दूध साधारण १ मोठा मग.
साखर २ चमचे
काजू, बदान, पिस्ते, चारोळी यांची एकत्रित पूड १ चमचा (ऐच्छिक)
संत्र्याचा गर - २ चमचे
प्रथम १ मग दूध उकळायला ठेवावे. त्यात साखर व सुकामेव्याची पूड घालून दाट होईपर्यन्त आटवावे.
ते आटेपर्यन्त एक छान केशरी रंगाचे संत्रे घ्यावे. संत्र्याचे साल वरून एक इंच व्यासाच्या वर्तुळात अलगद काढून घ्यावे. मग बोटाने अलगद आतला गर कोरून काढावा. अगदी जसा च्या तसा काढता येणार नाही, थोडा रसही निघेल. तो सगळा एका वाटीत काढून ठेवावा. त्यातून चांगला गर २ चमचे वेगळा करावा. उरलेला रस पिउन टाकावा.
आटलेले दूध गार झाले के त्यात संत्र्याचा गर घालावा.
ते सर्व मिश्रण कोरलेल्या संत्र्याच्या सालात ओतावे. फ्रिजर मधे ठेवून कुल्फी थंड होऊ द्यावी.
वाढताना धारधार सुरीने ४ तुकडे करून द्यावेत.
अशीच म्ह्णे आंब्याची कुल्फी पण करतात. उत्साही लोकांनी करून पहावी.
तोंडाको पाणी आया. मस्त
तोंडाको पाणी आया. मस्त गारेगार. पण संत्रा रसाने दूध फाटणार नाही ना? ( प्रश्न वेडगळ वाटु शकतो. )
आणी फ्रिझरमध्ये किती वेळ ठेवावे? बर्फाळ होईल की मऊ? मिक्सरमध्ये परत फेटायचे नाही का इतर आईस्क्रीमसारखे? ( जास्त प्रश्नाबद्दल क्षमस्व. )
हा फोटो
हा फोटो
संत्र्याचा रस नव्हे गर
संत्र्याचा रस नव्हे गर घालायचा आहे तोपण दूध थंड झाल्यावर, मग नाही फाटत दूध. मी फ्रीजर मधे ठेवण्याआधी हॅन्ड ब्लेन्डर वर फिरवले होते कारण आमच्याकडे साय आवडत नाही. पण काही जणांना तशी साय आवडते कुल्फी मधे. मी ४ तास ठेवली होती. छान घट्ट झाली.
वॉव! खूपच मस्त दिसतय दिपा ते.
वॉव! खूपच मस्त दिसतय दिपा ते.:स्मित: आकर्षक रंगसंगती.
धन्यवाद ! आईस्क्रीम पाहुन
धन्यवाद ! आईस्क्रीम पाहुन घाईतच टाईप केले, सॉरी.:स्मित:
वॉव! खूपच मस्त दिसतय.. गरम
वॉव! खूपच मस्त दिसतय.. गरम होत आहे आनी हि कुल्फी ...बघुनच गारेगार झाले...........
मस्त गारेगार!!!!! फोटो सही
मस्त गारेगार!!!!!
फोटो सही आलाय
तोपांसु डीश नक्की करुन
तोपांसु डीश
नक्की करुन पाहण्यात येइन
वाँव
वाँव
मस्त !
मस्त !
काय जबरी दिसताएत त्या
काय जबरी दिसताएत त्या संत्र्याच्या फोडी. भारी आयडिया आहे.
भारी आयडिया!
भारी आयडिया!
मस्तच दिसतेय, छान कृती.
मस्तच दिसतेय, छान कृती.
<<परवा एका पार्टी मधे खाल्ली होते. लगेच घरी येऊन प्रयोग केला.>> दॅट्स द स्पिरीट
झक्कास आयडिया! करुन बघावी
झक्कास आयडिया! करुन बघावी लागेल.
जबरीच! नक्की करणार!
जबरीच! नक्की करणार!
भारीच!
भारीच!
उरलेला रस पिउन टाकावा. >>> हा
उरलेला रस पिउन टाकावा.
>>> हा हा हा
हे खुप आवडले, रेसिपी मधला सर्वात ऊत्कृष्ट भाग
आहाहा मस्त रेसिपी !! ते फोटो
आहाहा मस्त रेसिपी !!
ते फोटो संत्र्याचे आहेत की कुल्फी तशी दिसते ??
मस्तच दिसतेय कुल्फी
मस्तच दिसतेय कुल्फी
सह्ही आयडिया! मस्त दिसत्येय
सह्ही आयडिया!
मस्त दिसत्येय कुल्फी
बनाके देखेंगे जरुर 
मला हा प्रकार पायनॅपल किंवा
मला हा प्रकार पायनॅपल किंवा सीताफळ वापरून करायचा आहे. कन्डेन्स्ड मिल्क किंवा हाफ-अँड-हाफ वापरून कुल्फी बनवता येते का? प्रश्न बावळट असेल तर माफ करा, पण मला दूध आटवत बसण्याइतका पेशन्स नाहीये
छान आहे कल्पना. दिसतेयही
छान आहे कल्पना. दिसतेयही मस्त.
१ मग म्हणजे किती? अर्धा लिटर?
१ मग म्हणजे किती? अर्धा लिटर? एकदम मस्त दिसतेय कुल्फी. तेवढं गर काढायला जमायला पाहिजे.
भारी आहे आयडिया. मागे संजीव
भारी आहे आयडिया. मागे संजीव कपूरने खाना खजाना मध्ये असाच हापूस आंबा पोखरुन त्यात मँगो कुल्फी सेट करायला ठेवली होती.
वा सही आयडीया. आता लगेच
वा सही आयडीया. आता लगेच उद्या संत्री आणावी लागतील.
मस्त पाकृ आहे. संत्र - आटीव
मस्त पाकृ आहे.
संत्र - आटीव दूध काँबो सहीच. गावात मिळणार्या ऑरेंज क्रीमसिकलची आठवण झाली.
भारी आहे आयडिया. मृ . अगदी.
भारी आहे आयडिया.
मृ . अगदी. ऑरेंज क्रिमसिकल करणार आता मी.
झेपणेबल वाटतंय पण थोडी भिती
झेपणेबल वाटतंय पण थोडी भिती पण वाटतेय..मी कधीही कुठलीही कुल्फी/आइस्क्रिम इ. घरी बनवलं नाहीये...
ते फोटो वरच्या रेसिपीच्या पानावर टाकल्यास अजून छान वाटेल...(एक फु.स.)
मस्त आहे आयडीया .. नुसतं दुध
मस्त आहे आयडीया ..
नुसतं दुध आटवून फ्रीझ केलं तर स्मूथ टेक्स्चर येतं का कुल्फी ला? आणि कन्डेस्ड मिल्क किंवा क्रीम वगैरे काही न घालता ती गाढी मलाईदार होते का?
अजून एक वेडगळ प्रश्न
अजून एक वेडगळ प्रश्न
संत्र्याच्या सालीत कुल्फीचे दुध ओतल्यानंतर कुल्फी सालाजवळ त्या पांढर्या सालीमुळे कडवट नाही कां लागत?
पण अतिशय कल्पक आणि एक्सायटींग पाकृ आहे... मी आजच बनवेन :))
Pages