एक कविता
Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
8
ओझी नकोनकोशी व्हायला लागली की वाटत
रानात रमलेल...रानात गमलेल एक रानफुल व्हाव!
आपल्याच हलक्या भारावर डोल डोल डोलणार!!!
घुसमट नकोनकोशी व्हायला लागली की वाटत
चहुबाजुने झाकोळलेल...वीजांनी कडाडलेल मेघ व्हाव!
फुटुन वाहून गेल की मग निळशार आकाश मिळव!
सखेसोबती नकोनकोसे व्हायला लागले की वाटत
आपल्यातच रंगलेल...आतबाहेरुन दरवळ्लेल फुल व्हाव
झडून गेल मी मग मातितच त्याच निर्माल्य व्हाव!
यशवंत
विषय:
प्रकार:
शेअर करा
टायपो खूप आहेत. उदा वाटतं
टायपो खूप आहेत. उदा वाटतं लिहा वाटत नव्हे.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मेघ नपुंसकलिंगी मराठित तरी नाही ,पुल्लिंगी आहे.
झाकोळलेलं कडाडलेलं मेघ अगदी कानडी वाटतंय.
हो... बरोबर आहे!
हो... बरोबर आहे! सांगितल्याबद्दल धन्यवाद चक्रम.
अजून खूप टायपो म्हणालात ते कुठले?
बी, जमतील ते टायपो दुरूस्त
बी, जमतील ते टायपो दुरूस्त करून आगाऊपणाने तुझी कविता इथे पेस्टते आहे. आगाऊपणाबद्दल क्षमस्व.
----------------------------------------------------------------------------------------------------------
ओझी नकोनकोशी व्हायला लागली की वाटतं
रानात रमलेलं...रानात गमलेलं एक रानफूल व्हावं!
आपल्याच हलक्या भारावर डोल डोल डोलणारं!!!
घुसमट नकोनकोशी व्हायला लागली की वाटतं
चहुबाजुने झाकोळलेला...वीजांनी कडाडलेला मेघ व्हावं!
फुटून वाहून गेलं की मग निळंशार आकाश मिळावं!
सखेसोबती नकोनकोसे व्हायला लागले की वाटतं
आपल्यातच रंगलेलं...आतबाहेरुन दरवळलेलं फूल व्हावं
झडून गेलं की मग मातीतच त्याचं निर्माल्य व्हावं!
वा! दोघांचे खूप खूप आभार.
वा! दोघांचे खूप खूप आभार. चुकांरहीत कविता वाचून आणखी छान वाटलं.
आम्हाला मराठीच व्याकरण कधी कुणीच शिकवल नाही![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
साक्षात कवी बी यांची कविता
साक्षात कवी बी यांची कविता म्हणून मनापासून वाचली.
लिहीत रहा कवीवर्य. टेण्शन नही लेनेका. पुलेशु
मस्त आहे कविता बी! रमडने
मस्त आहे कविता बी! रमडने सुचवलेले बदल वरती कर म्हणजे नव्याने वाचणार्यांना आपोआपच दिसतील.
छान लिहिताय, वाचनही वाढवलं तर
छान लिहिताय, वाचनही वाढवलं तर चुका होणार नाहीत..
धन्यवाद तुम्हा सर्वासर्वांचे!
धन्यवाद तुम्हा सर्वासर्वांचे!