कधी कधी मी मराठी असल्याची लाज वाटते. अर्थात हे वाक्य केवळ "मराठी" हा शब्द बदलून अनेक बाबतीत वापरता येईल. तर मुळ मुद्दा मराठी असण्याचा. का ? आणी कधी वाटते बर लाज ? सुरेश भटांनी लिहिलेल्या
" लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढया जगात माय मानतो मराठी"
या ओळींचा नायक असुनही माझ्यावर अशी वेळ यावी ? एखादा कट्टर (?) मराठी माणुस माझ्या मराठी असण्याबद्दल शंकाही घेईल. अस झालच तर हेच लाज असण्याची पहीलं कारण असेल. केवळ विरोधासाठी विरोध केल्यामुळ मन, आचार विचार , प्रगती आणि व्यासंग संकुचित होत जातो हे ज्यांच्या बरेचदा गावी नाही त्यातलाच एक मी आहे. 'आपला तो बाब्या, दुसऱ्याच ते कार्ट' या सूत्रावर ज्यांची अभिरुची ठरते त्याच जातीचा मी आहे. शिवाजी महाराजांचे गुण न घेता त्यांचं फक्त नाव वापरून धिंगाणा करायला उत्सुक गटात मी मोडतो. अर्थात हि सर्व वाक्यं व्यक्तीसापेक्ष आणी स्थळ सापेक्ष आहेत. भारतातल्या प्रत्येक राज्यात जिथे प्रादेशीक अस्मिता बिंबवली जातेय तिथे विचार साधर्म्य असणारे लोक पुष्कळ असतील याची कल्पना आहे. अशा लोकांना माझे काही प्रश्न :
१. प्रादेशीक अस्मिता नेहमी ओढून ताणून का आणली जाते?
एखादी व्यक्ती देश वा आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकली की तीच्या पूर्वायुष्याबद्दल खोदकाम सुरु होते. येण-केन प्रकारेण तिचा मराठी वा तत्सम प्रदेशाचा, जातीचा संबंध प्रस्थापित केला जातो. तिच्या ध्यानी मनी असो नसो, तिचं कार्यक्षेत्र मुळ भूमी पासून कुठेतरी दूर असो वा तिचं कार्य भाषा, जात-पात, लिंग या भेद-भावांपासुन अलिप्त असो , तिचा संबंध जसा हाव तसा जोडला जातो. नंतर या नूतन प्रसूत नात्याचा आनंद साजरा होतो - अशा एखाद्या नवीन संबंधाचा सुगावा लागेपर्यंत. या खेळाचे अलीकडील उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. वेंकटरामन रामकृष्णन. आपली कार्यभुमी इंग्लंड असताना, भारताचा व त्यांन नोबेल मिळण्याचा सरळ संबंध नसताना सुद्धा भारताशी त्यांचं नातं जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न पाहून 'आपण भारतीय नाही आहोत' असं त्यांना सांगाव लागण ही शरमेची बाब ना लोकांच्या लक्षात आली ना मिडीयाच्या ! अर्थात हे देश पातळीवरचं उदाहरण झालं. अजून अशी मराठमोळी अनेक उदाहरण देता येतील - रजनीकांत, राहुल द्रवीड, N. Vittal (Former CVC) इ.
२. शिवाजी महाराजांची (कींवा इतर प्रभूती) जयंती / पुण्यातिथीचं दिवस महात्म्य काय?
काय फरक पडतो दिवस कोणता आहे? जयंती / पुण्यतिथी साजरी करताना महत्वाचं त्या पुण्य-पुरुषाच स्मरण. त्याच्या गुणांचं अंगीकरण करण्याचा , वृद्धिंगत करण्याचा दिवस. हे सर्व सोडुन तारखे वरून वाद कशासाठी ? एखादी गोष्ट का व कशासाठी करायची हे माहीतच नसेल तर ' तारीख पे तारीख ' सीनचे रीटेक पुष्कळ व्हायचे.
३. मी अमुक एक जातीचा - मग मला इतर जातीतील महनीय व्यक्तींबद्दल वावडे का?
प्रादेशीक अस्मिता या बाबतीत काहीच बोलत नाही. ब्राह्मणांच्या कार्यक्रमात शाहु-फुले नकोत आणी दलीत मंडळींना टिळक- सावरकर नकोत. या सर्वांनी देशसेवेत तितकेच प्राण ओतले ना? "Love s not like a bread.
उर्वरित लेखासाठी इथे क्लिक करा
कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या "
कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या
" लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
<<<
http://www.sureshbhat.in/node/1213
विचार करकरून भंजाळलो
(No subject)