Submitted by वैवकु on 17 April, 2013 - 10:48
देईन मला मी जो आकार हवा आहे
आतून तुझा आधी आधार हवा आहे
शेजेत जरी आपण एकाच निजाया, पण...
नुसताच तुला माझा शेजार हवा आहे
सोडून दिली नाही पण घेतसुधा नाही
सुचवेल मला कविता तो बार हवा आहे
कित्येक दिवस मीही सुट्टी न दिली त्यांना
माझ्यातिल दु:खांना रविवार हवा आहे
दमलोय अता पुरता पूर्तीत पुराण्यांच्या
नसतील नवी स्वप्ने तो पार हवा आहे
भेटेल तुला कोणी माझ्यासम ना मृत्यो
देहात तुझा ज्याला आजार हवा आहे
विक्रीसहि विठ्ठल मी काढीन कधी माझा
पण त्याकरिता काळा बाजार हवा आहे
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुन्ही तिलकधारी आला आहे.
पुन्ही तिलकधारी आला आहे.
सुंदर नामकरण
हे नामकरण दशकांपूर्वी झालेले आहे. त्याचा आजच्या गझलकारांमधील साठमारीशी संबंध नाही. वैवकु देत असलेली लगावली चुकीची आहे. या वृत्तात एकच यती महत्वाचा आहे.
गागालल गागागा ! गागालल गागागा
ही लगावली आहे.
वर स्वाती आंबोळेने दिलेला प्रतिसाद कबीराच्या दोह्याच्या नेमका उलटा आहे.
बाहर हाथ सहार दे, अंदर मारे चोट
कर्दनकाळ मनसोक्त उधळला आहे.
तिलकधारी निघत आहे.
'रविवार' आणि 'विठ्ठल' सर्वात
'रविवार' आणि 'विठ्ठल' सर्वात आवडले.
खुरसाले . प्रसाद्जी , उकाका.
खुरसाले . प्रसाद्जी , उकाका. यांचे मनापासून व ककाकाकांचे रीत-भात म्हणून आभार !!
तिलकधारीजी माहीतीसाठी आपले विशेष आभार
खुरसाले <<<<विक्रीसहि विठ्ठल मी >>>> होय ! तुम्ही म्हणताय त्याच आर्थाने
धन्स अगेन !
छान! आवडली. कित्येक दिवस मीही
छान! आवडली.
कित्येक दिवस मीही सुट्टी न दिली त्यांना
माझ्यातिल दु:खांना रविवार हवा आहे >>> शेर जास्त आवडला
मृत्यो वरून तुम्हाला
मृत्यो वरून तुम्हाला आठवलेल्या ओळी यथायोग्य आहेत पण मला एकंदर हा शेरच तुमच्या त्या ओळी वरून सुचला आहे बहुतेक<<<< देहास मनाची मग ही नाळ कशासाठी ?>>>>>> पूर्ण शेर आठवतनैये क्षमस्व
<<<
गीता जर म्हणते की कर्तव्य करावे मी
देहास मनाची मग ही नाळ कशासाठी
असा शेर आहे तो.
धन्यवाद.
वा ! रविवार आवडलाच
वा !
रविवार आवडलाच
सोडून दिली नाही पण घेतसुधा
सोडून दिली नाही पण घेतसुधा नाही
सुचवेल मला कविता तो बार हवा आहे
ह्यावरून Richard Feynman चा एक किस्सा आठवला.
नीटसा आठवत नाही पण असाच काहीसा आहे.
तो आपला अभ्यास घेऊन डान्सबारमध्ये बसायचा.
एकदा रेड पडल्यावर एका नाचणारीच्या बाजूने बोलण्यासाठी तो न्यायालयातही गेला.
'रविवार' आणि 'विठ्ठल' सर्वात
'रविवार' आणि 'विठ्ठल' सर्वात आवडले.
Pages