दूध साधारण १ मोठा मग.
साखर २ चमचे
काजू, बदान, पिस्ते, चारोळी यांची एकत्रित पूड १ चमचा (ऐच्छिक)
संत्र्याचा गर - २ चमचे
प्रथम १ मग दूध उकळायला ठेवावे. त्यात साखर व सुकामेव्याची पूड घालून दाट होईपर्यन्त आटवावे.
ते आटेपर्यन्त एक छान केशरी रंगाचे संत्रे घ्यावे. संत्र्याचे साल वरून एक इंच व्यासाच्या वर्तुळात अलगद काढून घ्यावे. मग बोटाने अलगद आतला गर कोरून काढावा. अगदी जसा च्या तसा काढता येणार नाही, थोडा रसही निघेल. तो सगळा एका वाटीत काढून ठेवावा. त्यातून चांगला गर २ चमचे वेगळा करावा. उरलेला रस पिउन टाकावा.
आटलेले दूध गार झाले के त्यात संत्र्याचा गर घालावा.
ते सर्व मिश्रण कोरलेल्या संत्र्याच्या सालात ओतावे. फ्रिजर मधे ठेवून कुल्फी थंड होऊ द्यावी.
वाढताना धारधार सुरीने ४ तुकडे करून द्यावेत.
अशीच म्ह्णे आंब्याची कुल्फी पण करतात. उत्साही लोकांनी करून पहावी.
महाराष्ट्रात जी संत्री मिळतात
महाराष्ट्रात जी संत्री मिळतात ती रंगाने हिरवी असतात आणि साल गराला घट्ट चिकटलेली नसते. ही कुल्फी करण्यासाठी किनु वापरावीत का?
साधना तू बरेच दिवस गायब होतीस
साधना तू बरेच दिवस गायब होतीस म्हणून मी सालींचे फोटो नाही काढले आणि बघ अचानक आलीस
अग आणि मलाही तोच डाउट होता कडवटपणाचा पण आजीबात कडवट नाही लागत.
काय कल्पक रेसिपी आहे.
काय कल्पक रेसिपी आहे. धन्यवाद. नक्की करुन बघणार. दिपा तुमचे फोटो थोडे मोठे हवे होते.
जागूचे फोटो (नेहमीप्रमाणेच) अत्यंत आकर्षक!
मी दूध आटवत बसण्यापेक्षा घरात
मी दूध आटवत बसण्यापेक्षा घरात असलेले व्हॅनिला आईसक्रीम वितळवून त्यात संत्र्याचा गर घालून ते भरुन ठेवलंय.
आता काय होईल त्याचा फोटो टाकीन.
लोला
लोला
हा छोट्या संत्र्याचा वितळलेले
हा छोट्या संत्र्याचा वितळलेले आईसक्रीम प्रयोग. चांगले झाले, पटकन झाले. संत्र्याचे तुकडे/गर जरा करकरीत लागत होते. गर अजून कमी घालायला हवा होता कारण संत्रे लहान होते.
वरुन स्ट्रॉबेरी सिरप.
छान दिसत्येय की संत्रा
छान दिसत्येय की संत्रा आईस्क्रिम
अरे वा .. लोलाची एकदम वेगळीच
अरे वा .. लोलाची एकदम वेगळीच दिसत आहे .. गर जास्त आहे म्हणून असेल ..
ही क्विक ऑरेंज आईसक्रीम आयडीया छान आहे ..
लोला काय पण करते.
लोला काय पण करते.
केवळ तों पा सु ....
केवळ तों पा सु ....
करुन पाहीली आणि जमली पण
करुन पाहीली आणि जमली पण

स्वयंपाकघरात प्रथमच खुप काही creative केल्याच अभिमान वाटला
मी सालांसकट नाही खाल्ली परंतु त्या सालांमुळे अप्रतिम फ्लेवर आला होता. फ्रिजर उघड्ले तरी संत्र्याचा घमघमाट येत होता !
मस्त कल्पना शेअर केल्याबद्द्ल धन्यवाद !
छान!
छान!
परवा एका रेस्टॉरंट मध्ये ही
परवा एका रेस्टॉरंट मध्ये ही कुल्फी मिळाली

खुप छान पाककृती.
खुप छान पाककृती.
मस्त पाककृती!
मस्त पाककृती!
Pages