Submitted by वैवकु रीटर्न्स on 28 April, 2013 - 01:30
मी पर्यायी अंगुलिमाळ
मी गझलांचा कर्दनकाळ
प्रतिसादातुन मी वाचाळ
गझलांमधुनी खूप रटाळ
मी "मी"चे कीर्तन करतो
विठ्ठल मागे बडवी टाळ
गझल आवडो वा नाही
तू नुसते माझ्यावर भाळ
"पर्यायी- संग्रहा"स्तवे
शिजवत आहे माझी डाळ
गझला चाळिसच्या माझ्या
मी अकलेने नन्हा बाळ
'तिन्हिसांजा' मी वापरतो
तुम्ही वापरा 'संध्याकाळ'
पिंडबिंड पाहुन माझा
खच्चुन घाबरतात टवाळ
माबो मज तू किती पिटाळ
इथेच टाकिन गझलगुर्हाळ
इथेच टाकिन गझलगुर्हाळ.......मी गझलांचा कर्दनकाळ
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रतिसाद सतरांदा संपादीत करू
प्रतिसाद सतरांदा संपादीत करू नका प्लीजच>>>ओके सर !!
बा.बु.राव या खूप दिवसांनी गझलेच्या आखाड्यात आलात !!!!
पैलवानकी सोडवत नाही हो. असो,
पैलवानकी सोडवत नाही हो.
असो, फार मातीत लोळायची ईच्छा नाही राहिली. रचना आवडली म्हणून डोकावलो.
कुठुनतरी विठ्ठलाचा शेर खाली
कुठुनतरी विठ्ठलाचा शेर खाली पडल्याचा फील आला >>>
एक वैभव नावाचा कुणीतरी, यायचे
एक वैभव नावाचा कुणीतरी,
यायचे केव्हा तुझ्या गझलेत वैभव वैभवा?
षंढ शब्दांचा तुझ्या, हा नाच थांबव वैभवा!
शब्दब्रम्हाचा तुला अद्याप नाही गंधही;
काय तुज कळणार गझलेतील मार्दव वैभवा?
आग पाखडतोस, चिल्लर शायरी करतोस तू!
आव शब्दांची तुझी तात्काळ थांबव वैभवा!!
साधना, आराधना करतोस का केव्हा तरी?
वेळ कोणाला? तुझे बघण्यास तांडव वैभवा!
खूप झाले कोडकौतुक वांझ शब्दांचे तुझ्या!
आज ना कोणी तुझी करणार आर्जव वैभवा!!
शब्द असते शस्त्र, त्याचा योग्य वापर पाहिजे;
शब्दक्रीडेची तुझी ही हाव घालव वैभवा!
अय रियाकाकू काय? णिशेध
अय रियाकाकू काय?
णिशेध
(No subject)
माझ्यासाठी लिहिलेली गझल
माझ्यासाठी लिहिलेली गझल कुणातरी नव्याच एकास दिलीत याचा तीव्र शब्दात निषेध !!!!:राग:
~वैवकु
असो
तुमच्या या गझलेची प्रेरणा असलेली माझी मूळ गझल इथे देत आहे !!!
किती निर्भिडपणे पूर्वी गझल पाडायचो आम्ही
कुठुन हे देवसर आले नि अमुची ही दशा झाली
विजा घेवून येणार्या पिढ्यांचे स्वप्न सरणावर
चितेची राख करण्यास्तव पडा की देवसर खाली
गझल फडतूस असते रे तिची सोडून दे इच्छा
गुरू कर देवसर सुचतिल तुलाही शेर पर्यायी
कुणाच्या सर्टिफिकिटांची मला नव्हती तमा तेंव्हा
म्हणाले देवसर "हा शेर गोटीबंद का नाही ?"
मुघलि तुघलकीशाही नकोतर शूण-हूणी द्या
गझलराज्यात आम्हाला नको ही "देवसर"शाही
गझलराज्यात आम्हाला नको ही "देवसर"शाही !!!
इथे तू कबूली द्यायला कमी
इथे तू कबूली द्यायला कमी पडतोस! हा फरक आहे तुझ्यात व आमच्यात!
हा फरक आहे तुझ्यात व
हा फरक आहे तुझ्यात व आमच्यात>>>>
मी टवाळी ज्याक्षणी आतून आरंभेन ना
होत जातिल स्पष्ट मित्रा आपल्यातिल अंतरे
(....शेर माझा नाही आहे हा )
आधी आपण पिंडबिंड दाखवायचात आता फरकबिरक दाखवताय
कळतात अंतरे मजला या
कळतात अंतरे मजला या नात्यागोत्यांमधली!
मी कुणास टाळत नाही, किंवा कवटाळत नाही!...............इति कर्दनकाळ
हा धागा म्हणजे गाव-तंटे
हा धागा म्हणजे गाव-तंटे सोडवण्यासाठी जागा हवी म्हणून बांधलेला मारूतीच्या देवळापुढल्या पिंपळाचा पार नाही याची नोंद घ्यावी !!!! (विषेश्तः वैवकु व कर्दनकाळ यांनी!!!)
बाकी सर्वांचे हार्दिक आभार

Pages