Submitted by धनंजय वैद्य on 19 April, 2013 - 02:07
मला व माझ्या मित्राला साधारण 30-35 हजार पर्यँत बजेट असणारा लॅपटॉप घ्यायचा आहे. पण याविषयी आम्हाला कुठलिच माहिती नाही , त्यासाठी हा धागा .( किँमत ,कुठे मिळेल , सुविधा , आपले अनुभव अपेक्षित ! ) मी एक भावी शिक्षक आहे, त्याद्रुष्टीने पण, तसेच फोटो/व्हिडीओ इडिटीँग , इंटरनेट वापरासाठी . पिक्चर क्वॉलिटी पण सर्वोत्तम हवी !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
याठिकाणी नवीन लेखनात कसे काय
याठिकाणी नवीन लेखनात कसे काय पण दोन सारखेच धागे आले आहेत . त्यातला एक उडवायचा आहे , काय करु?
मा. अॅडमिन यांना विपु करून
मा. अॅडमिन यांना विपु करून धाग्याचा नंबर कळवा, व उडवायची विनंती करा.
*
तुम्हाला लॅपटॉपचा वापर नक्की कशासाठी करायचा आहे ते ठरवा, त्यानुसार मशिनची स्पेसिफिकेशन्स ठरतात. ते समजले तर चांगल्या सूचना येऊ शकतील.
बजेट वरून लॅपटॉप का घेता
बजेट वरून लॅपटॉप का घेता ?
तुमच्या गरजा काय आहेत ते आधी निश्चित करा. त्याप्रमाणे तुम्हाला इथे मॉडेल्स सुचवली जातील. त्यातलं तुमच्या बजेटमधे बसणारं एखादं घ्या.
बरं झाला हा धागा आला ते, मला
बरं झाला हा धागा आला ते, मला ही फक्त वैयक्तिक उपयोगासाठी लॅपटॉप घ्यायचा आहे. मुख्य म्हणजे परिक्षेच्या असाईनमेंट्स करणे, आणि इतर वेळी इंटरनेट... माबो, थोपु, बिले भरणे इ. साठी. आणि करावे लागले कधी तर हापिसचे काम..
माझा चालेल का (विकत) ? जुना
माझा चालेल का (विकत) ? जुना झालाय.
संधीसाधु किरण
दक्षे - डेल, सोनी पहा. विंडोज
दक्षे - डेल, सोनी पहा. विंडोज ८ जमते का ते तर आधी पहा. बर्याच लोकांना विंडोज ८ जमत नाही. हा जर मुद्दा असेल तर लॅपी विदाऊट ओएस घे (डेल वाले देतात) मग त्यात हवी ती ओएस - विंडोज ७ वा एक्स्पी टाकता येतं...
३० - ३५ के मध्ये सध्या खूप
३० - ३५ के मध्ये सध्या खूप चॉईस मिळेल.
दक्षे मग लॅपी कशाला? नेटबुक
दक्षे मग लॅपी कशाला?
नेटबुक घे ना. २५ च्या आत काम होईल.
योगेशशी मी असहमत.
आत्तापर्यंतचे माझे लॅपी हे विदाउट ओएस घेतले होते पण लॅपी हा विथ ओएसच घ्यावा असे माझे मत बनले आहे. लॅपी/ नेटबुकची गॅरंटी ही ओएससकट लॅपी घेतला नसेल तर फारश्या उपयोगाची नसते असा अनुभव आहे. नशिबाने माझा दुसरा लॅपी हा माझे सेकंडरी मशिन होता त्यामुळे फार प्रॉब्लेम्स झाले नाहीत.
भ्रमाला विचार. त्याच्याइतकी
भ्रमाला विचार. त्याच्याइतकी योग्य माहिती कोणीही देऊ शकणार नाही.
तुझ्या असाइनमेंटससाठी तुला
तुझ्या असाइनमेंटससाठी तुला व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक्ससाठीची सॉफ्टवेअर्स (फोटोशॉप, कोरल ड्रॉ किंवा अजून काही), साउंड एडिटिंग लागतात का?
तसे असेल तर लॅपी. अन्यथा नेटबुक + एक्स्टर्नल ऑप्टिकल ड्राइव्ह हे उत्तम डील पडते.
पोस्ट एडिट
पोस्ट एडिट
विंडोज १० ?
विंडोज १० ?
विंडोज १० आल बाजारात???
विंडोज १० आल बाजारात???
दक्षे तू ऑफिस १० बद्दल बोलतियेस का?
योगेश एक्सपी आता मिळत नाही बाजारात सो ओएस एकतर विन-७ किंवा ८च. लिनक्स वगैरे आपापल्या सोयीनुसार निवडावे.
धन्स शुकु.. मलाच माहित नाही
धन्स शुकु.. मलाच माहित नाही की काय असं वाटलं मला.
>>भ्रमाला विचार. त्याच्याइतकी
>>भ्रमाला विचार. त्याच्याइतकी योग्य माहिती कोणीही देऊ शकणार नाही.>>> +१
एक्स्टर्नल ऑप्टिकल ड्राइव्ह
एक्स्टर्नल ऑप्टिकल ड्राइव्ह >> म्हणजे काय?
मला ते छोटं छोटं ऑपरेट नाही करता येत. मैत्रिणीकडे आहे छोटा लॅप... मला अवघड जातं. ट्राय केलंय ऑलरेडी.
ऑफिस १० हो... विंडोज आणि
ऑफिस १० हो...
विंडोज आणि त्यात काय फरक असतो का?
:घोर अज्ञानी बाहुली:
ए हो विन्डोज ७ आहे माझ्याकडे
ए हो विन्डोज ७ आहे माझ्याकडे आत्ता.. माफ करा.. गाढवपणाबद्दल.
विंडोज आणि त्यात काय फरक असतो
विंडोज आणि त्यात काय फरक असतो का? <<<

मला अचानक स्वतःबद्दल अभिमान दाटून आलाय आणि माझं अज्ञान कमी घोर आहे हे लक्षात आलंय.
ऑप्टिकल ड्राइव्ह म्हणजे ज्यावर सिडी किंवा डिव्हिडी ही चालवता किंवा जाळता येते ती.
एक्स्टर्नल म्हणजे लॅपीसारखी ती इनबिल्ट नसते. यूएसबी द्वारा ती जोडता येते.
या सेटपमधे पैसे वाचतातच पण वजन कॅरी करणेही वाचते. हल्ली स्पेसिफिक सॉफ्टवेअरं लोड करताना सोडले तर सिडी वा डिव्हिडी तशी कमी लागते त्यामुळे कॅरी करण्याची गरज पडत नाही. आणि समजा तेही लागले तरी लॅपीपेक्षा कमीच वजन होते.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद! मला
प्रतिसादाबद्दल धन्यवाद! मला इंटरनेट साठी , फोटो/ व्हिडीओ इडिटिँगसाठी लागतोय. मी एक भावी शिक्षक आहे. त्याद्रुष्टीने पण! ( अवांतर- किरणजी आपला लॅपटॉप कितीला देताय?)
मला अचानक स्वतःबद्दल अभिमान
मला अचानक स्वतःबद्दल अभिमान दाटून आलाय आणि माझं अज्ञान कमी घोर आहे हे लक्षात आलंय. >> नक्कीच नक्कीच..
मग तुम्हाला कुठलाही साधा ओएस
मग तुम्हाला कुठलाही साधा ओएस होम एडिशनअसलेला लॅपटॉप चालेल. सोनीचे बरेच चांगले आहेत बाजारात त्यांच्या साईटवर पण तुम्ही चेक करु शकता अगदी किमती पण दिलेल्या असतात तिथे आणि काही ऑफर्स पण चालू असतात.
एसरचे लॅपटॉप पण चांगले आहेत, छोटे आणि हँडी. फक्त वरती नी म्हणाली तसे ऑप्टिकल ड्राईव्ह वेगळा घ्यावा लागेल.
चांगल्या क्वॉलिटीचा पाहिजेय .
चांगल्या क्वॉलिटीचा पाहिजेय . घेउन घ्यायचा तर चांगलाच असे वाटतेय ! ऑप्टिकल ड्राईव त्यातच नाही मिळणार का?
टि.व्ही पाहता येईल का त्यावर?
एसरचे लॅपटॉप पण चांगले आहेत,
एसरचे लॅपटॉप पण चांगले आहेत, छोटे आणि हँडी. फक्त वरती नी म्हणाली तसे ऑप्टिकल ड्राईव्ह वेगळा घ्यावा लागेल.<<
नाही. एसरच्या लॅपटॉप्सना ऑप्टिकल ड्राइव्ह वेगळी नाही घ्यावी लागत. माझ्याकडे एसरचाच आहे.
सेकंडरी मशिन म्हणून लॅपी घ्यायचा असेल तर एसर ठिके. प्रायमरी मशिन असेल तर एचपी आणि लेनोव्हो ला अजूनही तोड नाहीये.
चांगल्या क्वॉलिटीचा पाहिजेय
चांगल्या क्वॉलिटीचा पाहिजेय .>> बजेट थोडं वाढवा आणि सरळ मॅक-बुक/एअर घ्या
मला पण शून्य कळतं या
मला पण शून्य कळतं या क्षेत्रातलं पण तरी माझेही दोन आणे - माझा लॅपटॉप डेल वोस्ट्रो १०१४ आहे. साडेतीन वर्षं झाली. इतका ताबडूनही व्यवस्थित आहे. गेल्या आठवड्यात हार्ड डिस्क बदलायला लागली फक्त. शिवाय १४ इंची स्क्रीन असल्यामुळे इतर लॅपींसारखा धूड नाहीये. मी विंडोज एक्स्पी + ऑफिस १० वापरतेय. इतके दिवस ऑफिस ७ होतं. नो कटकट
मला लेनेव्होचे लॅपटॉप नाही
मला लेनेव्होचे लॅपटॉप नाही आवडत. कॉम्पॅक आणि लेनेव्होचा वाईट अनुभव आहे. माझ्यासाठी डेल आणि एचपी ब्येस्ट.
माझा एसरचा अनुभव एक गोष्ट
माझा एसरचा अनुभव एक गोष्ट सोडली तर व्यवस्थित आहे.
टचपॅड लाइव्ह ठेवले तर त्याची रचना अशी आहे की टाइप करताना आपोआप आपल्या तळव्याच्या मनगटाकडच्या बाजूने टचपॅड वापरले जाते आणि जाम घोळ होतात. हे असे एचपीमधे अजिबात होत नसे.
ते सुरुवातीला माझ्या मशीनवर
ते सुरुवातीला माझ्या मशीनवर पण व्हायचं. पण सरावाने ते टाळून लिहिता येतं आता. मी टचपॅड लाईव्हच ठेवते कायम
नाही. मी खूप प्रयत्न केला. ते
नाही. मी खूप प्रयत्न केला. ते शक्य नव्हतं. मलाच नाही माझ्या असिस्टंटसनाही हाच प्रॉब्लेम आला. आता मी सरळ टचपॅड बंद ठेवून माऊस वापरते.
Pages