Submitted by आनंदयात्री on 1 April, 2013 - 05:57
मनी तिच्याही भाव कदाचित
तिला पाहिजे नाव कदाचित
ती दिसली, पण दुखले नाही
भरून आला घाव कदाचित!
चाल नेमकी अचूक झाली
हरेन आता डाव कदाचित
मिळाले तरी टिकले नाही
अखेर नडली हाव कदाचित
इथेच उरली आहे माती
इथेच होते गाव कदाचित
नचिकेत जोशी
(ब्लॉगवर पूर्वप्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2013/03/blog-post_26.html)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
मातीत उमटली पाउले लोक
मातीत उमटली पाउले
लोक घेतील धाव कदाचित............
>>ती दिसली, पण दुखले नाही
>>ती दिसली, पण दुखले नाही
भरून आला घाव कदाचित >>
व्वा !
ती दिसली, पण दुखले नाही भरून
ती दिसली, पण दुखले नाही
भरून आला घाव कदाचित!
क्या बात !
ती दिसली, पण दुखले नाही भरून
ती दिसली, पण दुखले नाही
भरून आला घाव कदाचित!
<< सह्ही !
इथेच उरली आहे माती इथेच होते
इथेच उरली आहे माती
इथेच होते गाव कदाचित
व्वा!
चाल नेमकी अचूक झाली हरेन आता
चाल नेमकी अचूक झाली
हरेन आता डाव कदाचित
ती दिसली, पण दुखले नाही

भरून आला घाव कदाचित!
>>
"माझं" मत तुला माहीत आहेच!
तेंव्हा परत नाही टाकत
खूप मस्त जमलीये रे .........
खूप मस्त जमलीये रे .........
ती दिसली, पण दुखले नाही भरून
ती दिसली, पण दुखले नाही
भरून आला घाव कदाचित!<<< मस्त
(असे म्हणतात की मतल्यात प्रस्थापित झालेल्या जमीनीत उर्वरीत गझल असावी, बाकी हे बिगिनर्ससाठीच)
सही !! ती दिसली, पण दुखले
सही !!
ती दिसली, पण दुखले नाही
भरून आला घाव कदाचित!................ क्या बात है रे...... !!
गाव, घाव वा वा!
गाव, घाव वा वा!
मिळाले तरी टिकले नाही अखेर
मिळाले तरी टिकले नाही
अखेर नडली हाव कदाचित शेर आवडला!
इथे चौथरे दिसती काही....
इथेच होते गाव कदाचित!
जमीनीबद्दल बेफिकीरांशी
जमीनीबद्दल बेफिकीरांशी सहमत.
घाव शेर मस्तच आहे!
घाव मस्तच !!!! बाकी शेर
घाव मस्तच !!!!
बाकी शेर नवख्या शायराचे वाटतात तुमचे नाहीत वाट्ले (वैयक्तिक जाणीव-नेंणीवेचा भाग
)
जमीन मला समजली
गागागागा गागागागा अशी असावी लय
-काफिये रदीफ पाळले गेलेत छान (माझे मत)
मिळाले तरी टिकले नाही>> इथे लयीत मला सहजता नाही जाणवली
माझे मत असे की अशा मात्रावृत्त्तात जी आपण अखंड-गा =गागागागा .....अशी वाचू शकतोय त्यात गा सहसा जवळजवळ्च्या अक्षरात ल-ल असा फोडावा......शब्द बदलला तरी चालू शकते / किमान दोहोतील अक्षराचे अंतर कमीत कमी असावे
मिळाले तरी ऐवजी जरी मिळाले असा एखादा बदल करता आला तर हे अंतर एका अक्षराचे उरते आधी हे दोन अक्षरांचे होते
धन्यवाद दोस्तहो! बेफिकीर,
धन्यवाद दोस्तहो!
बेफिकीर, चूक झाली होती. आता तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे ना?
रिया, हम्म्म
ती दिसली, पण दुखले नाही भरून
ती दिसली, पण दुखले नाही
भरून आला घाव कदाचित!
क्या बात्.....व्वा
"ती दिसली, पण दुखले नाही भरून
"ती दिसली, पण दुखले नाही
भरून आला घाव कदाचित!" >>> हा सर्वात आवडला.
मतला इतका नाही आवडला. बाकी
मतला इतका नाही आवडला. बाकी शेर मस्त!! 'कदाचित' चांगला निभावला आहे.
ती दिसली, पण दुखले नाही भरून
ती दिसली, पण दुखले नाही
भरून आला घाव कदाचित!
इथेच उरली आहे माती
इथेच होते गाव कदाचित .......... हे दोन शेर खुप आवडले
धन्यवाद
धन्यवाद