Submitted by शुभानन चिंचकर 'अरुण' on 2 April, 2013 - 09:33
तुझी जिन्दगानी फुलांचीच होती , इथे गंध उधळून गेलास तू
अता पाय बागेमधे ठेववेना ... अकस्मात निखळून गेलास तू
अजूनी तुझा भास होतो मनाला , अजूनी तुझा स्पर्शही जाणवे
पिसाने मनाला जसे कुर्वळावे , असा खूप जवळून गेलास तू !
कशी थांबवू आर्त आंदोलने मी , कशी थोपवू अंतरी वादळे ?
सुनामी कशी ही जगावेगळी रे , उभा जन्म ढवळून गेलास तू
युगांचा असा जीर्ण अंधार कोठे , कुणी दूर केलाय का सांग ना ...
समाधान हे की दिव्याच्या प्रमाणे , सुनी रात्र उजळून गेलास तू !
मला वाटलेले तुझ्या संगतीने , फुलावे उन्हातूनही चांदणे ...
'अरूणोदयाने' विरावे जसे दव , तसा हाय, निथळून गेलास तू ...
'अरुण' (शुभानन चिंचकर)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडली गझल.
आवडली गझल.
तिलकधारी आला आहे. 'मला
तिलकधारी आला आहे.
'मला वाटलेले' हे 'मला वाटले होते' या अर्थी वापरल्याने रसभंग झाला. जीर्ण अंधार, युगांचा वगैरेवरून शिरवाडकरांच्या पृथ्वीचे प्रेमगीत स्मरले. विरामचिन्हे मुबलक.
तिलकधारी वळत आहे.
गझल चांगली आहे पृथ्वीच्या
गझल चांगली आहे
पृथ्वीच्या प्रेमगीताचीच चाल बसते या गझलेला अभिव्यक्तीची ढब मात्र भट साहेबांसारखी आहे बहुतेक
यति दाखवण्यासाठी विरामचिन्हांचा वापर करावा हे आज प्रथमच पाहिले. यापूर्वी मी याच्याशी अनभिज्ञ होतो
पुनश्च ...गझल चांगली आहे !
अरुणोदयाने >>>>>इथे रु ; रू असा दीर्घ हवा असे मला वाटले (मला त्यातले काही समजत नाही तरीही मला वाटले ते मी सांगतो आहे इतकेच )
गझल आवडली.
गझल आवडली.
वैभवराव धन्यवाद. अरुणोदयाने
वैभवराव धन्यवाद.
अरुणोदयाने >>>>>इथे रु ; रू असा दीर्घ हवा असे मला वाटले <<<<
बरोबर आहे तुमचे. टायपो झाला आहे. सुधारणा केली आहे.
निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद !
कशी थांबवू आर्त आंदोलने मी ,
कशी थांबवू आर्त आंदोलने मी , कशी थोपवू अंतरी वादळे ?
सुनामी कशी ही जगावेगळी रे , उभा जन्म ढवळून गेलास तू >>>> हा सर्वात आवडला.