मायबोलीवरील गझल विभागात पर्यायी शेर आणि त्याला धरून चाललेले वाद-विवाद चांगलेच चर्चेला येत आहेत.
काही वर्षांपूर्वी समीक्षक रामनाथ सुमन ह्यांचा मीर हा समीक्षात्मक ग्रंथ वाचनात आला. त्यात मीरच्या जीवन आणि साहित्यप्रवास संबंधित अनेक गोष्टी दिल्या आहेत. त्यात मीरने दुस-यांच्या शेरांचे केलेले संशोधन सुध्दा दिले आहे. मीर बहुधा आपल्या आत्मकथेत अतिशय नम्रपणे म्हणतो की अमकातमका शेर मी लिहिला असता तर असा लिहिला असता. मीरने संशोधन केलेला एकच शेर इथे देत आहे. इस्लाह देणे चांगले की वाईट हा चर्चेचा मुद्दा ठरावा.
मूळ शेर आहे सज्जाद अकबराबादीचा:
हिज्र-ए-शीरी में क्योंकि काटेगा
हिज्र की यह पहाड-सी रातें
शीरी=ईराणच्या एका प्रेमिकेचे नाव, हिज्र-ए-शीरी=शीरीचा वियोग
इथे दुसरी ओळ फारच सुंदर आहे.
बदल आवश्यक आहे का ? असेल तर बदल काय असावा आणि कुठे असावा ?
सज्जादच्या वर दिलेल्या शेरात पहिल्या ओळीत बदलाची गरज जाणवण्याइतपत आहे.
पर्यायी शेराची गरज आहे का, पर्यायी शेर मूळ शेरापेक्षा उजवा आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच मूळ शेरात संशोधन हे जवाबदारीचे काम असून ये-यागबाळाचे नव्हे.
स्वत:ची पक्की वैचारिक बैठक, विपुल लेखन आणि वाचन नसेल तर पर्यायी फक्त पादरधिटाई होऊन रहावी.
असो, आता पाहूया मीरने काय सुचवले:
किस तरह कोहकन पे गुजरेंगी
हिज्र की यह पहाड-सी रातें
कोहकन=पहाड तोडणारा अर्थात शीरीचा प्रेमी फरहाद
मीरच्या शेराला विशेष स्पष्टीकरणाची गरज नाही. तरीही सांगावेसे वाटते की गुजरेगी ह्या वाक्यप्रचारामुळे पहिल्या ओळीचे दुस-या ओळीशी नाते घट्ट होते तर कोहकन प्रियकर आणि पहाड तोडणारा असे दोन्ही अर्थ आणतो, ज्यामुळे शेर अतिशय खुलतो. एका महाकवीच्या प्रतिभेची ही केवळ झलकच आहे.
धन्यवाद.
समीर चव्हाण
समीरजी, अतिशय आवडलं..!
समीरजी, अतिशय आवडलं..!
स्वत:ची पक्की वैचारिक बैठक, विपुल
लेखन आणि वाचन नसेल तर पर्यायी फक्त
पादरधिटाई होऊन रहावी.>>> अगदी!
मीरचा पर्यायी शेर अधिक उजवा वाटला या ठिकाणी तरी.
अतिशय उत्तम मात्र थोडक्यात
अतिशय उत्तम मात्र थोडक्यात असलेला लेख. (जमल्यास कृपया संपादीत करून अधिक काही लिहावे अशी विनंती).
भूषणः पर्यायीला धरून लिहिले
भूषणः
पर्यायीला धरून लिहिले असल्याने मर्यादा येत आहेत.
फार-फार तर मीरचे अजून एक-दोन शेरांचे पर्याय देता येतील.
दिलेला पर्याय सर्वोत्तम वाटल्याने इतर दिले नाहीत.
धन्यवाद.
सर्वप्रथम ह्या धाग्यासाठी
सर्वप्रथम ह्या धाग्यासाठी धन्यवाद समीरजी
मीर्चा शेर जास्त आवडला व उजवा वाटला
बेफीजींशी सहमत
मला एक प्रश्न पडतो की इस्लाह/ पर्याय देताना देणार्याने मूळ शायराच्या शायरीची शैली ( बाज) , मूळ खयालातील सखोलता कल्पकता , मूळ शेरात शेरात शायराकडून उतरलेली भाषिक सौंदर्ये इत्यादी ..... व स्वतःकडील त्या बाबी या सर्व गोष्टींचा तौलनिक विचार करायलाच हवा मगच पर्याय द्यावा .......असे जे मला वाटते ते बरोबर आहे काय ?
यावर आपले व तज्ज्ञांचे काय मत आहे हे मला जाणून घ्यायचे आहे

धन्यवाद. भूषण काही वेळ
धन्यवाद.
भूषण काही वेळ देशील.
दोनेक आठवड्यात मीर वर लेख लिहितोच.
धाग्याचं नाव पाहुन धस्स
धाग्याचं नाव पाहुन धस्स झालेलं
पण चांगलीच चर्चा वाचायला मिळेल अशी अपेक्षा आहे
इस्लाह या प्रकाराचा मला किळस
इस्लाह या प्रकाराचा मला किळस येतो.
कोणी मागीतला तर त्याला सल्ला देणे, इथपर्यंतच हा प्रकार ठीक वाटतो.
अनाहूत सल्ला देखील अतिक्रमन या सदरातच मोडतो.
कधीतरी आणखी लिहिता येईल याविषयी.
मुटेंशी सहमत. इस्लाह
मुटेंशी सहमत.
इस्लाह पूर्वीच्या काळी गुरू-शिष्य परंपरेमुळे येणे स्वाभाविक होते.
आता तश्या परंपरा जवळपास नाहीच आहेत.
भटांनी दीपक करंदीकरांच्या गझलसंग्रहाच्या प्रस्तावनेत स्पष्ट म्हटलेय की मी कुणाचा गुरू नाही आणि कोणी माझा चेला. शेर आठवत नाही नेमका. भटांचे पाय चेपणारे आता त्याचं भांडवल करीत आहेत.
जबरदस्तीचा इस्लाह गुन्ह्यापेक्षा कमी नाही.
मीरवर अत्यंत कमी लिहीलेस
मीरवर अत्यंत कमी लिहीलेस समीर.
रामनाथ सुमन ह्यांच्या पुस्तकात अनेक पैलूंवर मीरच्या शायरीचा उहापोह केलेला आहे.
भटांचे पाय चेपणारे आता त्याचं भांडवल करीत आहेत.>>> अक्षरशः !!
समीर.. टू गूड
समीर..
टू गूड