणते दळून....उकडे तांदूळ
आजच आणते दळून....उकडे तांदूळ घ्यावेत का? की दुसरे कुठले?
अप्रतिम दिस्ताहेत. प्रज्ञा९
अप्रतिम दिस्ताहेत.
प्रज्ञा९ ने दिलेल्या साधारण अशाच रेसिपीनं आंबोळ्या करून बघितल्या होत्या. उन्हात वाळवणं जमलं नसल्यामुळे १८० डिग्रीज फॅ.वर भाजल्या. पण कोरडं पीठ फारवेळ ठेवता आलं नाही.
आंबोळ्या प्रचंड
आंबोळ्या प्रचंड आवडतात....
मस्त जाळीदार झाल्यात तुझ्या आंबोळ्या
आईच्या हातच्या आंबोळ्यांची आठवण झाली....
सहीच! अडैसारखं पण पीठ दळून
सहीच! अडैसारखं पण पीठ दळून तयार ठेवल्यास नो कट्कट प्रकार.
थांकु
मस्तच फोटो जागू. आम्ही
मस्तच फोटो जागू.
आम्ही आंबोळ्यात फक्त तांदूळ आणि उडीद च घालतो आणि त्या थोड्या जाड्सर असतात. चहा बरोबर खायला पण आवडतात.
नॉनव्हेज पदार्थाबरोबर खातात
नॉनव्हेज पदार्थाबरोबर खातात त्या ह्याच का आंबोळ्या जागु? मला हवीच होती ह्याची रेसिपी
मस्त जाळीदार झाल्यात!
मस्त जाळीदार झाल्यात!
आमच्या ओळखीतल्या एक आजी मला
आमच्या ओळखीतल्या एक आजी मला नेहमी आंबोळ्यांचे कोरडे पीठ बांधून द्यायच्या इथे येताना. आजी गेल्यापासून पुन्हा करणं झालंच नाही. आता ह्या पद्धतीने करून बघेन.
मस्त दिसतायत. ह्याला आंबोळ्या
मस्त दिसतायत. ह्याला आंबोळ्या म्हणायचं की धिरडी? मला वाटलेलं आंबोळ्या म्हणजे गोड नारळाच्या दुधाशी खातात.
मृ, इकडे सगळ्या डाळी वाळवून मिक्सरलाच पीठ केलंस का?
आम्च्याकडे(कोल्हापूर आणि
आम्च्याकडे(कोल्हापूर आणि परीसर, विशेषतः राधानगरी, भुदरगड, कागल तालुके) 'हावळा' ही एक तांदळाची जात आहे त्याच्या आंबोळ्या करताना ताक, खूप वेळ भिजत ठेवणे वगैरे गोष्टी अजिबात कराव्या लागत नाहीत. शिवाय ह्या निव्वळ तांदळाच्या आंबोळ्या होतात.
जागूची रेसिपी नेहमीप्रमाणे हीटच!
सायो गोड नारळाच्या दुधाशी
सायो गोड नारळाच्या दुधाशी खातात ते घावणे. त्याला रस घावणे म्हणतात.
नॉनव्हेज पदार्थाबरोबर आंबोळ्या करतात त्या जरा जाडसर असतात. आंबोळ्या बरोबर कॉम्बीनेशन म्हणजे आंबोळ्या -चटणी, आंबोळ्या -चिकन/ मटण रस्सा, आंबोळ्या- काळ्या वाटाण्याचे सांबार आणि गावी आंबोळ्या-चहा किंवा आंबोळ्या -चटणी.
मस्तच झाल्यात!!
मस्तच झाल्यात!!
>> मला वाटलेलं आंबोळ्या
>> मला वाटलेलं आंबोळ्या म्हणजे गोड नारळाच्या दुधाशी खातात.>> त्या खापरपोळी
आमच्याकडे आंबोळीला तांदळाबरोबर फक्त उडीद डाळ, मेथ्या, जीरे आणि थोडी बडिशेप असते.
>>मृ, इकडे सगळ्या डाळी वाळवून
>>मृ, इकडे सगळ्या डाळी वाळवून मिक्सरलाच पीठ केलंस का?
हो. निथळून घेतल्यावर फॅनखाली वाळवल्या. हाताला किंचित दमट लागायला लागल्यावर ओव्हनमधे टाकल्या. पण त्या बहुतेक आतपर्यंत खुटखुटीत वाळत नाहीत. बारिक करताना खूप वेळ लागला.
आंबोळ्या-चहा ही सुद्धा भन्नाट
आंबोळ्या-चहा ही सुद्धा भन्नाट कॉम्बीनेशन आहे. सामी ह्यांच्याशी सहमत!
नॉनव्हेज पदार्थाबरोबर
नॉनव्हेज पदार्थाबरोबर आंबोळ्या करतात त्या जरा जाडसर असतात >>> ह्या त्याच जरा खोलगट तव्यात करायच्या ना ? माझी एक केरळी मैत्रिण करते तशा.
ते अप्पम सिंडी.
ते अप्पम सिंडी.
हां ? अप्पम आणि आप्पे
हां ? अप्पम आणि आप्पे वेगवेगळे का ? (आता ह्या धाग्याचा श्रा घे होणार का ? ;))
अग्गं जागू, कसल्या देखण्या
अग्गं जागू, कसल्या देखण्या दिसताहेत तुझ्या या आंबोळ्या. मस्त रेसिपी. मी सध्या एक नवान्न आंबोळी पीठ आणलंय आयतं. त्याच्याही अशाच होतील अशी आशा! नाहीतर येईनच तुझ्या घरी!
हो, आप्पे म्हणजे आप्पेपात्रात
हो, आप्पे म्हणजे आप्पेपात्रात करतो ते. अप्पम म्हणजे खोलगट कढईत डोशासारखे पसरुन त्यात चटणी घालून खायचे. डोंबिवली इस्टला एका अप्पमवाल्याकडे भरपूर गर्दी असते.
ओक्के.
ओक्के.
काय सुंदर दिसतायत या
काय सुंदर दिसतायत या आंबोळ्या. मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी .. फक्त
मस्त रेसिपी .. फक्त ज्वारीच्या पीठाची पण करता येते .. बिडाच्याजाड तव्यावरची चव ही मस्त येते
मी सध्या ज्या भाज्या आहेत त्या घालुन करतेयं
Pages