माझ्या त्या सा-या कविता

Submitted by तुषार जोशी on 3 April, 2013 - 20:20

जग रुसले तेव्हा आल्या माझ्या त्या सा-या कविता
दु:खाचे औषध झाल्या माझ्या त्या सा-या कविता

माझ्या त्या सा-या कविता

जग रुसले तेव्हा आल्या माझ्या त्या सा-या कविता
दु:खाचे औषध झाल्या माझ्या त्या सा-या कविता

मी किती लपविले सांगू संदर्भ तुझ्या प्रीतीचे
बडबडल्या सगळे साल्या माझ्या त्या सा-या कविता

कोणाचे कुणीच नसते वाटले मनाला जेव्हा
आम्ही आहोत म्हणाल्या माझ्या त्या सा-या कविता

आयुष्याच्या रूंदीची चर्चा चालवली त्यांनी
पाठवल्या मीटरवाल्या माझ्या त्या सा-या कविता

जगताना जळलो इतके स्वप्नांची राखच झाली
अन् राखेतून उडाल्या माझ्या त्या सा-या कविता

तुष्की

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुषार,

किती...................... काळाने...........

>>आयुष्याच्या रूंदीची चर्चा चालवली त्यांनी
पाठवल्या मीटरवाल्या माझ्या त्या सा-या कविता
क्या बात है!!